एखादी हानिकारक गोष्ट उत्पन्न झाली तरी ती फार वेळ टिकून रहात नाही हे उत्क्रांतीच्या अभ्यासाने आपल्याला दाखवून दिले आहे. मानवी मेंदू हा सध्याच्या स्वरुपात काही लक्ष वर्षे टिकून आहे पण तो अशा अनेक गोष्टी निर्माण करतो ज्या तर्काच्या चाळणीत टिकत नाहीत. तरीही लिखित आणि मौखिक इतिहास असे सांगतो की या क्रिया, सवयी आणि परम्परा हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. जगभर आहेत. कोणताही मानवी समूह – भाषा , धर्म, भौगोलिक जागा याने इतरांपेक्षा वेगळा पडला असला तरीही – या नियमाला अपवाद नाही.
जी गोष्ट हजारो वर्ष टिकून आहे ती काहीतरी उपयोगाची असावी असाही निसर्गनियम आहे.
“मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा, अनुच्छेद 21 नुसारचा मूलभूत हक्क आम्हाला वापरता आला पाहिजे. समानता केवळ पुस्तकात आहे, कारण आमच्यावर नेहमी भेदभाव व विषमता सहन करायची वेळ येते” असे म्हणत “अनुच्छेद 14 नुसार समानता द्या, अनुच्छेद 15 नुसार कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक द्या” अश्या मागण्या करणारी आंदोलने भारतात अनेकदा होताना दिसतात. पण अनुच्छेद 51-A मधील मूलभूत कर्तव्यांबद्दल जाहीर चर्चेच्या स्वरूपात कुणी काही बोलतांना दिसत नाही. हक्काची भाषा शिकणे व अधिकार मागणे ही लोकशाही शिकण्यातील महत्त्वाची पायरी असते. पण केवळ हक्कच मागण्यात पुढे असलेला पण कर्तव्यांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या बाबतीत मागे असलेला समाजसुद्धा वैचारिकदृष्ट्या मागासलेला व एका अर्थाने भांडवलशाही मानणारा होत जातो हे सूत्र महत्त्वाचे असते.