विश्वंभर चौधरी यांनी ब्राइट्सच्या नास्तिक परिषदेत आपल्या भाषणाची सुरुवात “तुम्हाला जगण्याचा सांवैधानिक हक्क आहे, पण देशाच्या प्राचीन संस्कृतीला घेऊन चालावे लागेल” असे सांगून केली. उजवे लोक मुस्लिम लोकांना देतात तेवढी जगण्याची मुभा विश्वंभर यांनी आम्हा नास्तिक लोकांना दिली. अर्थातच, “हिंदुस्थान मे रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा”. पण आपल्या खांद्यावर मृत इतिहासाचे ओझे वाहत आपण पुरोगामी कसे होणार?
चौधरी यांनी सुरुवातीलाच हे नमूद केले की politically correct असण्यासाठी धर्म गरजेचा असतो. पूर्ण भाषण politically correct पद्धतीने केल्यावर शेवटी मानाचा तुरा म्हणजे त्यांचे स्वतःला गांधी आणि आंबेडकर या दोघांचे अनुयायी आहे हे सांगणे.