आम्हां नास्तिक मित्रांचा एक छोटासा गट आहे. या गटात चर्चा करताना, आम्ही काही महत्त्वाचे नियम पाळतो ते असे. चर्चेचा विषय ठरल्यावर विषयबाह्य लिहायचे नाही, चर्चा करताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. ‘मला माहीत नाही’, असे उत्तर दिले तरी चालते पण ते द्यायचे. अशा नियमबद्ध चर्चेचा प्रत्येकाला चांगला फायदा होतो. एक तर प्रश्नांच्या खाचाखोचा कळतात. आणि दुसरे म्हणजे आपल्या गैरसमजुती दूर होतात.
तर या गटात भरतने रसेलच्या एका निबंधाकडे आमचे लक्ष वेधले. हा निबंध ‘तत्त्वज्ञानातील कूट प्रश्न’ (problems of philosophy) या रसेलच्या पुस्तकात आला आहे.