अतार्किक बोलण्यातून किंवा कृतीतून विनोद निर्माण होत असतो. असंबद्ध बोलणे, कृती करणे, हे विनोदनिर्मितीतील प्रमुख तंत्र आहे. आपण दररोजच्या धकाधकीच्या धबडग्यात विनोद निर्माण करून थोडा विसावा शोधत असतो. व्यक्तीला कामाच्या ताणतणावात तेवढाच विरंगुळा आणि त्यातून आनंद मिळत असतो. कला, सांस्कृतिक कार्यक्रमांतून होणारी आनंदनिर्मिती मनाला स्वस्थता आणि शांतता मिळवून देते. ह्याच आनंदाचा, सुखाचा निरंतर शोध पुढे नकळत काही गोष्टी घडवून आणत असतो. आनंद ह्याचा अर्थ नेहमी काहीही विचार न करणे, दु:ख विसरणे होय. दु:ख अगदी समोर दिसत असतानाही आनंद घेण्याच्या प्रक्रियेत, त्याचा विसर पडू लागतो.
विषय «तंत्रज्ञान»
यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोजगार
तंत्रज्ञानाचा विकास
२१व्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (Artificial Intelligence – AI) सर्वांत जास्त उत्सुकता दाखविली जात आहे. सर्व प्रकारच्या माध्यमामध्ये ह्याची चर्चा होत असल्यामुळे हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, त्याचे परिणाम (व दुष्परिणाम) काय आहेत व विशेष करून त्याचा रोजगारावर नेमका काय परिणाम होणार आहे, हा एक जगभर चर्चिला जाणारा विषय ठरत आहे.
माणसाने आपल्यातील बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आपल्या दैनंदिन सोयी-सुविधांमध्ये फ्रीज, फॅन, मायक्रोवेव्ह, इत्यादी आले. ऐषारामी जीवनाला पूरक अशा मनोरंजन साधनांमध्ये रेडिओ, चित्रपट, टीव्ही, वॉकमन, व्हिसिआर, इत्यादी आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी सृजनात्मकतेसमोरील आव्हाने
होमो सेपियन म्हणून आपण स्वतःला आजपर्यंत मिरवले. गर्व बाळगला की या पृथ्वीवर आपणच तितके बुद्धिमान. “What a Piece of Work is Man!” हे हॅम्लेटमधील शेक्सपिअरचे वाक्य आणि त्यानंतर त्याने तुलना करून मानवाचे केलेले वर्णन आपल्याला सांगून जाते की आपल्याला ‘माणूस’ असण्याचा किती गर्व आहे..! विसाव्या शतकापर्यंत या गर्वाला नख लावणारे असे काही घडले नाही किंवा घडलेही असेल तर ते तात्पुरतेच. लक्षातही न राहण्यासारखे. उलट मानवाने बुद्धीच्या आणि कल्पनेच्या जोरावर प्रगतीच केली. थक्क करणारी. विमाने काय बनवली, पाणबुडी, वेगाने धावणारी वाहने…. जमीन असो, आकाश असो की पाणी, आपणच सर्वश्रेष्ठ ठरलो.
कृत्रिमप्रज्ञा आणि कला
तंत्रज्ञानाचा समाजावरील परिणाम
हल्ली मुले स्मार्टफोनला चिकटून असतात म्हणून जे पालक चिंतित असतात त्यांच्या पालकांना तीसेक वर्षांपूर्वी टीव्हीचीही तशीच भीती वाटत होती. त्याआधीच्या पिढीतील तरुण मुले रेडिओमुळे बिघडतील अशीही भीती त्यांच्या पालकांनी व्यक्त केली होती. तंत्रज्ञानाविषयी लोकांची प्रतिक्रिया कशी बदलते त्याविषयी प्रतिभावंत विज्ञानकथालेखक डग्लस अॅडम्स यांनी सांगितलेल्या ठोकताळ्यांचा स्वैर अनुवाद काहीसा असा करता येईल: “तुमच्या बालपणापासून प्रचलित असलेले तंत्रज्ञान तुम्हाला स्वाभाविक आणि जीवनावश्यक वाटते. तुमच्या तरुणपणात जे शोध लागतात ते तुम्हाला क्रांतिकारक वाटतात आणि त्यांवर तुम्ही चरितार्थही चालवू शकता. परंतु, तुमच्या म्हातारपणी लागलेले शोध मात्र विकृत असतात, तरुणाईला वाईट नादाला लावून जगबुडी आणणारे असतात.”
गुणाकाराची बेरीज – वजाबाकी
लहानपणी आजी एक गोष्ट सांगत असे. भस्मासुराची गोष्ट. त्यात म्हणे भोळ्या शंकर महादेवाने भस्मासुराला एक वरदान दिले. आणि त्यात त्याला अशा काही शक्ती प्राप्त झाल्या की तो भस्मासूर ज्या कोणत्याही वस्तूवर, गोष्टीवर किंवा प्राण्यावर हात ठेवेल तो तात्काळ नष्ट होईल, जळून भस्म म्हणजे राख होईल. ही गोष्ट ऐकताना त्या भस्मासुराबद्दल राग येत होता की त्याला मिळालेल्या त्या शक्तीबद्दल त्याचा हेवा वाटत होता? हे आजतागायत ठरवता आलेले नाही. आपल्याला अशी शक्ती मिळाली तर कित्ती मज्जा! असा विचार मनात येत असतानाच आजी त्या भस्मासुराला दोन शिव्या हासडत विष्णूला मोहिनी रूप घ्यायला लावून त्या भस्मासुरालाच संपवून टाकत असे.
कृत्रिम बुद्धिमत्ता : आळं की आळा
नोव्हेंबर २०२२ च्या शेवटी जन्म झालेल्या चॅटजीपीटीने कृत्रिमप्रज्ञेच्या जगतात खळबळ उडवली. चॅटजीपीटीची महती हा हा म्हणता बहुतांश सांख्यीक-साक्षर जगतात पोचली आणि उलट-सुलट चर्चांना ऊत आला. चॅटजीपीटी हा तुमच्यासोबतच्या चर्चेतून तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे देणारा तुमचा सखा आहे(१). लार्ज लॅंग्वेज मॉडेलवर (LLM) आधारित असल्याने निबंध लिहिणे, कविता करणे, ज्या ज्या विषयांची माहिती उपलब्ध आहे त्या विषयांवर संभाषण करणे यात तो तरबेज आहे. OpenAI च्या या प्रारूपापाठोपाठ बाजारात अनेक प्रारूपे आली. आधी आकाराने गलेलठ्ठ असलेली ही प्रारूपे फाईन-ट्युनिंगद्वारे हळूहळू रोड होताहेत.
कृत्रिमप्रज्ञा आणि सर्जनशीलता
अवघ्या सात-आठ महिन्यांपूर्वी लाँच झालेले चॅटजीपीटी आणि पर्यायाने कृत्रिमप्रज्ञा हे क्षेत्र आज जगभरात सर्वांत मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बेरोजगारीची सर्वात मोठी लाट येणार, तब्बल तीस कोटी रोजगार यातून बाधित होऊ शकतील असे काही अहवाल सांगत आहेत. मानवी सर्जनशीलतेवर कृत्रिमप्रज्ञेचा हा हल्ला आहे असे काही चिंतातूर जंतू ओरडत आहेत, तर तंत्रज्ञानाचे बहुतेक जाणकार, तज्ज्ञ तिचे स्वागतही करत आहेत. चॅटजीपीटीमार्फत ओपनएआय कंपनीने जगभरातील भाषा आणि सर्जनशीलता क्षेत्रात आघाडी घेतली आहे. त्यांनी असे एक चॅटबॉट बनवले आहे जे तुमच्यासाठी लेखनिकाचे काम करते.
जननशील कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रश्न सोडवू शकत नाही
बुद्धिमत्ता म्हणजे काय?
अवजारे वापरणे हे बुद्धिमत्ता असण्याचे एक लक्षण मानले जाते. आपण माणसेही ज्या वानरगणाचा भाग आहोत, त्यातले चिंपांझी काडी वापरून मुंग्या पकडून खातात.
माझ्या एका मित्राकडे कुत्रा आहे. काही वर्षांपूर्वी तो मला सांगत होता की त्याच्या कुत्र्याची प्रजाती कुत्र्यांमधली दुसऱ्या क्रमांकाची आहे, हुशारीच्या बाबतीत. मी त्याला म्हणाले, “माझ्याकडे मांजर आहे. तिला कॅल्क्युलस येत नाही; कोडिंग करता येत नाही; तिची भाषा अत्यंत मर्यादित आहे. मला कॅल्क्युलस येतो, कोडिंग येते. त्यामुळे दोघींच्या पोटापाण्याची सोय मला लावता येते. आणि आपल्याला खायला कोण घालते, कुणावर विश्वास ठेवता येतो हे तिला बरोबर समजते.
कृत्रिमप्रज्ञा आणि सर्जनशीलता
दिलेल्या उत्तरांच्या आधारे जर एखाद्या मानवी परीक्षकाला, ती उत्तरे मानवाने दिली आहेत की यंत्राने हे ठामपणे निश्चित करता आले नाही तर ते यंत्र मानवासारखे आणि मानवाएवढे विचारी आहे असे म्हणता येईल अशी ही यंत्राची बुद्धिमत्ता/प्रज्ञा तपासण्याची परीक्षा अॅलन टुरिंग ह्या ब्रिटिश गणितज्ञाने १९५० मध्ये सुचवली. २०२२-२३ मध्ये ChatGPT, Bard आणि ह्यांसारख्या माध्यमांद्वारे सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिलेली कृत्रिमप्रज्ञा टुरिंगच्या परीक्षेत उत्तीर्ण होते. म्हणून आजच्या कृत्रिमप्रज्ञेला मानवाएवढी बुद्धिमत्ता/प्रज्ञा आहे म्हटले जाते. मात्र मानवी मेंदूच्या माहितीच्या साठवण आणि प्रक्रिया करण्याच्या क्षमतेच्या तुलनेत आजच्या कृत्रिमप्रज्ञेची क्षमता अफाट असल्याने आजची आधुनिक कृत्रिमप्रज्ञा मानवाहून जास्त बुद्धिमान ठरेल आणि (नजीकच्या?)
