विषय «इतर»

“पैसा” उत्पत्ती आणि उत्क्रांती

प्रत्येक मनुष्याला आपल्या कामाचा/वस्तूचा/वेळेचा मोबदला हवा असतो. हा मोबदला सोयिस्कर स्वरूपात, दीर्घकाळ टिकेल असा, भविष्यासाठीही राखून ठेवता येईल असा आणि त्याबदल्यात काही मिळवून देईल असा असावा. पूर्वी अशा त-हेची काही सोय नव्हती. लोक रोखठोक व्यवहारात वस्तूंच्या अदलाबदली करत. परंतु हे फारच जिकिरीचे असे. अशा प्रकारची स्थानिक पातळीवरची देवाणघेवाण म्हणजे व्यापार नव्हे.
तेव्हा मग व्यापा-यांनी, सावकारांनी हुंड्या, हवाला, वचनचिठ्या देण्यास सुरुवात केली. त्या त्या व्यक्तीची पत आणि विश्वासार्हता यांवर हा व्यवहार चाले. परदेशी व्यापाराच्या वेळी सावकार-श्रेष्ठी गायी, शेळ्या-मेंढ्या अशा वस्तू तारण म्हणून ठेवून घेत.

पुढे वाचा

आम्ही आणि ‘ते’! (भाग २)

मागच्या अंकामध्ये समाजाची चिकित्सक वृत्ती कोणत्याही एका जातीकडून कुंठित होत नसते हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. ह्या अंकात बहुजनांचे शोषण करण्याचा मक्ता फक्त ब्राह्मणांकडे नव्हता हे सांगण्याचा यत्न करणार आहे.
अन्याय आणि शोषण ह्यांचा देशमुख त्याच वाक्यात पुढे उल्लेख करतात. त्यांच्या वाक्यातून अन्याय आणि शोषण फक्त ब्राह्मणांनीच केले असे सूचित होते. परंतु ते तसे नाही हे इतिहासाच्या कोणत्याही चिकित्सक वाचकाला समजण्यासारखे आहे. आमच्या देशात अन्याय आणि शोषण आम्ही सर्वांनीच एकमेकांचे केले. येथे म्हणजे भारतात महाराष्ट्रातल्या काही मोजक्या प्रदेशात शाहूचे मुख्यप्रधान म्हणून पेशव्यांनी राज्य केले असले तरी अन्यत्र कोठेही ब्राह्मण राज्यकर्ते नव्हते.

पुढे वाचा

प्राचीन आर्यसंस्कृति – १

समाजस्वास्थ्याच्या नोवेंबरच्या अंकात ‘चमत्कारिक खटला’ या मथळ्याखाली फ्रायबुर्ग (जर्मनी) येथील ओटो व त्याची बहीण एलीझ यांवर निषिद्ध समागमाबद्दल १९२८ साली झालेल्या खटल्याची हकीकत आली आहे. सदर खटल्यांतील पुरावा बनावट होता असे पुढे दिसून आले तरी लोकहिताच्या दृष्टीने शिक्षा ताबडतोब पुरी। होणे इष्ट असल्यामुळे अपील अर्जाचा निकाल होईपर्यंत ती तहकूब करता येत नाही असा जबाब आरोपीच्या वकिलास देण्यांत आला.
निषिद्ध-समागमाचे योगाने इतर कोणाचे नुकसान होत नसल्याने असले खटलेच गैर आहेत. पण प्रजेच्या पापाचा हिस्सा यमाच्या दरबारांत राजाच्या खात्यावर चढवला जातो अशी राजकत्र्यांची समजूत असल्यास व निषिद्ध समागम हे पातक मानल्यास बहीणभावाच्या निषिद्ध संबंधाबद्दल राज्यकर्त्यांनी खुनशी वृत्ति दाखवणे क्षम्य होईल.

पुढे वाचा

मंटो नावाचे बंड

येत्या १८ जानेवारीला मंटो मरून ४५ वर्षे होतील. वयाच्या ४३ व्या वर्षी तो वारला. काही समीक्षकांच्या मते तो उर्दूतला सर्वश्रेष्ठ कथाकार होता. नोकरीच्या शोधात अमृतसरहून मुंबईला आला अन् चित्रपट-व्यवसायात शूटींगच्या वेळी संवाद दुरुस्त करून देणारा मुन्शी म्हणून नोकरीला लागला. लवकरच ‘मुसव्विर’ (चित्रकार) या उर्दू सिनेसाप्ताहिकाचा संपादक म्हणून त्याला जरा प्रतिष्ठेची नोकरी मिळाली. ‘बद सही लेकिन नाम तो हुवा’ अशा बेहोशीत लिहायचा. स्वतःबद्दल फार थोडे सांगणारा
मंटो म्हणतो, “माझ्या आयुष्यात सांगण्यासारख्या तीनच गोष्टी. एक माझा जन्म, दुसरे, माझे लग्न आणि तिसरे माझे लिहिणे.

पुढे वाचा

मांसाहार – उपयुक्ततावादी!

प्राचीन काळच्या भारतीय समाजात मांसाहाराला मान्यता होती, हे डॉ. लोखंडे यांच्या लेखात (१०.९) वयाच पुराव्यांच्या मदतीने दाखवले आहे. पण पूर्वी काय होते आणि ते का बंद झाले, हा एक दृष्टिकोन झाला. मांसाहाराला विरोध करण्यामागची एक सरळसरळ उपयुक्ततावादी भूमिका अशी –
सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून वनस्पतींची वाढ होते. वनस्पती खाऊन शाकाहारी जीव जगतात. अशा जीवांना खाऊन मांसाहारी जीव जगतात. या तीन्ही ऊर्जा-रूपांतरांची कार्यक्षमता सुमारे पंधरा टक्क्यांएवढी (एक-सप्तमांश म्हणा) आहे. म्हणजे वनस्पती खाऊन एक कॅलरी ऊर्जा घेण्यात सात कॅलरी सूर्यप्रकाश परहस्ते ‘खाल्ला जात असतो.

पुढे वाचा

महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात

एक वृत्तान्त :
मराठी भाषेची सद्यःस्थिति आणि भवितव्य या विषयावर कोकण मराठी साहित्य परिषदेत (को.म.सा.प.) परिसंवाद झाला. प्रत्यक्षात ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात’ अशा शब्दात विषय मांडला तरी आशय तोच.
न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे हे परिसंवादांचे अध्यक्ष होते. आणि मुंबईसकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त भाषासंचालक डॉ. न. ब. पाटील आणि सुरेश नाडकर्णी हे वक्ते होते. मराठीची आणि मराठी माणसाची महाराष्ट्राच्या राजधानीतून हकालपट्टी होत आहे, द्रव्यबळ आणि स्नायुबळ हेच प्रभावी ठरत आहेत, असा मुद्दा अध्यक्षीय भाषणात मांडला गेला. नार्वेकरांनी वृत्तपत्रसृष्टीतील मराठीची गळचेपी निदर्शनास आणली.

पुढे वाचा

प्रिय वाचक

१. वैचारिक लिखाणाची दाद घेऊन प्रतिक्रिया देणे हे काम कठीण आहे. म्हणून कोणी केले की आनंद होतो. मग तो प्रतिवाद पुरेसा तर्कशुद्ध का नसेना. या दृष्टीने अमेरिकेतील दोन वाचकांचा मी आभारी आहे. विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती – ही आमची मुलाखत कॅनडातून प्रसिद्ध होणा-या ‘एकता’या त्रैमासिकाच्या जुलैच्या अंकात आली. तिची दखल ऑक्टोबर ‘९९ च्या ‘एकता’त दोन लेखकांनी घेतली. त्या आक्षेपांना थोडक्यात उत्तरे या अंकात दिली आहेत. ‘एकता’तील आक्षेपकांचे लेख विस्तारभयास्तव देता आले नाहीत.
२. कच्च्या आहाराचा प्रयोग हा र. धों. कर्वे यांचा लेख पुनर्मुद्रित करीत आहोत.

पुढे वाचा

विवेकवादाला हरकत – दोन प्रतिक्रिया

१. उत्तर अमेरिकेत कॅनडामधून ‘एकता’ नावाचे एक मराठी त्रैमासिक प्रसिद्ध होते. त्याच्या जुलै ‘९९ च्या अंकात आमची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. श्रीराम गोवंडे या न्यूजर्सीमधील आमच्या मित्राने ती घेतली होती. (आजचा सुधारकच्या ऑक्टोबरच्या अंकात नंतर ती पुनर्मुद्रित केली आहे) ‘विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती’ या नावाने. एकताच्या ऑक्टोबर ‘९९ च्या अंकात आम्ही मांडलेल्या काही मुद्द्यांवरून दोन प्रतिक्रिया आल्या आहेत. त्या कनेक्टिकट येथील आमचे मित्र श्री. सुनील देशमुख आणि मॅसॅच्युझेट्सच्या डॉ. ललिता गंडभीर यांनी आमच्याकडे पाठवल्या. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. त्यांपैकी एक ‘धर्म का हवा?’

पुढे वाचा

पोपप्रणीत धर्मविस्तार

भारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना पायांनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली. इ.स. १४७८ मध्ये पोप (चवथा) सिक्स्टस् ह्यांनी स्पॅनिश इन्क्विझिशनला अधिकृतपणे मान्यता दिली. ह्या स्पॅनिश इन्क्विझिशनने आपल्या कारकिर्दीत सुमारे चार लाख लोकांचा अमानुष छळ करून वध केला! आमच्या धर्मशास्त्राचा हजारो पानांचा अनेक खंडी इंग्रजी इतिहास लिहिणा-या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे ह्यांनी हे लिहिले आहे! त्यांच्या धर्मशास्त्राच्या इतिहासाचा पहिला खंड १९३० साली निघाला व शेवटचा १९६२ साली!

पुढे वाचा

ब्राह्मणांचे गोमांसभक्षण

धार्मिक दृष्टीने गोहत्या हा विषय संवेदनशील असला तरी सत्यशोधन कोणालाही आक्षेपार्ह वाटू नये. वैदिकवाडमयाचे व प्राचीन संस्कृत, पालि-प्राकृत साहित्याचे जे विद्वान यांच्या संशोधनातून व खुद्द वेदांतून मूळ वचने देऊन प्रस्तुत निबंध सज्ज केला आहे.
रजनीकांत शास्त्री, साहित्य सरस्वती, विद्यानिधि –
(१) “ऋग्वेद के अध्ययनसे पता चलता है कि वैदिककाल में जौ और गेहूं खेतों की आज तत्कालीन हिन्दुओंके मुख्य खाद्य पदार्थ थे।… मांसभोजनभी उस कालमें बहुत प्रचलित था और आधुनिक हिन्दू जनता यह जानकर चौक उठेगी कि अन्य खाने योग्य पशुओंके मांस की तरह गोमांस भी खाद्य पदार्थों में सम्मिलित था”
(हिंदु जाति का उत्थान ओर पतन पृ.

पुढे वाचा