संग्राह्य पुस्तके
संपादक, आजचा सुधारक
खालील दोन पुस्तके संग्रही असावयास हवीत. .
(१) राजेश्वर दयाळ A Life of Our Times प्रकाशक – Orient Longmans
(२) अनिल अवचट – अमेरिका, प्रकाशक – कोठावळे
तसेच खालील दोन लेख वाचकांनी जरूर संग्रही ठेवावेत. दहा रु. पाठविल्यास मी त्या लेखाच्या झेरॉक्स पाठवीन.
(१) शिवाजीच्या स्वराज्य-चळवळीमागील ऐतिहासिक प्रेरणा धार्मिक होत्या काय? लेखक – वा. द. दिवेकर – नवभारत – एप्रिल १९८६.
(२)न झालेल्या (तळपद्यांच्या) विमानोड्डाणाची सुरस विद्वत्-कथा लेखक श्री. गो.ग. जोशी – लोकसत्ता – ता. १८-६-१९७८.
विषय «इतर»
पुरोहितब्राह्मणांना अनुकूल अशी समाजव्यवस्था
कलियुग म्हणजे मानवी अधःपाताची शेवटची पायरी असा प्रचार करण्यात पुराणांचा हेतु स्पष्टच आहे. पुरोहित ब्राह्मणांना अनुकूल असलेली समाजव्यवस्था सुवर्णयुगाची असे निश्चित झाले म्हणजे त्यात प्रत्यक्षात दिसून येणारी सर्व स्थित्यंतरे कलियुगातील अवनतिसूचक आहेत असे ओघानेच ठरते. विशेषतः जैन, बौद्ध वगैरे पाखंडांनी नवे आचारविचार, नव्या ईर्षा समाजात उत्पन्न केल्या. त्यांचा निराळा निषेध करण्याचे प्रयोजनच उरत नाही. ज्या पातकांच्या भारामुळे पृथ्वी कलियुगात दबून जाते ती पातके व्यासाची भविष्यवाणी म्हणून पुराणांत वर्णिलेली आहेत. त्या पातकांचे निरीक्षण केले म्हणजे पुरोहितवर्गास विशेष भय कसले वाटत होते ते स्पष्ट होते.
समाजवाद, बाजारपेठा आणि लोकशाही
गेले काही दिवस समाजवादी तत्त्वांची पिछेहाट वेगाने होत आहे आणि भांडवलशाहीचे नव्याने कौतुक होत आहे. हे कौतुक बाजारपेठांवर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देदीप्यमान यशामुळे होत आहेच पण समाजवादी देशांच्या पिछेहाटीमुळेही होत आहे. सोव्हिएट रशियां, पूर्व युरोपीय देश आणि चीन ह्यांसारख्या देशांमध्ये पारंपरिक समाजवादी पद्धतींपासून अलग होण्याची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. समाजवादी तत्त्वांची छाननी, अंतर्गत टीका ह्यामुळे हे बदल घडून येत आहेत, ते बाहेरून लादलेले नाहीत. समाजवादी दृष्टिकोनातून विचार केला तर खरी चिंता करण्यासारखी बाब ही आहे की केवळ संघटनेच्या व्यवहारातच नव्हे तर तात्त्विक चर्चेतही समाजवादी संकल्पनांना पराभव पत्करावा लागत आहे.
महागाई का होते?
आजचा सुधारक मध्ये अलीकडे सामाजिक विषयांवर लेख प्रसिद्ध होऊ लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे. सामान्य जनतेला दैनंदिन जीवनात जे चावते, पोळते त्यास वाचा फोडून त्यावर नागरिकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे व अंततः समाजाचे प्रबोधन करणे हे पुरोगामी विचारसरणीचे ध्येय साध्य होण्यास त्यामुळे साहाय्य होते हे निश्चित. अलीकडे महिलांना नोकरी करण्यास भाग पाडण्यास महागाई कारणीभूत आहे असे सुचविण्यात आले. परंतु महागाई का होते हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. ह्यासंबंधी माझ्या अभ्यासातून व चिंतनातून मला जे जाणवते ते मी आ.सु. च्या वाचकांसमोर मांडू इच्छिते.
चर्चा -श्री. महाजन ह्यांच्या लेखाच्या निमित्ताने
(१)’सत्य’ स्थलकालनिरपेक्ष असते काय?
माणसांना विज्ञानाच्या अभ्यासातून जाणवणारे सत्याचे स्वरूप बदलत जाणारे आहे. पण ह्यावरून खुद्द ‘सत्य’ बदलत जाणारे आहे किंवा नाही यावर काहीच प्रकाश पडत नाही. अखेर माणसे त्यांना जाणवणारी सत्ये सांगतात, ती केवळ वेगवेगळ्या रूपकांच्याद्वारे — models किंवा allegories च्या माध्यमातून. अशी रूपके बदलतात, असे विज्ञानाच्या इतिहासातून दिसते.
विज्ञानातील रूपके मान्य होण्यासाठी त्या रूपकांनी काही क्षेत्रांतल्या काही घटनांचा सुसंगत अर्थ लावायला हवा. जर या रूपकांच्या वापराने काही भाकिते वर्तवता आली, तर उत्तमच. श्री. महाजन अशा तीन रूपकांची उदाहरणे तपासतात (न्यूटनीय भौतिकी, सापेक्षतावाद आणि पुंजवाद).
उदारीकरणात रुतलेली प्रसारमाध्यमे
भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण ९१ साली स्वीकारल्यानंतरच्या अवस्थेबद्दल मी बोलणार आहे. गेले दोन महिने माझे फिरणे जरा कमी करून मी घरी घालवले. ह्या दोन महिन्यांत मी दोन गोष्टी केल्या. एक–टीव्हीवरचे काही कार्यक्रम पाहिले, दुसरे – माझ्याकडे असलेल्या ३०-४० मासिकांची मुखपृष्ठे फाडली व अवती-भोवती पसरून ठेवली. जेणेकरून मला या मासिकांतून कोणकोणते विषय मांडले आहेत ते पाहता येईल. मला असे आढळले की टीव्ही व मासिके ह्यांमधून मुख्यतः दोन विषयासंबंधीचे कार्यक्रम सातत्याने मांडले जात होते. विषय होता – भारतातील मोठ्या शहरांमध्ये वजन कमी करण्याच्या क्लिनिक्समध्ये झपाट्याने झालेल्या वाढीसंबंधी.
सत्याविषयीचा प्रकारभेद गैरलागू
प्रा. अनिलकुमार भाटे यांस,
स.न.
आपण माझ्या विवेकवादावरील लेखांसंबंधी (आ.सु. जानेवारी ९८, पृ. ३०८) विचारले. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यापूर्वी या उत्तरांतील त्रोटकपणाबद्दल आपली क्षमा मागतो. तीन वर्षांपूर्वी मला झालेल्या आजारानंतर माझी लिहिण्याची ताकद भराभर कमी होत गेली आहे, आणि लिहिणे कष्टप्रद झाले आहे.
माझ्या लेखांसंबंधी आपले अवलोकन (observation) असे आहे की त्याचा सर्व भर Anglo-American तत्त्वज्ञानावर आहे. आपला हा समज कशामुळे झाला असेल ते मला सांगता येत नाही. कारण विवेकवाद ही सर्वच तत्त्वज्ञानांत समान असणारी विचारसरणी आहे अशी माझी समजूत आहे.
अमेरिकेत आजचा सुधारक
काही एका कौटुंबिक कारणाने अमेरिकेला जायचा योग आला. जाताना मोहनींकडून तिथल्या वर्गणीदारांची यादी घेतली. म्हटले, विचारू कसा वाटतो आजचा सुधारक ? खरोखरी वाचता की कोणाच्या भिडेखातर १० डॉलर्स भरले, असे झाले ? यादी तीसेक जणांची होती. पण काही वाचक निश्चल होते. वर्ष उलटले, स्मरणपत्रे गेली तरी हूँ की चूं नाही. न्यू जर्सीत ४ जण, त्यातली एक मुलगीच मधू. तिने इंटरनेटवरून पत्त्यावरून एकदोन फोन नंबर काढून दिले. एका सकाळी फडणिसांना फोन केला. उत्तर आले, ते आंघोळीला गेले आहेत. नंबर ठेवून द्या. तेच फोन करतील.
एका जुन्या वादाचा शेवट-फलज्योतिष : ग्रहांसहित आणि ग्रहांविरहितही; पण दोन्ही प्रकार भ्रामक!
फलज्योतिषाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या फलज्योतिषातले ग्रह सुबुद्ध असतात व त्यांना फलज्योतिषाचे नियम ठाऊक असतात. दुसऱ्या प्रकारच्या फलज्योतिषाला आकाशातल्या ग्रहांची गरज नसते. ग्रहांची नावे तेवढी त्यात वापरलेली असतात! माझे हे विधान वाचकांना चमत्कारिक वाटेल, पण ते अक्षरशः खरे आहे हे मी सिद्ध करणार आहे.
वादापुरती मान्य अशी गृहीतके
(१) ग्रहांचे फलज्योतिषीय प्रभाव पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर सतत पडत असतात. ग्रहांचे प्रकाश-किरण मात्र फक्त अर्ध्या भागावरच पडत असतात हे लक्षात ठेवावे. (२) प्रत्येक ग्रहाच्या प्रभावात १२ घटक समाविष्ट असतात. (३) प्रत्येक घटक कुंडलीतल्या एकेका स्थानाशी निगडित असतो, व (४) कुंडलीच्या स्थानाचे फल त्या घटकामुळे मिळते.
असामान्य मानवी जीवनाचा निर्देशक, जन्मकाळ!
आजचा सुधारक’ (९:४, १२३-१२४) मध्ये मी मांडलेल्या एका कल्पनेवर अभ्युपगमावर (hypothesis) भरपूर प्रतिकूल प्रतिक्रिया होण्याची मी वाट पाहत होतो. कारण आ.सु.च्या माध्यमातून चर्चा करण्यासाठीच मी तो लेखप्रपंच केला होता. परंतु केवळ श्री. पंकज कुरुळकर यांच्याखेरीज (आ.सु., ९:८ पृष्ठ २५२, २५३) कोणी या विषयावर आपले मत जाहीरपणे व्यक्त केलेले नाही. पुण्याचे प्रा. प्र.वि. सोवनी यांनीही मी मांडलेली कल्पना हास्यास्पद आहे असे खाजगी पत्रातून कळविले आहे. कदाचित खरोखरच माझी कल्पना हास्यास्पद असू शकते. परंतु मी माझ्या अभ्युपगमावर ठाम आहे कारण सर्वच नवीन कल्पनांची प्रारंभी अशीच वाट लावण्यात येते असे इतिहासात अनेक दाखले आहेत.