विषय «इतर»

कावळे आणि कोकिळा

कावळ्याच्या घरट्यांत कोकिळा अंडी घालते. अंडी घालताना कावळ्याची अंडी घरट्यातून बाहेर ढकलून देते. कोकिळेची अंडी लवकर फुटतात व त्यातून लवकर पिल्लू बाहेर येते. ते पिल्लू देखील सोबतएखादे कावळ्याचे पिल्लू असेल तर त्याला घरट्याबाहेर ढकलून देते. कावळा मात्र त्याला आपलेच पिल्लू समजून वाढवतो. पिल्लू मात्र वाढल्यावर सर्वार्थाने कोकिळाच होते, त्याच्यात कावळ्याचे कोणतेही गुणधर्म येत नाहीत. या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांना माहीतच आहेत.
आपल्या समाजालाही हा काक-कोकिल न्याय चपखलपणे लागू पडतो हे मात्र आपण लक्षात घेत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीची मुले आपल्या घरोघरी वाढत आहेत.

पुढे वाचा

विधवाविवाह चळवळ

ईश्वरचंद्र विद्यासागर यांना एकदा त्यांच्या आईने विचारले, “तू एवढे मोठमोठे ग्रंथ वाचतोस, परंतु या ९ वर्षांच्या चिमुरड्या विधवेचे दुर्भाग्य ज्यामुळे नष्ट होईल असे एखादे शास्त्र तुला माहीत नाही का?’ ईश्वरचंद्रानी त्या मुलीकडे पाहिले. त्यांना तिची कणव आली. त्यानंतर त्यांनी महत्प्रयासाने विधवाविवाहासंबंधीचे शास्त्रार्थ शोधले आणि विधवांना क्रूरपणे वागवणाच्या दुष्ट रूढीविरुद्ध लढा आरंभला.
ही हकीगत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली. आज ती आठवायचे कारण म्हणजे नुकतेच विधवाविवाह चळवळ हे पुस्तक हातांत पडले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे स.गं. मालशे आणि नंदा आपटे यांनी केलेल्या संशोधनावर आधारलेले हे पुस्तक त्याच विद्यापीठाच्या स्त्रीसंशोधन केंद्रातर्फे १९७८ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

पुढे वाचा

स्वातंत्र्याच्या जबाबदार्याश

“समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य रुजवायचे असेल तर ती दुहेरी प्रक्रिया असते. एक तर इतरांच्या बाबतीत आपण सहिष्णू असावे लागते. आमच्या सहिष्णुतेच्या मर्यादा आपल्यापेक्षा वेगळा विचार करणान्यांच्या बाबत उदासीनता इतक्याच आहेत. सहिष्णुतेची खरी कसोटी आपल्या श्रद्धांवर आघात करणाच्या लिखाणांच्याविषयी आपण किती सहिष्णुता दाखवतो या ठिकाणी लागते. कुणीच कुणाची मने दुखवायची नाहीत, सर्वांनी एकमेकांच्या अंधश्रद्धा जपायच्या, या दिशेने आपल्या सहिष्णुतेचा प्रवास चालू असतो! मुळात ही दिशाच चूक आहे. सर्वांनीच सर्व बाबींची चिकित्सा करायची आणि या चिकित्सेबाबत श्रद्धा कितीही दुखावोत, सहिष्णुतेने वागायचे – या दिशेने आपल्याला प्रवास केला पाहिजे.

पुढे वाचा

प्रस्थानत्रयी व राष्ट्रवाद

भाषेचे अभ्यासक भाषेच्या दोन उपयोगांमध्ये भेद करतात. एक निवेदक, आणि दुसरा भावनोद्दीपक. निवेदक उपयोगात लेखकाचा बोलणान्याचा उद्देश माहिती देणे, वस्तुस्थितीचे वर्णन करणे हा असतो, तर दुसन्यात वाचकाच्या/श्रोत्याच्या भावना उद्दीपित करणे आणि त्याला कोणत्यातरी कर्माला प्रवृत्त करणे हा असतो. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला ‘ब्राह्मण म्हणणे जवळपास विकारशून्य असू शकेल. पण त्याला ‘भट’ किंवा ‘भटुड’ म्हणणे त्याला क्रोधाविष्ट करण्यास पुरे होईल. सामान्यपणे भाषेत दोन्ही प्रकार कमी अधिक प्रमाणात एकत्र असतात; पण क्वचित भाषेचा उपयोग शुद्ध निवेदक किंवा शुद्ध भावनोद्दीपक टोकाजवळ जाऊ शकेल. शुद्ध निवेदक प्रकार निर्विकार असू शकेल, तर शुद्ध भावनोद्दीपक प्रकार जवळपास निर्विचार असू शकेल.

पुढे वाचा

विज्ञानातील व्याधी (Diseases in Science) -प्रा. जॉन एकल्स यांचे काही विचार

. इतकेच नव्हे तर या व्याधींवर करण्याचे उपाय हे कार्ल पॉपर यांच्याच लेखनात व विचारांत मिळू शकतात हे एकल्स यांनी स्पष्ट केले आहे. विज्ञानक्षेत्रातील व्याधींबद्दल प्रा. एकल्स यांचे विचार वाचकांसमोर मांडावे असे वाटल्यावरून हे टिपण लिहिण्यास घेतले.
सुरुवातीलाच प्रा. एकल्स यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे, की त्यांना हे विचार ते स्वतः संशोधनकार्यातून निवृत्त झाल्यावर, मागील आयुष्यक्रमावर दृष्टिक्षेप करताना सुचले. ते स्वतः संशोधनात गुंतले असताना त्यांच्यातही या व्याधी व हे दोष अंशतः होतेच. विज्ञानांतील संशोधनकार्य ज्या रीतीने चालविले जाते, ज्या संस्थांचा या कार्याला पाठिंबा आहे, त्यांना विज्ञान तंत्रज्ञान यांतील प्रगतीमुळे काय अपेक्षित आहे, अशा तर्हेाच्या प्रश्नांशी त्यांनी निर्देश केलेल्या व्याधी व दोष निगडित आहेत.

पुढे वाचा

आडारकरांच्या उत्तराविषयी

डॉ. हेमंत आडारकरांच्या लेखाला मी मे ९७ च्या अंकात दिलेल्या उत्तराला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते याच अंकात छापले आहे. त्याविषयी दोन शब्द लिहिणे अवश्य वाटते.
वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे या माझ्या विधानावर ते म्हणतात की देश म्हणजे देशातील माणसे.
त्यासंबंधी एवढेच म्हणणे पुरे की विज्ञान म्हणजे प्रमाणित ज्ञानाचा संचय, तर वैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिक उद्योग करणारी माणसे. माणसे असल्यामुळे माणसांचे दोष त्यांच्याठिकाणी असू शकतात. (उदा. आपल्या शोधाविषयी खात्री करणे किंवा प्रीति असणे.) परंतु विज्ञान कोणत्याही काळी सिद्ध झालेले आणि सर्वमान्य झालेले ज्ञान.

पुढे वाचा

मी आस्तिक / नास्तिक का आहे?

आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द तसे परिचयाचे. पण तरीही त्यांचा नेमका अर्थ प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून. साध्या सोप्या भाषेत मी देवावर विश्वास ठेवणारा आस्तिकआणि तसं न करणारा तो नास्तिक असं समजते. आणि याच साध्या अर्थाच्या अनुषंगानं माझे विचार मांडते. मी नास्तिक का आहे? प्रश्नाच्या उत्तराचे अनेक कप्पे आहेत. काही उदाहरणांसह ते स्पष्ट करीनच.
मुळात लोक आस्तिक का असतात? पूर्वीचा काळ ढवळून पाहिला तर कुणीतरी धर्मगुरू – धर्माची शिक्षणप्रणाली पुढं हाकणारे असे जे कुणी होते त्यांनी समाज आपल्या इशा-यांवर नाचवण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

श्री माधव रिसबूड यांस आणखी एक उत्तर

आ. सु. (जुलै ९७) ला लिहिलेल्या पत्रात श्री. माधव रिसबूड लिहितात – ‘फलित बीजांडापासून आरंभ करून संपूर्ण देह तयार होईपर्यंत ज्या क्रिया घडतात त्यात जोडीजोडीचे अवयव ज्या पेशींपासून बनतात त्या पेशींची दोन अधुके एकमेकांपासून वेगळी होऊन दूर होण्याची क्रिया असते. ही दोन अधुक एका काल्पनिक मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस ठराविक अंतरावर जाऊन थांबतात, त्यांना डावे-उजवेपणाचे भान असते व त्यानुसार त्यांची पुढली जडणघडण होते, आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना सिमेट्रीचे भान असते. या तीन गोष्टी निश्चितपणे हे दर्शवितात की कसलीतरी जाणीव इथे कार्यरत आहे.”

पुढे वाचा

सामाजिक सुधारणा आणि आजचा सुधारक

विवेकवादाला (rationalism) ला वाहिलेले “आजचा सुधारक’ हे जगातील प्रमुख मराठी मासिक आहे. या मासिकाचे लक्ष्य मराठी भाषिक, विशेषत: महाराष्ट्रातील जनता हेच आहे हे सुद्धा उघड आहे. ही जनता म्हणजे सामान्य जनता नसून, समाजातील विचार करण्याची आवड व कुवत असलेली मंडळी एवढीच “आ.सु.” ची वाचक आहेत. परंतु ही मोजकी मंडळीच नवे तर्कशुद्ध विचारही प्रसवू शकतात.
“आजचा सुधारक’ च्या पहिल्या संपादकीयामध्ये (आ.सु., १-१ : ३-५) यामासिकाची काही उद्दिष्टे विशद केलेली आहेत. त्यात अंधश्रद्धेचे व बुवाबाजीचे निर्मूलन, सामाजिक जीवनातील धर्माचा ‘धुडगूस’, व्रतेवैकल्ये, यज्ञ, कुंभमेळे यांवर आवर घालणे; दलित, स्त्रिया यांचे शोषण थांबविणे; अनाथ, अनौरस मुलांना आधार देण्याचे महत्व पटवून देणे.

पुढे वाचा

सुधारणा, लैंगिकता व क्लोनिंग

हे विश्व अनादि व अनंत आहे. त्याचा पसारा, त्याचे वस्तुमान, त्याचे तेज, त्याची शक्ती, त्याचे वेग, या सर्वच गोष्टी मानवी कल्पनेबाहेरच्या आहेत. गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण त्या समजू शकत नाही. या उलट अणु-रचनेचे, अणु-परमाणूंचे आकार, वेग, भ्रमणकक्षा, वस्तुमान वगैरेंची कल्पना, गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण करू शकत नाही. पण ही विश्वाची अवाढव्य यंत्रणा काय किंवा अणूची सूक्ष्मतम यंत्रणा काय, त्या एखाद्या घड्याळाप्रमाणे नियमबद्ध आहेत. त्यामधील घटकांना स्वयंप्रज्ञाही नाही व आत्मभानही नाही. त्यांना संवेदनाही नाही व बुद्धिमत्ताही नाही. स्मृतीही नाही, व प्रगतीही नाही.

पुढे वाचा