आगरकर ले. य. दि. फडके, मौज प्रकाशन, १९९६. किंमत रु. १७५/
आगरकर उंच होते. अंगकाठी मूळची थोराड व काटक होती(११६)*, डोळे पाणीदार (९). राहणी-वेश पारंपरिक, शेंडी मोठी पण घेरा लहान, (११६). मात्र ते जानवे घालत नसत आणि संध्याही करत नसत (२४२) .त्यांचे किंचित पुढे आलेले दात झुपकेदार मिशांनी झाकले जात (११६). बुद्धी चपळ आणि वृत्ती मनमिळाऊ असलेले (९) गोपाळराव डेक्कन कॉलेजातल्या शिक्षकांना आठवतात ते ‘सर्वांत मोठा विद्यार्थी, धिप्पाड व बलवान’ असे या रूपात (२५२). आगरकरांचे हे चित्र, चरित्रग्रंथात विखुरलेले उल्लेख एकत्र करून जुळवता येते.
Category «इतर»
कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव
‘डीप ब्लू’ ह्या संगणकावरील कार्यप्रणालीत बुद्धिबळात अनेक वर्षे जगज्जेता असलेल्या कॅस्पोरोव्हला ‘बुद्धिमत्तेची झलक दिसली व ती एक विचित्र, अकार्यक्षम व लवचिकता नसलेली बुद्धिमत्ता आहे असे वाटले. (आजचा सुधारक जून ‘९६). नंदा खरे ह्यांना अपेक्षित असलेल्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेविषयी चर्चा न करता कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव (robot) या संपूर्ण दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या शाखांवरून बुद्धिमान यंत्रमानवाचा विकास होण्याची शक्यता आहे काह्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
यंत्रमानवाविषयीचे तंत्रज्ञान पूर्णपणे मानवाच्या शारीरिक क्षमतेस पर्यायी व्यवस्था म्हणून विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक बिनडोक, स्वतंत्र निर्णय न घेणारा पण पूर्ण आज्ञाधारक, तंतोतंत, बिनचूक काम करणारा व मानवापेक्षा कित्येक पटींनी अधिक क्षमता असलेल्या यंत्रमानवाची रचना करून मानवाचे शारीरिक श्रम व वेळ वाचवण्यास मदत होत आहे.
‘सर्व माणसे समान आहेत’
मानवी व्यक्ती, जगातील सर्वच वस्तूंप्रमाणे, अनके बाबतीत असमान असतात हे नाकारणे अर्थातच शक्य नाही; आणि तसेच ही असमानता अतिशय महत्त्वाची आहे, आणि काही बाबतीत अत्यंत इष्टही आहे हेही निःसंशय….पण या सर्व गोष्टी मनुष्यांना विशेषतः राजकीय बाबतीत समान म्हणून, निदान शक्य तितके समान म्हणून वागविण्याचे आपण ठरवावे का, म्हणजे समान हक्क आणि समान वागणूक मिळण्यास पात्र समजावे का, या प्रश्नांशी पूर्णपणे अप्रस्तुत असून, आपण त्या प्रकारच्या राजकीय संस्था निर्माण कराव्या काय या प्रश्नाशी पूर्णतः असंबद्ध आहेत. कायद्याच्या दृष्टीने समानता’ ही वस्तुस्थिती नाही, ती नैतिक विचारावर आधारलेली एक राजकीय मागणी आहे, आणि तिचा ‘सर्व मनुष्य समान आहेत’ या (बहुधा असत्य असलेल्या मताशी काही संबंध नाही.
नियमांचे दोन प्रकार – नैसर्गिक आणि रूढ
‘पाणी उंच प्रदेशाकडून सखल प्रदेशाकडे वाहते’हा नियम आहे. तसेच ‘वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने हाकावीत’ हाही नियम आहे. ते नियम आहेत अशा अर्थाने की दोन्हींत एकविधता (uniformity) आहे, एकात घटनांची एकविधता तर दुसऱ्याहत कृतींची एकविधता.
पण एवढे साम्य सोडले तर वरील दोन नियमांत फार अंतर आहे. पाण्याविषयीचा नियम म्हणजे निसर्गात प्रत्यक्ष आढळणारी एकविधता आहे, तर वाहनांविषयीच्या नियमात वाहन चालकांनी पाळावयाची एकविधता आहे. निसर्गात आढळणारी एकविधता कुणी निर्माण केलेली नसते, तो वस्तूंचा निसर्गसिद्ध स्वभाव असतो. पण वाहनांविषयीचा नियम निसर्गसिद्ध नाही; तो मनुष्याने मनुष्यांवर लादलेला असतो, आणि त्याचा भंग केल्यास त्याबद्दल शिक्षेची तरतूद केलेली असते.
पत्र
चि. मो. पडित
श्री संपादक, आजचा सुधारकयांस,
गेले वर्षभर माझ्या मनात जी अस्वस्थता आहे ती थोडक्यात पुढे मांडत आहे. मूल्यांचा मुद्दा उपस्थित करायचा नाही ही दक्षता यावच्छक्य घेतली आहे. “विधींचे”समर्थन/खंडन नीतिमूल्यांकडे नेत असल्यामुळे फक्त मला जशी वस्तुस्थिती आकलन होत आहे तसे वर्णन करत आहे. यात अभिनिवेश नाही, फक्त माझी बिकट अवस्था predicament आहे. आजच्या सुधारकचे विचारवंत वाचक यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करतील अशी अपेक्षा.
आधार विधानः-जातपात, वर्ग, लिंग, भाषा, उपासना असले कुठलेही भेदाभेद समष्टीच्या व्यवहारात न करणारा, सर्वांना समान संधी देणारा समाज आणि त्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपाची इहवादी राज्यव्यवस्था उभी करण्यासाठी आपण सार्वत्रिक प्रौढमतदानाची पद्धत स्वीकारली आहे.
व्यापक सामाजिक बदल हवेत: श्री पंडितांना उत्तर
श्री. पंडितांनी त्यांच्या मनातील अस्वस्थता उत्तम प्रकारे चितारली आहे. आजचा सुधारक च्या वाचकांनी त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी त्यांनी अपेक्षा केली। आहे. त्या दिशेने हा एक प्रयत्न. श्री. पंडितांच्या प्रयत्नाप्रमाणेच मूल्यांचा मुद्दा उपस्थित होऊ नये असा माझाही प्रयत्न आहे. परंतु असे दिसून येते की प्रश्नांची मांडणी करताना कदाचित मूल्यसंबंधी प्रश्न टाळता येतात, पण उत्तरे शोधताना मूल्यविचार केव्हा शिरकाव करील ते कळणारही नाही. अर्थात त्याचे कारणही उघड आहे, की पंडितांचे प्रश्न मूल्यांसंबंधीच आहेत.
१. धोक्याची, कष्टाची, घाणेरडी कामे
ह्या प्रकारची कामे करण्याबाबत अॅडम स्मिथ यांनी त्यांच्या १७७६ साली प्रकाशित केलेल्या ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या ग्रंथात असे मत मांडले की बाजार अर्थव्यवस्थेत विविध कार्याकरिता पैशाच्या रूपात भिन्न मोबदला (वेतन) मिळत असला तरी श्रमाच्या आणि त्यागाच्या स्वरूपात विविध कार्याचे वास्तविक वेतन (real wage) समान होण्याची प्रवृत्ती राहील.
आगरकर : एक आगळे चरित्र (भाग १)
‘टिळक, आगरकर, गोखले वगैरे मंडळींविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे … मात्र हे लेखन कळत नकळत एकतर्फी, पूर्वग्रहदूषित होते … ज्या शिस्तीने व काटेकोरपणे व्हावयास हवे होते तसे ते झालेले दिसत नाही,” अशी डॉ. य. दि. फडके यांची तक्रार कधीपासून वाचनात आहे. अर्वाचीन महाराष्ट्राचे इतिहासकार आणि सामाजिक परिवर्तनाचे भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक विद्वन्मान्य आहे, इतकेच नाही तर राजमान्य देखील आहे. आपल्या सत्यसंशोधनाचे फलित शिस्त आणि काटेकोरपणा पाळून त्यांनी वारंवार वाचकापुढे ठेवले आहे. त्यांची शोधः बाळ-गोपाळांचा (१९७७)आणि व्यक्ती आणि विचार (१९७९) ही प्रस्तुत चरित्रविषयाशी संबंधित पुस्तके याच भूमिकेची निदर्शक आहेत.
हिंदुत्व आणि सर्वोच्च न्यायालय
११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एका त्रिसदस्यीय खंडपीठाने काही खटल्यांमध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अपीलांवर निर्णय जाहीर केले. ही अपीले काही शिवसेना व भा.ज.पा.च्या उमेदवारांच्या निवडणुकांच्या वैधतेविषयीच्या निर्णयाबद्दल होती. मुंबईच्या उच्च न्यायालयाने या उमेदवारांच्या निवडी रद्द केलेल्या होत्या. त्या रद्द करण्याचे कारण असे की १९५१ सालच्या रेप्रिझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्टच्या सेक्शन १२३ (३) मध्ये व्याख्या केलेल्या भ्रष्ट मार्गाचा या उमेदवारांनी वापर केलेला होता. सेक्शन १२३ (३) मध्ये निर्दिष्ट केलेला भ्रष्ट मार्ग म्हणजे उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने उमेदवाराच्या सम्मतीने धर्माच्या भावनेने मत देण्याविषयी किंवा न देण्याविषयी आवाहन करणे.
हिंदुत्व आणि देशाची एकात्मता :सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा
भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्त्वावर आधारलेली आहे. भारताने हे तत्त्व स्वीकारले त्या काळातील राजकीय व सामाजिक परिस्थिती विशेष उल्लेखनीय आहे. १९४७ साली दुर्दैवाने देशाची नुकतीच फाळणी झाली होती आणि त्या काळात सर्व देशभर व विशेषतःउत्तरेकडे जातीय दंगलींचा डोंब उसळला होता. धर्माच्या नावावर एकमेकांची अमानुषपणे कत्तल चालू होती. देशात निर्वासितांचे लोंढे मोठ्या प्रमाणावर येत होते. देशातले वातावरण अशाप्रकारे धर्मान्ध शक्तींच्या दंगलीने कुंद झालेले असताना आपल्या देशात भारतीय राज्यघटनेचे एकेक कलम तयार होत होते. अशा दंगलीच्या काळातही आपल्या देशाची राज्यघटना तयार होत असताना आपण आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्त्वावरआधारलेली आहे ही अतिशय महत्त्वाची घटना आहे.
सर्वोच्च न्यायालय, हिंदुत्व आणि हिंदुइझमा
-१-
डिसेंबर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदुइझम’ या संकल्पनांबाबत काही विवेचन केले आहे. त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणे व त्यावर भाष्य करणे हा या लेखनाचा हेतू आहे. न्यायाधीशांनी या विषयाबाबत केलेली विस्तृत मीमांसा डॉ. रमेश प्रभू वि. श्री. प्रभाकर कुंटे आणि बाळ ठाकरे वि. प्रभाकर कुंटे या दोन प्रकरणांत दिलेल्या निकालपत्रात आली आहे. तिचाच मी मुख्यतः उपयोग करणार आहे.
-२-
प्रथम संक्षेपाने न्यायालयाचे प्रतिपादन काय आहे ते पाहू. सारांशाने ते अशा शब्दांत मांडता येईल: ‘‘हिंदुत्व’ किंवा/ आणि हिंदुइझम’ या संज्ञांना एक व्यापक अर्थ आहे आणि एक संकुचित अर्थ आहे.