विषय «इतर»

मी आस्तिक / नास्तिक का आहे?

आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द तसे परिचयाचे. पण तरीही त्यांचा नेमका अर्थ प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून. साध्या सोप्या भाषेत मी देवावर विश्वास ठेवणारा आस्तिकआणि तसं न करणारा तो नास्तिक असं समजते. आणि याच साध्या अर्थाच्या अनुषंगानं माझे विचार मांडते. मी नास्तिक का आहे? प्रश्नाच्या उत्तराचे अनेक कप्पे आहेत. काही उदाहरणांसह ते स्पष्ट करीनच.
मुळात लोक आस्तिक का असतात? पूर्वीचा काळ ढवळून पाहिला तर कुणीतरी धर्मगुरू – धर्माची शिक्षणप्रणाली पुढं हाकणारे असे जे कुणी होते त्यांनी समाज आपल्या इशा-यांवर नाचवण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

श्री रिसबूड यांना उत्तर

याच अंकात पत्रव्यवहार या सदरात श्री माधव रिसबूड यांचे मला आलेले पत्र छापले आहे. या पत्राचा सूर उघड उघड अनादराचा, अधिक्षेपाचाही आहे. माझी विचारसरणी साचेबंद आहे असा त्यांचा आरोप आहे. ते मला हटवादीही म्हणतात. त्यांच्या सप्टेंबर ९३ च्या पत्राला दिलेल्या उत्तरात मी जाणीव कल्पनेची थट्टा केली आहे, समर्पक उत्तर दिले नाही अशी त्यांची तक्रार आहे. असे जर आहे तर त्यांनी त्याच विषयावरील विचार पुन्हा माझ्यापुढे का मांडावेत? माझ्या साचेबंद हटवादी भूमिकेतून त्यांना हवे ते उत्तर मिळाल्याची आशा नसल्यामुळे या पत्राचे प्रयोजन काय असा प्रश्न मला पडला आहे.

पुढे वाचा

परंपरा, आधुनिकता व राष्ट्रवाद (पूर्वार्ध)

आधुनिकतेचा विचार राष्ट्रवादाच्या संदर्भात केला नाही तर तो अपुरा आणि अधांतरी राहतो असे मला वाटते. म्हणून त्या दोहोंचा संबंध तपासण्याचा हेतू मनात धरून हा लेख लिहीत आहे.
मानवतेवर आधारलेला नीतिविचार आणि बुद्धिवाद ही दोन ‘‘आधुनिक’ म्हटली जाणारी मूल्य आहेत. प्र. ब. कुळकर्णीच्या शब्दांत (आ. सु. मार्च १९९७) “विवेकनिष्ठ मानवता हेआधुनिकतेचे बीज आहे.” “मानवता”म्हटले की राष्ट्रवाद बाद होतो. राष्ट्रवाद बाद होणे मला रुचणारे नाही. तेव्हा प्रथम राष्ट्रवादाची गरज मला का वाटते आणि त्याचे स्वरूप काय हे अत्यंत सक्षेपाने सांगून नंतर राष्ट्रवादाचा नीतिविचाराशी व बुद्धिवादाशी कोणत्या प्रकारचा संबंध असू शकतो याचा शोध मी घेणार आहे.

पुढे वाचा

‘सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी’

उडत्या तबकड्यांमधून परग्रहांवरले जीव पृथ्वीवर येतात. इथल्या जीवजातींचे नमुने गोळा करून अभ्यासासाठी न्यायच्या हेतूने ही मोहीम असते. कुत्रे, झाडे वगैरेंना पकडून नेण्यात येते, तसेच माणसांनाही. पण त्या ‘परक्यांना इथल्या व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करायची नसते, म्हणून सर्व ‘नमुन्यांच्या तपासण्या झाल्यावर त्यांना परत स्वगृही पोचवले जाते. मांजरे, गुलाबाची रोपे वगैरेंना या प्रकारांचे स्मरण राहत नाही, व ते जीव आपल्या भाईबंदांना सावध करू शकत नाहीत. माणसांना मात्र स्मरण राहते व ती इतर माणसांना सजग करण्यासाठी अशा अनुभवांची वर्णन करतात. कधीकधी या घटनांचे स्मरण सहजपणे मनाच्या पृष्ठभागावर येत नाही.

पुढे वाचा

वैज्ञानिक रीत

डॉ. हेमंत आडारकर यांच्या पत्राच्या (आ. सु., ८:२, ५९-६१) संदर्भात थोडे विवेचन.
आपल्या पत्रातील पहिल्याच परिच्छेदात डॉ. आडारकरांनी आम्ही आमच्या लेखात (आ. सु., ८:१, २४-२५) वर्णन केलेल्या भस्मधारी तथाकथित वैज्ञानकांच्या वर्णनाची पुष्टीच केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.

विज्ञान हे गृहीतकांपासूनच सुरू होते हे खरेच. सर्वप्रथम कोणा एका वैज्ञानिकाच्या (अथवा सामान्यजनांच्याही!) तल्लख डोक्यात एखाद्या भन्नाट कल्पनेचा (idea) उगम होतो. त्यानंतर, ती व्यक्ती वैज्ञानिक असली तर, अशी कल्पना उपलब्ध ज्ञानावर तपासली जाते व ती अगदीच निराधार (म्हणजे पाण्यापासून पेट्रोल सारखी) नसेल तर ती कल्पना तपासून पाहण्यासाठी (test करण्यासाठी) प्रयोगांची आणखी केली जाते व त्यानुसार प्रयोग वारंवार (हे महत्त्वाचे) केले जातात.

पुढे वाचा

वैज्ञानिक व आस्तिकता

वैज्ञानिक व आस्तिकता यांविषयी गेल्या तीन महिन्यात ‘आजचा सुधारक’मध्ये वेगवेगळी मते मांडण्यात आली. ह्याच चर्चेचा धागा पकडून काही माहिती देत आहे. अत्याधुनिक ज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या व सर्व प्रकारचे ऐहिक सुख भोगत असलेल्या अमेरिकन वैज्ञानिकांना ईश्वर व अमरत्व (life after death) यांविषयी काय वाटते याबद्दलची एक चाचणी नुकतीच घेण्यात आली. ३ एप्रिल १९९७ च्या ‘नेचर’च्या अंकात याविषयीचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. जॉर्जिया विद्यापीठाचे एड्वर्ड लार्सन व लॅरी विथम यांनी १९९६ मध्ये यथातथाच निवडलेल्या १००० वैज्ञानिकांची चाचणी घेण्यात आली. अशीच वैज्ञानिकांची चाचणी यापूर्वी १९१६ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व संशोधक जेम्स ल्यूबा यांनी घेतली होती.

पुढे वाचा

यांचा सेक्युलरिझम् म्हणजे केवळ हिंदुद्वेष!

बंगलोरला येत असताना, नागपूर ते मद्रास या प्रवासात आजचा सुधारकचा मे १९९७ चा अंक वाचला. या अंकात श्री अविनाश भडकमकर नावाच्या सद्गृहस्थाचा ‘‘धर्मनिरपेक्षतेला आव्हान’ या शीर्षकाचा लेख आहे. लेखकाचा आव तात्त्विक चर्चा करण्याचा असला, तरी त्यांचा खरा हेतु भारतीय जनता पार्टीला झोडपून काढण्याचा दिसून येतो. तत्त्वचिंतन कमी आणि पूर्वग्रह अधिक अशा लेखाला तात्त्विक म्हणावे किंवा नाही, असा प्रश्न कुणाच्या मनात उत्पन्न झाला, तर त्याला त्याबद्दल दोष देता येणार नाही. तथापि, श्री भडकमकर यांच्या या लेखाच्या संदर्भात,विशेषतः त्यांच्यासाठी आणि सामान्यतः सर्व तथाकथित सेक्युलरिस्टांसाठी मी काही मुद्दे प्रस्तुतकरीत आहे.

पुढे वाचा

मी नास्तिक का आहे?

एखादी गोष्ट अस्तित्वात आहे की नाही, हा ज्ञानक्षेत्राशी निगडित प्रश्न आहे. आणि त्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण किंवा अनुमान हे ज्ञानसाधन आहे. ईश्वराविषयी जेव्हा पुरावा मागितला जातो तेव्हा हा श्रद्धेचा प्रश्न आहे, असे आस्तिक म्हणतात. श्रद्धा ही ज्ञानसाधन होऊ शकते काय?ज्याचा पुरावा देता येत नाही त्यावर विश्वास म्हणजे श्रद्धा. ही श्रद्धा ज्ञानसाधन कशी काय होऊ शकते?
ज्याप्रमाणे आस्तिक ईश्वर हे अंतिम तत्त्व मानतात त्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानात पुरुष आणि प्रकृती ही अंतिम तत्त्वे मानली जातात. तर अनेकेश्वरवादात अनेक ईश्वर मानले जातात. श्रद्धा हे ज्ञानसाधन असेल तर या विश्वाच्या, सृष्टीच्या मागचे अंतिम तत्त्व काय, या प्रश्नाचे उत्तर सारखे असले पाहिजे, हे उघड आहे.

पुढे वाचा

प्लेटोचे रिपब्लिक

प्लेटोचा Republic हा ग्रंथ न्याय या विषयावर आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या ग्रंथांपैकी सर्वांत काळजीपूर्वक आणि तपशीलवार लिहिलेला ग्रंथ आहे. त्यात न्यायाविषयीच्या अनेक मतांचे परीक्षण आले असून, ते अशा थाटात केले गेले आहे की त्यात प्लेटोने त्याला माहीत असलेल्या सर्व उपपत्तींचा समावेश केला आहे असे वाटावे. … परंतु अस्तित्वात असलेल्या उपपत्तींची चर्चा आणि चिकित्सा करताना न्याय म्हणजे कायद्यासमोर समानता ह्या मताचा तो कोठेही उल्लेख करीत नाही. याची दोन स्पष्टीकरणे शक्य आहेत. एक तर त्याचे त्या उपपत्तीकडे दुर्लक्ष झाले, किंवा त्याने ती मुद्दाम टाळली.

पुढे वाचा

फिरून एकदा स्त्रीमुक्ती

गेली कमीत कमी दहा वर्षे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या देशात चालू आहे. पण स्त्रीमुक्तीविषयी, किंवा असे म्हणू या की त्या विषयाच्या व्याप्तीविषयी, आपणा बहुतेकांच्या मनांत संदिग्धता आहे. आपल्या स्त्रीमुक्तिविषयीच्या कल्पना अद्याप धूसर किंवा अस्पष्ट आहेत. बहुतेक सर्वांच्याच कल्पनेची धाव स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांनी स्त्रियांना घरकामात मदत करून त्यांची ढोरमेहनत कमी करावी आणि त्यांना आजच्यापेक्षा जास्त मानाने वागवावे ह्यापलिकडे जात नाही. (वरच्या समजाला मदत म्हणून काही ज्येष्ठ समंजस स्त्रिया स्त्रीपुरुषसंबंधामध्ये पुरुष बेजबाबदारीने वागतात, पण त्यांची बरोबरी करावयाची म्हणून स्त्रियांनी पुरुषांसारखे बेजबाबदारीने वागू नये; आपले शील सांभाळावे असे सांगतात.)

पुढे वाचा