विषय «इतर»

अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा

अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा
भारतातील मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात हिंदु जातीयवादाचा विचार करावयाला हवा. पण माझे मत असे आहे की हिंदु जातीयवाद हा मूलतः मुस्लिम जातीयवादाला प्रत्युत्तर देण्याच्या स्वरूपात आपल्या देशात निर्माण झाला आहे. हिंदु जातीयवाद असण्याची कारणे नष्ट करा – थोडक्यात मुस्लिम जातीयवाद नष्ट करा – आपल्याला या देशात मूठभरदेखील प्रभावी हिंदु जातीयवादी आढळणार नाहीत.

‘सय्यदनांचा हस्तक्षेप कोठपर्यंत?

अस्मा ताहेर बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेली औरंगाबादची गुणवान, बुद्धिमान विद्यार्थिनी. तिचा कल वैद्यकीय शाखेकडे; परंतु ‘सय्यदनां’नी – बोहरा धर्मगुरूंनी परवानगी दिल्याशिवाय ती वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. का ?
जुलेखाची कहाणी हृदयद्रावक. जन्मतःच हृदयाला छिद्र असलेली जुलेखा वेळीच उपचार न झाल्याने ‘अल्लाला प्यारी झाली. शस्त्रक्रिया करायची की नाही, याविषयीचे आदेश ‘सय्यदनांकडून मिळविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी मधली तब्बल पस्तीस वर्षे वाया घालविली होती ! असे का घडावे ?
माझ्या पत्नीने-झेनबने १९५१ मध्ये पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. ची पदवी संपादन केली, दिल्ली विद्यापीठात पीएच.डी.

पुढे वाचा

पडद्यातला देश

गावी शेजारच्या देवकरण भटजींना ज्योतिष चांगले समजत असे. एकदा माझा हात पाहून ते म्हणाले, ‘याला विद्या नाही. हे भविष्य ऐकून माझी माय कष्टी झाली. पण ते भविष्य तिच्या अंदाजाबाहेर मी खोटे ठरविले. दुसरे, शेंदुर्णीकरांचे भविष्य : ‘तुम्हाला वाहनयोग (चारचाकी) आहे.’ तेही मी आतापर्यंत तरी खोटे ठरवले आहे. परदेशप्रवास घडेल असे मात्र माझ्या हातावर कोणालाच दिसले नव्हते. तो घडला. आणि मुळातील भविष्यावर माझा अविश्वास अधिक पक्का झाला.
मात्र परदेशप्रवासातही एक प्रकारची वर्णव्यवस्था आहे. युरप-अमेरिका अव्वल दर्जाचे, दुबई-आफ्रिका त्या मानाने दुय्यम, सिंगापूर-हाँगकाँग यांना शूद्र म्हटले तर नेपाळ अतिशूद्रात गणले जाईल.

पुढे वाचा

स्त्रियांचे शिक्षण कसे असावें?

सदाचरणी होण्यास व सदाचरणी राहण्यास त्यांस सदाचरणाची किंमत कळली पाहिजे, ती किंमत कळण्यास त्यांची सापेक्ष बुद्धि जागृत झाली पाहिजे, व तसे होण्यास त्यांस सुशिक्षण दिले पाहिजे. लहान मुलांस खोटे बोलणे वगैरे पापांपासून दूर ठेवण्यास छडीचाच केवळ उपयोग नको आहे. पाप केल्यास शरीरदंड होतो येवढेच ज्ञान ज्यास मिळाले आहे तो सदैव पापपराङ्मुख राहील, असे मुळीच नाही. शिक्षा होण्याचा संभव गेला की, तो पाप करण्यास सोडणार नाही. सदाचरण व असत्प्रतिकार यांविषयीं तात्त्विक ज्ञान मनुष्यमात्रास झाल्यावाचून दोहोंचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम पूर्णपणे कळून येणे शक्य नाही, व जोपर्यंत हे परिणाम कल्लले नाहीत तोपर्यंत मनुष्यास सदा-चरणाची खरी योग्यता, व असत्पथावलंबनाची स्वपरवंचक प्रवृत्ति ही कधीहि कळणार नाहीत.

पुढे वाचा

परिसंवाद निसर्ग आणि मानव – १

श्रीमती मेधा पाटकर गेल्या आठवड्यामध्ये पुण्यास आल्या असता स्नेहसदनात भरलेल्या सभेत त्यांनी जी भूमिका मांडली तिचे माझ्या मते दोन स्थूल विभाग पाडता येतील. पहिला भाग म्हणजे त्यांनी नर्मदा घाटीतील धरणात बुडणार असणाऱ्या ग्रामीण जनतेला जागे करून एक जबरदस्त संघटन उभे केलेले आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नर्मदा प्रकल्पाच्या अनावश्यकतेचा, त्याच्या सिद्धीसाठी चाललेल्या अमानुष सरकारी दडपशाहीचा आणि त्या प्रकल्पामुळे अपरिहार्यपणे होणाऱ्या निसर्गविध्वंसाचा प्रश्न.
नर्मदा प्रकल्पाची योजना आखताना शासनाने (गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ही राज्य शासने व केंद्रशासन या सर्वांनी) जी हरत-हेची माहिती जमा करावयास हवी होती तशी ती मिळवण्याचे कष्ट न घेता सगळी आखणी मनमानीपणाने केलेली आहे, हा मेधा आणि तिचे सहकारी यांनी घेतलेला मूलभूत आक्षेप.

पुढे वाचा

परिसंवाद निसर्ग आणि मानव – २

साधनाच्या (१८ जुलै) अंकातील ‘निसर्ग आणि मानव या आपल्या लेखात श्री. नानासाहेब गोरे यांनी म्हटले आहे, आदिम क्षणापासून या चालू घटकेपर्यंत निसर्ग होता तसाच राहिला आहे : लहरी, निर्हेतुक.’ त्यांनी मानवाचे आणि निसर्गाचे स्वर पूर्वीच्या काळी कधी तरी खरोखर जुळले होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. लेखाच्या अखेरीस ‘स्वस्थितिमग्न निसर्ग व विज्ञानधर पुरुषार्थी मानव यांच्या संयोगाची गोष्ट केली आहे.
निसर्ग कसा आहे याचे वर्णन करते वेळी विश्व, पृथ्वी व पृथ्वीवरील सजीव सृष्टी या व्यवस्था आहेत आणि त्यांना एक इतिहास आहे, या दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

पुढे वाचा

परिसंवाद निसर्ग आणि मानव: एक अनिवार्य समग्रता – ४ प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लेखाच्या निमित्ताने

प्रा. दि. य. देशपांडे यांचा साधनेतील (१४ नोव्हें. १९९२) टिपणवजा लेख वाचून मनात आलेले काही विचार म्हणा, काही शंका आणि प्रश्न म्हणा मी येथे व्यक्त करू इच्छितो. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या लेखाला एक दुहेरी पाश्वभूमी आहे. एक म्हणजे मा. नानासाहेब गोरे यांचा साधनेतील (१८ जुलै ९२) लेख आणि दुसरी म्हणजे त्या लेखावरील मा. श्री. वसंत पळशीकर (साधना २९ ऑगस्ट ९२) यांची प्रतिक्रिया. माझ्या प्रस्तुत । लेखनालाही ही पाश्वभूमी अंशतः असणे स्वाभाविकच आहे. तथापि, श्री. गोरे काय किंवा श्री. पळशीकर काय, यांच्या विचारांचे खंडन अगर मंडन करावे या हेतूने मी हे लिहिलेले नाही.

पुढे वाचा

परिसंवाद निसर्ग आणि मानव -५

दि. य. देशपांडे यांना उत्तर – उत्तरार्ध वसंत पळशीकर (या लेखाचा पूर्वार्ध आजचा सुधारकमार्च ९३ या अंकात आला आहे.)
६ डेव्हिड बोम (Bohm) या भौतिकी वैज्ञानिकांचे एक विधान पुढीलप्रमाणे आहे: ‘We have seen that each world-view holds within itself its own basic notions of order. What is order ? How we do presuppose that there is some kind of order – so a general and explicit definition of order is not actually possible’. बोम हे भौतिकीमधील विभिन्न word-views बद्दल बोलत आहेत.

पुढे वाचा

परिसंवाद निसर्ग आणि मानव -६

निसर्गामधल्या उत्क्रांतीचा आजमितीला शेवटचा टप्पा म्हणजे मानव; त्यास्तव तो देखील निसर्गाचा एक घटकच मानावा लागेल. मानव विरुद्ध निसर्गामधील इतर घटक ही लढाई आदिमानवाच्या काळापासून चालू आहे. निसर्गामधल्या इतर घटकांमध्ये देखील लढाई चालू असते. उदा. हिंस्र पशू इतरांना खातात. पण ही लढाई मर्यादित स्वरूपाची असते. परंतु मानवाची लढाई उग्रस्वरूपी झाली आहे, याची कारणे म्हणजे मानवाचा बुद्धिविकास, त्याचे कार्यकौशल्य, विज्ञानाने उपलब्ध करून दिलेली अनेक साधने आणि लोकसंख्येची अफाट वाढ ही होत. या सर्वांचा परिणाम म्हणून मानव निसर्गातल्या इतर सर्व घटकांचे आपल्या सुखसोयीसाठी शोषण करीत आहे.

पुढे वाचा