[लेखक भारतीय राजस्व सेवा (खठड)च्या १९९४ च्या बॅचचा अधिकारी आहे आणि सध्या धारवाड, कर्नाटक येथे Joint Commission of Incom Tax म्हणून काम करतो.]
आ.सु.च्या फेब्रुवारी २००७ च्या अंकातील “ठिकऱ्याः बदलती जातिव्यवस्था’ या नावाचा सत्यजित भटकळ आणि नॅन्सी फर्नाडिस यांच्या पुस्तकाचा सुलभीकृत संक्षेप वाचला. जातिव्यवस्थेबद्दल मुळातून आणि सविस्तर चर्चा त्यात आढळली. लेखावर प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
१.एकंदर मांडणी; जातिव्यवस्था हा least count गृहीत धरून केलेली दिसते. त्यामुळे अनेक दुखण्यांचे मूळ जातिव्यवस्थेमध्ये शोधलेले दिसते. तसेच उपायही जातिव्यवस्थेभोवती फिरताना दिसतात. लेखकाचे ‘जातिव्यवस्था ही सभ्यता आहे आणि हिंदूंची शास्त्रे आणि मिथ्यकथांबद्दलच्या श्रद्धा ह्या जातिसंस्थेचा परिणाम आहेत’ हे विधानही न पटणारे आहे.
विषय «इतर»
भाषा बहता नीर है
कितीतरी शब्द आपण बेफिकिरीने, बेपर्वाईने वापरत असतो. त्यांच्या सांस्कृतिक संदर्भांचा आदर न ठेवता! मध्यंतरी चंद्रपूर जिल्ह्यातील वणव्याची वार्ता देताना एका वृत्तपत्राने ‘आग वडवानळासारखी पसरत आहे’ असे छापले होते. वडवानळसुद्धा अग्नीचाच अवत हे खर तील सुप्त अग्नीचा एक काल्पनिक, पौराणिक प्रकार आहे. त्या ठिकाणी ‘दावानळ’ असा शब्द साजरा नसता का ठरला ? केरळचे थोर मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते ई. एम. एस. नंबुद्रीपाद वर्षभर नियतकालिके काळजीपूर्वक वाचून पुढील वर्षारंभी मल्याळम भाषेतील प्रमाद, विसंगती, नवी वळणे यांचे विवेचन करणारा एक सालगुदस्त आढावा निरलसपणे लिहीत असत.
मानवी स्वभाव व डार्विनवाद (६)
[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे.
प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
आदर्श जगाच्या भ्रमात!
डार्विनवादाचा समाजरचनेवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करणाऱ्या समाज-जीवशास्त्र या विद्याशाखेवर ‘या शास्त्राला सामायिक न्याय मान्य नाही; डार्विनवादी व समाज-जीवशास्त्रज्ञ उजव्या विचारांचे आहेत’ असा आरोप केला जात असतो.
जग खाऊन टाकणारे! जनअरण्य…
जेफ्री साक्स हे आजचे आघाडीचे अर्थतज्ज्ञ आहेत. अनेक देशांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे आणि रशियासारख्या देशांना आर्थिक संकटातून बाहेरही काढले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे ते विश्वासू मित्र. त्यांनीच ब्लेअर यांना निराळा ‘आफ्रिका निधी’ उभारायला लावला. या पैशातून गरिबी आणि अज्ञानात रेंगाळलेल्या आफ्रिकन देशांना सावरण्यासाठी मदत होते.
जेफ्री साक्स यांना यंदा बीबीसीची अतिशय प्रतिष्ठेची अशी रीथ व्याख्यानमाला गुंफण्याचा मान मिळाला. एण्ड ऑफ पॉव्हर्टी या पुस्तकामुळे साक्स जगभर परिचित आहेतच. अर्थशास्त्र हा केवळ घडणाऱ्या घटनांचा ताळा मांडण्याचा बौद्धिक खेळ नाही.
नंदीग्राम: कोसंबी : टॉयन्बी
नंदीग्राम: कोसंबी : टॉयन्बी
इतिहासाच्या घटनांचा जास्तजास्त अभ्यास करत गेल्यास सामान्यजनांवर विनाकारण लादल्या गेलेल्या त्रासाबद्दलचे आपले आश्चर्य वाढतच जाते. आपण जी काही प्रगती साधली आहे असे मानतो ती अनेक चुकीच्या आणि अन्याय्य वाटावळणांनी साधली आहे. आपण कितीही नैसर्गिक नियम (natural law) आणि अटळ विकास (inevitable development) यांबद्दल सामान्यीकृत विधाने केली तरी हे सत्य दृष्टिआड करता येत नाही. याबाबतचे सर्वांत दृश्य उदाहरण जमीन-व्यवहाराचे आहे. ह्या आणि इतर बाबींचा इतिहास तपासला तर आपले व्यवहार जास्तजास्त क्रांतिकारक होत जातील. आपल्याला वाटते की आजचे अर्थशास्त्राच्या आधाराने अभ्यास करणारे इतिहासकार पुराणी स्मारके तपासत आहेत.
इतिहासः कसा लिहावा व कसा लिहू नये !
[जयंत गडकरी हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि दामोदर धर्मानन्द कोसंबींच्या कल्चर अॅण्ड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शंट इंडिया या ग्रंथाचे भाषांतरकार आहेत.]
आजचा सुधारक च्या ह्या अंकाने प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी ह्यांच्या जीवनपटावरील एक लेख, अॅडव्हेंचर्स इन्टू द अननोन ह्या निबंधातील निवडक उतारे आणि भगवद्गीतेवरील एक अत्यंत महत्त्वाचा लेख असे आपल्यापुढे सादर केले आहेत. प्रा. दा. ध. कोसंबी ह्यांची ग्रंथसंपदा आणि लेखसंपदा इतकी विविधविषयी आणि विस्तृत आहे, (त्याची माहिती पहिल्या लेखातून मिळते) की हे तीन लेख म्हणजे अफाट सागरातून ओंजळभर पाणी उचलण्यासारखे आहे.
दामोदर धर्मानंद कोसंबीः संक्षिप्त जीवनपट
‘भारतातील सर्वांत स्फूर्तिदायी इतिहासकार’ असे ज्याचे वर्णन जॉन की (John Keay) हे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ करतात, आणि भारतीय इतिहास विद्येला एक नवा पॅराडाईम त्यांनी मिळवून दिला’ असे प्रा. रोमिला थापरसारख्या इतिहाससंशोधक मानतात. त्या दामोदर धर्मानंद कोसंबींचे हे जन्मशताब्दी वर्ष. इतिहाससंशोधक म्हणन कोसंबी विशेष प्रसिद्ध असले तरी गणित आणि संख्याशास्त्र ह्या विषयातील त्यांचा अधिकारही मोठा होता. त्यांच्या नावावर प्रसिद्ध झालेल्या सुमारे दीडशे लेखांतील साठेक लेख गणित व संख्याशास्त्र ह्या विषयांवरचे आहेत. ह्या सगळ्याच्या जोडीला समाज व विज्ञान ह्या विषयांवरील त्यांचे चिंतनही महत्त्वाचे मानले जाते.
कोसंबी विचार-सार
काही लोकांसाठी प्रश्न सोडवत राहाणे श्वासोच्छ्रास करण्याइतके आवश्यक असते. याची कारणे मानसशास्त्राच्या क्षेत्रात येतात. पण वैज्ञानिक प्रश्नच का सोडवावे ? देवशास्त्र, साहित्य, कला, या क्षेत्रांमध्ये अभिव्यक्तीचे मार्ग का शोधू नयेत? अनेक कार्यरत वैज्ञानिक या प्रश्नांवर जाणीवपूर्वक विचार करत नाहीत. ज्या देशांमध्ये केवळ धर्मशास्त्र, देवशास्त्र, यांवरच विचारवंतांनी लक्ष केंद्रित केले, ते देश अडाणी आणि मागासलेले राहिले. हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा असूनही भारतासारखे ते गुलामगिरीत अडकले. या ह्रासातून सुटायला आधुनिक उत्पादनतंत्रेच मदत करू शकत, आणि त्यासाठी विचारवंतांनी विज्ञानावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते.
भगवद्गीतेची सामाजिक आणि आर्थिक अंगे
‘भगवद्गीता’ हा महाभारत या भारतीय महाकाव्याचा एक भाग आहे. गीतेच्या १८ अध्यायात पांडववीर अर्जुन आणि त्याचा यदु (कुलोत्पन्न) सारथी श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा आठवा अवतार, यांच्यात झालेल्या संवादाचा संजयाने सांगितलेला वृत्तान्त आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाला युद्धात होणाऱ्या आपले भाऊ आणि कुलबंधू यांच्या संहारात त्याला जो महत्त्वाचा वाटा उचलावा लागणार होता त्याच्या विचाराने त्याबद्दल घृणा निर्माण होते. परंतु श्रीकृष्णाच्या सर्वंकष तात्त्विक उपदेशाने सर्व शंकांचे निरसन होऊन अर्जुन महासंहारास निःशंक मनाने तयार होतो. गीतेने निरनिराळ्या प्रकारच्या अनेक आणि अर्जुनापेक्षा भिन्न मनोवृत्तीच्या लोकांना आकर्षित केले आहे.
वित्तीय क्षेत्रातील सुधारांचे प्रादेशिक विकासावरील परिणामः महाराष्ट्रासंबंधी एक टिपण
१९ जुलै १९६९ साली १४ प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यावेळी बँकिंग उद्योगासाठी अनेक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. एक प्रमुख उद्दिष्ट मागास भागांचा विकास हे होते. माणसाच्या शरीरात जे हृदयाचे स्थान असते ते अर्थव्यवस्थेत बँकिंगचे आहे. एखाद्या गावात बँकेची शाखा उघडली की अवघ्या काही दिवसांत तेथील आर्थिक उलाढाल प्रचंड वाढते. व्यापार-उद्योग-कारखानदारीला प्रोत्साहन मिळते. रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बाजारपेठ फुलू लागते. विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळते. भांडवल आकृष्ट होते. नफा मिळू लागतो. यातून पुन्हा गुंतवणूक वाढू लागते. बँक-बँकिंग ही संरचना विकासाची वाहक बनते आणि म्हणूनच या अर्थाने अर्थव्यवस्थेत बँकिंगला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.