डॉ. सुभाष आठले यांचा राज्यघटनेत सुधारणा हा लेख वाचला. ह्या सुधारणा अमलात येणे शक्य नाही हे स्पष्टच दिसते व त्याच्या कारणांची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. अगदी या सुधारणा अंमलात आल्या तरी मिळणारा राजधर्म सध्यापेक्षा नक्की चांगला असेल असे सांगणे अवघड आहे. (उदा. समजा कॉंग्रेस निवडून आली तर सगळ्या गोष्टी ठरवणार कोण? सोनियाजीच ना!) असल्या किरकोळ गोष्टी आपण सोडून देऊ.
साधारणपणे या लेखातून व्यक्त झालेला मुद्दा हा बुद्धिमत्तेचा आहे. म्हणजे तुम्ही एक पक्ष निवडून द्या आणि तो पक्ष बुद्धिमान लोकांचे (मग ते खासदार नसेनात का) एक मंत्रिमंडळ तुम्हाला देईल.