विषय «इतर»

राजकीय व अर्थविषयक व्यवस्था : काही विचार व सूचना (लेख-२)

राष्ट्रनिष्ठेत/समाजनिष्ठेत वाढ करण्यासाठी करावयाच्या गोष्टी

१. समाजाकडून व्यक्तीला/कुटुंबाला मिळणारे फायदे आणि सोयी सशर्त (कंडिशनल) असाव्या. कायदे व नियम मोडणाऱ्या व्यक्तींना हे फायदे व सोयी मिळणे लगेच, त्वरित बंद झाले पाहिजे, म्हणजे समाजाची नापसंती त्या व्यक्तीस व कुटुंबास लगेच जाणवली पाहिजे. अर्थात औपचारिक न्याययंत्रणा खूप सुधारली पाहिजे. यामध्ये अनावश्यक कायदे, अंमलात न आणण्यासारखे कायदे रद्द केले पाहिजेत व नवे असे कायदे करू नयेत. (उदा. भाडे-नियंत्रण कायदा, नागरी कमाल जमीन धारणा कायदा, दारूबंदी व गुटखाबंदी कायदा, व्यक्तीची नीती सुधारण्याचा प्रयत्न करणारे कायदे, गर्भलिंग चिकित्सा बंदी कायदा, गोहत्या प्रतिबंधक कायदा) शासन, पोलीस-प्रॉसिक्युटर्स व न्यायमूर्ती या सर्वच न्यायसंस्थेच्या अवयवांत सुधारणा आवश्यक आहे.

पुढे वाचा

रस्ते आणि मोटारी: एक न संपणारी शर्यत

1908 साली अमेरिकेत फोर्ड मोटारीच्या कारखान्यातून पहिली मोटार बाहेर पडली आणि माणसाच्या भ्रमंतीला क्रांतिकारी वेग प्राप्त झाला. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत या मोटारींचा म्हणावा तितका प्रसार शहरांमध्ये झाला नव्हता. शेतकरी मात्र या वाहनांवर खूष होते. त्यांचा ताजा शेतीमाल शहरांत आणावयाला हे वाहन फार उपयोगी ठरले होते. शिवाय त्या काळात युरोप-अमेरिकेतील सर्व शहरांमध्ये रुळांवरून ट्राम, मेट्रो, आणि उंच पुलांवरून धावणारी छोटी रेल्वे यांसारखी सार्वजनिक आणि स्वस्त वाहतूक-साधने उपलब्ध झाली होती. यामुळे मोटारी या प्रामुख्याने खेड्यांमध्ये प्रचलित झाल्या होत्या हे आज खरे वाटणार नाही.

पुढे वाचा

परस्परावलंबनाविषयी आणखी काही (२)

७. (क) मोहनी: आम्ही आम्हाला पैसा जास्त मिळाल्याने श्रीमंत होत नाही, तर आमच्या परिश्रमांच्या मोबदल्यात आपल्याला किती उपभोग मिळाला ते पाहून पूर्वीइतक्याच श्रमांत जास्त उपभोग मिळत असेल तरच आम्ही संघशः आणि त्यामुळे सरासरीने व्यक्तिशः श्रीमान् झालो आहोत हे समजू शकते.
(ख) पंडित: ह्याला अर्थ नाही. एक उपाशी तर दुसरा तुडुंब! सरासरीने दोघेही अर्धपोटी!
(ग) मोहनी: वरील वाक्यात, म्हणजे ७क मध्ये, पूर्वीइतक्याच श्रमात प्रत्येकाला जास्त उपभोग हा शब्द घालायला हवा आणि सरासरीने हा शब्द काढायला हवा म्हणजे माझ्या म्हणण्यातील अर्थ स्पष्ट होईल.

पुढे वाचा

वर्तमान

‘वर्तमान’ ही श्री. सुरेश द्वादशीवारांची अद्यावधि शेवटची कादंबरी. तिच्या वेष्टनावर तिचे वर्णन ‘राजकीय कादंबरी’ असे केले आहे. तिच्यात इ.स. 2002 या कालखंडावर आणि त्यातल्या मातब्बरांवर प्रकाशझोत टाकला आहे. केंद्र-सरकार, राज्यसरकारे. पक्ष. संघटना. प्रसारमाध्यमे आणि लोकमानस यांचा आढावा घेत वर्तम आणि लोकमानस यांचा आढावा घेत वर्तमान राजकारणाचा पट उलगडणारी’ हे तिचे वर्णन बरोबर आहे. पण त्या वर्णनांत न आलेले अनेक सामान्यपणे दुर्मिळ गुणही तिच्यात आहेत. प्रथम सांगायचा गुण म्हणजे तिची विलक्षण मनोवेधकता. चारशेचार पृष्ठांची ही कादंबरी इतकी चित्ताकर्षक आहे की वाचक एकदा वाचायला लागला की झपाटल्यासारखा ती वाचतच राहतो, आणि त्याला सवड असेल तर एक-दोन बैठकीत ही संपवितो.

पुढे वाचा

स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (भाग १)

विषयप्रवेश
काळात भारताचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. या विकासात विज्ञानाचा मोठा हातभार होता. आपण केलेला हा विकास पुरेसा झाला की नाही, आपल्या क्षमतेएवढा झाला की नाही, ज्या क्षेत्रात हवा त्या क्षेत्रात झाला की नाही, समाजातील निम्नस्तरांना फायदेशीर झाला की नाही, या प्रश्नांना होकारार्थी उत्तरे मिळतीलच असे नाही. पण विकास झालाच नाही असे कोणी म्हणू शकणार नाही. आपल्याला हवी तशी व हवी तेवढी प्रगती का झाली नाही या प्रश्नाचा शोध आपल्याला राज्यकर्ते व त्यांची धोरणे, समाज व सामाजिक परिस्थिती त्याचप्रमाणे व्यक्तिशः आपण स्वतः यांच्यापर्यंत नेऊन पोचवतो.

पुढे वाचा

तंत्रज्ञान आणि विचारांची पद्धत

भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातले अनेक तज्ञ आजच प्रयोगांचे निष्कर्ष काढायला आणि समजून घ्यायला इलेक्ट्रॉनिक तर्कशास्त्राची मदत घेत आहेत. समाजशास्त्री आणि अर्थशास्त्री संगणकांशिवाय कामे करू शकत नाही आहेत. मानव्यशास्त्री, विचारवंत आणि सर्जनशील लेखकांना आज तरी या यंत्राचा फारसा वापर करता येत नाही. पण हे लवकरच बदलेल, कारण संगणकाने मजकुराचे संपादन करणे कागद-लेखणी वा टंकलेखकाने तसे करण्यापेक्षा खूपच सोपे जाते. प्रकाशन उद्योगाला इलेक्ट्रॉनिक अक्षरजुळणीचे फायदे आधीच कळलेले आहेत. पुढे साहित्यिक आणि वैज्ञानिक ग्रंथालयेही इलेक्टॉनिक रूपात संगणकावर उपलब्ध होतीलच. साहित्य, तत्त्वज्ञान किंवा इतिहासाचा अभ्यास अंकबद्ध करून संगणक हुकूमनाम्यांमध्ये साठवता येईल का, हा प्रश्नच नाही आहे—-मुळात संवाद साधायला शास्त्रीपंडितांना संगणक हेच महत्त्वाचे साधन उरणार आहे.

पुढे वाचा

करायला गेलो एक !

ज्ञानाचा आग्रह जेवढा हिंदुधर्मात धरण्यात आला तेवढा विचार इतर कोणत्याही धर्मात नाही; परंतु अज्ञानी जन जेवढे हिंदु धर्मात आहेत तेवढे इतर धर्मांत नाहीत.
इमानदारीचा जेवढा आग्रह इस्लाम धर्मात आहे तेवढा इतर कोणत्याही धर्मात नाही; परंतु बेइमानीच्या जेवढ्या गोष्टी मुस्लिम राजकारणात आहेत तेवढ्या इतर कोणत्याही धर्मात नाहीत.
अपरिग्रहाचा जेवढा आग्रह जैन धर्मात आहे तेवढा इतरांचे ठायी आढळणार नाही; परंतु परिग्रहाच्या मूर्ती जेवढ्या जैनांमध्ये आहेत तेवढ्या इतरत्र दिसत नाहीत.
प्रेमाचा आग्रह जेवढा ख्रिश्चन धर्मात आहे तेवढा इतर धर्मांत नाही; परंतु धर्माच्या नावावर जेवढी युद्धे ख्रिश्चन धर्मीयांनी केली तेवढी अन्यत्र झाली नाहीत.

पुढे वाचा

विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय?

विवेकवादाविषयी प्रचलित असलेल्या अनेक विलक्षण आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की विवेकवादी माणसे भावनाहीन असतात. हा आक्षेप इतका विपरीत आहे की सामान्यपणे शहाणी असणारी माणसेही जेव्हा त्याचा पुरस्कार करतात, तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते. वस्तुतः विवेकवाद ही एक अतिशय शहाणपणाची भूमिका असून तिचे स्वरूप नीट लक्षात घेतल्यास तिच्यात शंकास्पद किंवा विवाद्य असे काही शोधूनही सापडणार नाही अशी आमची समजूत होती. तिच्याविषयी अनेक खोटेनाटे, सर्वथा गैरलागू, असमंजस आक्षेप कोणी का घ्यावेत हे अनाकलनीय आहे. या (कु)प्रसिद्ध आक्षेपांपैकी या लेखाच्या शीर्षकात व्यक्त झालेला आक्षेप एक आहे.

पुढे वाचा

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-३)

शासकीय संगनमत

“गोध्र्यानंतरचा गुजरातेतील हिंसाचार हा राज्याच्या मुख्यमंत्र्याने व शासनाने केलेला संघटित गुन्हा आहे. सरकार व त्याचे अधिकारी यांनी जे केले, व जे केले नाही, त्यावरून हे उघड होते’.

गोध्र्यामागे काही पूर्वतयारी होती व ती एका मोठ्या कटाचा भाग होती, असे सिद्ध होण्याची वाट न पाहता मोदी व त्यांच्या मंत्रिगणाने बेजबाबदार विधाने करून ते सिद्धच झाल्यासारखे चित्र उभे केले. ओळखता न येणारी जळकी प्रेते ‘समारंभाने’ अहमदाबादेस नेणे, नंतरच्या हिंसेचे समर्थन करणे, हेही हिंसेचे मूळ ठरले, आणि त्याचा दोष ठामपणे मोदींकडेच जातो.

पुढे वाचा

विज्ञानाचे रूपांतरण

कालिदासाच्या ‘शाकुंतला’त एक प्रसंग आहे. दुष्यंत शिकारीच्या नादात कण्वाच्या आश्रमाजवळ येऊन हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमवासी त्याला सांगतात की तसे करू नये, कारण पवित्र वनांत प्राण्यांची व झाडांची हिंसा निषिद्ध आहे. 1801 सालानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस बुकॅनन कारवारच्या देवरायांबाबत लिहितो की देवरायां-मधील झाडे तोडायला गावप्रमुखामार्फत देवाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी फुकट मिळते, पण ती न घेतल्यास देवाचा कोप होतो. पुढे तो म्हणतो की सरकारने ती मालमत्ता (देवराई) काबीज करू नये यासाठी घडवलेली ही क्लृप्ती आहे.
मला देवराया, देवतळी, पवित्र पशुपक्षी यांच्याबद्दल कालिदासाची भूमिका बुकॅननच्या भूमिकेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ वाटते.

पुढे वाचा