विषय «इतर»

न्यायपालिका की अन्यायपालिका?

गेल्या काही वर्षांतील वृत्तपत्रांत किंवा नियतकालिकांत प्रसिद्ध होणाऱ्या न्यायपालिकेतील निरनिराळ्या न्यायाधीशांबद्दलच्या बातम्या बघा—–
1. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या कार्यकलापांवर राम जेठमलानींचे पुस्तक
2. पंजाब उच्च न्यायालयाच्या तब्बल तीन न्यायमूर्तीवर लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये आपल्या संबंधितांना उत्तीर्ण करून घेऊन नोकरी लावून घेतल्याचा आरोप; त्यांच्याकडील न्यायालयीन कामकाज काढून घेतले
3. राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तीची एका स्त्रीला तिच्या बाजूने निकाल देण्यासाठी त्यांची लैगिक भूक भागवण्याची मागणी; चौकशी सुरू
4. कर्नाटक उच्च न्यायालयाचे काही न्यायमूर्ती निर्दोष
5. महाराष्ट्रात न्यायदान करणाऱ्या शेकडो न्यायाधीशांची नेमणूक करणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर पैसे खाऊन नोकऱ्या देण्याचा आरोप.

पुढे वाचा

. . . जर परवडत असला तर . . .

ज्या ऐतिहासिक प्रक्रियेने भारताला तरल, नाजुक, नखरेल दर्शने, धर्मशास्त्र, वास्तुकला आणि संगीत दिले; त्याच प्रक्रियेने उपाशी, मरगळलेली खेडी, संधीसाधू आणि हावरट ‘सुसंस्कृत’ (नागर) वर्ग, नाराज कामगार, ढासळती मूल्ये, अंधश्रद्धा यांनाही जन्म दिला. एक अंग दुसऱ्या अंगाचा परिणाम आहे. एक अंग दुसऱ्याची अभिव्यक्ती आहे.

अगदी अनघड, प्राथमिक हत्यारांमुळे अतिरिक्त उत्पादन तुटपुंजे राहिले, आणि तेही (तंत्रज्ञानाला) समरूप अशा जुन्यापुराण्या समाजव्यवस्थेने हिरावून घेतले. बहुसंख्यकांच्या दारिद्र्यावर आपला ऐषारामी सुसंस्कृतपणा रचलेला आहे, हे विसरून उच्च वर्गाला आपला उच्चपणा अंगभूत श्रेष्ठतेतून आला, असे वाटू लागले. इतिहास म्हणजे स्वैर, विस्कळीत घटनांची माळ नव्हे.

पुढे वाचा

क्रिकेट हा खेळ की स्वार्थाचा बाजार

दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या काही घटनांचे अस्तित्व आपल्या देशात आज ही कायम आहे. ब्रिटिशांनी जाता जाता आपल्या देशाची फाळणी केल्यामुळे न भरून निघणाऱ्या जखमांचे व्रण आजही आपल्याला त्रास देत आहेत. तसेच ब्रिटिशांनी आपल्या देशाला क्रिकेट या खेळाची देणगी दिल्यामुळे या खेळाने सध्या कहर माजविला आहे. 1975 पासून सुरू झालेल्या विश्वचषकामुळे अलिकडच्या काळात क्रिकेटच्या स्पर्धा ह्या खेळाडू वृत्तीने खेळण्याच्या स्पर्धा न राहता त्यामध्ये व्यावसायिक व धंदेवाईक प्रवृत्तीने शिरकाव केला आहे. क्रिकेटच्या वेडाने शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शासकीय कार्यालयातील शिपायापासून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत, तसेच लहान मोठ्या विविध व्यावसायिकांना झपाटून टाकले आहे.

पुढे वाचा

मी नास्तिक का आहे?

“वृथा अहंकार किंवा गर्वामुळे माणूस ईश्वराचे अस्तित्व कसे नाकारायला लागेल हे मला अजिबात समजू शकत नाही. एखाद्यास जर पात्रता नसताना अमाप लोकप्रियता मिळाली असेल तर तो दुसऱ्या कुणा थोर माणसाचे थोरपण नाकारू शकेल हे समजू शकते. पण मुळात आस्तिक माणूस अहंकारापोटी ईश्वराचे अस्तित्व नाकारू शकेल हे पटत नाही. असे दोनच कारणांनी घडू शकते. एकतर हा अहंकारी माणूस स्वतःस देवाचा प्रतिस्पर्धी तरी समजत असेल किंवा स्वतःसच देव मानीत असेल. पण मग त्यापैकी कोणत्याही बाबतीत तो खऱ्या अर्थाने नास्तिक असू शकत नाही. स्वतःला देवाचा प्रतिस्पर्धी मानणारा माणूस देवाचे अस्तित्व नाकारीत नसतोच.

पुढे वाचा

अनुभववादी नीतिमीमांसेवरील आक्षेपांस उत्तर

फेब्रुवारी 2003 च्या आजचा सुधारक मधील माझ्या लेखात मी अनुभववावादी नीतिमीमांसेचे विवरण आणि समर्थन केले. त्या लेखाच्या शेवटी अनुभववादाच्या टीकाकारांचे काही आक्षेप आहेत असे मी म्हणालो. त्या आक्षेपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करावयाचा आहे.
पहिला आक्षेप असा होता की नैतिक वाक्यांचे प्रमुख कार्य कर्मोपदेश आहे ही सर्वमान्य गोष्ट आहे. ती सर्व वाक्ये स्पष्टपणे किंवा व्यंजनेने, उपदेशपर, आदेशपर किंवा prescription असून आपण काय करावे हे सांगणारी आहेत. शुद्ध कथनात्मक किंवा निवेदक (indication) वाक्याप्रमाणे ती वस्तुस्थितीचे वर्णन करणारी नसतात. पण हे म्हणणे पूर्णपणे खरे नाही, कारण बहुतेक नैतिक वाक्यांना वर्णनपर अर्थही थोडाफार असतो.

पुढे वाचा

उत्क्रांतीची तोंडओळख (लेख-१)

काही दिवसांपूर्वी वाचनात आले की मानवी गर्भाला सुद्धा उचकी लागते. पुढे शास्त्रज्ञाचे मत दिले होते की ‘उचकी लागणे’ हा उत्क्रांतीचा एक टप्पा असू शकतो. त्याचा सखोल अभ्यास अजून व्हायचा आहे. वाचून मजाही वाटली अन् आ चर्यही. नंतर लक्षात आले की हे सोदाहरण सिद्ध व्हायला अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत आपण कुठे असणार?
उत्क्रांती म्हणताच नाव समोर आले, ‘डार्विन’, आणि पुढे ‘बलिष्ठ अतिजीविता’, म्हणजे Survival of the fittest! पण मुळात डार्विनने ‘बलिष्ठ अतिजीविता’ ही संज्ञा वापरलीच नव्हती. त्याचे म्हणणे होते की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राण्यांमध्ये एका विशिष्ट क्रमाने बदल होत असतात.

पुढे वाचा

महाराष्ट्राची वित्तीय स्थिती व उपाय : जागतिक बँकेचा अहवाल (उत्तरार्ध)

विकास व विषमता
अहवाल म्हणतो ते काही अंशी खरे आहे की, महाराष्ट्राच्या साधारण बरोबरीचे दरडोई उत्पन्न असणाऱ्या हरियाणा राज्याच्या तीनपट आणि पंजाब राज्याच्या पाचपट विषमता महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकावर असून येथे दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. राज्याचा पश्चिम आणि दक्षिण भाग अतिश्रीमंत आहे तर मध्य आणि पूर्व भाग गरीब आहे. त्याचे कारण अहवालात दिलेले नाही ते असे की पंजाब-हरियाणातील समृद्धी प्रामुख्याने सार्वत्रिक असलेल्या सिंचनामुळे व त्या आधारावर दर हेक्टरी उच्च उत्पादन– उत्पन्न यामुळे आहे. त्यामुळे समृद्धी सार्वत्रिक आहे.

पुढे वाचा

भारतीय संस्कृती व गर्भपात (उत्तरार्ध)

भारतामध्ये सुरुवातीपासून शस्त्रक्रियेवर अवलंबून राहण्याची परंपरा सुरू झाली. त्यालाही 1953 च्या सुमारास ‘bad in taste’ संबोधिले गेले तरी जगात सर्व ठिकाणी हळूहळू त्याचा वापर वाढीस लागला. येथे नोंदवावेसे वाटते की भारतात बऱ्याच भागात संतति-नियमन करण्याची आंतरिक इच्छाच नव्हती. त्यामुळे गर्भपात, शस्त्रक्रिया किंवा कोठल्याच उपलब्ध मार्गांचा आधार घेण्याची बहुजनांना तितक्या प्रमाणात जरूरी वाटली नाही. आजही बऱ्याच मोठ्या राज्यांत निम्मेएक लोक त्यापासून दूर असलेले आढळतात. ह्या उलट मुलगे हवेत, मुली नकोत ही वृत्ती मात्र भारतभर नित्यनियमाने सर्वांत आढळते.
एक काळ असा होती की मुली झाल्या तर त्यांना मारीत.

पुढे वाचा

नवमध्यमवर्गाचे राजकारण

चिनी बनावटीच्या गृहोपयोगी वस्तू पार केरळपर्यंत मिळायला लागल्याला आता काही वर्षे होऊन गेली. या सर्व वस्तू खासगी क्षेत्रातील उत्पादने आहेत. चिनी उत्पादक हे कसे करू शकले? आर्थिक उदारीकरणाची, खासगीकरणाची चीन व भारतातील प्रक्रिया जवळजवळ एकाच वेळी सुरू झाली. भारतामध्ये या प्रक्रियेची गती गोगलगाईची, तर चीनमध्ये गरुडझेपेची. भारतामधील या कमी गतीची अनेक कारणे दिली जातात. येथील लोकशाहीचे अस्तित्व हेही एक कारण दिले जाते. चीनमध्ये कामगार-कपातीचे भांडवल करून कामगार नेते भांडवलदार होत नाहीत, अशा कलाने त्या विचाराची मांडणी केली जाते. खरे तर लोकशाही समाजरचनेमध्ये लोकमान्यतेच्या पायावरती आर्थिक उदारमतवादाने जास्त गतीने पुढे जायला पाहिजे होते.

पुढे वाचा

असहिष्णुतेचे दुर्लक्षित परिणाम

जवळजवळ सर्व जगात धार्मिक असहिष्णुता आणि दहशतवाद यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक विचारवंत या दोन्ही अनर्थकारक घटनांची चिकित्सा करून त्यांना प्रतिबंध कसा घालावा, याविषयी अभ्यासपूर्ण लेखन करीत असतात. या विचारवंतां-मध्ये समाजशास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक, पत्रपंडित, राजकीय मुत्सद्दी, विविध धर्मांच्या अनुयायांचे नेतृत्व करणारे धुरीण, इत्यादींचा समावेश असतो. परंतु अशा विचारवंतां-मध्ये मानसोपचारतज्ज्ञ सामील झालेले क्वचितच दृष्टोत्पत्तीस येते. वस्तुतः माणसाच्या मनातील वैरभाव, द्वेष आणि चिंता यांच्यासारख्या विघातक भावनांचे उच्चाटन करून, त्याला सहनशीलतेची व परमतसहिष्णुतेची कास धरून समाजातील इतर माणसांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्यास मदत करणे, हे मानसोपचारशास्त्राचे एक उद्दिष्ट असते.

पुढे वाचा