विज्ञान आपल्याला सत्य सांगते का? विज्ञान आणि विज्ञान नसलेल्या गोष्टी यातील फरक कसा सांगता येईल? जर वैज्ञानिकांच्या एका गटाने आपणाला जैविक प्रक्रिया केलेले अन्न (genetically modified foods) धोकादायक नसते असे सांगितले, व दुसऱ्या वैज्ञानिकांच्या गटाने सांगितले की असे अन्न धोकादायक असते; तर कोणावर विश्वास ठेवायचा? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपणाला वैज्ञानिक एखाद्या निष्कर्षाप्रत कसे पोहचतात, हे पाहिले पाहिजे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून निष्कर्ष कसा काढला जातो हे पाहिले पाहिजे.
चांगले विज्ञान हे जाहीरपणे केले जाते. त्यामध्ये काही लपवाछपवी केली जात नाही.
विषय «इतर»
अज्ञान, ज्ञान आणि आत्मज्ञान
‘ज्ञान’ म्हणजे काय? ज्ञानेन्द्रिये आणि कर्मेन्द्रिये यांचे द्वारा व्यक्तीला होणारी ‘जाणीव’ म्हणजे ज्ञान. अध्यात्मवादी तत्त्वज्ञानात अशा ज्ञानाला मिथ्या म्हटले जाते. त्यांच्या मते ‘खरे’ ज्ञान हे इंद्रियापलीकडील असते. आणि हे इंद्रियांपलीकडील ज्ञान भगवद्भक्ती केली तरच प्राप्त होते, अन्यथा नाही. अध्यात्मवादी ह्या छापील तत्त्वज्ञानावर किंवा त्यांचे गुरु सांगतात म्हणून संपूर्ण विश्वास (चुकलो) —- ‘संपूर्ण श्रद्धा’ ठेवतात. विश्वास ठेवायला पूर्वानुभव लागतो. श्रद्धा ठेवायला पूर्वानुभवाची गरज नसते.
अशा ज्ञानाची पुढची पायरी म्हणजे आत्मज्ञान! म्हणजेच ‘आत्मसाक्षात्कार’ असे म्हणतात! श्रीमद्भगवद्गीतेत हा विषय पुष्कळ विस्तृतपणे हाताळलेला आहे. श्रद्धाळू लोकांना गीतेत सांगितलेली प्रत्येक गोष्ट संपूर्ण खरी वाटते.
‘एक होती बाय’
नित्यनव्या घडणाऱ्या प्रसंगांच्या गुंफणीमधून चित्रपट वा टी. व्ही. मालिका वेधक बनतात. आपल्याला खेचून घेतात. तीच ताकद ‘एक होती बाय’ ह्या पुस्तकात आहे. गेली सुमारे चाळीस वर्षे हॉलंडमध्ये स्थायिक झालेल्या श्री. सुरेन आपटे यांनी त्यांच्या सत्तरीत लिहिलेली ही सत्यकथा. फक्त त्यांच्या जन्मापूर्वीचा, अजाण वयातला आणि दूरदेशीच्या वास्तव्याचा काळ यातील हकिकती ऐकीव माहितीतून आल्या आहेत. जगावेगळ्या आईची आणि मुलाची जोडकथा, असे हे मराठीतले एकमेव पुस्तक असावे.
पेणजवळच्या हातोंडे या खेड्यातले एक ज्यू कुटुंब. त्यात १९१० च्या आसपास जन्मलेली बाय. वडिलांचा अकाली मृत्यू होतो.
पर्यावरण, जमिनीचे पोषकत्व आणि लोकसंख्या इ.
१. मार्च २००२ च्या आ.सु.मधील संपादकीयावर चर्चा होणे आवश्यक आहे. अशा चर्चेसाठी पूरक असे काही विचार इथे मांडत आहे. मूळ मुद्दा आहे ‘नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन’, ‘नैसर्गिक संसाधनांवर सर्वांचा हक्क’ आणि ‘नैसर्गिक संसाधनांवर येणारे लोकसंख्येचे सातत्याने दडपण’. माल्थसपासून हा विचार अधून मधून पुढे येतच राहिला आहे. पण विज्ञानामुळे उत्पादनवाढही पटीत होऊ शकते (Geometrical increase) आणि लोकसंख्यावाढ नियंत्रणही शक्य झाले आहे. आणि सुजाण, जागरुक, ज्ञानी समाज आज याचा पुरेपूर फायदा करून घेताना दिसत आहे. खास करून राजकीय सत्तासंपादनाच्या खेळाबाहेरच या गोष्टी राहायला हव्यात.
हिंदू! एक शिवी!
काही महिन्यापूर्वी आ.सु.च्या काही वाचकांनी ‘हिंदू म्हणजे नेमके काय’ असे प्रश्न विचारले होते. भल्याभल्या विद्वानांना नेमक्या हिंदुत्वाची परिभाषा करता आली नाही. एक विचार असाही वाचायला मिळाला, ज्यात ‘हिंदू नावाचा कोणी धर्मच नाही’ असे मांडले होते. प्रत्येक धर्मपंथाला एखादा संस्थापक असतो, ग्रंथ असतो, ठराविक तत्त्वज्ञान, कर्मकांड असते, तसे हिंदूधर्माचे नाही.
जैन-बुद्ध धर्माच्या वैचारिक आक्रमणानंतर आर्य पुरोहितशाहीची बरीच पिछेहाट झाली. त्यांनी मग पडते घेतले. गोमांस, पशुपक्षीमांसभक्षक यज्ञ बंद केले. यज्ञातील अ लील प्रकार बंद केले. भरतखंडात पसरलेल्या अनार्यांच्या देवदेवता स्वीकारल्या, मंदिरे, मूर्तिपूजा स्वीकारल्या.
धैर्य
तापलेल्या आणि धूळभरल्या डांबरी रस्त्यावर एका स्त्रीचा, गीताबेनचा, नग्नदेह पडला आहे. तिचे कपडे जवळच अस्ताव्यस्त पडले आहेत. अंतर्वस्त्रांपैकी एक वस्तू तिच्यापासून फुटाभरावर आहे, तर दुसरी तिच्या डाव्या हाताने जिवाच्या आकांताने धरली आहे. तिचा डावा हात आणि धड हे रक्ताळले आहेत. धडावर खोल जखमा आहेत. डाव्या मांडीवर रक्त आहे आणि घोट यावर एक पैंजण. प्लास्टिकच्या चपला शेजारी आहेत. चित्राच्या मध्यावर एक वेडावाकडा, लाल, द्वेषभरला विटेचा तुकडा आहे—-बहुधा तिच्या मारेकऱ्यांनी तिचा अंत घडवायला वापरलेला.
गीताबेन अमदाबादेत २५ मार्चला दिवसाढवळ्या मारली गेली, तिच्या घराशेजारील एका बस-थांब्याजवळ.
चोरांची एकाधिकारशाही
चोरांची एकाधिकारशाही
. . . कोणास ठाऊक, कोण लुटारू त्याच्या डोळ्याच्या कोषातून सारे काही खोदून घेऊन गेले आणि त्याच्या नकळत त्याच्या विचार-कोषात एक नियंत्रक मशीन बसवून गेले. परिणामी बाहेस्न चेहेरा तसाच दिसतो पण मेंदूत चित्रविचित्र विचार घिरट्या घालत राहतात. लुटारू आजकाल या देशाच्या बहुसंख्य डोक्यांचे नियंत्रण करत आहेत. याचा परिणाम म्हणून नियंत्रित माणसे देश आणि देशवासीयांना इजा पोचवणारे विचार करतात, आचरण करतात आणि वर स्वतःला सचोटीचे आणि विवेकी समजतात. सारे काही लुटारूंच्या मनासारखे घडते. लुटारूंचा हेतू एकच आहे, शोषितांच्या गोटात कधी हिंसात्मक किंवा सशस्त्र प्रतिकार दिसूच नये, आणि हिंसेचा आणि शस्त्रे बाळगण्याचा अधिकार फक्त शासकांनाच असावा.
धिस फिशर्ड लँड : लेख १
विवेक आणि उधळेपणा
[माधव गाडगीळ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘धिस फिशर्ड लँड : अॅन इकॉलॉजि-कल हिस्टरी ऑफ इंडिया’ (ऑक्स्फर्ड इंडिया पेपरबॅक्स, १९९२) हे पुस्तक भारताची सद्यःस्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अत्यंत शिस्तबद्ध संशोधन-पद्धती, प्रचंड आवाका आणि अनेक विषयांची सांगड घालण्याची लेखकांची हातोटी, हे स्तिमित करणारे आहे. या पुस्तकाचा संक्षेप करून काही लेखांमधून तो आ.सु.च्या वाचकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. खरे तर पूर्ण पुस्तक मराठीत यायला हवे—-मल्याळममध्ये केरळ शास्त्र साहित्य परिषदेने ते मागेच नेले आहे. पण त्रोटक स्पात तरी त्याला मराठीत आणू या.
भारतीय तत्त्वज्ञान आणि आपले जीवन
माझ्या मित्राचा भाऊ मुंबईला असतो. ५९ वर्षाचा आहे. बी.ए. झाला आहे. नेव्हीत ११ वर्षे नोकरी, त्यानंतर १५ वर्षे मुंबईला नामांकित खाजगी कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी व सध्या लेबर कॉन्ट्रक्ट घेणे, व एका कंपनीसाठी मुदत ठेवी गोळा करणारा एजंट म्हणून काम करणे—असा आतापर्यंत विविध प्रकारचा अनुभव गाठीस आहे. स्वतःचे घर आहे. बायको स्वतःच्या वेगळ्या जागेत दुकान व पैसे व्याजाने देण्याचा उद्योग करते, मुलगा चांगल्या नोकरीवर. अशा रीतीने आर्थिक स्थिती चांगली आहे.
११ वर्षांपूर्वी अपघाताने जखम झाल्याने मधुमेह व रक्तदाब हे विकार लक्षात आले.
पर्यायी विकासनीतीची ओळख
नर्मदा बचाव आंदोलनाच्या निमित्ताने चर्चिल्या गेलेल्या अनेक प्रश्नांबरोबर पर्यायी विकासनीतीचा उल्लेख बऱ्याच वेळा केला जातो. प्रचलित विकासनीतीसंबंधाच्या असमाधानातून पर्यायी विकासनीती गेली कित्येक वर्षे मांडली जात आहे. पर्यावरण-वाद्यांचे एक नवीन फॅड आहे’ ह्या मतापासून ‘पर्यायी विकासनीती’ हीच शाश्वत विकासनीती आहे आणि त्याशिवाय तरणोपाय नाही ह्या मतापर्यंत ह्या संबंधात अनेक मते मांडली जातात. पण पर्यायी विकासनीती म्हणजे काय? ह्याचे साकल्याने विवेचन अपवादात्मकच दिसून येते. श्री दिलीप कुलकर्णी ह्यांनी ही उणीव ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’ (राजहंस प्रकाशन जाने. २००१, पृष्ठसंख्या १४८, मूल्य १२०/- रु.) ह्या पुस्तकाद्वारे भरून काढली आहे.