मुंग्यांना साखर, कबूतरांना ज्वारी, गाईला मूठभर चारा टाकावा आणि धन्य व्हावे तोच प्रकार दारात नाना हेतूंपैकी एका हेतूने आलेल्या अतिथीला खायला-प्यायला देण्याचा. कणात विश्व पाहावे त्याप्रमाणे नैवेद्यात विश्वातल्या असंख्य गरिबांची क्षुधा शमल्याचे स्वप्न पाहावे! गरजूला काम देऊन पुरेसे वेतन द्यावे ही खरी सेवा. अनेकांच्या जमिनी जाताहेत. अनेकाचे रोजगार नष्ट होताहेत, अनेकां-वर नाना पटींनी अन्याय होत आहे त्यासाठी झगडणाऱ्या संस्थांना मदत करणे ही आजची गरज आहे. त्यातूनच गरिबांचा स्वाभिमान जपला जाईल. मागे सरकारने भिकाऱ्यांसाठी वसाहत सुरू केली. भीक देणे गुन्हा ठरवला. पण चार आणे देऊन अजिजी पाहून सुखावणाऱ्या धनिकबाळांनी ती योजना धुडकावून लावली.
विषय «इतर»
खादी (भाग ६)
खादी आणि रोजगार
खादी आणि रोजगार ह्या दोन संकल्पनांची सांगडच बसू शकत नाही. तत्त्व म्हणून खादी स्वीकारल्यानंतर तिचा विचार रोजगारनिर्मितीसाठी करता येणार नाही असे माझे मत आहे. (पण माझे हे मत पूर्णपणे चुकीचे असू शकते आणि त्यासाठी ते तपासून पाहणे आवश्यक आहे.) खादीचा रोजगाराशी ३६ चा आकडा आहे. खादी ही स्वावलंबनासाठी आहे. रोजगार-निर्मितीसाठी नाही. कातणाऱ्याने जमल्यास विणणे शिकले पाहिजे; विणणारा स्वतः कातत असेल तर चांगलेच असे मानणारा हा विचार आहे. खादी ही अर्थव्यवस्थेच्या विकेन्द्रीकरणासाठी आहे. आणि रोजगाराला विकेन्द्रीकरणाचे वावडे आहे. केन्द्रीकरण केल्याशिवाय, कोणत्या तरी स्वरूपात संघटित प्रयत्न केल्याशिवाय रोजगार निर्माण होऊ शकत नाही.
शस्त्रप्रेम आणि आदर्शवाद
[Cheryl Benard ही ऑस्ट्रियन स्त्री विएनातील एका संशोधन-संस्थेची संचालिका आहे. प्रामुख्याने स्त्री प्रश्नांबाबत जर्मन भाषेत लिहिणाऱ्या या लेखिकेची ‘मर्डर इन पेशावर’ (लेखन १९९८) ही कादंबरी नुकतीच पेंग्विन बुक्स, इंडियाने प्रकाशित केली. मुळात सामान्य गुन्हेगारकथा असलेल्या या कादंबरीत १९९८ च्या जरा आधीच्या पाक-अफगाण सीमेच्या स्थितीचे विवेचन आहे.
मॅलोन ह्या अमेरिकन व्यापाऱ्याला काही कारणाने एका अफगाण निर्वासितांच्या शिबिरात लपावे लागते. तिथे त्याची हमीद या आपल्या आईसोबत राहणाऱ्या सात वर्षांच्या ‘पोरक्या’ मुलाशी मैत्री होते. आता . . .]
हमीदला मॅलोनबद्दल काळजीही वाटते. त्याच्या झोपडीत शस्त्रे नाहीत.
तीच दहशत: लक्ष्य वेगळे
(नोम चोम्स्की |Noam Chomski] हे मॅसॅच्युसेट्स तंत्रविज्ञान संस्थेत भाषाविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. अमेरिकन परराष्ट्रधोरणाचे परखड टीकाकार म्हणून त्यांची कीर्ती आहे. ११ सप्टेंबर २००१ च्या घटना आणि त्यांचे संभाव्य पडसाद याबद्दल बेलग्रेडच्या एका रेडिओवाहिनीने चोम्स्कींची मुलाखत घेतली. तिच्यातील काही उतारे टाईम्स ऑफ इंडियाने २४ सप्टेंबर २००१ ला प्रकाशित केले. त्यांचा हा सारांश —-) तुम्हाला हल्ले का झाले असे वाटते?
ओसामा बिन लादेनला वाटते की १९९० मध्ये अमेरिकेने सौदी अरेबियात तळ स्थापणे, ही रशियाने अफगाणिस्तानावर केलेल्या आक्रमणाचीच आवृत्ती होती. मुळात इस्लामी धर्मस्थळे असलेल्या धर्मसंरक्षक सौदी अरेबियावरच्या या अतिक्रमणा-नंतर ओसामा आणि त्याचे ‘अफगाण’ साथी अमेरिकाविरोधी झाले.
११ सप्टेंबर आणि भारतापुढील पर्याय
११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादाने अमेरिकेत हाहाकार उडवून दिला. अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याचा मानबिंदू असलेले जागतिक व्यापार केंद्र आणि लष्करी सामर्थ्याचे मानबिंदू पेंटॅगॉन, हे दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य बनले. कॅपिटॉल हॉल आणि राष्ट्राध्यक्ष निवास हे राजकीय सामर्थ्याचे मानबिंदू या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. तालिबानच्या आश्रयास असलेला ओसामा बिन लादेन हा या हल्ल्यांमागील प्रमुख सूत्रधार असल्याचे अमेरिकेने घोषित केले. ओसामा, त्याची अल-कायदा ही अतिरेकी संघटना, आणि अफगाणिस्तानातील तालिबान राजवट यांना धडा शिकवण्याचा आता अमेरिकेने निर्धार केला आहे.
अमेरिका, इस्राएल आणि भारत हे आपले प्रमुख शत्रू असल्याचे ओसामाने यापूर्वीच जाहीर केले आहे.
अग्नि व यज्ञ: वेदकाल आणि विसावे शतक
अग्नीला साक्ष ठेवून सध्याचे भारतवर्षीय त्रैवर्णिक हिंदू लोक विवाह-संपादन करतात. अग्नीची साक्ष नसेल, तर तो विवाह धर्म्य समजला जात नाही. येथे असा प्रश्न उद्भवतो की, अग्नीचा व विवाहाचा संबंध काय? . . .
अशा प्रश्नांना उत्तर द्यावयाचे म्हणजे रानटी आर्यांची पुरातन काळी सामाजिक व भौम स्थिती काय होती ते पाहावे लागते.
ऋषींचे अतिप्राचीन पूर्वज वानरीय पाशवावस्थेत असताना, वानरांप्रमाणेच त्यांनाही झाडे, पर्वतांचे कपरे, गुहा वगैरेंच्या आश्रयाने राहून हिंस्र पशृंपासून, वादळांपासून व थंडीवाऱ्यापासून आपला बचाव मोठ्या संकटाने करावा लागे. . . . हरणे वगैरेंना बचावाकरिता शिंगे, दाढा, टापा वगैरे सहज शस्त्रे तरी असतात, मनुष्यांना तीही नाहीत.
ग्रीटिंग कार्ड
ग्रीटिंग कार्ड
शुभेच्छा व्यक्त केल्याने शुभ झाले असते
तर कुत्रे कशाला फिरले असते
भोंगळे अन् हराममौत मरणाऱ्या
कुत्र्यासारखे हे आयुष्य कोणत्याही वेळी येऊ शकते
भरधाव वाहनाखाली कुठल्याही z
राजमार्गावर कावळ्याच्या शापाने
जशा मरत नसतात गाई
तितकीच असते शुभेच्छाही वांझ
जेथे शुभेच्छा कशाशी खातात
हेच नसते ठाऊक कवडीमोल असते
पसायदान अन् कविता तर नसते त्यांच्या गावी ही
[गेले काही दिवस नैवेद्य,पूजाअर्चा वगैरेंचे ‘सुपरिणाम’ सांगणारे काही लेख येत आहेत. त्यांचा फोलपणा दाखवणारी ही श्रीकृष्ण राऊतांची कविता, संक्षिप्त स्यात. (‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’.
‘ल्यूटाइन बेल’
लॉइज ऑफ लंडन. काही शतके जगाच्या विमाव्यवसायाचे केंद्र समजली जाणारी संस्था. एका मोठ्या दालनात अनेक विमाव्याव-सायिक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा, क्रियेचा किंवा घटनेचा विमा उतरवून देतात. लॉइड्जची सुरुवात झाली जहाजे आणि त्यांच्यात वाहिला जाणारा माल यांच्या विम्यापासून. ‘मरीन इन्शुअरन्स’ ही संज्ञा आज कोणत्याही वाहनातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या विम्यासाठी वापरतात. पूर्वी मात्र जहाजी वाहतूकच महत्त्वाची होती आणि लॉइड्जच्या दालनातील बहुतेकांचा प्रत्येक जहाजाच्या प्रत्येक सफरीच्या विम्यात सहभाग असे. एखादे जहाज बुडाल्याची वार्ता आली की दालनाच्या एका कोपऱ्यातील ‘ल्यूटाइन बेल’ (Lutine Bell) वाजवली जाई.
आजचा सुधारक व आगरकरांचे विचार
भारतात नुकत्याच झालेल्या फूलनदेवीच्या हत्येचे कारण व कारस्थान अजून पूर्ण उघडकीस आले नसले तरी शेरसिंग राणा याने राजपुतांच्या खुनाचा बदला घेऊन ठाकूर/राजपूत जातींचे नाव उज्ज्वल करण्यासाठी हा खून केला हे वाचून भारतात आजही जातिनिष्ठा व जात्यभिमान किती तीव्र आहे याची खात्री झाली. दोन वर्षे अगोदर फूलनदेवी जेव्हा न्यूयॉर्कला यु. एन्. ओ. मध्ये आल्या होत्या तेव्हा मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. जास्त शिक्षित नसूनदेखील भारतातल्या मागासलेल्या (दलित) समाजाच्या व विशेषतः त्यांच्या स्त्रियांच्या उन्नतीकरता त्यांची कळकळ पाहून व विचार ऐकून भविष्यात गोर-गरिबांकरता त्या जोरदार आवाज उठवतील असे वाटले होते.
शालेय शिक्षणाविषयी थोडेसे
१. आ.सु.च्या गेल्या काही अंकांतून शालेय शिक्षणाविषयी बऱ्याच चिंता व्यक्त झाल्या आहेत. “आम्हाला का विचारत नाही” असा प्रश्न जुलैच्या अंकाच्या पहिल्या पानावर पालकांतर्फे विचारला गेला आहे. ‘परभारे’ निर्णय घेतल्याबद्दल सरकारवर टीका आहे.
२. १९८६ साली सरकारने शिक्षण धोरणावर जाहीर चर्चेचे आवाहन केले व झालेल्या चर्चेवर आधारलेली स्परेखा प्रसिद्ध केली. या स्परेखेचे पुनरवलोकन करताना NCERT या सरकारी संस्थेने अनेक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक-संस्था, गैरसरकारी संस्था यांच्यात चर्चा घडवून आणल्या व त्या आधारावर नवीन रूपरेखा तयार केली असा त्या संस्थेचा दावा आहे. या संबंधीची बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर मी एका शिक्षण-संस्थेच्या वतीने NCERT कडे या स्परेखेच्या प्रतीची मागणी केली व ती मला सहजपणे मिळाली.