विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

गंगाधर गलांडे, 4 Aldridge Court, Meadway, High Wycombe, Bucks, HP11 1SE, United Kingdom
आपला मेचा अंक मिळाला. मुखपृष्ठावरचा ‘धैर्य’ या मथळ्याखालचा मजकूर वाचून मनस्वी विषाद वाटला. वर्णन केलेली घटना निंद्य तर खरीच पण संपादकांनी असा मजकूर छापून काय साधले हे मात्र समजत नाही मला.
प्रथम मी हे मान्य करतो की १९ एप्रिलचा टाइम्स ऑफ इंडियाचा अंक माझ्या वाचनात आलेला नाही. तरीही हे तर उघडच आहे— संपादकांनी त्या मूळ लेखांतल्या निवडक मजकुराचाच गोषवारा दिलेला आहे. माझी खात्री आहे की लोकांची माथी भडकवण्याच्या (mass hysteria) कृत्यातूनच त्या अबलेची हत्या झालेली असावी व, जाणून वा बुजून, निवडक/अर्धवट माहिती देऊन तुम्हीही तोच मार्ग आचरलेला आहे, नाही का?

पुढे वाचा

पत्रसंवाद

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड) — ४१० १०१ (अ) एप्रिल २००२ च्या अंकात मेहेंदळे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पुढील विधाने मला खटकली.
१. ‘देव ही एक मनोवैज्ञानिक गरज आहे’. २. ‘शाप, कुंडलिनी, रेकी . . . तत्सम शक्तींचा अभ्यास होत आहे.’ ३. ‘डत्दृदत्द्म . . . ध्वनिमुद्रिका . . . विश्वास वाटतो.’ ४. . . . ऐतिहासिक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे म्हणजे राम, . . . अनुकरण
अपेक्षित आहे.’ त्या विधानांमध्ये मला पुढील चुका सापडल्या.
१. “placebo’ ह्या ‘औषधा’चा एक दुर्लक्षित गुणधर्म म्हणजे ‘वापरकर्त्याला औषध मनोवैज्ञानिक मार्गाने गुण देणारे आहे ह्या सत्याची जाणीव कस्न दिल्यावर औषधाचा परिणाम बंद होतो.’

पुढे वाचा

पत्रसंवाद

रवींद्र द. खडपेकर, २० पार्वती, पाटीलवाडी, सिद्धेश्वर तलाव मार्ग, ठाणे — ४०० ६०१
…… अलिकडेच दूरदर्शनवर एक भयानक विज्ञापन पाहण्यात आले. त्यासंबंधी मी ‘राज्य महिला आयोगास’ लिहिले. तुमच्याकडेही हा प्रकार कळवीत आहे. आपण योग्य ती दखल घ्याल ही खात्री आहे.
…. मी स्वतः हिंदुत्ववादी गोतावळ्यात असल्याने हिंदुत्वाबाबत माझा विचार नेहमी चालूच असतो. म्हणून मला प्रश्न विचारावेसे वाटतात. (१) आपण राष्ट्रवाद मानता का? (२) नसल्यास दुसरा कोणता वाद मानता? मानवतावाद? (३) असल्यास हिंदुत्ववाद हाच भारताचा राष्ट्रवाद होऊ शकतो असे आपणास का वाटत नाही?

पुढे वाचा

पत्रसंवाद

केशवराव जोशी, तत्त्वबोध, नेरळ (रायगड) — ४१० १०१
तुम्ही पान ४१५ वर मृतकांची बाबरीनंतरची आकडेवारी मागितली आहे म्हणून हा पत्रप्रपंच करीत आहे. सर्व कमिशननी हिंदूनाच दोषी धरले आहे.
सुरवातीलाच एक स्पष्ट करितो की आम्ही बाबरी मशीद पाडण्याच्या विरुद्ध आहोत. आम्ही बाबराची अवलाद नाही. राजवाडे, पोतदार, पगडी, खरे शेजलकरांचे अनुयायी आहोत आणि जे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवितात तेवढेच आम्ही मान्य करणार. “आयोध्येला राम जन्मला” व “बाबराने देऊळ पाडले’ असे इतिहासात शिकवत नाहीत.
“श्रीकृष्ण अहवालात’ पान २७ वर माहिती दिली आहे ती अशी आहे:
“मुंबईत डिसेंबर ९२ व जानेवारी ९३ मध्ये ९०० जण मेले.

पुढे वाचा

पत्रसंवाद

भ. पां. पाटणकर, ३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
(क) जानेवारी २००२ अंकातील दोन लेख एकत्र वाचले की एक विनोदी निष्कर्ष निघतो. पुरुष अजून पुरुषप्रधान भूतकाळात राहत असल्यामुळे पा चात्त्य कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत आहे असे ललिता गंडभीर म्हणतात. आशा ब्रह्म यांच्या मते आपल्या जैविक प्रवृत्ती आणि (उपरी?) नैतिक ध्येये यांच्यातील विरोधामुळे समस्या निर्माण होतात. एक मत दुसऱ्या मतावर कलमख्याने लावले की असा निष्कर्ष निघतो की पुरुष भूतकालीन जैविक प्रेरणांच्या समाधानावरच खूष आहे आणि स्त्रिया (उपरी) नैतिक मूल्यांच्या मागे लागल्या आहेत. शिवाय पुरुषांनी स्त्रियांना त्यांच्या जीवनाबद्दलचे निर्णय घेऊ द्यावेत असे त्या आवाहन करताहेत म्हणजेच उदार बुद्धी दाखवण्याचे म्हणजेच (उपरी) नैतिक मूल्ये स्वीकारायला सांगत आहेत!

पुढे वाचा

पत्रसंवाद

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, नेरळ, (रायगड) — ४१० १०१
_ श्री. दिवाकर मोहनी यांनी आ.सु. डिसेंबर २००१ मध्ये ‘रोजगार आणि पैसा’ या लेखात देव आणि पैसा यांच्यातील साम्य शोधले आहे. असे करताना विश्वास आणि श्रद्धा यांमध्ये गल्लत झालेली दिसते.
एखाद्या गृहीतकावर आधारित अनुमाने खोटी ठरत असल्याचे दिसत असूनही त्या गृहीतकाला कवटाळून बसणे म्हणजे अंधश्रद्धा होय. देव मानणे या वर्गात येते. जोवर अनुमाने खोटी ठरत नाहीत तोवर ते गृहीतक खरे आहे असे मानून सावध व्यवहार करणे ही अंधश्रद्धा नाही. पैसा आहे असे गृहीत धरून केलेले आचरण जर अपेक्षित फल (Result) देत असेल तर, ‘तो कोठे आहे?’,

पुढे वाचा

पत्रसंवाद

विजय वर्षा, ‘चार्वाक’, अमृत कॉलनी, भू-विकास बँकेमागे, करंजे, सातारा
आस्तिक माणूस अंधश्रद्धाळू असतो, हे विधान खटकणार असले तरी ते सत्य आहे. कारण दैनंदिन जीवनात माणूस वागताना पावलोपावली त्याच्या अंध-श्रद्धाळूपणाचा ‘प्रत्यय’ येतो.
घरी देवपूजा करून सुख, शांती समाधान, धन संपत्ती, असे बरच काही देवाकडे मागून कामाला बाहेर पडतो. परंतु रस्तोरस्ती दिसणाऱ्या देखल्या देवाला दंडवत घातल्याशिवाय पुढे जात नाही. कारण आपण मागितलेले मागणे देवाच्या स्मरणात राहण्यासाठी येता जाता सारखा दंडवत घालत असतो. ज्याने स्वतःवरचा विश्वास गमावलाय तो देवावर विश्वास ठेवण्याचा नाहक प्रयत्न करतो.

पुढे वाचा

स्त्री-हत्या: जैविक प्रतिसाद की सामाजिक मानसिकता?

आजचा सुधारक, ऑक्टो. २००१ मधील श्री. सुभाष आठले यांचा ‘स्त्री : पुरुष प्रमाण’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनगणनेनुसार समाजात स्त्रियांचे प्रमाण घसरण्याचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्त्रीहत्या आहे हे निर्विवाद. पण त्याची कारणमीमांसा करताना जनसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाल्यावर अबोध समाजमनाकडून केवळ जैविक प्रतिसादरूप असा स्त्रीहत्येचा निर्णय आपोआप घेतला जात असावा असे जे प्रमेय मांडले आहे ते मुळीच विवेकाला धन नाही. समाजातील स्त्री/पुरुष प्रमाणाचा नैसर्गिक समतोल ढळतो आहे. लेखक म्हणतात त्याप्रमाणे स्त्रीहत्या जैविक पातळीवर नैसर्गिकपणे घडून आली असती, तर हा समतोल बिघडण्याचे कारण नव्हते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सुधाकर देशमुख, कन्सल्टिंग सर्जन, देशमुख हॉस्पिटल, उदगीर, जि. लातूर–४१३५१७
सध्या इंग्रजी वाङ्मयामध्ये J. K. Rowlings ह्यांच्या पुस्तकांचा बोलबाला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांचा नायक Harry Potter हा पा िचमेत आणि भारतातही (अर्थात इंग्रजीवाचकांत) लोकप्रिय होत आहे. दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकविक्रीच्या याद्यांत ह्या पुस्तकाची आघाडी गेली कित्येक महिने कायम आहे. Times of India सारख्या मान्यवर वृत्तपत्राच्या संपादकीयातही Harry Potter Phenomenon संबंधी लिहिले गेले आहे. जादूटोण्याच्या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्यांचे लेखन आहे. ह्या पुस्तकांच्या वाचनानंतर माझ्या मनात दोन प्रश्न निर्माण झाले. पहिला असा की जादूटोण्यासारख्या अशास्त्रीय विषयावर मुलांकरिता लिहिलेले पुस्तक एवढे लोकप्रिय का व्हावे?

पुढे वाचा

पत्रसंवाद

श्री. एस्. पी. तारे, टाईप D, 25/6, ऊर्जा नगर, चंद्रपुर — 442 404
महिलांच्या प्रश्नांबद्दल आजचा सुधारक फार जागरूक आहे पण त्यांत श्री. शरद जोशी यांच्या लक्ष्मी मुक्ती चळवळीला स्थान मिळायला हवे होते. १ लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आपल्या स्वीवर इस्टेटीमध्ये पत्नीच्या नावांचा पण संयुक्तपणे समावेश केला आहे. ही फार मोठी सामाजिक क्रांती आहे. त्या खेड्यांमध्ये १०० शेतकऱ्यांनी पत्नीचे नाव शेतीच्या मालकींत समाविष्ट केले आहे. अशा खेड्यांना आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढून प्रत्यक्ष भेट देऊन त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करतात. प्रत्येक जिल्ह्यांतील किमान १०० गांवे ‘लक्ष्मी मुक्ती गांवे’ व्हावीत असा त्यांचा आग्रह व प्रयत्न आहे.

पुढे वाचा