विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

विज्ञानाचे स्वरूप सांगणारा विशेषांक फारच चांगला झाला आहे. त्यात दिलेली माहिती प्रत्येक सुविद्य माणसाला माहीत हवीच.
सामान्य माणसाच्या जीवनात मात्र विज्ञान फारसे शिरत नाही. त्यातले काही न समजताही तो फोनची बटने दाबून, स्कूटरला किक मारून, कम्प्यूटरचा ‘उंदीर’ चालवून आपला कार्यभाग साधत असतो. त्याची बुद्धी स्थल-काल, द्रव्यगुण या पारंपारिक संकल्पनांशी जुळलेली असते. या सर्वच कल्पना जिथे विलय पावतात, ऊर्जेचा पुरावा असतो पण द्रव्याचा पुरावा नसतो, तरीही गुरुत्वाकर्षण शक्ती असते, स्थल-काल हे स्वतंत्र पदार्थ नसून ते एका जटिल गणिती संबंधाने जुळलेली कशाचीतरी रूपे असतात अशा ‘नेति, नेति’ कल्पना सामान्य मनुष्याच्या पचनी पडत नाहीत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी मी काहीही लिहिण्याचे टाळतो कारण ते प्रश्न नाजुक तर आहेतच पण त्यातले काही अपरिवर्तनीय वास्तव पुढे मांडणे हे पुरुषी अहंकाराचे लक्षण मानले जाते.
(एखाद्या स्थितीला, ती) “आज आणि इथे आहे या कारणासाठीच मान्यता देणे मला शक्य नाही’ असे तुम्ही म्हणता. परिस्थिती बदलायची धडपड जो कोणी करतो तो असेच म्हणतो. पण वास्तव किती बदलता येईल हा प्रश्न पडतोच. स्त्री ही शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे. ती कामसुखाकरता पुरुषाच्या इच्छेतर अवलंबून आहे (पुरुष मात्र तसा नाही) व बाळंतपण, बाळांना स्तनपान देणे या नैसर्गिक प्रक्रियांमुळे तिच्यावर बंधने येतात, ती परावलंबी होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

“ ‘मित्र’च्या निमित्ताने’ या सुनीती देव यांच्या लेखासंबंधी (आ.सु. ऑक्टोबर, २००३) माझी प्रतिक्रिया : सुनीतीबाईंशी बऱ्याच बाबतीत माझे मतैक्य आहे. त्या म्हणतात तसे दादासाहेबांचा दलितांविषयीचा ग्रह न समजण्यासारखा आहे. बऱ्यापैकी बुद्धिवादी वाटणारा माणूस स्वतःस येणाऱ्या एका अनुभवामुळे सबंध जमातीविषयी एवढा आकस धरू शकेल असे वाटत नाही. त्याचे अधिक खोल जाणारे कारण दिले असते तर त्या पात्राला पोषक ठरले असते. तसेच आपल्या आग्रहीपणाने ते मुलांवर त्यांना वृद्धा-श्रमात पाठविण्याचा निर्णय घेणे भाग पाडत आहेत, हे त्यांना कळण्यासारखे आहे. पण या बाबतीत निदान असे म्हणता येईल की कळूनही त्यांचे खचणे व तो निर्णय न पटवून घेणे समजण्यासारखे आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

जे. के. रोलिंग या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या हॅरी पॉटर नायक असणाऱ्या कादंबऱ्यांनी सध्या जगातील बालमनाचा पगडा घेतला आहे. लेखिकेला मिळालेले हे यश कौतुकास्पद आहे यात शंकाच नाही पण ज्या मुलाची मातृभाषा व संस्कार भारतीय आहेत त्यांनीही या पुस्तकासाठी रांगा लावाव्यात असे या पुस्तकात काय विशेष आहे या कुतूहलाने त्यातील एका भागाचे मराठी भाषांतर ‘हॅरी पॉटर आणि गुपितांचे दालन’ वाचून मोठी निराशा पदरी पडली. केवळ एवढेच नव्हे तर अशी पुस्तके आपल्या पाल्यांना वाचायला देण्यापूर्वी जागरूक पालकांनी ती स्वतः वाचून त्या वाचनाचा मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा असे वाटते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

वर्ष 14, अंक 4, हा जुलैचा अंक वाचला. त्यांतील दोन विषयांवर काही मते मांडत आहे.
1. गांधीजी व सावरकर यांच्या एकूण वैचारिकांची तुलना करणे योग्य होईल. अस्मृश्यता निवारण सोडल्यास हे दोघे मान्यवर पुढारी दोन विरुद्ध टोकाना उभे होते. गांधीजींचे अर्थकारण, राजकारण व समाजकारण सुसंगत होती. शेतीप्रधान व खेडीप्रधान अशी उत्पादनाची रचना, सूतकताई व हाथविणाई असा खादी-उद्योगाचा पुरस्कार, नांगरासाठी सशक्त बैल, दुधासाठी सशक्त गायी असा गोरक्षण कार्यक्रम, वैयक्तिक आचरणांत ब्रह्मचर्य व अहिंसा यावर अतिरेकी भर, ही गांधींच्या वैचारिकेची मुख्य सूत्रे होती. सावरकर हे गिरण्यांचे कापड, आधुनिक(तम) तांत्रिकी, अतिरिक्त गोधनाची हिंसा, इत्यादीचा पुरस्कार करीत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

जॉर्ज ऑर्वेलच्या -1984′ या उपहासगर्भ पुस्तकातील शासनाची एक घोषणा ‘इग्नोरन्स इज स्ट्रेंग्थ’ ही आहे. या पुस्तकातल्यासारख्या शासनाविषयी घृणा बनविण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले. देवरायांच्या समर्थकांनाही ही घोषणा आवडत नसावी या गृहीतकावर पुढील लिखाण आहे.
औषधशास्त्रात प्लॅसिबो ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. खोट्या समजुतीचा सुद्धा औषधासारखा परिणाम घडत असेल तर त्यास प्लॅसिबो परिणाम म्हणतात. मात्र प्लॅसिबो परिणाम केवळ खऱ्या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठीच वापरला जातो. रोग निवारण्यासाठी प्लॅसिबोचे बुजगावणे वापरले जात नाही. फसवणूक करून लोकांवर अगदी त्यांच्या भल्यासाठीसुद्धा राज्य करू नये असा टूमन शो किंवा मेट्रिक्स या चित्रपटांचा विषय आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

गांधींना छोटा करणारा नथुराम मोठा कसा?
एप्रिल 2003 चा आजचा सुधारक वाचला त्यातील शांताराम कुलकर्णी यांच्या पत्रावर माझ्या प्रतिक्रिया देत आहे.
‘महात्मा’ही गांधींना मिळालेली पदवी त्यांच्या महान कार्याविषयीची पोहोच पावती होती. ‘अहिंसा’, ‘सत्याग्रह’ यासारख्या प्रभावी हत्यारांनी, शांततामय मार्गांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अध्यात्माचा आधार घेऊन गांधींनी नैतिकतेतून सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार केले. म्हणूनच स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर हाच महात्मा स्वतंत्र भारताचा ‘राष्ट्रपिता’ झाला.
आपल्या पित्याविषयीसुद्धा वाईट विचार व्यक्त करताना मुलगा आपल्या घराण्याच्या संस्कृतीचा चांगल्या विवेकी जीवनमूल्यांचा विचार करतो. ‘पिता’ हा कुटुंबाचा पालक असतो, म्हणूनच कुटुंबीय त्याला गुणदोषासहित स्वीकारीत असतात.

पुढे वाचा

पत्रसंवाद

एप्रिल 2003चा आजचा सुधारक वाचला. दि. 13.9 च्या आजचा सुधारक या अंकातील श्री. मधुकर देशपांडे यांचा ‘मी नथुराम बोलतोय’ हा लेख वाचून श्री. शांताराम कुळकर्णी, पुणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नथुराम नाटकाला सर्व प्रेक्षक नथुराम विचाराचे होते असे कळते आणि नथुराम संख्या आताच का वाढली असा प्र न श्री कुळकर्णी यांनी केला आहे. मला असे वाटते या नाटका-अगोदर ही नथुराम म्हणजे नथुराम विचार होतेच पण ते छुपे होते कारण उघडपणे उदात्तीकरण (त्या विचाराचे) करण्याची धास्ती वाटत होती. आता केन्द्र सरकारात नथुरामप्रणीत सरकार असल्यामुळे त्यांना उघडमाथ्याने प्रचार करण्याची संधी मिळत आहे आणि संख्या नथुरामधर्माची वाढत आहे, पण ती संधीसाधूंच्या रूपात.

पुढे वाचा

पत्रसंवाद

विजय तेंडुलकर, श्री. पु. भागवत, सामाजिक-वैयक्तिक नीतिमूल्ये आणि वेडाचे सोंग घेणारे विचारवंत साहित्यिक आपण सर्वच एका व्यवस्थेचे लाभधारक असतो, अविभाज्य भाग असतो. त्या व्यवस्थेचे तोटेही आपल्याला सहन करावे लागतात. व्यवस्था जर अन्याय्य पिळवणूक करणारी असेल तर तिचा दोष आपणा सर्वांना चिकटणारच, माझा क्लायंट मला भरपूर फी देतो. तो फी तो सरळ मार्गाने मिळवीत नसेल तर? तस्करी करणाऱ्यांचे वकीलपत्र घेणारे वकील, उद्योगपतींचे सल्लागार . . . हे कशात बसतात? वाट्टेल ती किंमत देऊन हुसेनची चित्रे खरीदणारे कशात बसतात? लाखो रुपये भरून Health Club, Resorts, Gymkhana यांची वर्गणी भरणारे कशात बसतात?

पुढे वाचा

पत्रसंवाद

नोव्हेंबर अंकाच्या संपादकीयात पृ. 293 वर; ‘धर्म या शब्दाचा अर्थ सदा-चरण व कर्तव्यभावना’ असा असेल तर; तुमचा धर्माला विरोध नाही. ते तुम्ही स्पष्ट केलेले आहे. ते वाचून आनंद वाटला.
धर्म या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे; ‘स्वाभाविक नियम’ म्हणजे उतारा-कडे वाहणे हा पाण्याचा धर्म आहे. तर उष्णता हा अग्नीचा धर्म आहे. इत्यादि. आणखी ‘सहज स्वभाव’ असाही अर्थ होतो. उदाहरणार्थ; भुंकणे हा कुत्र्याचा धर्म आहे. नांगी मारणे हा विंचवाचा. माकड माकडचेष्टा करणारच. तो त्याचा धर्मच! धर्म वा शब्दाचा अर्थ संप्रदाय, पंथ असा केला जातो.

पुढे वाचा