विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

एप्रिल 2003चा आजचा सुधारक वाचला. दि. 13.9 च्या आजचा सुधारक या अंकातील श्री. मधुकर देशपांडे यांचा ‘मी नथुराम बोलतोय’ हा लेख वाचून श्री. शांताराम कुळकर्णी, पुणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नथुराम नाटकाला सर्व प्रेक्षक नथुराम विचाराचे होते असे कळते आणि नथुराम संख्या आताच का वाढली असा प्रश्न श्री कुळकर्णी यांनी केला आहे. मला असे वाटते या नाटका-अगोदर ही नथुराम म्हणजे नथुराम विचार होतेच पण ते छुपे होते कारण उघडपणे उदात्तीकरण (त्या विचाराचे) करण्याची धास्ती वाटत होती. आता केन्द्र सरकारात नथुरामप्रणीत सरकार असल्यामुळे त्यांना उघडमाथ्याने प्रचार करण्याची संधी मिळत आहे आणि संख्या नथुरामधर्माची वाढत आहे, पण ती संधीसाधूंच्या रूपात.

पुढे वाचा

पत्रसंवाद

विजय तेंडुलकर, श्री. पु. भागवत, सामाजिक-वैयक्तिक नीतिमूल्ये आणि वेडाचे सोंग घेणारे विचारवंत साहित्यिक आपण सर्वच एका व्यवस्थेचे लाभधारक असतो, अविभाज्य भाग असतो. त्या व्यवस्थेचे तोटेही आपल्याला सहन करावे लागतात. व्यवस्था जर अन्याय्य पिळवणूक करणारी असेल तर तिचा दोष आपणा सर्वांना चिकटणारच, माझा क्लायंट मला भरपूर फी देतो. तो फी तो सरळ मार्गाने मिळवीत नसेल तर? तस्करी करणाऱ्यांचे वकीलपत्र घेणारे वकील, उद्योगपतींचे सल्लागार . . . हे कशात बसतात? वाट्टेल ती किंमत देऊन हुसेनची चित्रे खरीदणारे कशात बसतात? लाखो रुपये भरून Health Club, Resorts, Gymkhana यांची वर्गणी भरणारे कशात बसतात?

पुढे वाचा

पत्रसंवाद

नोव्हेंबर अंकाच्या संपादकीयात पृ. 293 वर; ‘धर्म या शब्दाचा अर्थ सदा-चरण व कर्तव्यभावना’ असा असेल तर; तुमचा धर्माला विरोध नाही. ते तुम्ही स्पष्ट केलेले आहे. ते वाचून आनंद वाटला.
धर्म या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे; ‘स्वाभाविक नियम’ म्हणजे उतारा-कडे वाहणे हा पाण्याचा धर्म आहे. तर उष्णता हा अग्नीचा धर्म आहे. इत्यादि. आणखी ‘सहज स्वभाव’ असाही अर्थ होतो. उदाहरणार्थ; भुंकणे हा कुत्र्याचा धर्म आहे. नांगी मारणे हा विंचवाचा. माकड माकडचेष्टा करणारच. तो त्याचा धर्मच! धर्म वा शब्दाचा अर्थ संप्रदाय, पंथ असा केला जातो.

पुढे वाचा

पत्रसंवाद

श्री. केशवराव जोशी यांचे जाने २००३ च्या अंकातील पत्र वाचले. त्या अनुषंगाने —-
१. “सर्वसाधारणपणे सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यापासून भारतात ख्रिश्चन जबरदस्तीने बाटवाबाटवी करीत आहेत’ असा ओरडा सुरू झाला चर्च व धर्मगुरूंवर हल्ले सुरू झाले,” हे श्री. जोशी यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आणि वस्तुस्थितीशी विसंगत आहे. अगदी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून हा ‘ओरडा’ सुरू आहे याचे असंख्य ऐतिहासिक, वृत्तपत्रीय व वाङ्मयीन संदर्भ उपलब्ध आहेत. ब्रिटिश राजवटीतील सभ्यतेच्या बुरख्याखालील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निर्बधांमुळे त्या ‘ओरड्याची’ तीव्रता ज्याच्या-त्याच्या मवाळ-जहाल धोरणानुसार कमी अधिक होती. ख्रिश्चनांवरचा हा आक्षेपच मूलतः चुकीचा होता/आहे असे आपले व्यक्तिात मत श्री.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आ.सु.च्या नोव्हें. २००२ च्या अंकांतील दोन तीन लेखांनी काही बहुचर्चित विषय हाताळले आहेत. माझ्या प्रतिक्रिया अशा :
नागपूरची एम्प्रेस मिल बंद होताच कामा नये, जंगले २०० वर्षांपूर्वी होती तशीच राहिली पाहिजेत, विशिष्ट जंगले फक्त भिल्लांच्याच मालकीची आहेत, नर्मदेचा परिसर तिथे पिढ्यान् पिढ्या राहणाऱ्या लोकांचाच फक्त आहे असे म्हटले तर मुंबई फक्त तिथल्या कोळी लोकांचीच आहे असेही म्हणावे लागेल. नर्मदेचे पाणी गुजरातपर्यंत नेणे चुकीचे असेल तर पंजाबचे धान्य इतर प्रांतांना देणेही चुकीचे ठरेल. रस्तारुंदीकरणासाठी खाजगी मालमत्ता ताब्यात घेणेही चुकीचे ठरेल.
कुणाच्याही परंपरागत हक्कांना धक्का न लागू देता सरकारने सगळ्यांची सर्व प्रकारची सोय केली पाहिजे ही कल्पनाच मला हास्यास्पद वाटते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सप्टेंबर व ऑक्टोबरच्या अंकांवरील माझ्या प्रतिक्रियांची भेळ खाली सादर करत आहे.
विवेकवाद : दि. य. देशपांडे यांनी ‘अनुभवावर आधारलेले सत्य आणि वैध अनुमानाने जाणलेले सत्य’ अशी दोन प्रकारची सत्ये सांगितली आहेत. आकलनाने जाणलेले सत्य हा एक तिसरा प्रकार दिसतो. नवीन ज्ञान तार्किक पद्धतीने उत्पन्न होत नसून ते आकलन पद्धतीने जन्म घेते असे म्हणणाऱ्यांचा एक पक्ष आहे. त्यात आइनस्टाइनही येतात. याविषयी बरीच चर्चा “INTUITION – The Immer Story (Ed. Floyd & Avidson)” या ग्रंथात आहे. रामनुजन या प्रसिद्ध भारतीय गणितज्ञाविषयी त्याच्या मार्गदर्शकांनी म्हटले आहे, रामानुजन् यांना गणितातील नवनवीन सत्यांचे आकलन होत असे पण ती सत्ये तार्किक पद्धतीने सिद्ध करण्याची कला त्यांना अवगत नव्हती.

पुढे वाचा

पत्रसंवाद

चिं. मो. पंडित, ६ सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व) मुंबई — ४०० ०५७
नुकतीच एका तरुण कार्यकर्त्याने अशी खंत व्यक्त केली की सामाजिक कार्य करताना त्याला सततच त्याची विश्वासार्हता सिद्ध करावी लागते. म्हणजे असे की समजा ‘नामांतराचा’ प्रश्न असेल किंवा ‘आरक्षणाचा’ प्रश्न असेल तर तो मांडत असलेल्या विचारावर त्याच्या ‘ब्राह्मण्याचा’ अजिबात प्रभाव नसून त्याचे विचार तर्काधिष्ठित सम न्यायतत्त्वावर मांडलेले आहेत हे त्याला आधी सिद्ध करावे लागते. वर्षांनुवर्षे ज्यांच्या बरोबर तो काम करतो त्यांचीही अशी धारणा पाहून मन फार उद्विग्न होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

केशवराव जोशी, तत्त्वबोध, हायवे क्र. ३५, नेरळ — ४१० १०१
मध्यंतरी मी नेरळच्या चौकात दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील उतारा लावला होता. लगेचच भा.ज.पा.च्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेऊन मला दंड- प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४९ प्रमाणे नोटिस द्यावयास लावली. सदरहू नोटिसीत ‘बोर्ड लावून लोकांच्या भावना भडकावून जातीय व धार्मिक तणाव निर्माण झाला’; असे । म्हटले आहे.
वास्तविक सदरहू उताऱ्यात ‘दगडाच्या मूर्तीपुढे मोदक, लाडू, लोणी हे न ठेवता ते गरिबाला द्या’ असा उपदेश होता. असाच उपदेश तुकाराम, रामदास आणि एकनाथ यांनीसुद्धा केला आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सत्यरंजन साठे, अ-५, श्रीराहुल सहकारी गृहरचना संस्था, ८३/१० एरडवन, पुणे — ४११ ००४
माझा साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला संघाचा फतवा हा लेख आपण पुनर्मुद्रित केलात याबद्दल धन्यवाद. लेखाबद्दल दोन प्रतिक्रिया आपण मला पाठविल्या. त्यावरील माझे भाष्य यासोबत धाडत आहे.
श्री. गंगाधर गलांडे यांची प्रतिक्रिया पाहू या. घटनासमितीने पंतप्रधान म्हणून वल्लभभाई पटेल यांची शिफारस केली होती असे ते आत्मविश्वासपूर्वक सांगतात. पण माझ्या वाचनात घटनासमितीने असा कुठलाही निर्णय कधी घेतलेला नव्हता. तसा घेणे हे घटनासमितीच्या कार्यकक्षेत येतच नव्हते. घटनासमिती ही पंतप्रधान कुणी व्हायचे हे ठरवणारी संस्था नव्हती तर पंतप्रधान कसा निवडला जावा हे ठरवणारी संस्था होती.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

द. रा. ताम्हनकर, ६७५, गव्हे, दापोली, रत्नागिरी – ४१५ ७१२
जुलै-ऑगस्टच्या आ.सु.च्या अंकांत श्री. वि. वा. ताम्हनकर, मिरज, यांनी—-कीव करण्यालायक अशा लेखकांना, संपादकांना, श्री. ढाकुलकरांना आणि मला स्वतःला—-काही शेलक्या शब्दांनी आमचा नालायकपणा थांबवावा अशी ऑर्डर दिली आहे. मी माझ्यापुरते लिहितो.
अहो, वि. वा. ताम्हनकर, मिरज, एवढ्या पत्त्यावर आपणांशी संपर्क साधणे कठीण, म्हणून आपणासाठी आ.सु. मधून हे पत्र. आपण “मला अनभिषिक्त भाष्यकार, मी समजतो” असे म्हटले आहे. मी अज्ञान, ज्ञान, आत्मज्ञानाबद्दल (यांत कदाचित् आपणही असाल) आपापले खंडन-मत मांडून ते खोडून काढून भारतीय जनतेला योग्य ज्ञानाचे दर्शन घडवावे हा त्यात हेतू होता.

पुढे वाचा