विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

प्रतिवाद करता आला असता. “भारतीय व इतर गरीब देशातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला” अशी अतिव्याप्त व टोकाची विधानेदेखील आसु मध्ये येण्याच्या पात्रतेची वाटत नाहीत. आपली निवड अधिक चोखंदळ असावी.
(२) संदर्भः महानगराची वाढ = झोपडपट्टीची वाढ १३४/आसु/जून २००५
महानगराच्या वाढीबरोबर झोपडपट्टीची वाढ होणारच, असे अटळ समीकरण बांधणे सोपे, पण चुकीचे आहे..
झोपडपट्टीत राहणाऱ्या बहुतेक सर्वांची आर्थिक क्षमता भाड्याने जागा घेऊन राहण्याची किंवा स्वतःचे लहानसे घर बांधण्याची असते. पण नागरी कमाल जमीन धारणा कायदा व भाडे नियंत्रण कायदा यामुळे कायदेशीरपणे भाड्याने देण्यासाठी चाळी बांधणे बंदच झाले, असलेल्या चाळींची देखभाल अशक्य झाली, व जमिनींच्या किमती अवास्तव वाढून स्वतःचे घर बांधणे अशक्य झाले.

पुढे वाचा

पत्रसंवाद

अहवालावर इतर लेखकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सर्वांत एक सूर समान आहे. तो म्हणजे ‘काय घडले’ याच्या वर्णनातून ‘काय करता येईल’ याचे मार्गदर्शन मिळत नाही. कुठल्याही लेखांतून स्थूलमानाने काही विधाने केलेली असतात. वाचकांना स्थूलमानाने एखादा विषय समजावून सांगणे एवढेच ह्या लेखांचे कार्य असते. तपशीलवार उपाय योजण्यासाठी त्या त्या छोट्या मुद्द्यांमध्ये बुडून जावे लागते. काहीजण एकेकटी विषयाचा सखोल अभ्यास करू शकतात. त्यातून काही निष्कर्ष काढून काही प्रयोग करू शकतात. ते प्रयोग यशस्वी होतातच असे नाही.
गिरणी कामगारांची दुरवस्था भांडवलशाही पद्धतीमुळे झाली असे आ.सु.च्या

पुढे वाचा

पत्रसंवाद

(१) आस मधील आपला पत्ररूपी लेख वाचला. ‘दागिना’ हा शब्दप्रयोग पटला. त्या लेखांत पाश्चात्त्य विचारधारा, आणि आपली भारतीय नागरीकरणावरचे वस्तुनिष्ठ विचार, म्हणून मला आपला लेख आवडला. असेच लेख, लेखमाला, पुस्तकाची आपणाकडून अपेक्षा.
(२) आजचा सुधारक फेब्रुवारी २००५ मधील आपला लेख वाचला. विवाहित मुसलमान स्त्री ही घटस्फोट, काडीमोड घेऊ शकते. त्यास खुला असे म्हणतात. ती स्त्री विभक्त होऊ शकते. इस्लाममध्ये ‘तलाक’ व ‘खुला’ ह्याचा निषेध केला असून हे टाळण्याचे सर्व प्रयास असफल झाल्यावरच मोठ्या निरुपायाने ‘विभक्त’ होण्याची अनुमती आहे. मुस्लिम स्त्री असे सहसा करत नाही.

पुढे वाचा

पत्रसंवाद

‘साधना’ दिवाळी अंकात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत बुद्धिवादी ग.प्र.प्रधान सर यांचा बुद्धिवादाकडून आस्तिकतेकडे प्रवास, याविषयी एक लेख आहे. कोणत्या प्रकारच्या ईश्वराची कामना त्यांच्या मनात आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. परंतु आस्तिक राहूनही ते बुद्धिवादाची उपाधी लावू शकतात! बुद्धिवाद हा आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पुरावा मागत असतो एवढेच. असा पुरावा प्रधान सरांनी दिला नसला तरी ब्रिटनचे रहिवासी प्रा. अँटोनी फ्ल्यू (Antony Flew) ह्या ८१ वर्षांच्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी ईश्वराच्या कल्पनेबद्दलच पुरावा देऊ केला आहे. “Has Science discovered God?’ ह्या चित्रफितीमध्ये त्यांनी आपली मते मांडली आहेत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

जाने २००५ च्या अंकातील “पायवा”तील काही मतांचे स्पष्टीकरण मागतो आहे.
१) अध्यात्मावरील टीकेत “अध्यात्मिक ज्ञान हे केवळ पूर्ण श्रद्धावानासच प्राप्त होऊ शकते असे नमूद केले आहे. येथे आधुनिक भारतीय शिक्षणसंस्थाचा प्रवर्तक मॅकॉले याची एक गोष्ट सांगावीशी वाटते. हा गृहस्थ पूर्णतः भारतीय परंपरागत धर्मशिक्षणाचे (वेदपाठशाला इ.) समूळ उच्चाटण करून त्याऐवजी आधुनिक आंग्लशिक्षणाचे बीजारोपण करताना भारतातील सर्व धर्मशिक्षणकेंद्रे नष्ट करण्याचा प्रयास करी. एकदा आन्ध्रप्रदेशातील मंत्रालयम् येथील “श्रीराघवेन्द्रस्वामी” यांच्या तीर्थक्षेत्री जाऊन तेथील मठाधीन जमीन जप्त करण्यासाठी गेला असता त्यास साक्षात् राघवेन्द्र स्वामींचे दर्शन होऊन त्याने हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा प्रकट केली; तेव्हा स्वामींनी त्यास “प्रथम चांगला ख्रिश्चन हो” असे सांगितले.

पुढे वाचा

पत्रसंवाद

खांदेवाले यांनी एका अहवालाचा परिचय वाचकांना करून दिला आहे तेव्हा काय टीका करायची असेल ती माझ्यावर नको हे खांदेवाल्यांचे म्हणणे बरोबर आहे. अहवालात समस्यांची सोडवणूक सुचवली असती तर टीका किंवा समर्थन करता आले असते. पण अहवालात नुसते भाराभर प्रश्न आहेत. पुष्कळशा “विद्वत्तापूर्ण’ लिखाणाची हीच गत असते. एका अहवालाचा आधार घेऊन दुसरा कोणी एक प्रबंध लिहितो. मग तिसरा कोणी एक ‘शोध-प्रबंध’ लिहितो. अशा त-हेने अहवालांचे आणि प्रश्नांचे ‘पीक’ निघत जाते. उपाय कोणी सुचवत नाही. प्रश्न खूप विचारले की दुसरा मनुष्य नालायक आहे असे सूचित होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

तुमचा नागरीकरणावरील विशेषांक वाचला. काही लेख उदा. बोंगिरवार, सुजाता खांडेकर, विद्याधर फाटक असेही इतर-नागरीकरणाच्या प्रश्नाला हात घालतात आणि वाचून समाधान होते. पण विशेषतः संपादकीयातील जेन जेकब्ज, एबेक्झर हॉवर्ड, फ्रँक लॉइड राईट, जुवाल पोर्तुगाली वगैरे उल्लेख हे पानभरू वाटतात. गरीब देशातील नागरीकरणाकडे जमिनीवर उभे राहून पहाणारे वाटत नाहीत. अशा उल्लेखांचा उपयोग दागिन्यांसारखा वाटतो. दागिन्यांना स्थान नक्कीच आहे. पण नागरीकरण हा भारतीय देह समजला तर भारतीय देह त्याच्या प्रवृत्ती, सुदृढता, अंगभूत निरोगीपणा, रोगिष्ट असल्यास त्याची कारणे व आवाक्यातील उपाय याचा यथायोग्य अभ्यास करून देह निरोगी झाला तर त्याला अधिकतर सौंदर्य प्राप्त करण्याकरिताच या दागिन्यांचा उपयोग असतो.

पुढे वाचा

पत्रसंवाद

जॉर्ज ऑरवेलची नॅशनॅलिझमवरची टीका ही समूहवादाला उद्देशून होती, राष्ट्रवादाला नव्हे हे मी सप्टें. ०४ च्या अंकातील पत्रात स्पष्ट केले होते. तशीच चूक मीरा नंदा ह्यांच्या ‘आधुनिकोत्तरवाद’ ह्या लेखात दिसते. भारतात इ.स. १३०० पासून मुस्लिमांनी जिहादच्या नावाने प्रचंड कत्तली घडवून आणल्या आहेत. ह्याची प्रतिक्रिया म्हणून शिवाजीच्या वेळेपासून हिंदू समाजाचे संघटित होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच परिणाम टिळक, सावरकर, हेडगेवार यांच्या राष्ट्रवादाच्या पुरस्कारात झाला आहे. ही तथ्ये नाकारली आहेत.
हे मुस्लिम दहशतवादी अत्याचार आजही चालू असून त्याविरुद्ध राष्ट्रवादी शक्ती उभ्या करणे ही काळाची गरज आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आ.सु. सप्टेंबर २००४ च्या अंकात पृष्ठ क्र. २८७ वर श्री.पु.नी. फडके यांचे पत्र आहे. त्याच्या शेवटी असलेल्या संपादकीय टिपणींमधील दोन मुद्दे खटकण्यासारखे आहेत.
१. “हे सारे आमच्या भूमिकेच्या पूर्ण विरोधात आहे.” असे संपादकांचे म्हणणे आहे. येथे एक विनंती करावी वाटते की ज्याप्रमाणे वाईच्या ‘नवभारतात’ पहिल्याच पानावर नवभारतची भूमिका छापलेली असते तशी आपली भूमिका आपण छापावी. कारण माझ्यासारख्या नवीन वाचकांना तुमची भूमिका काय आहे हे कधी कळणारच नाही.
२. “घेणे, न घेणे, अर्थातच आपल्यावर सोडतो.’ या टिपणीबाबतीत भाष्य करायचे झाल्यास त्याच शब्दांत हे पत्र छापावे वा न छापावे, मला काही फरक पडत नाही असे म्हणणे औद्धत्याचे आपल्याला वाटणार नाही का?

पुढे वाचा

पत्रसंवाद

एस. पी. देशपांडे
लेखांचे विषय जरी त्या-त्या विशेषज्ञांनी निवडले असले आणि जगदीशचंद्र बसूंच्या मुखपृष्ठावरील उताऱ्यावरून एकच सर्वसमावेशक विज्ञान असले तरी त्याच्या विविध उपांगांचा ह्या अंकात समावेश करण्याची घेतलेली खबरदारी स्पृहणीय आहे. ज्यांना पानपूरके म्हणतात ती किंवा ज्यांना अवतरणे किंवा चौकटी म्हटले आहे त्या, सुप्रसिद्ध व्यक्ती आणि संशोधकांच्या विज्ञानविषयक निबंधांतून उद्बोधक विचार डोळसपणे निवडून मधून मधून अंकात पेरल्याने ह्या अंकाच्या गुणवत्तेला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे.

एका अत्यंत महत्त्वाच्या विज्ञानशाखेची गैरहजेरी तीव्रतेने जाणवते, ती म्हणजे रसायनशास्त्र शाखेची. मानवी जीवनावर प्राचीन काळापासून परिणाम करणारा व त्याच्या साहाय्याने विज्ञानाच्या शाखोपशाखात भर टाकणारा, विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा औषधशास्त्रात रसायनशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व असताना, अशी महत्त्वाची शाखा कशी सुटली?

पुढे वाचा