असहिष्णुतेचे दुर्लक्षित परिणाम

जवळजवळ सर्व जगात धार्मिक असहिष्णुता आणि दहशतवाद यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक विचारवंत या दोन्ही अनर्थकारक घटनांची चिकित्सा करून त्यांना प्रतिबंध कसा घालावा, याविषयी अभ्यासपूर्ण लेखन करीत असतात. या विचारवंतां-मध्ये समाजशास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक, पत्रपंडित, राजकीय मुत्सद्दी, विविध धर्मांच्या अनुयायांचे नेतृत्व करणारे धुरीण, इत्यादींचा समावेश असतो. परंतु अशा विचारवंतां-मध्ये मानसोपचारतज्ज्ञ सामील झालेले क्वचितच दृष्टोत्पत्तीस येते. वस्तुतः माणसाच्या मनातील वैरभाव, द्वेष आणि चिंता यांच्यासारख्या विघातक भावनांचे उच्चाटन करून, त्याला सहनशीलतेची व परमतसहिष्णुतेची कास धरून समाजातील इतर माणसांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्यास मदत करणे, हे मानसोपचारशास्त्राचे एक उद्दिष्ट असते.

पुढे वाचा

नवमध्यमवर्गाचे राजकारण

चिनी बनावटीच्या गृहोपयोगी वस्तू पार केरळपर्यंत मिळायला लागल्याला आता काही वर्षे होऊन गेली. या सर्व वस्तू खासगी क्षेत्रातील उत्पादने आहेत. चिनी उत्पादक हे कसे करू शकले? आर्थिक उदारीकरणाची, खासगीकरणाची चीन व भारतातील प्रक्रिया जवळजवळ एकाच वेळी सुरू झाली. भारतामध्ये या प्रक्रियेची गती गोगलगाईची, तर चीनमध्ये गरुडझेपेची. भारतामधील या कमी गतीची अनेक कारणे दिली जातात. येथील लोकशाहीचे अस्तित्व हेही एक कारण दिले जाते. चीनमध्ये कामगार-कपातीचे भांडवल करून कामगार नेते भांडवलदार होत नाहीत, अशा कलाने त्या विचाराची मांडणी केली जाते. खरे तर लोकशाही समाजरचनेमध्ये लोकमान्यतेच्या पायावरती आर्थिक उदारमतवादाने जास्त गतीने पुढे जायला पाहिजे होते.

पुढे वाचा

भारतीय संस्कृती व गर्भपात (उत्तरार्ध)

भारतामध्ये सुरुवातीपासून शस्त्रक्रियेवर अवलंबून राहण्याची परंपरा सुरू झाली. त्यालाही 1953 च्या सुमारास ‘bad in taste’ संबोधिले गेले तरी जगात सर्व ठिकाणी हळूहळू त्याचा वापर वाढीस लागला. येथे नोंदवावेसे वाटते की भारतात बऱ्याच भागात संतति-नियमन करण्याची आंतरिक इच्छाच नव्हती. त्यामुळे गर्भपात, शस्त्रक्रिया किंवा कोठल्याच उपलब्ध मार्गांचा आधार घेण्याची बहुजनांना तितक्या प्रमाणात जरूरी वाटली नाही. आजही बऱ्याच मोठ्या राज्यांत निम्मेएक लोक त्यापासून दूर असलेले आढळतात. ह्या उलट मुलगे हवेत, मुली नकोत ही वृत्ती मात्र भारतभर नित्यनियमाने सर्वांत आढळते.
एक काळ असा होती की मुली झाल्या तर त्यांना मारीत.

पुढे वाचा

महाराष्ट्राची वित्तीय स्थिती व उपाय : जागतिक बँकेचा अहवाल (उत्तरार्ध)

विकास व विषमता
अहवाल म्हणतो ते काही अंशी खरे आहे की, महाराष्ट्राच्या साधारण बरोबरीचे दरडोई उत्पन्न असणाऱ्या हरियाणा राज्याच्या तीनपट आणि पंजाब राज्याच्या पाचपट विषमता महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकावर असून येथे दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. राज्याचा पश्चिम आणि दक्षिण भाग अतिश्रीमंत आहे तर मध्य आणि पूर्व भाग गरीब आहे. त्याचे कारण अहवालात दिलेले नाही ते असे की पंजाब-हरियाणातील समृद्धी प्रामुख्याने सार्वत्रिक असलेल्या सिंचनामुळे व त्या आधारावर दर हेक्टरी उच्च उत्पादन– उत्पन्न यामुळे आहे. त्यामुळे समृद्धी सार्वत्रिक आहे.

पुढे वाचा

उत्क्रांतीची तोंडओळख (लेख-१)

काही दिवसांपूर्वी वाचनात आले की मानवी गर्भाला सुद्धा उचकी लागते. पुढे शास्त्रज्ञाचे मत दिले होते की ‘उचकी लागणे’ हा उत्क्रांतीचा एक टप्पा असू शकतो. त्याचा सखोल अभ्यास अजून व्हायचा आहे. वाचून मजाही वाटली अन् आ चर्यही. नंतर लक्षात आले की हे सोदाहरण सिद्ध व्हायला अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत आपण कुठे असणार?
उत्क्रांती म्हणताच नाव समोर आले, ‘डार्विन’, आणि पुढे ‘बलिष्ठ अतिजीविता’, म्हणजे Survival of the fittest! पण मुळात डार्विनने ‘बलिष्ठ अतिजीविता’ ही संज्ञा वापरलीच नव्हती. त्याचे म्हणणे होते की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राण्यांमध्ये एका विशिष्ट क्रमाने बदल होत असतात.

पुढे वाचा

अनुभववादी नीतिमीमांसेवरील आक्षेपांस उत्तर

फेब्रुवारी 2003 च्या आजचा सुधारक मधील माझ्या लेखात मी अनुभववावादी नीतिमीमांसेचे विवरण आणि समर्थन केले. त्या लेखाच्या शेवटी अनुभववादाच्या टीकाकारांचे काही आक्षेप आहेत असे मी म्हणालो. त्या आक्षेपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करावयाचा आहे.
पहिला आक्षेप असा होता की नैतिक वाक्यांचे प्रमुख कार्य कर्मोपदेश आहे ही सर्वमान्य गोष्ट आहे. ती सर्व वाक्ये स्पष्टपणे किंवा व्यंजनेने, उपदेशपर, आदेशपर किंवा prescription असून आपण काय करावे हे सांगणारी आहेत. शुद्ध कथनात्मक किंवा निवेदक (indication) वाक्याप्रमाणे ती वस्तुस्थितीचे वर्णन करणारी नसतात. पण हे म्हणणे पूर्णपणे खरे नाही, कारण बहुतेक नैतिक वाक्यांना वर्णनपर अर्थही थोडाफार असतो.

पुढे वाचा

मी नास्तिक का आहे?

“वृथा अहंकार किंवा गर्वामुळे माणूस ईश्वराचे अस्तित्व कसे नाकारायला लागेल हे मला अजिबात समजू शकत नाही. एखाद्यास जर पात्रता नसताना अमाप लोकप्रियता मिळाली असेल तर तो दुसऱ्या कुणा थोर माणसाचे थोरपण नाकारू शकेल हे समजू शकते. पण मुळात आस्तिक माणूस अहंकारापोटी ईश्वराचे अस्तित्व नाकारू शकेल हे पटत नाही. असे दोनच कारणांनी घडू शकते. एकतर हा अहंकारी माणूस स्वतःस देवाचा प्रतिस्पर्धी तरी समजत असेल किंवा स्वतःसच देव मानीत असेल. पण मग त्यापैकी कोणत्याही बाबतीत तो खऱ्या अर्थाने नास्तिक असू शकत नाही. स्वतःला देवाचा प्रतिस्पर्धी मानणारा माणूस देवाचे अस्तित्व नाकारीत नसतोच.

पुढे वाचा

पत्रसंवाद

विजय तेंडुलकर, श्री. पु. भागवत, सामाजिक-वैयक्तिक नीतिमूल्ये आणि वेडाचे सोंग घेणारे विचारवंत साहित्यिक आपण सर्वच एका व्यवस्थेचे लाभधारक असतो, अविभाज्य भाग असतो. त्या व्यवस्थेचे तोटेही आपल्याला सहन करावे लागतात. व्यवस्था जर अन्याय्य पिळवणूक करणारी असेल तर तिचा दोष आपणा सर्वांना चिकटणारच, माझा क्लायंट मला भरपूर फी देतो. तो फी तो सरळ मार्गाने मिळवीत नसेल तर? तस्करी करणाऱ्यांचे वकीलपत्र घेणारे वकील, उद्योगपतींचे सल्लागार . . . हे कशात बसतात? वाट्टेल ती किंमत देऊन हुसेनची चित्रे खरीदणारे कशात बसतात? लाखो रुपये भरून Health Club, Resorts, Gymkhana यांची वर्गणी भरणारे कशात बसतात?

पुढे वाचा

पत्रसंवाद

नोव्हेंबर अंकाच्या संपादकीयात पृ. 293 वर; ‘धर्म या शब्दाचा अर्थ सदा-चरण व कर्तव्यभावना’ असा असेल तर; तुमचा धर्माला विरोध नाही. ते तुम्ही स्पष्ट केलेले आहे. ते वाचून आनंद वाटला.
धर्म या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे; ‘स्वाभाविक नियम’ म्हणजे उतारा-कडे वाहणे हा पाण्याचा धर्म आहे. तर उष्णता हा अग्नीचा धर्म आहे. इत्यादि. आणखी ‘सहज स्वभाव’ असाही अर्थ होतो. उदाहरणार्थ; भुंकणे हा कुत्र्याचा धर्म आहे. नांगी मारणे हा विंचवाचा. माकड माकडचेष्टा करणारच. तो त्याचा धर्मच! धर्म वा शब्दाचा अर्थ संप्रदाय, पंथ असा केला जातो.

पुढे वाचा

घरोघरी मातीच्याच . . .

गेली पाच हजार वर्षे चीन ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ ठरायची आस इतर जगाला लागली आहे. एकशेवीस कोटी उपभोक्ते, 2000-2001 साली अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के वाढ, इतर जग शून्याजवळ रखडत असताना. परकी गुंतवणुकीचे सर्वांत मोठे ‘आगर’—-47 अब्ज डॉलर तिथे गेले, गेल्या वर्षी. थ्री गॉर्जेस ह्या 27 अब्ज डॉलर्सच्या जगातील सर्वांत मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे ‘माहेर’. आकडेवारी एक असामान्य, महान देश दाखवते. पण ही आकडेवारी वैज्ञानिक’ नाही, असे मानायला जागा आहे.
जुलै 1992 मध्ये डेंग झिआओ पिंग यांनी एक ‘दक्षिण यात्रा’ काढली. परकी गुंतवणुकीला आकर्षित करा, बाजारपेठ खुली करा, अशी आवाहने करणारी ही यात्रा.

पुढे वाचा