आ.सु.च्या वतीने सर्व चर्चकांचे आभार मानणे आणि काही आणखी खुलासे करणे ही कामे उरली होती. आप्तवचन तुम्ही मानत नाही. पण धर्मग्रंथांतून तुम्ही वेळोवेळी वचने उद्धृत करता हे कसे असा एक आक्षेप या पूर्वीच्या व्याख्यानात, ‘विवेकवाद धर्माची जागा घेऊ शकेल?’ या विषयावर बोलताना घेतलेला होता. आजच्या चर्चेतही श्रद्धेची दृढनि चयाशी गफलत करून टीका झालेली होती. त्या संदर्भात मी म्हणालो : धर्मग्रंथ व धर्मगुरू म्हणतात म्हणून आपण एखादे वचन स्वीकारतो तेव्हा ती श्रद्धा असते. बुद्धिवाद्याचे त्याने समाधान होत नाही. ‘जनीं निंद्य तें सर्व सोडोनि द्यावें । जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ।।’ ह्या म्हणण्यावर मला प्रश्न पडतो की एखादी गोष्ट निंद्य का ठरते किंवा वंद्य का समजावी ह्याचे उत्तर येथे नाही.
खादी (भाग ४)
सगळ्या महाग वस्तू फुकट!
मागच्या लेखांकामध्ये संघटित उद्योग जेव्हा उत्पादन खपवितात तेव्हा ते आपला माल ग्राहकांवर लादत असतात असे एक विधान आहे आणि त्या पाठोपाठ हा लादलेला माल ग्राहकाला फुकट पडतो असे दुसरे विधान आहे. ह्या विधानांचे विवेचन ह्या नंतर करावयाचे आहे.
माणसांच्या मनाची ओढ सुधारलेल्या जीवनमानाकडे आहे हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. पशृंमध्ये आणि माणसामध्ये जो फरक आहे तो हाच आहे. माणूस आपले हातपाय आणि त्यांसोबत आपली बुद्धी वापरून पूर्वी नसलेल्या वस्तू बनवू शकतो. गारगोटीची हत्यारे जेव्हापासून माणूस बनवू लागला, गुहा खोदू लागला, अग्नि सिद्ध करू लागला तेव्हापासूनच त्याचा ओढा सुधारलेला जीवनमानाकडे आहे असे मानावयास हरकत नाही.
पुस्तक परीक्षण भूमि संपादन अधिनियम १८९४ – अर्थउकल (मार्च २००१ रोजी जसा होता तसा)
लेखकाने भूमिसंपादनाचा कायदा सहजपणे वाचता व समजून घेता यावा यासाठी हे पुस्तक लिहिले आहे तसेच या पुस्तकाचा वाचक हा खेड्यातील किंवा शहरातील या विषयात अनाभिज्ञ असलेला माणूस असेल हे गृहीत धरले आहे. लेखकाने या पुस्तकात अधिनियमावर कोणतीही टीकाटिप्पणी केलेली नाही. यातील कोणती तरतूद अन्याय्य आहे व ती कशी, याबद्दल काहीही सांगितले नाही. फक्त “कायदा काय म्हणतो” तेवढेच सांगण्याचा मर्यादित उद्देश ठेवला आहे. अशिक्षित किंवा कायदा या विषयाशी अपरिचित असलेल्या अनेक सामान्यजनांना हे पुस्तक वाचावयाचे आहे अशी लेखकाची अपेक्षा आहे. या पुस्तकात मूळ पाठ (Bare Act) व त्याचा सोप्या भाषेतील अर्थ हे दोन्ही सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे : हे पुस्तक निव्वळ या अधिनियमापुरतेच तयार केले नाही.
धर्मश्रद्धा आणि दि. के. बेडेकर
आजचा सुधारकच्या नोव्हेंबर २००० च्या अंकात दि. के. बेडेकर यांच्या श्रद्धाविषयक भूमिकेवर श्री. वसंत पळशीकर यांचा संक्षिप्त लेख व त्यावरील प्रा. दि. य. देशपांडे यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली होती. त्या चर्चेवस्न दि. के. बेडेकरांच्या भूमिकेबाबत गैरसमजच होण्याचा संभव आहे; ‘धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार’ या त्यांच्या पुस्तकाच्या आधारे श्री. पळशीकरांनी असे मत मांडले आहे की त्यांना धर्मश्रद्धेची आवश्यकता वाटू लागली होती. परंतु हा फार मोठा विपर्यास आहे. त्यांचे खरे म्हणणे काय होते हे येथे पाहायचे आहे. धर्माला पर्यायी श्रद्धा हवी. दि. ३ मे १९७३ रोजी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर बेडेकरांचे निधन झाले.
काही समीक्षण, काही चिन्तन
‘प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ हा मराठी भाषेतील एक अपूर्व असा ग्रन्थ आहे. एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या हयातीतच त्याच्या तत्त्वचिंतनाविषयी मोकळेपणाने समकक्ष लोकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवावी व तत्त्ववेत्त्याने त्यांचा त्याच ग्रन्थात परामर्श घ्यावा अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. अन्य भारतीय भाषांतही अशा स्वरूपाचा ग्रन्थ प्रसिद्ध झाल्याचे मला माहीत नाही. इंग्रजीमध्ये मात्र Living Philosopher’s Library या ग्रन्थमालेत अनेक दशके अशा स्वरूपाचे ग्रन्थ प्रसिद्ध होत आलेले आहेत.
या ग्रन्थाच्या अपूर्वतेचे दुसरे अंग असे की रेगे यांच्या भूमिकेविषयी महाराष्ट्रात गेल्या दशकात जे काही संदेह निर्माण झाले त्याविषयीचा धागा या ग्रन्थातील सर्व लेखांना जोडताना आढळतो.
कुटुंब-व्यवस्था — मुलांना वाढविणे (भाग १)
१.कुटुंबाच्या दोनतीन व्याख्या करणे शक्य आहे. विकेंद्रित समाजव्यवस्थेतील सर्वांत लहान स्वायत्त घटक अशी एक काहीशी राजकीय-व्यवस्थापकीय-व्यावहारिक जगातील व्याख्या होऊ शकेल. विशाल समाजपुरुषाची ती एक छोटीशी घटकपेशी आहे अशी पण व्याख्या होऊ शकते. कुटुंबाची जैविक व्याख्या पण होऊ शकते – नर मादी-पिले अशी.
मानववंशसाखळी ही अखंड, अतूट असली तरी व्यक्ती, कुटुंबे ह्या त्यातल्या सुट्या सुट्या कड्या आहेत आणि त्यांचे महत्त्व आहेच. कुटुंबाची कोणतीही व्याख्या असो, मुलांना वाढविणे ही एक सामाजिक पण व्यक्तिअभिमुख महत्त्वाची बाब आहे, आणि यात आईबाबा, आजी आजोबा, मोठी भावंडे, घरातील नोकरवर्ग, सख्खे शेजारी या सर्वांचा समावेश असतो.
खादीचे नवसर्जन
[‘साम्ययोग साधना’ (१६ मे २००१) या नियतकालिकातील हा लेख आ. सु. त सुरू असलेल्या विचारमंथनाचा भाग वाटला, म्हणून तो त्यांच्या सौजन्याने येथे घेत आहे. हा लेख मोहनींच्या लेखाला उत्तरादाखल लिहिलेला नाही. (तिरपा टाइप आ. सु. च्या संपादकाचा)]
१९०८ मध्ये गांधींच्या मनात चरख्याची कल्पना पहिल्यांदा आली. गिरण्या उभ्या राहिल्या तर विणकरांचे काय होईल, हा प्रश्न मनात उभा झाला आणि गांधी हातकताईच्या शोधात लागले. एका महिला कार्यकर्तीने गुजराथमध्ये विजापूरला कताई जाणणाऱ्या मुसलमान भगिनींचा शोध लावला आणि कताईचा जन्म झाला. १९१५ मध्ये गांधी प्रथम विणकर झाले.
नैतिक उपपत्तींचे दोन प्रकार
नीतिशास्त्राच्या इतिहासाकडे थोड्या बारकाईने पाहिल्यास त्यातील नीतिशास्त्रीय व्यवस्थांचे किंवा उपपत्तींचे स्थूलमानाने दोन प्रकार आढळून येतात. त्यांना अनुक्रमे empirical आणि transcendental अशी नावे देता येतील. empirical म्हणजे अनुभववादी आणि transcendental म्हणजे अतिक्रामी. अनुभववादी उपपत्ती अर्थातच पंचज्ञानेंद्रिये आणि मन यांच्यावर आधारलेली; आणि अतिक्रामी म्हणजे सामान्य अनुभवांखेरीज अन्य ज्ञानस्रोतांवर विश्वास ठेवणारी. या दुसऱ्या वर्गातील उपपत्तीत intuition (साक्षात्कार)१ या ज्ञानसाधनाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो, उदा. goodness किंवा साधुत्व हा काही इंद्रियगोचर गुण नव्हे. तो जाणण्याकरिता अनेंद्रिय साक्षात्काराची आवश्यकता असते. तसेच कर्तव्याची कल्पनाही अनेंद्रिय साक्षात्काराशिवाय आकलन करणे अशक्य आहे.
नीती ही मानवनिर्मितच
“इतिहासाचे सर्व विद्यार्थी राजवाडे या अनुभवी संशोधकाला ओळखतातच. काही जणांना वाटते की अस्तित्वात असलेली सर्व नीतीची तत्त्वे अनादि अनंत आकाशातून उतरलेली आहेत आणि येणाऱ्या अनंत काळातही तशीच राहतील. त्यांना ही नीतीची तत्त्वे मोडणे ही गुन्हेगारी क्रिया वाटते. अशा लोकांना (राजवाड्यांचे लिखाण वाचून) जाणवेल की नीतीसुद्धा मानवी सर्जनशीलतेतून व उत्क्रांतीच्या इच्छेतून उपजलेली एक ‘वस्तू’ आहे, एखाद्या पटाशी किंवा सुरीसारखीच. राजवाड्यांच्या शोधितांबद्दलचे आमचे निष्कर्ष आम्ही राखून ठेवतो, कारण आमचे त्यांच्याशी बरेच मतभेद आहेत.”
[कॉ. श्री. अ. डांगे यांनी सोशलिस्ट या इंग्रजी मासिकाच्या मे-जून १९२३ या अंकात लिहिलेली ही टीप भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या ग्रंथाच्या इंग्रजी ‘धारावाहिक’ प्रकाशनाची प्रस्तावना आहे.
संपादकीय
उन्हाळा सुरू झाला की नागपूरकर रोजच्या वृत्तपत्रातले तापमानाचे आकडे आदराने वाचतात —- जसे “४५ होते काल!” असाच काही लोकांना वर्षभर ‘पाहावासा’ वाटणारा आकडा म्हणजे सेन्सेक्स हा शेअरबाजारासंबंधीचा निर्देशांक. तापमानात जसे फॅरनहाईट-सेल्सियस प्रकार असतात तसे शेअरांमध्येही सेन्सेक्स-निफ्टी प्रकार असतात, आणि ‘दर्दी’ लोक त्यांच्या तौलनिक विश्वासार्हतेवर वाद घालत असतात. मुळात शेअरबाजार देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दाखवतो का, आणि निर्देशांकांचे चढउतार अर्थव्यवस्थेच्या तब्येतीचे चढउतार दाखवतात का, हे दोन्ही प्रश्न भरपूर वादग्रस्त आहेत. पण दूरान्वयाने तरी हे निर्देशांक अर्थव्यवस्थेच्या अगदी मर्यादित अंगांबद्दल काही तरी सांगतात. इतकेही वास्तवाशी संबध नसणारे एक प्रकरण आज काही नियतकालिके ‘द फील–गुड फॅक्टर’ या नावाने उपस्थित करतात.