डॉ. राममनोहर लोहिया यांचे स्त्रीविषयक विचार

‘जातिप्रथा आणि स्त्रिया हे भारतीय समाजातील दोन मोठे पिंजरे होत. स्त्रिया आणि शूद्र मिळून बनलेल्या ९० टक्के समाजाला अलग आणि बहिष्कृत केल्यानेच भारतीय आत्म्याचे पतन झालेले आहे.वस्तुतः ह्या दोहोंत कमालीची शक्ती आहे. परंतु हे तुरुंग कायम ठेवल्याने समाजातील सारा उल्हास, साहस आणि कर्तृत्व कुजत पडले आहे. हे दोन्ही कैदखाने परस्परसंबंधित असून परस्परांचे पोषण करतात आणि म्हणूनच ते नष्ट करण्याचे बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्याशिवाय क्रांतीची भाषा फोल आहे. आर्थिक क्रांती झाली की हे पिंजरे आपोआप तुटतील असे मानणे बरोबर नाही.
‘स्त्रियांची स्थिती तर फारच भयंकर आहे’.

पुढे वाचा

इहवादावरील आक्षेप

प्रा. मे.पुं. रेगे यांचे इहवाद आणि सर्वधर्मसमभाव हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी पहिल्या प्रकरणात ‘इहवाद म्हणजे काय?’ या शीर्षकाचा उपोद्घात लिहून पूर्वपक्ष केला आहे. त्यातील इहवादाचे निरूपण सामान्यपणे न्याय्य आणि वाजवी आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्यात फक्त एकच दुरुस्ती सुचवावीशी वाटते. पान दोन वर ते म्हणतात: ‘प्रत्यक्ष प्रमाणाने वस्तूंच्या अंगी असलेल्या ज्या गुणधर्माचे आणि शक्तींचे ज्ञान आपल्याला होणे शक्य आहे तेवढेच काय ते गुणधर्म आणि शक्ती वस्तूंच्या ठिकाणी असू शकतात. जे काही आहे त्याचे संपूर्ण स्वरूप अशा गुणधर्माचे आणि शक्तींचे बनलेले असते’ (तिरका ठसा माझा).

पुढे वाचा

बुद्धि आणि भावना

मला केवळ नकारात्मक भावनिक वृत्तीचा उपदेश करायचा नाही. सर्व बलेवान भावनांचा उच्छेद करावा असे मी सुचवीत नाही. ही भूमिका मी फक्त ज्या भावनांवर सामूहिक उन्माद आधारलेले असतात त्यांच्याच बाबतीत घेतो, कारण सामूहिक उन्माद युद्ध आणि हुकूमशाही यांना पोषक असतो. शहाणपणा केवळ बौद्धिक असण्यात नाही. बुद्धी वाट दाखविते आणि मार्गदर्शन करते; पण ज्यातून कृति निर्माण होते ते बळ तिच्यात नाही. हे बळ केवळ भावनांमधूनच मिळवावे लागते. ज्यांतून इष्ट सामाजिक परिणाम घडून येतात त्या भावना द्वेष, क्रोध आणि भय यांच्या इतक्या सहज निर्माण होत नाहीत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

पुरोगामित्वाचे बुरखे
संपादक, आजचा सुधारक
नुकताच या संक्रातीच्या व हळदीकुंकवाच्या मोसमात दोनतीन ठिकाणी जाण्याचा योग आला. विशेष उत्सुकतेने मी सामील झाले, कारण विधवेलाही आमंत्रण करण्याचे पुरोगामी विचार स्त्रीवर्गाने दाखवल्याने विशेष आनंद वाटला. परंतु तेथे गेल्यावर कुंकू लावणे, वाण देणे व ओटी भरणे या मुख्य कार्यक्रमातून विधवांना वगळून त्यांना तिळगुळाचा प्रसाद केवळ देण्यात आला हे पाहून मन विषण्ण झाले. म्हणजे जेवायला बोलावून मुख्य पक्वान्न न वाढता, वरणभातावर बोळवण केल्याचा पंक्तिप्रंपच केल्याने उपेक्षेचे दुःख वाट्याला आले. यावरून तथाकथित पुरोगामित्वाचे बुरखे ल्यालेल्या स्त्रीसमाजाने अजूनही त्याच पक्षपाती व अपमानकारक परंपरा जपून ठेवलेल्या दिसल्या व काही कटु सत्ये लक्षात आली ती अशी :
१.

पुढे वाचा

ग्रंथपरिचय

भाषांतर मीमांसा, सं. कल्याण काळे व अंजली सोमण, प्रतिमा प्रकाशन, पुणे, पृ. ४१५, किं. रु. २६०/-.
वेगवेगळ्या भाषांमध्ये नित्यनव्याने विकसित होणार्याव ज्ञानक्षेत्रांची ओळख करून घ्यावयाची, त्यांचा उपयोग करायचा. त्यांमधील वाङ्मयीन समृद्धतेचा आस्वाद घ्यायचातर भाषांतराला पर्याय नाही. कधी व्यावहारिक गरज म्हणून तर कधी केवळ आंतरिक ऊर्मी म्हणून भाषांतरे केली जातात. भाषांतर म्हणजे काय?भाषांतर कसे करायचे?कुणी करायचे?असे वेगवेगळे प्रश्न या संदर्भात अभ्यासकांच्याच नव्हे तर सामान्य वाचकांच्याही मनात उभे राहात असतात. या सगळ्यांचा परामर्श घेणारे एक चांगले पुस्तक नुकतेच वाचनात आले. डॉ. कल्याण काळे व डॉ.

पुढे वाचा

श्रीमती कोठाऱ्यांना उत्तर

श्रीमती कल्पना कोठाऱ्यांचा ‘ब्रेन-ड्रेन’ वरील लेख (आ.सु. डिसें. ९७) वाचून सुचलेले काही मुद्दे नोंदत आहे. मुळात या महत्त्वाच्या विषयावर अशी तुकड्या-तुकड्याने चर्चा होण्याने फारसे साध्य होत नाही याची पूर्ण जाणीव ठेवून हे वाचावे.

(१) कोठाऱ्यांची समजूत दिसते की GREv TOEFL (TOFFEL नव्हे) या परीक्षा गुणवत्ता ठरवण्याच्या फार उच्च प्रतीच्या कसोट्या आहेत. कोठाभ्यांनी IIT चा उल्लेख करून उदाहरण अभियांत्रिकीचे दिले आहे. IIT व इतर अभियांत्रिकी संस्थांच्या पदवीधरांना पुढे शिकायचे झाले तर त्यांना भारतातच ‘गेट’ (Graduate Aptitude Test in Engineering) ही परीक्षा देऊन भारतीय संस्थांमध्ये पुढे शिकता येते.

पुढे वाचा

विकृत संस्कार

श्रीमती कल्पना कोठारे यांनी डिसेंबर ९७ च्या आजचा सुधारक मध्ये एक चांगला लेख लिहून माझ्या लेखातील वैगुण्ये दाखवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.

पण ब्रेन-ड्रेन किंवा काही भारतीयांची पाश्चात्त्य देशांत होणारी कुतरओढ हा माझ्या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा नव्हताच. माझ्या मुंबईत राहणार्याो मराठीभाषक भावाची दोन मुले अनुक्रमे सातवी व नववीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांना प्रादेशिक भाषा म्हणून ‘मराठी हा विषयही शिकावा लागतो. या मुलांना सोमवार, मंगळवार, मराठी आकडे, वगैरे नेहमीच्या वापरातील मराठी शब्दांचे अर्थ समजत नाहीत, मराठी वृत्तपत्र नीट वाचता येत नाही.

पुढे वाचा

कहाणी – एका ज्ञानपिपासू तपस्विनीची

१९३४ सालची गोष्ट. एका १६ वर्षांच्या उपवर मुलीचे लग्न ठरले अन् त्याप्रमाणे नाशिक क्षेत्री झाले पण. त्यावेळचे ऑल इंडिया रिपोर्टरचे संचालक श्री रा.रा. वामनराव चितळे, हे होते वरपिता. वर चि. दिनकर, वकील अन् ‘युवराज’, तर वधू होती मराठी लेखक श्री. वि.मा.दी. पटवर्धन यांची एकुलती एक भगिनी, व शेंडेफळ चि. सौ. कां. श्यामला. मुलीच्या जन्मानंतर अल्पावधीतच मातृच्छत्र हरपले व लगोलग वडील, प्रा. ग.स. दीक्षित, प्रकृति-अस्वास्थ्यामुळे पुण्याच्या फर्म्युसन महाविद्यालयांतून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे ही चिचुंद्री (आजमितीसही जेमतेम ५ फूट उंचीची बुटकी अन् शिडशिडीतच मूर्ति आहे ही) तीन बंधू व वडील यांचा जीव की प्राण होती.

पुढे वाचा

परिशिष्ट

ललिता गंडभीर, स.न.
‘आजचा सुधारक’मधील ‘समाज आणि लोकशाही’ हा लेख प्रभावी वाटला. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांचा लोकशाही पद्धतीवरचा (आणि एकूणच जीवनावरचा) विश्वास उडत चालल्याचा भास होतो. हे विधान परंपरेने विचारी असलेल्या मध्यमवर्गास लागू होते. त्यांतले बरेचसे अमेरिकेकडे डोळे लावून असतात. त्यांच्या हा वाचनात यायला हवा असे वाटले. म्हणून तो ‘रुची’च्या पुढील अंकात (दिवाळी विशेषांक – प्रसिद्धी ३० ऑक्टोबर) समाविष्ट करावा अशी इच्छा आहे. अनुमतीसाठी हे पत्र आपणास लिहिले आहे.
सुधारक’मधील आपले लेखन वाचत असतो.‘रुची’मध्ये काही लेख पुनर्मुद्रित करीत असतो. पूर्वी यासाठी ग्रंथमाला’ नावाचे नियतकालिक असे.

पुढे वाचा

रोमन लोकशाही

रोमन नागरिकांची स्वतःच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची (identity) जाणीव दोन कल्पकथांमध्ये (myth) रुजलेली होती.
एनियस हा रोमचा मूळ पराभूत संस्थापक ट्रॉयच्या युद्धानंतर (१२०० ख्रिस्तपूर्व) वडिलांना खांद्यावर घेऊन, मुलाला हाताशी धरून निर्वासितांसह देशोधडीस लागला. त्याच्या वडिलांच्या हातात त्यांच्या देवाच्या मूर्ती होत्या. एनियस ट्रॉयमध्ये युद्धात हरणेआवश्यकच होते. कारण त्याच्या नियतीत (destiny) रोमची स्थापना करणे होते. (प्रत्यक्षात एनियसच्या नंतर अनेक पिढ्या उलटल्यावर रोमची स्थापना झाली ही गोष्ट वेगळी.)
हा एनियस वाटेत निर्वासितांसह थांबला. तिथे तो डो डो ह्या विधवेच्या प्रेमात पडला. डोडोवरच्या प्रेमामुळे त्याला पुढे निघून जाण्याची इच्छा नसते.

पुढे वाचा