भाग ३ : इकॉलॉजी, विषाणू आणि आरोग्य

करोना विषाणूची उत्पत्ती आणि रोगाचा प्रसार बघता पर्यावरणाचे आणि जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. कसे ते समजून घेऊ. करोनासारखे विषाणू प्राण्यांकडून माणसाकडे संक्रमित (Zoonotic) होतात. जगातील ६०% साथीचे रोग हे प्राण्यांकडून येतात. यातले ७२% जंगली प्राण्यांकडून येतात. हे प्रमाण गेल्या शतकात बरेच वाढलेले दिसते. सार्स, मर्स, इबोला, निपा, झिका, एच.आय.व्ही. ही सगळी अशीच पिल्लावळ. साहजिक प्रश्न येतो की हे सगळे जीव माणसाच्या आरोग्यासाठी कधी, कुठे, केव्हा, कसे आणि का घातक ठरत आहेत?