पुनश्च मेकॉले
१८३५ मध्ये शिक्षणक्षेत्रात ब्रिटिश राजवटीने आणलेली ‘मेकॉले’ मानसिकता उलथून टाकण्याचा दहा वर्षांचा कृती-आराखडा पंतप्रधान मोदी ह्यांनी नुकताच आपल्या रामनाथ गोएंका व्याख्यानात मांडला. मेकॉले ह्यांनी इंग्रजी भाषा जनतेवर लादून त्यांच्यात ब्रिटिश लोकांची मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे सांगून जपान, चीनप्रमाणे आपण भारतीय भाषांतून शिक्षण द्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप सातत्याने पाठपुरावा करीत …