भास्कर लक्ष्मण भोळे - लेख सूची

हे छोटे सरदार की खोटे सरदार

गुजरात राज्यातील हिंदूराष्ट्राच्या प्रयोगशाळेचे मुख्य संचालक नरेंद्र मोदी यांनी रा.स्व.संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद वगैरे परिवाराच्या सहकार्याने आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा वेठीस धरून 27 फेब्रुवारी 2002 च्या गोध्रा हत्याकांडानंतर जो बहात्तर तासांचा अभूतपूर्व नरसंहार त्या राज्यात घडवून आणला त्याबद्दल प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया प्रभृती श्रेष्ठींनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. या …

जोतीराव फुले यांचे अंधश्रद्धा-निर्मूलन कार्य

जोतीराव फुले यांनी विश्वमानवाच्या मुक्तीसाठी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या दोन निष्ठावंत अग्रणींच्या आयुष्यातील दोन प्रसंग प्रारंभीच नमूद केल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्या चळवळीने संपादन केलेल्या यशाचा प्रत्यय येऊ शकेल. पहिला प्रसंग ना. भास्करराव जाधवांच्या आयुष्यातला आहे. वेदोक्त प्रकरणी दुखावलेल्या शाहू महाराजांनी जेव्हा क्षात्र जगद्गुरूची प्रतिष्ठापना केली तेव्हा भास्कररावांनी त्या कल्पनेस विरोध केला होता. एवढेच नव्हे …

सपाटीकरणाचा सपाटा आणि विश्वाचे ‘वाट्टोळे’ वास्तव

टॉमस एल्. फ्रीडमन, दि वर्ल्ड इज् फ्लॅट : अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द्वेन्टीफर्स्ट सेंचुरी, फरार-स्ट्राऊस अँड गिरॉक्स, न्यूयॉर्क २००५, पृष्ठे : ४८८. टॉमस फ्रीडमन हे न्यूयॉर्क टाईम्स दैनिकाचे परराष्ट्रव्यवहार प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांना पुलित्झर पुरस्काराने तीनदा गौरविले गेले आहे. बैरुत टु जेरुसलेम (१९८९), दि लेक्सस अँड दि ऑलिव्ह ट्री (१९९९) आणि लाँगिट्यूडस् अँड अॅटिट्यूडस् …

हे छोटे सरदार की खोटे सरदार

गुजरात राज्यातील हिंदूराष्ट्राच्या प्रयोगशाळेचे मुख्य संचालक नरेंद्र मोदी यांनी रा.स्व.संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद वगैरे परिवाराच्या सहकार्याने आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा वेठीस धरून २७ फेब्रुवारी २००२ च्या गोध्रा हत्याकांडानंतर जो बहात्तर तासांचा अभूतपूर्व नरसंहार त्या राज्यात घडवून आणला त्याबद्दल प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया प्रभृती श्रेष्ठींनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. या …

नवधर्मस्थापनेतून सामाजिक पुनर्रचना होऊ शकेल?

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुखे यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने नव्या धर्माची स्थापना करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असल्याची बातमी वर्तमानपत्रांतून काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाली आणि त्यावर उलटसुलट चर्चाही तेव्हापासून सुरू आहे. हे कार्य तसे प्रचंड मोठे आणि आव्हानात्मक आहे. धर्माचे तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठान, पूजापद्धती वगैरे कृतिरूप अभिव्यक्ती आणि रीतिरिवाज, दंडक, नीतितत्त्वे, यमनियम, …

तीन नवी पुस्तके

१. अग्नी ते अणुशक्ती : मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक प्रवासाच्यापाऊलखुणा (स.मा. गर्गे : समाज, विज्ञान आणि संस्कृती, समाजविज्ञान मंडळ, पुणे; जानेवारी १९९७, पृष्ठे : ११५, किंमत : रु. ८०) इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र वगैरे विषयांवरील विपुल लेखनामुळे आणि विशेषतः भारतीय समाजविज्ञान कोश या सहा खंडात्मक संदर्भसाहित्याच्या संपादनामुळे स.मा. गर्गे हे नाव मराठी वाचकांना ठाऊक आहे. त्यांनी आपल्या या …

संपादकीय

आगरकरांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा जून-जुलै अंक आगरकरविशेषांक म्हणून वाचकांच्या हातांत देताना आम्हाला स्वाभाविकच आनंद होत आहे. ह्या अंकाचे संपादन डॉ. भा. ल. भोळे ह्यांनी केले असून त्यांचे संपादकीय निवेदन पुढे दिलेआहे. डॉ. भोळे ह्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल आम्ही त्यांचे अत्यन्त आभारी आहोत. ते आमच्यापैकीच असले व त्यांचे औपचारिक आभार मानण्याची तशी गरज नसली तरी ते …

चर्चा – पण पूर्वग्रह पुराव्यांपेक्षा प्रबळ होऊ नयेत

प्रा. शेषराव मोरे यांनी वाचकांचा त्यांच्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून केलेला खुलासा माझे आक्षेपच अधिक बळकट करणारा आहे. माझ्या परीक्षणाचा एकूण रोख जाणीवपूर्वक लक्षात न घेता त्यांनी आत्मसमर्थनार्थ बरीच मखलाशी केली आहे. जाणीवपूर्वक हा शब्द मी मूळ परीक्षणातही मुद्दाम दुहेरी अवतरणचिन्हांत टाकला होता। (आजचा सुधारक – १९९२ पृ. २७६). फडके-पळशीकरादी टीकाकार फक्त सावरकरांची बदनामी करण्यासाठीच …

पुस्तकपरीक्षण -‘सत्या’पेक्षा अधिक ‘विपर्यासां’चाच ऊहापोह।

सावरकरांचे एक निष्ठावंत व व्यासंगी अभ्यासक म्हणून प्रा. शेषराव मोरे यांचे नाव आता प्रतिष्ठित झाले आहे. व्यावसायिकदृष्ट्या अभियांत्रिकीत पारंगत असलेले प्रा. मोरे इतिहास, समाजशास्त्र, तर्कशास्त्र व भाषा वगैरे विषयांचेही जाणकार आहेत. स्वातंत्र्यवीर हा तर त्यांच्या अध्ययन-मनन-चिंतनाचा नव्हे तर निजिध्यासाचाच विषय गेल्या अनेक वर्षांपासून ठरला आहे. यातूनच निष्पन्न झालेल्या त्यांच्या ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ …

धर्मनिरपेक्षता : वस्तुस्थिती आणि विचारवंत

‘आजचा सुधारक’च्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या अंकात धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाशी संबंधित दहा प्रश्न प्रसिद्ध करून त्यावर प्रतिक्रिया पाठवण्याचे आवाहन विचारवंतांना केले होते. वर्षभरातील अंकांतून या प्रतिक्रिया वाचकांसमोर आल्याच आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरचा अंक धर्मनिरपेक्षता विशेषांक म्हणूनच प्रकाशित झाला आहे. त्यानंतरही एक प्रदीर्घ लेख क्रमशः तीन अंकांतून आला आहे. (लेखांक १, लेखांक २, लेखांक ३) आमच्या प्रश्नावलीला प्रतिसाद देणाऱ्या या …

फुले-आंबेडकर शताब्दी समारोहाच्या निमित्ताने

हे वर्ष सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेबद्दल आस्था बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या वर्षीपासून जोतीराव फुले यांची मृत्युशताब्दी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी प्रचंड उत्साहानिशी साजरी होत आहे. कालगतीने जयंतीमयंती आणि त्यांच्या शताब्दीही येतच असतात, पण त्या सगळ्याच समारंभपूर्वक साजऱ्या होत नसतात. तुरळक महापुरुषांच्याच वाट्याला हे सन्मान येत असतात कारण त्यांच्या विचाराबद्दल व कार्याबद्दल कृतज्ञता …

साम्यवादी जगातील घडामोडी : काही निरीक्षणे

रशियात गोर्बाचेव्ह यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केलेल्या ग्लासनोस्त व पेरिस्रोयको नामक परिवर्तनपर्वाने आता चांगलेच मूळ धरले असून जगात सर्वत्र खळबळ गाजवली आहे. ‘सर्वत्र’ हा शब्द इथे मुद्दामच वापरला आहे कारण त्याचे परिणाम आता साम्यवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून कथित लोकशाही व अलिप्ततावादी या सर्वांना आज नव्याने विचार करण्याची गरज भासू लागली …