मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०१४

अंधश्रद्धानिर्मूलनाची एक गोष्ट

घराची बरीच दुर्दशा झालेली असताना दुरुस्ती व देखभालीचे काम काढायचे ठरले. ठेकेदार मिश्रीलाल ह्यांना ठेका देण्यात आला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी, दोन लेबर बाजूच्या सर्वंट क्वार्टरमध्ये आणून ठेवतो असे आम्हाला सांगितले व त्याबरोबरच हेही बजावले, की त्या लेबर लोकांना काहीही द्यावयाचे नाही. ते स्वतःची व्यवस्था करून घेतील. तुम्हाला कटकट नको म्हणून आधीच सांगतो.

किशोर, ललिता व त्यांचे एक वर्षाचे बाळ दुसऱ्या दिवशीच आले. झोपलेल्या बाळाला खाटेवर टाकून ललिताबाईने आपला संसार थाटण्यास सुरुवात केली. एका तासाच्या आतच त्या गचाळ सर्वेंट्स् क्वार्टरचा कायापालट झाला व तीन दगडांच्या चुलीवर भात मांडला गेला.

पुढे वाचा

नवा पर्यावरणवाद

नवा पर्यावरणवाद गेल्या काही दशकांत पर्यावरणीय जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या असून मानवी-सामाजिक जीवनाचा अधिक परिपूर्ण रीतीने विचार त्यातून पुढे आला आहे. शुद्ध हवा, पाण्याचे शुद्ध व निरंतर स्रोत, स्वच्छ सूर्यप्रकाश, नितळ आकाश वा चांदणे, या सृष्टीबद्दल वा इतर जीवांबद्दल प्रेम-कुतूहल, समृद्ध सांस्कृतिक- सामाजिक जीवन, जंगल-झाडे, प्राणी-पक्षी यांचे अस्तित्व या गोष्टी अधिक समृद्ध जीवनासाठी आवश्यक असतात. आदिवासी, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठीतर अधिकच. त्यांच्या जीवनाचा तो सहज भाग असतो. जीवनाची गुणवत्ता व सौंदर्य हा सर्वांचाच अधिकार आहे. कष्टकरी वर्गाचा देखील. पर्यावरणीय व सांस्कृतिक उन्नयनाचा त्यांच्याशी संबंध नाही असे म्हणणे हे भांडवलशाही राजकारणाचा भाग आहे.

पुढे वाचा

सम्यक जीवनशैली

या सर्वांना जोडून सामाजिक व व्यक्तिगत जीवनशैलीबद्दल आखणी करणे व धोरण असणे आवश्यक बनले आहे. जीवनशैलीचा मुद्दा उपभोगाशी, वस्तू व साधनसंपदेच्या वापराशी निगडित आहे. उपभोगवाद किंवा चंगळवाद हा मुद्दा व्यक्तिवादी नैतिकतेबरोबरच सामाजिक नीतीचा (सोशल मॉरॅलिटी), आपल्याशिवाय इतरांच्या लोकशाही हक्कांचा व साधनसंपत्तीविषयक धोरणांचा आहे. प्रत्येकाने किती पाणी, वीज, जंगल, नैसर्गिक साधनसपंत्ती वापरावी, इथपासून किती धन व वस्तूसंग्रह करावा येथपर्यंत अनेक बाबी वापरण्यावर कमाल मर्यादा येतील. अमेरिका-युरोपप्रमाणे दरमाणशी वीजवापराचे व अन्य उपभोगाचे उद्दिष्ट प्रमाण मानले तर भारतातल्या सर्व नद्यांवर अगडबंब धरणे बांधून सर्व जंगले, जमीन, पैसा वापरूनही त्याची पूर्तता होणार नाही.

पुढे वाचा

दुष्काळ – पाण्याचा की विचारांचा?

(थोर पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचा हा लेख काश्मीरमधील प्रलयाच्या पार्श्वभूमीवर ह्या अंकात प्रकाशित करीत आहोत. डॉ राजेन्द्रप्रसाद ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे विचार प्रथम आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले होते. प्रस्तुत लेखात, समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटीची जंगले नष्ट केल्यामुळे त्या प्रदेशात किंवा मुद्दाम उंचावरून रस्ते काढल्यामुळे सखल प्रदेशात पूर आल्याची उदाहरणे देऊन त्यांनी एक महत्त्वाचा सिध्दान्त मांडला आहे, तो असा की दुष्काळ किंवा पुरासारख्या आपत्ती अचानक कधीच येत नाहीत. त्यांच्या आधी चांगल्या विचारांचा दुष्काळ आलेला असतो. ‘ज्ञानोदय’ मासिकाच्या जून २०१४ च्या अंकातून अनुवादित, संपादित, साभार.

पुढे वाचा

औरस- अनौरसत्व, जनुकशास्त्र वगैरे…

(औरस-अनौरसाचा जगाच्या प्रारंभापासून नसला तरी तो खूप खूप जुना आहे. आणि फक्त भारतातच नाही, तर जगात सर्वत्र आहे. हा गुण करणाऱ्यांना चिकटत नाही, निरागस, नवजात अर्भकाला मात्र चिकटतो. एका नोबेल विजेत्याने आपल्या जन्माची कहाणी कशी उघड करून सांगितली आहे, ते पहा. अशी गोष्ट एखाद्याच्या बाबतीत घडावी ह्यात काहीच आश्चर्य नाही. वर म्हटल्याप्रमाणे असे खूप खूप पूर्वीपासून होतच आले आहे. आश्चर्य आहे ते त्याने ती एवढी मोकळेपणाने सांगावी ह्याचे. पॉल नर्स ह्यांना त्यांच्या जन्माची गोष्ट तशी कर्मधर्मसंयोगानेच कळली. तेव्हा तर त्यांना धक्का बसलाच.

पुढे वाचा

अनश्व-रथ, पुष्पक विमान व आपण सर्व – लेखांक दुसरा

(मागील लेखात आपण पहिले की नरेंद्र मोदी ह्यांच्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय जितके हिंदुत्ववाद्यांच्या अथक परिश्रमाला आहे, तितकेच ते भारतीय परंपरेचा अन्वयार्थ लावू न शकलेल्या पुरोगाम्यांच्या अविचारीपणाला व दुराग्रहालाही आहे. हिंदू राष्ट्रवादाचा व राहदूराष्ट्रवादी व गांधी दोघेही परंपरेचे समर्थक होते; पण हिंदू धर्मातील अनाग्रही, सहिष्णु वृत्ती हाच हिंदुधर्माचा गाभा आहे, त्याचे शक्तिस्थान आहे, अशी गांधींची श्रद्धा होती. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांनाहा हिंदूंचा दुबळेपणा आहे असे वाटत आले आहे. हिंदुराष्ट्रवादाचामुख्य आधार ‘हिंदू’ विरुद्ध ‘इतर’ असे द्वंद्व उभे करणे हा आहे. म्हणूनच भारतीय इतिहासातील भव्यता, उदात्तता ही फक्त हिंदूंमुळे, व त्यातील त्याज्य भाग परधर्मीयांमुळे आहे, असे सांगून त्यांना इतिहासाची मोडतोड करावी लागते.

पुढे वाचा

अमेरिकेचे राष्ट्रगीत

‘सूर्याच्या पहिल्या किरणांसवे, धुक्याच्या पडद्याआड ज्याचे दर्शन होत आहे तो ध्वज कालच्या काळरात्रीनंतर अजूनही दिमाखाने झळाळतो आहे. अग्निबाण आणि बारुदी गोळ्यांच्या माऱ्यात आणि लालतांबड्या आगीच्या लोळातही आमचा राष्ट्रध्वज खंबीरपणे झळाळतो आहे. जोपर्यंत युद्धभूमीवर आमच्या राष्ट्रध्वजाचे दर्शन होत राहील तोपर्यंत ह्या वीरांच्या आणि स्वातंत्र्याच्या भूमीसाठी आम्ही लढा देत राहू. (अमेरिकन राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या कडव्याचा स्वैर भावार्थ)

एखाद्या देशाचे राष्ट्रगीत हे जणू त्याच्या इतिहासाचे प्रतिबिंबच असते. देशासाठी आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा उल्लेख राष्ट्रगीतात केला जातो. राष्ट्रगीतांत जाणते- अजाणतेपणे ज्या घटकांचा उल्लेख केला जात नाही ते घटकही महत्त्वाचे असतात, नाही असे नाही.

पुढे वाचा

ज्ञानाची बहुलता

या चळवळींतून व विकासाच्या समीक्षेतून आजवरच्या वर्चस्ववादी ज्ञानविज्ञानावरही सवाल केले गेले आहेत व ज्ञानविज्ञानांचे बहुलवादी अस्तित्व ठसवले गेले. एका वर्गाचे ज्ञान किंवा अमुक प्रकारचेच विज्ञान यांना एकमेवाद्वितीय, प्रमाण मानण्याऐवजी प्रत्येक समाजघटकाचे व विभिन्न देशकालातील अनुभव व प्रयोगांनी सिद्ध होत आलेले ज्ञान-विज्ञान देखील महत्त्वाचे आहे, प्रमाण आहे, जी जाणीव अनेक चळवळी रुजवत आहेत. एखाद्याच वर्गाच्या, एकाच विशिष्ट कालातील वा भूभागातील व एकाच पद्धतीच्या ज्ञानाचे प्रमाण्य व त्याची मक्तेदारी असणे हे सुद्धा वर्चस्वाचे व शोषणाचे एक मुख्य कारण आहे. साधारण जनसमूह सुद्धा शेकडो वर्षे आपली बुद्धी, सर्जनक्षमता व परंपरेने शेती, पाणी, आरोग्य, तंत्रविज्ञान विकसित करत आले आहेत.

पुढे वाचा

धोरणकर्त्यांचे अपयश

देशात परिवर्तनाची लाट आलेली आहे. शहरे बदलत आहेत, गावे पूर्वीसारखी हिली नाहीत. शिकलेल्यांचे उत्पन्न वाढत आहे. पिरॅमिडच्या तळातल्या म्हणजे खालील लोकांना मोफत भेटी दिल्या जात आहेत. अशा वेळी भारतीय समाजाचा घटक अस्पृश्यासारखा वेगळा पडलेला दिसतो आहे. तो आहे साठ कोटी ख्येचा शेतकरी समुदाय. सतरा वर्षांत सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या आहेत. ६५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये देशाची सर्वाधिक लोकसंख्या कमीत कमी उत्पन्नावर आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा सातत्याने घसरतो आहे.

पुढे वाचा

शेवटचा स्टॉप नाही!

“म्हणजे एकंदरीतच वेदान्त हा मानवी कल्याणाचा विचार दिसतो. तिथे ‘हिंदू’ ‘इस्लाम’ या लेबलांना स्थान नाही. हे पाहता सतत मनात येणारा एक प्रश्न तुला विचारतो, ‘संघपरिवाराला विवेकानंद एवढे जवळचे कसे काय वाटतात व डाव्या पुरोगामी मंडळींना ते निदान कालपर्यंत तरी जवळपास पूर्णत: अस्पृश्य होते हे कसे काय?’

‘हे बघ मित्रा, समाजातील उच्च स्थान, प्रभाव व कर्तृत्व यांनी फार मोठ्या असलेल्या व एरवी अत्यंत आदर वाटावा अशा अनेक व्यक्ती विचारांच्या उदारतेच्या प्रांतात त्या त्या परिस्थितीच्या मर्यादा ओलांडू शकत नाहीत असे दुर्दैवाने घडताना अनेकदा दिसते खरे.

पुढे वाचा