विषय «नीती»

दस्तावेज -गोहत्याबंदी आणि गांधीजी

गोहत्याबंदी, गांधीजी
———————————————————————————————-
गोहत्याबंदीच्या प्रश्नावर आपल्या देशात नुकतेच रण माजले होते. अजूनही हा वाद शमला नाही. ह्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीच्या भल्यासाठी गोसंगोपन आणि गोसेवेचा आग्रह धरणारे गांधीजी धार्मिक स्वातंत्र्याच्या आधारावर गोहत्याबंदीच्या मागणीला ठाम विरोध करतात हे समजून घेऊ या त्यांच्याच शब्दांतून.
—————————————————————————-
राजेंद्रबाबूनी मला सांगितले की त्यांच्याकडे गोहत्याबंदीची मागणी करणारे सुमारे ५०,००० पोस्टकार्ड्स, २५,०००-३०,००० पत्रे व हजारो तारा येऊन पडल्या आहेत. मी तुमच्याशी ह्यापूर्वी ह्या विषयावर बोललो होतो. हा पत्र आणि तारांचा पूर कशासाठी? त्यांचा काहीही परिणाम झालेला नाही.
मला एक तार मिळाली ज्यात सांगितले आहे की एका मित्राने ह्या प्रश्नावर उपोषण सुरू केले आहे.

पुढे वाचा

निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)

भारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय
Secularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याच बरोबर येथील संरंजामशाही राज्य व्यवस्थेमध्ये सर्व धर्मामध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्म-निरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही.
पण 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पट बदलून गेला. ब्रिटिश राज्यकत्र्यानी फोडा व झोडाची राजनीती स्वीकारली. यामूळे मध्ययुगीन संस्कृतीच्या इतिहासावर परिणाम होऊन नवीनच विस्कळीत इतिहास निर्माण झाला.

पुढे वाचा

निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)

आज काल सेक्युलॅरिझम व सेक्युलर बद्दल बरेच बोलले जाते. जेष्ठांच्या बैठकित यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्याना जशी माहिती तशी त्यानी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा.
• सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैली बरोबरच राज्यशासन व्यवस्थेशी जोडला गेला आहे.
• या शब्दाला बरेच अर्थ आहेत जसे इहवाद येथपासून ते कांही सामाजिक तुष्टीकरणा बरोबर याच संबंध जोडला जातो.
• पाश्चात्य व भारतीय विचारसरणी सेक्युलरबाबत भिन्न आहे. पण आपल्याला भारतीय संविधानाने यासाठी मान्य केलेला सर्वधर्मसमभाव हा शब्दच मान्य करावा लागतो.

पुढे वाचा

मेंदू प्रदूषण….

“दूषित करणे” म्हणजे बिघडविणे, वापरण्यास अयोग्य बनविणे. “प्र” उपसर्ग प्रकर्ष, आधिक्य (अधिक प्रमाण) दर्शवितो. यावरून प्रदूषण म्हणजे मोठ्या प्रमाणात बिघडविण्याची क्रिया. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, नदीप्रदूषण, भूमीप्रदूषण इत्यादि शब्द सुपरिचित आहेत.”मेंदुप्रदूषण” हा शब्द तसा प्रचलित झालेला नाही. पण त्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. इंग्रजीत ब्रेन वॉशिंग असा शब्द आहे. त्याचे मराठीकरण मेंदूची धुलाई असे करतात. परंतु धुतल्यामुळे वस्तू स्वच्छ होते. तो अर्थ इथे अभिप्रत नाही. मेंदुप्रदूषण हा शब्द मला अधिक समर्पक वाटतो. तुम्ही म्हणाल हे मेंदुप्रदूषण करणारे कोण ? ते कोणाच्या मेंदूचे प्रदूषण करतात ?

पुढे वाचा

स्वप्रतिमेच्या प्रेमात काही थोर भारतीय

नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्या अलीकडील भेटीत नरेंद्र मोदींनी घातलेल्या पोषाखाची चर्चा बरीच गाजली. त्यांनी जो सूट परिधान केला होता, त्यावर त्यांच्या नावाच्या नक्षीचे पट्टे होते. त्यावरील टीका अप्रस्तुत नव्हती. त्यांच्या पोषाखात दिखाऊपणा, भोंगळपणा तर होताच; तरीही मोदींचे त्यांच्या पेहरावातून दिसणारे स्वयंप्रेम हे आपल्याकडील किती तरी ताकदवान आणि यशस्वी भारतीय पुरुषांच्या सामाजिक वर्तणुकीचे अनुकरण होते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
याचे पहिले उदाहरण भारताच्या सुप्रसिद्ध आणि अनेक सन्मानांनी अलंकृत शास्त्रज्ञ सी.एन.आर.राव यांचे देता येईल. ते जगातील एका प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेचे सदस्य (फेलो) आहेत आणि आपल्या देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार ‘भारतरत्न’ त्यांना अलीकडेच मिळाला आहे.

पुढे वाचा

भ्रष्टाचाराचे अ(न)र्थशास्त्र!

लोकशाहीने आपल्या समाजाला काही चांगले, काही वाईट दिले. त्याबाबत चर्चा होऊ शकते. त्या चर्चेचा निष्कर्ष निरनिराळ्या पद्धतीनी निघू शकतो. मात्र भारतातली एक चिंताजनक अशी बाब म्हणजे भ्रष्टाचाराची. आपल्याकडची लोकशाही आणि त्यातून निर्माण झालेले राजकारण भ्रष्टाचाराला आळा घालू शकले नाही, हे विदारक सत्य होय. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या दोन दशकात भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण माफक होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही समाजव्यवस्थेत भ्रष्टाचार होत असतोच आणि तो टाळता येण्यासारखा नसतो. त्या समाजातील पुढाऱ्यांनी आणि शासनकर्त्यांनी तशा व्यवहाराचे प्रमाण माफक असेल याची खबरदारी घ्यायची असते. भारतात तसे झाले नाही.

पुढे वाचा

नीतीची मूलतत्त्वे (उत्तरार्ध)

आजच्या समाजातील नीतिमत्ता
समाजातील विचारवंतांचे आणि सामान्य माणसाचे आपल्या आजच्या नीतिमत्तेविषयी मत साधारण असे असते,” काय बघा कुठे चालला आहे आपला समाज! कुणालाही नीतीची चाड म्हणून राहिलेली नाही.आपल्या संस्कृतीचा असं ह्रास पिढ्या न पिढ्या चालू राहिला तर भविष्यात कसे होणार?”
खरोखरच, सर्वसामान्य माणूस नीतीने वागतो का? याचे उत्तर मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केले तरी खरे उत्तर मिळणे कठीण. अनैतिक वागणारे सुध्दा “ मी नैतिकतेनेच वागतो.” अशा तऱ्हेचा प्रतिसाद देतील! पण सामाजिक नीतिमत्ता तपासून बघण्यासाठी एक सोपी पद्धत आहे, ती अनेकवेळा वापरलेली आहे.

पुढे वाचा

नीतीची मूलतत्वे (पूर्वार्ध)

नीती आपल्याला समाजात कसे वागावे ते सांगते. नीतीचे नियम ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ या विषयी असतात. असे नियम जो पाळतो तो/ती नीतीमान: अशा व्यक्तीची नीतिमत्ता चांगली आहे असे म्हटले जाते. समाजात सर्वांनी नीतीने वागावे अशी अपेक्षा असते. परंतु काय करावे वा करू नये हे ठरवायचे कसें ‘चांगले वागावे, वाईट वागू नये’ हे खरे, पण ‘चांगले’ काय हे नक्की कसे ठरवायचे? एखाद्याला जे चांगले वाटेल ते दुसऱ्याला तसे वाटेलच असे नाही.

वागणूक चांगली-वाईट, इष्ट-अनिष्ट,योग्य-अयोग्य हे ठरवण्याचा मक्ता धर्मसंस्थेने घेतलेला आहे.

पुढे वाचा

‘प्रारूप राष्ट्रीय जल नीती’तील सुधारणा

‘प्रारूप राष्ट्रीय जल नीती’ २०१२ मध्ये पिण्याचे आणि स्वच्छतेचे पाणी सोडल्यास बाकी सर्व पाण्याला आर्थिक वस्तू समजले जावे असे सुचवले गेले. नंतरच्या आवृत्त्यां ध्ये अन्नसुरक्षा आणि शेतीसाठीचे पाणी ही प्राथमिक गरज समजली जावी याची खातरजमा करण्यात आली. १९९५ मध्ये घडलेली एक घटना आज इतक्या वर्षानंतरही माझ्या मनात ताजी आहे. मी एका मित्रासोबत कोई तूर च्या गर्दीच्या बाजारात खरेदी करीत असताना एक महागडी गाडी आमच्याजवळ येऊन थांबली. गाडीच्या खिडकीतून दोन हात बाहेर आले. दुकानातून नुकत्याच खरेदी केलेल्या एक लिटरच्या मिनरल बाटलीतल्या पाण्याने ते हात धुतले गेले.

पुढे वाचा

नैतिकतेची वैश्विकता

मार्क हॉसर हे नामवंत मानसतज्ज्ञ असून मन, मेंदू व वर्तणूक यांविषयी विशेष अभ्यास करत आहेत. त्यांच्या मॉरल माइंड्स (Moral Minds: How Nature Designed Our Universal Sense of Right and Wrong) या पुस्तकात नीतिमत्तेच्या वैश्विक स्वरूपाबद्दल विस्तृतपणे चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेल्या काही प्रश्नोत्तरांतून नैतिकतेविषयी त्यांना काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. माणसांमध्ये नीतिमत्ता उपजतच असते असे विधान आपण करत आहात. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे?

सर्वांत प्रथम नीतिमत्तेचे मूळ कुठे असेल याचा विचार करायला हवा. बरोबर वा चूक असे निकाल देत असताना त्यामागील मानसिक प्रक्रिया कोणती असेल?

पुढे वाचा