विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रचर्चा

अर्थ असा नाही की या मंडळींचे विचार प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. परंतु विचारांवर बंदी नको. धर्मनिष्ठांना धार्मिक जशा भावना असतात तशाच तीव्र भावना धर्मावर विश्वास न ठेवणारांच्याही असू शकतात याची जाणीव प्रत्येक प्रगतिशील शासनाने ठेवली पाहिजे.
धर्मावर टीका केली म्हणून मारा; आम्ही अमुक अमुक बक्षीस देऊ अशा प्रकारचे काही फतवे भारतातही निघाले होते. भारतात असे फतवे काढणाऱ्यांत जसे इस्लाम धर्मातील लोक आहेत तसेच हिंदू कट्टरपंथीयही आहेत. आणि असे फतवे काढणाऱ्यांवर काही विशेष कार्यवाही झाल्याचे माझ्या तरी माहितीत नाही. जर असे फतवे काढणारांवर कार्यवाही करायची नसेल तर भारतातील न्यायालये बंद करावी व न्यायव्यवस्था मुल्ला-पंडित यांच्यावरच सोपवावी हेच बरे.

पुढे वाचा

पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, ए-९/१, कुमार पद्मालय, न्यू डी पी रोड, स. नं. १६०/१, औंध, पुणे ४११ ००७. फोन (०२०) २५८९७३५९
लंकाधिपति-सम्राट-रावणाशी युद्ध करण्यासाठी समुद्राचे उल्लंघन आवश्यक होते. त्यासाठी रामेश्वर व लंका यांच्यामधील महासागरावर सेतू बांधावा लागला. रामाने वानरांच्या साह्याने पाच दिवसांत महासागरावर पाषाण, वृक्ष टाकून सेतू बांधला अशी कथा आहे. हा रामसेतू रामायण प्रत्यक्ष घडल्याचा पुरावा म्हणून दिला जातो व त्यावरून प्रतिपादन केले जाते. डॉ. भावे यांनी संशोधन करून हा सेतू रामाने प्रत्यक्षात बांधला होता असा दावा केला आहे. रामसेतू (हनुमान सेतू) वरून वानरसेनेने लंकेत प्रवेश केल्यावर शत्रूने पळून जाण्यासाठी अथवा अन्य कारणासाठी त्याचा उपयोग करू नये म्हणून रामाने एक बाण मारून सेतू महासागरात बुडवून टाकला व त्याचेच अवशेष आज दिसताहेत.

पुढे वाचा

पत्रचर्चा

ह. आ. सारंग, प्लॉट नं. ३२, सुभाषनगर, ‘हॉटेल अश्वमेघ’च्या पाठीमागे, एम.आय.डी.सी. रोड, लातूर – ४१३ ५३१.
‘अभ्यासेंनि प्रगटावें’ या संपादकीयाद्वारे आपण वाचकांशी साधलेला सुसंवाद आवडला. त्यामुळे आ.सु. च्या मागील अंगावर प्रतिक्रिया द्यायला प्रोत्साहित झालो. ‘पत्रबोध’ हे नामकरण व त्याला दिलेली जास्तीची जागा या दोन्ही गोष्टी आवडल्या. आ.स्. मध्ये चुटके-विनोद असण्याची गरज नाही. त्यासाठी इतर माध्यमे आहेत. याबाबतीत पंकज कुरुलकरांशी सहमत व्हावेसे वाटते. आ.सु.चे स्वरूप अलीकडे बदलले आहे, हे खरेच. हा बदल आवश्यकच होता. विनोदाप्रमाणेच कामजीवनावरील तथ्यांनाही आ.सु.त जागा देण्याची गरज आहे, असे वाटत नाही.

पुढे वाचा

पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, पुणे ४११ ००७
हिंदू धर्मानुसार विष्णूचे दहा अवतार मानले जातात. काहींच्या मते ३९ अवतार आहेत. लेखकाचे म्हणणे असे आहे की इतर कोणत्याही धर्मात मानवाचा उदय अथवा विकास उत्क्रांतीमुळे झाला याची पुसटशीसुद्धा कल्पना नाही. सर्व प्राणी, पक्षी व मानव ईश्वराने एका झटक्यात निर्माण केले असे यहुदी (ज्यू), ख्रिस्ती व इस्लाम धर्म मानतात. याला हिंदुधर्मही अपवाद नाही. हिंदुधर्मात ब्रह्मदेवाने हे जीव जगत् निर्माण केले आहे असे मानले जाते तर परमात्म्याने ब्रह्माला निर्माण केले आहे असे मानले जाते.
वेदकाळात तेहतीस [? सं.]

पुढे वाचा

पत्रचर्चा

कार्यकारणभाव
श्री देवीदास तुळजापूरकर (आसु जून २००७) यांनी दाखवून दिले आहे की कर्ज-ठेवी प्रमाण मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण या भागात ५७ ते ६४% आहे. ते असेही दाखवून देतात की महानगरे व शहरे यांत शाखा व कर्जे केंद्रित होत आहेत. असे होण्याच्या कारणांची चिकित्सा न करता त्यांनी हेत्वारोप व दोषारोप केले आहेत. उदा. वित्तव्यवस्था गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या जीवनाला स्पर्श करीत नाही ही अत्यंत क्रूर चेष्टा आहे, नवीन आर्थिक धोरणामुळे १९९१ ९२ सालानंतर ही ‘विकृती’ अधिकच वाढली आहे, हा जागतिक व्यूहरचनेचा भाग आहे काय ?

पुढे वाचा

पत्रचर्चा

संपादक, आजचा सुधारक यांस, आपल्या २००७ च्या अंकात श्री टी.बी. खिलारे ह्यांचे पत्र प्रकाशित झाले आहे. त्यांचे मला समजलेले मुद्दे खालीलप्रमाणे: १) अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. (ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे ती त्यांनी दिली ह्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.) २) मी आजच्या जातिविषयक वास्तवाकडे दुर्लक्ष करीत आहे. ३) मी पर्यायी व्यवस्था सुचवलेली नाही. ४) आरक्षणाला इतकी वर्षे झाली असूनसुद्धा वरिष्ठ जातींचा कनिष्ठ जातींवरील अन्याय चालूच आहे.
खिलाऱ्यांनी माझे म्हणणे समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न केलेला नाही असे मला दुर्दैवाने म्हणावे लागते.

पुढे वाचा

पत्रचर्चा (२)

आरक्षण प्रतिक्रिया (खिलारे) दि. २.४.२००७
मागच्या अंकात मी समानता आणण्यासाठी आरक्षणाऐवजी काय करता येईल ? अशा शीर्षकाचा लेख लिहिला होता आणि त्यामध्ये आर्थिक समानता आणण्यासाठी जातिसापेक्ष आरक्षणाऐवजी जातिनिरपेक्ष बेकारीभत्ता द्यावा असा मुद्दा मांडला होता. माझ्या लेखावर मला दोन प्रकारची प्रतिक्रिया मिळाली. पहिली अनुकूल प्रतिक्रिया एका तत्त्वज्ञानाच्या माजी प्राध्यापकाने लिहिली आणि प्रतिकूल प्रतिक्रिया पु कळ मोठ्या संख्येने आल्या. अनुकूल प्रतिक्रिया लिहिणाऱ्याने मी केलेल्या सूचनांचे मनःपूर्वक स्वागत केले. प्रतिकूल प्रतिक्रिया देणारे संख्येने खूप मोठे. त्यांची तोंडी किंवा लेखी प्रतिक्रिया समजून घेतल्यावर माझ्या असे लक्षात आले की ते शेवटपर्यन्त माझा लेख वाचूच शकले नव्हते.

पुढे वाचा

पत्रचर्चा

सिलेक्टेड-इलेक्टेड _आत्ताच एनडीटीव्हीवर राजकारणी विरुद्ध न्यायालय असा वाद-विवाद पाहिला व ऐकला. त्यामध्ये असे निघाले की न्यायालयांवर जनतेचा जेवढा विश्वास आहे, तेवढा राजकारण्यांवर नक्कीच नाही. त्यावर एक श्रोता म्हणाला की राजकारणात चांगली माणसे उतरतच नाहीत. असे का व्हावे ? त्यावर श्री रूडी जे राजकारण्यांच्या बाजूने बोलत होते ते म्हणाले की चांगल्या माणसांनी राजकारणात यावे म्हणजे परिस्थिती सुधारेल?
न्यायाधीश निवडलेले (सिलेक्टेड) असतात, व राजकारणी निवडून आलेले असतात हाच तो मूलभूत फरक आहे. आपल्या निवडणुकांमध्ये असे काहीतरी आहे की ज्यामुळे चांगली माणसे एकतर निवडूनच येऊ शकत नाहीत, नाहीतर निवडून आल्यानंतर त्यांना आपल्या मूल्यांशी तडजोड करावी लागते, म्हणजेच आपला चांगुलपणा गमावावा लागतो.

पुढे वाचा

पत्रचर्चा

वाढते HIV/AIDS प्रमाण – लैंगिक शिक्षणाची गरज
आरोग्य विशेषांकात एड्स विषयाला दिलेला ‘वेटेज’ यावर टी. बी. खिलारे यांनी निराशा व्यक्त केली. प्रत्यक्षात HIV/AIDS वरील सत्य माहिती, आजची जागतिक स्थिती, भारतातील, महाराष्ट्रातील स्थिती ही लोकांपर्यंत सर्व माध्यमांतून येणे गरजेचे आहेच. जसे पल्स पोलिओ डोसविषयी सतत प्रचार करीत राहिल्याने ती मोहीम यशस्वी होत आहे. जागतिक अनुदान मिळते म्हणून काम करणाऱ्या असंख्य सामाजिक संस्था आहेत. याचा अर्थ सर्व संस्था प्रामाणिक व शास्त्रीय काम करीत आहेत व शिक्षण देत आहेत असे समजू नये. स्वतःची तुंबडी भरणाऱ्या काही संस्था व काही समाजसेवक आहेत.

पुढे वाचा

पत्रचर्चा

गरीब, श्रीमंत व अतिश्रीमंत
परवा एका शिक्षक मेळाव्याबरोबर भारतीय संस्कृतीविषयी बोलताना चांगल्या, सुसंस्कृत नागरिकाचे पुढील गुण मी सांगितले. १) निरोगी सुदृढपणा २) स्वच्छता ३) सौंदर्यप्रेम ४) श्रीमंती ५) नियम/कायदे पाळण्याची वृत्ती अर्थात् भ्रष्टाचारी नसणे ६) स्त्रियांचा मान राखणे ७) सुशिक्षण.
यांपैकी श्रीमंती वगळता सर्व लक्षणांबद्दल एकमत झाले, व या लक्षणांचा निकष लावता भारतीय संस्कृती निकृष्ट आहे, ‘‘गर्वसे कहो हम भारतीय हैं” असे अभिमानाने म्हणण्यासारखी परिस्थिती नाही, व अधिक चांगले नागरिक घडवण्यासाठी डोळसपणे प्रयत्न केले पाहिजेत याबद्दलही चर्चेअंती एकमत झाले. ‘भारतीय असल्याबद्दल मला अभिमान वाटतो” असे सुरवातीला सर्वचजण म्हणत होते, पण चर्चेअंती सर्वांचे मतपरिवर्तन झाले.

पुढे वाचा