विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रचर्चा

कार्यकारणभाव
श्री देवीदास तुळजापूरकर (आसु जून २००७) यांनी दाखवून दिले आहे की कर्ज-ठेवी प्रमाण मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण या भागात ५७ ते ६४% आहे. ते असेही दाखवून देतात की महानगरे व शहरे यांत शाखा व कर्जे केंद्रित होत आहेत. असे होण्याच्या कारणांची चिकित्सा न करता त्यांनी हेत्वारोप व दोषारोप केले आहेत. उदा. वित्तव्यवस्था गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या जीवनाला स्पर्श करीत नाही ही अत्यंत क्रूर चेष्टा आहे, नवीन आर्थिक धोरणामुळे १९९१ ९२ सालानंतर ही ‘विकृती’ अधिकच वाढली आहे, हा जागतिक व्यूहरचनेचा भाग आहे काय ?

पुढे वाचा

पत्रचर्चा

संपादक, आजचा सुधारक यांस, आपल्या २००७ च्या अंकात श्री टी.बी. खिलारे ह्यांचे पत्र प्रकाशित झाले आहे. त्यांचे मला समजलेले मुद्दे खालीलप्रमाणे: १) अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. (ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे ती त्यांनी दिली ह्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.) २) मी आजच्या जातिविषयक वास्तवाकडे दुर्लक्ष करीत आहे. ३) मी पर्यायी व्यवस्था सुचवलेली नाही. ४) आरक्षणाला इतकी वर्षे झाली असूनसुद्धा वरिष्ठ जातींचा कनिष्ठ जातींवरील अन्याय चालूच आहे.
खिलाऱ्यांनी माझे म्हणणे समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न केलेला नाही असे मला दुर्दैवाने म्हणावे लागते.

पुढे वाचा

पत्रचर्चा (२)

आरक्षण प्रतिक्रिया (खिलारे) दि. २.४.२००७
मागच्या अंकात मी समानता आणण्यासाठी आरक्षणाऐवजी काय करता येईल ? अशा शीर्षकाचा लेख लिहिला होता आणि त्यामध्ये आर्थिक समानता आणण्यासाठी जातिसापेक्ष आरक्षणाऐवजी जातिनिरपेक्ष बेकारीभत्ता द्यावा असा मुद्दा मांडला होता. माझ्या लेखावर मला दोन प्रकारची प्रतिक्रिया मिळाली. पहिली अनुकूल प्रतिक्रिया एका तत्त्वज्ञानाच्या माजी प्राध्यापकाने लिहिली आणि प्रतिकूल प्रतिक्रिया पु कळ मोठ्या संख्येने आल्या. अनुकूल प्रतिक्रिया लिहिणाऱ्याने मी केलेल्या सूचनांचे मनःपूर्वक स्वागत केले. प्रतिकूल प्रतिक्रिया देणारे संख्येने खूप मोठे. त्यांची तोंडी किंवा लेखी प्रतिक्रिया समजून घेतल्यावर माझ्या असे लक्षात आले की ते शेवटपर्यन्त माझा लेख वाचूच शकले नव्हते.

पुढे वाचा

पत्रचर्चा

सिलेक्टेड-इलेक्टेड _आत्ताच एनडीटीव्हीवर राजकारणी विरुद्ध न्यायालय असा वाद-विवाद पाहिला व ऐकला. त्यामध्ये असे निघाले की न्यायालयांवर जनतेचा जेवढा विश्वास आहे, तेवढा राजकारण्यांवर नक्कीच नाही. त्यावर एक श्रोता म्हणाला की राजकारणात चांगली माणसे उतरतच नाहीत. असे का व्हावे ? त्यावर श्री रूडी जे राजकारण्यांच्या बाजूने बोलत होते ते म्हणाले की चांगल्या माणसांनी राजकारणात यावे म्हणजे परिस्थिती सुधारेल?
न्यायाधीश निवडलेले (सिलेक्टेड) असतात, व राजकारणी निवडून आलेले असतात हाच तो मूलभूत फरक आहे. आपल्या निवडणुकांमध्ये असे काहीतरी आहे की ज्यामुळे चांगली माणसे एकतर निवडूनच येऊ शकत नाहीत, नाहीतर निवडून आल्यानंतर त्यांना आपल्या मूल्यांशी तडजोड करावी लागते, म्हणजेच आपला चांगुलपणा गमावावा लागतो.

पुढे वाचा

पत्रचर्चा

वाढते HIV/AIDS प्रमाण – लैंगिक शिक्षणाची गरज
आरोग्य विशेषांकात एड्स विषयाला दिलेला ‘वेटेज’ यावर टी. बी. खिलारे यांनी निराशा व्यक्त केली. प्रत्यक्षात HIV/AIDS वरील सत्य माहिती, आजची जागतिक स्थिती, भारतातील, महाराष्ट्रातील स्थिती ही लोकांपर्यंत सर्व माध्यमांतून येणे गरजेचे आहेच. जसे पल्स पोलिओ डोसविषयी सतत प्रचार करीत राहिल्याने ती मोहीम यशस्वी होत आहे. जागतिक अनुदान मिळते म्हणून काम करणाऱ्या असंख्य सामाजिक संस्था आहेत. याचा अर्थ सर्व संस्था प्रामाणिक व शास्त्रीय काम करीत आहेत व शिक्षण देत आहेत असे समजू नये. स्वतःची तुंबडी भरणाऱ्या काही संस्था व काही समाजसेवक आहेत.

पुढे वाचा

पत्रचर्चा

गरीब, श्रीमंत व अतिश्रीमंत
परवा एका शिक्षक मेळाव्याबरोबर भारतीय संस्कृतीविषयी बोलताना चांगल्या, सुसंस्कृत नागरिकाचे पुढील गुण मी सांगितले. १) निरोगी सुदृढपणा २) स्वच्छता ३) सौंदर्यप्रेम ४) श्रीमंती ५) नियम/कायदे पाळण्याची वृत्ती अर्थात् भ्रष्टाचारी नसणे ६) स्त्रियांचा मान राखणे ७) सुशिक्षण.
यांपैकी श्रीमंती वगळता सर्व लक्षणांबद्दल एकमत झाले, व या लक्षणांचा निकष लावता भारतीय संस्कृती निकृष्ट आहे, ‘‘गर्वसे कहो हम भारतीय हैं” असे अभिमानाने म्हणण्यासारखी परिस्थिती नाही, व अधिक चांगले नागरिक घडवण्यासाठी डोळसपणे प्रयत्न केले पाहिजेत याबद्दलही चर्चेअंती एकमत झाले. ‘भारतीय असल्याबद्दल मला अभिमान वाटतो” असे सुरवातीला सर्वचजण म्हणत होते, पण चर्चेअंती सर्वांचे मतपरिवर्तन झाले.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आजचा सुधारक, डिसें. २००६ मधील संपादकीयात, निखळ बुद्धिवादाच्या, विवेकवादाच्या पुढे जाण्याचा विचार जाणवला. भावनांनी ध्येय ठरवावे. बुद्धिवादाने मार्ग दाखवावा. साधने पुरवावी.
वाढत्या विषमतेवर आपला रोख दिसतो. वाढत्या विषमतेमध्ये काही जणांना फार पैसा मिळतो ही कमी महत्त्वाची गोष्ट आहे. काही जणांना फार कमी पैसा मिळतो. ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची कारणे शोधून दूर करण्याचा प्रयत्न करणे हेच आपल्या हातात आहे. १) पालकांच्या दारिद्र्यामुळे अनेक मुलांना कसलेच शिक्षण मिळत नाही. पालकांना शिक्षणाचे महत्त्व न वाटणे हे मुलांना शिक्षण न मिळण्याचे गरिबीशिवाय आणखी एक कारण आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

मेंदूतील देव वरील चर्चा (जुलै, ऑक्टो.व नोव्हें.०६), याबद्दल पर्सिंगर ह्यांचे पूर्वीचेही एक संशोधन पाहिले तर त्यांच्या मेंदूतील धार्मिक स्थानाच्या प्रयोगाबद्दल संशय घेण्यासारखीच स्थिती आहे. परामानसशास्त्रज्ञ विल्यम रोल ह्यांच्याबरोबर पर्सिंगर ह्यांनी २००१ मध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. त्याचे नाव होते : पिशाच्च आणि पिशाच्चाने झपाटलेल्या जागेविषयीचे संशोधन पुनर्तपासणी आणि अर्थान्तरण. त्यामध्ये त्यांनी काढलेले निष्कर्ष गूढ भाषेत लिहिलेले होते व ते बुद्धिवादी संशोधकांना पटलेले नव्हते.
आपल्या निष्कर्षात पर्सिंगर व रोल ह्यांनी, “काही पिशाचे ‘सायकोएनर्जीटिक फोर्स’ मुळे शांतताभंग (भानामतीसारख्या गोष्टी) करतात.” “मेंदूतील विद्युत्-चुंबकीयच अवस्था वातावरणातील विद्युत्-चुंबकीय शक्तींवर परिणाम करून घटना घडवत असावी,” ह्यासारखे निष्कर्ष काढले होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आसु च्या नोव्हें.०६ च्या पत्रसंवादातील प्रदीप पाटील यांचे पत्रातील शेवटच्या परिच्छेदांत माझ्या नावाचा उल्लेख व उल्लेखाचे कारण वाचून मी आश्चर्यचकित झालो. प्रदीप पाटील लिहितात की “डॉ.देशकर यांना धर्म म्हणजे नीती या अर्थाने त्यांचे विवेचन अभिप्रेत असेल तर मी (प्रदीप पाटील) आस मध्ये पूर्वीच लिहिले आहे. आणि धर्माविषयी आस ने दि.य.देशपांडेंचे अनेक लेख छापले आहेत तीच माझी भूमिका आहे.” माझी प्रदीप पाटलांच्या मेंदूतील देव’ ह्या मूळ (जुलै ०६) लेखावर प्रतिक्रिया ऑक्टो.०६ च्या पत्रसंवादात प्रसिद्ध झाली होती. त्यात कुठेही मी नीती हा शब्द वापरला नव्हता.

पुढे वाचा

पत्रसंवाद

अंक १७.७ मधील मॅक्स प्लँकचा (भाषांतरित) आपल्या अस्तित्वाचे गूढ रहस्य शीर्षक असणारा लेख प्रकाशित झाला आहे. असला लेख आजचा सुधारक सारख्या विवेकवादाला समर्पित मासिकात का छापला जावा हे मला पडलेले गूढ आहे. कदाचित संपादकांची ही मनीषा असेल की बुद्धिवाद्यांना विरोधी पक्ष माहीत असावा. आरंभीच मला एक गोष्ट म्हणायची आहे ती ही की कोणी एक व्यक्ती एखाद्या क्षेत्रात अधिकारी जरी असेल तरी जीवनाच्या अन्य क्षेत्रात तिचे म्हणणे तितकेच अधिकारी असते असे नसते. उदा. लता मंगेशकर आर्थिक किंवा कृषिक्षेत्रात अधिकारी नाहीत. त्याचप्रमाणे मॅक्स प्लँक हे भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात अधिकारी वैज्ञानक आहेत म्हणून आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांच्या मतांना तितकेच महत्त्व दिले जावे असे मला वाटत नाही.

पुढे वाचा