विषय «राजकारण»

आम्ही का जावं पाकिस्तानात ?

हा देश तुमची मालमत्ता आहे
की आमच्यापेक्षा अधिक घाम-रक्त वाहवलंय तुम्ही
तुमच्या श्वासात आमच्यापेक्षा अधिक विरघळली आहे इथली हवा
तुमच्या मातीत इथला सुवास अधिक आहे
की नसांतून जरा जास्तच दौडतय इथलं पाणी
नाही ना, मग आम्ही का जावं पाकिस्तानात?
ज्यांना जायचं होतं, ते गेले निघून पाकिस्तानात
त्यांना तुमच्या पाकिस्तानची भीती वाटत होती
म्हणून त्यांनी बनवला त्यांचा त्यांचा पाकिस्तान
पण काय झालं ?
धोक्यात आहे त्यांचे अस्तित्त्व
आपल्याच पाकिस्तानात भयग्रस्त आहेत ते,
खरं तर सर्वांनाच माहित आहे
की प्रत्येक पाकिस्तानचा शेवट सारखाच असतो
म्हणून आम्ही पाकिस्तानात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

पुढे वाचा

सावरकर हे नवभारताचे राष्ट्रपिता, गांधी सावत्रपिता

सावरकर, गांधी, हिंदुत्ववाद, हिंदुधर्म, जागतिकीकरण

——————————————————————————–

         प्रख्यात मनोविश्लेषक-राजकीय भाष्यकार आशिष नंदी ह्यांची ही ताजी मुलाखत त्यांची मार्मिक निरीक्षणे, वादग्रस्त विधाने ह्यांनी भरलेली आहे. पण त्यापलीकडे जाऊन विचार केला तर तीतून आपल्याला परंपरा व भविष्य ह्यांच्याकडे बघण्याची मर्मदृष्टी सापडू शकते. वाचक ही चर्चा पुढे नेतील अशी अपेक्षा आहे.

——————————————————————————–

अश्रफ : आपले पुस्तक ‘Regions of Naricism, Regions of Despair’ याची सुरुवातच अशी आहे की, ‘या निबंधामध्ये मी अशा भारताबद्दल लिहिलेले आहे, जो 40 वर्षांपूर्वी मी ज्या भारताबद्दल लिहायचो त्याच्याहून खूप भिन्न आहे’.

पुढे वाचा

मराठा मोर्चे : एक आकलन

मराठा, अस्मिता, सामाजिक लढा, सत्याग्रह
—————————————————————————–
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात निघालेल्या विराट् मराठा मोर्च्यांनी अनेक नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामागील समूहमानस समजून घेण्याचा हा एक प्रयत्न. ह्या विषयावर व्यापक चर्चा घडावी ह्या अपेक्षेने तोप्रकाशित करीत आहोत.
—————————————————————————–

कोपर्डी, जिल्हा – अहमदनगर येथे मराठा समाजातील एका गरीब आणि अल्पवयीन मुलीवर चार दलित तरुणांनी बलात्कार करून तिचा खून केला. या घटनेने महाराष्ट्रातील समस्त मराठा समाज अतिशय क्षुब्ध झाला. आपण राज्यकर्ता समाज असल्याचे भान असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढून त्याने अत्यंत संयत प्रतिक्रिया देत, त्या घटनेचा निषेध करायला सुरुवात केली आहे.

पुढे वाचा

अनुभव : मी मराठा ?

मराठा, जातीय अस्मिता
—————————————————————————–
मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाने नव्हे, तर शिक्षण व स्वतंत्र व्यवसाय उभारण्यातून मराठा युवकांचे प्रश्न सुटू शकतील असे मांडणारा हा स्वानुभव
—————————————————————————–
मराठा जातीत जन्माला आल्याचा मला जराही अभिमान नाही, असण्याची आवश्यकता अजिबात नाही, यात माझं काहीही कर्तृत्व नाही. याउलट याची लाज वाटावी अशाच काही घटना घडल्या आहेत. आरक्षणाचा मला वैयक्तिक काहीच तोटा झाला नाही. मला दहावीला ८४% मार्क्स मिळाले, बारावीला ७८%. देशातल्या सर्वोत्तम कॉलेजेसपैकी एक असणाऱ्या रुईया कॉलेजमध्ये मला अॅडमिशन मिळाली, कोणत्याही अडचणीशिवाय. गावाकडे अगदीच थोडीशी कोरडवाहू शेती असल्याने त्याचा तसा कधीच काही फायदा झाला नाही.

पुढे वाचा

सामाजिक मानसशास्त्राच्या संदर्भात मतभिन्नता

समूहाच्या मताच्या विरुद्ध जाऊन आपला आवाज व्यक्त करणे हे महत्त्वाचे आहेच. पण याबद्दलचे मानसशास्त्रीय अभ्यास काय सांगतात? सामाजिक मानसशास्त्रातील एका प्रसिद्ध प्रयोगाची तोंडओळख करून देणारा हा लेख
——————————————————————————–

ओळख
’dissent’ या इंग्रजी शब्दामध्ये फक्त वेगळे मत किंवा विचार एवढेच अपेक्षित नाही, तर ही मतभिन्नता सर्वसाधारण किंवा अधिकृत मतापेक्षा वेगळे मत असलेली आहे. हा ’वेगळा आवाज’ बहुमतापेक्षा वेगळा किंवा अल्पमतातील आवाज आहे. “To dissent is democracy” असे म्हटले जाते ते या संदर्भातच. बहुमतापेक्षा वेगळे मत असणे, ते मांडता येणे आणि ते मांडण्यासाठी जागा असणे म्हणजे लोकशाही जागृत असण्याचे लक्षण आहे.

पुढे वाचा

पुरस्कार: स्वीकार आणि नकार

अलीकडे चर्चेत राहिलेल्या साहित्यिकांच्या पुरस्कारवापसीच्या पार्श्वभूमीवर एका तरुण लेखकाचे विचारप्रवृत्त करणारे हे मनोगत. युवा साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारताना त्याने केलेल्या भाषणासह. मराठीतील या नव्या दमाच्या लेखकाचे हे विचारमंथन आपल्याला आश्वस्त करणारे आहे. ‘एकरेघ’ या लेखकाने चालवलेल्या ब्लॉगवरून साभार.
—————————————————————————–
कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांची हत्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात दादरी इथं गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून झालेली अखलाख या मुस्लीम व्यक्तीची हत्या, हे अगदी अलीकडचे प्रसंग. या व इतर काही प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी ‘साहित्य अकादमी’ या सरकारस्थापित स्वायत्त संस्थेचे पुरस्कार परत केल्यासंबंधीच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये येत आहेत.

पुढे वाचा

उजवा प्रतिक्रिया वाद की स्व-अस्तित्वाची लढाई?

मे २०१४ मधील सत्तांतरानंतर सार्वजनिक चर्चाविश्वात जोमाने सुरू झालेल्या सहिष्णुता-असहिष्णुता, पुरोगामी-प्रतिगामी या वादांच्या पार्श्वभूमीवर डाव्या ’लिबरल्स’चं परखड मूल्यमापन करणारा लेख.
——————————————————————————–
‘ब्रेक्झिट’नंतर त्यावर टीका करणार्‍या टीकाकारांची जगभर लाटच पसरली आहे. ही टीका करण्यामध्ये सर्व रंगांच्या ‘लिबरल्स’चा समावेश आहे. ‘लिबरल्स’ याला ‘उदारमतवादी’ असा मराठी प्रतिशब्द आहे, आणि तो मी जाणूनबुजून वापरत नाही. याचे कारण उदारमतवाद या शब्दातच विचारांचे औदार्य व दुसर्‍याचे विचार जाणून घेण्याची प्रवृत्ती अंगभूत आहे. परंतु आजच्या ‘लिबरल्स’ची स्थिती तशी नाही. त्यांनी स्वत:चे असे विचारविश्व तयार केले आहे व ते त्यांच्या दृष्टीने स्वयंघोषित सत्य असते.

पुढे वाचा

चौफुलीवर उभे राष्ट्र

हिंदुत्ववादी विचारसरणी आणि हिंदूराष्ट्रवाद या कायम चर्चेत राहिलेल्या विषयावर हा नव्याने टाकलेला प्रकाशझोत.
——————————————————————————–
‘हिंदू सांप्रदायिकता ही इतरांपेक्षा अधिक हानिकारक आहे कारण हिंदू सांप्रदायिकता सोयीस्करपणे भारतीय राष्ट्रवादाचे सोंग आणून सर्व विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांचा धिक्कार करू शकते.’(जयप्रकाश नारायण –अध्यक्षीय भापण, दुसरी सांप्रदायिकताविरोधी राष्ट्रीय परिषद, डिसेंबर 1968)

वैचारिक अभिसरण हे कोणत्याही समाज किवा राष्ट्रासाठी प्राणवायूसारखे असते. आजबर्‍याच वर्षांनंतर राष्ट्राच्या मूलतत्त्वांसंदर्भात वैचारिक अभिसरण होताना दिसते. पहिल्यांदा काँग्रेसपेक्षा भिन्न विचारसरणीचा पक्ष स्वबळावर संपूर्ण बहूमतासह केंद्रात सत्तेवर आहे. आज चौदा राज्यांमध्येभाजप स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या साहाय्याने सत्तेत आहे.

पुढे वाचा

राष्ट्रवादाच्या तीरावर

राष्ट्र, राष्ट्रवाद या संकल्पनांचा आणि त्यांच्या प्रासंगिकतेचा एका संवेदनशील मनाच्या लेखकाने आपल्या स्वतःच्या बुद्धी, अनुभव आणि आकलनाच्या कक्षेत घेतलेला शोध.
——————————————————————————–
हा एक जुना प्रसंग आहे. २००५-०६ मधला. मध्य प्रदेशात बडवानीमध्ये ’नर्मदा बचाओ आंदोलना’चं ऑफिस आहे. मी मेधाताईंना प्रथम पाहिलं ते या छोट्याशा ऑफिसमध्ये. माझ्या या पहिल्या भेटीच्या वेळी पुण्यातून माझ्याबरोबर असीम सरोदे आणि शिल्पा बल्लाळ हे दोघेजणही होते. त्या दिवशी बडवानीमध्ये एक मोठी सभा होती. पुष्कळ लोक होते. स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. डोक्यावरून लाल-हिरव्या रंगाचे पदर घेतलेल्या स्त्रिया घोळक्याने बसल्या होत्या.

पुढे वाचा

अनुभव- लाल सवाल

नक्षलवाद, विकास, हिंसा-अहिंसा
—————————————————————————-
छत्तीसगढमध्ये फिरताना तेथील आदिवासी जीवनाचे दाहक दर्शन लेखकाला झाले. ते जगणे आपल्यासमोर मांडताना हिंसा-अहिंसा, विकास-विस्थापन ह्यांविषयी आपल्या सुरक्षित मध्यमवर्गीय दृष्टीने पाहणे किती अपूर्ण व अन्यायकारी आहे ह्याचे भान जागविणारा व तत्त्वज्ञानाच्या व विचारधारांच्या प्रश्नावर होय- नाहीच्या मधला व्यापक पण अंधुक अवकाश दाखविणारा हा अनुभव.
—————————————————————————-
हा प्रदेश आपल्या ओळखीचा नाही. हे रस्ते, दोन्ही बाजूचं जंगल, मधूनच विरळ जंगलात जमिनीवरचं काही वेचणारे लोक, रस्त्यालगतची ही लाल ‘शहीद स्मारकं’, गस्त घालणारे जवान आणि इथल्या वातावरणात जाणवणारा ताण– हे सगळं आपल्याला नवीन आहे.

पुढे वाचा