विषय «संपादकीय»

संपादकीयांविषयी

आजचा सुधारकच्या नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ च्या अंकातील दोन्ही संपादकीयांविषयी काही प्रतिक्रिया येथे नोंदवू इच्छितो.
(१) डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या संदर्भातील संपादकीय
आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे याचा अर्थ धर्म स्वीकारणाच्या व्यक्ती संपादक वा सल्लागार राहू शकत नाहीत असा करणे अविवेकी आहे. अंतिमतः ईश्वराच्या एक ना एक स्वरूपाच्या अस्तित्वाच्या स्वीकारावर धर्माची उभारणी होते असे मानले तरी, निरपवादपणे असा स्वीकार ऐहिक जीवनात विवेकनिष्ठा नाकारण्यात परिणत होतो असे मला दिसत नाही. आधुनिक विज्ञानाच्या चौकटीत ईश्वराचे अस्तित्व नाकारणे बंधनकारक नाही. बौद्धिक तर्काच्या आधारे ईश्वराचे आस्तित्व सिद्ध करता येत नसले तर ईश्वर नावाची शक्ती नाहीच असेही ‘सिद्ध करता येत नाही.

पुढे वाचा

संपादकीय

डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांच्या धर्मान्तरामुळे श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आमचे वर्गणीदार न राहण्याचे ठरविले आणि त्यांनी तसे आम्हाला कळविले. त्या निमित्ताने लिहिलेल्या आमच्या संपादकीयामध्ये (नोव्हें.-डिसें.९२) आमची जी इहवादविषयक भूमिका व्यक्त झाली आहे तिच्याबद्दल अधिक खुलासा मागणारी वा मतभेद व्यक्त करणारी जी पत्रे आली त्यांपैकी डॉ. आ.ह. साळुखे व श्रीमती सुनीता देशपांडे ह्यांची वेगळी नोंद घेऊ. त्या पत्रांतील काही मुद्दे अन्तर्मुख करणारे आहेत.
डॉ. आ. ह. साळुखे ह्यांच्या पत्रातील मुद्द्यांबद्दल पहिल्याने लिहितो. ते म्हणतात “डॉ. कुळकर्णी ह्यांना राजीनामा देण्यास सुचविणे अनुचित होते, ह्याची जाणीव आपणास झाली आहे ही गोष्ट समाधानाची असली, तरी आधी तसे सुचविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे, हे आपले कर्तव्य ठरते.”

पुढे वाचा

संपादकीय

आजच्या संपादकीयाचे स्वरूप वेगळे आहे. श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी आमच्या सल्लागार मंडळाच्या एक सभासद डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या धर्मान्तराच्या निमित्तानेआम्हाला पाठविलेल्या पत्रामुळे काही खुलासा करण्यासाठी हे आम्ही लिहीत आहोत.
आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक सुरू झाल्याला लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील. ह्या अवधीत आम्हाला महाराष्ट्रातील विचारी वाचकांकडून पुष्कळच प्रोत्साहन मिळाले आहे. ह्या मासिकात कोणते विषय कसे मांडले जातात त्याकडे आमच्या वाचकांचे बारीक लक्ष असते.
ह्या मासिकाच्या संचालनासाठी दोन मंडळे नेमली आहेत. एक संपादक मंडळ व दुसरे सल्लागार मंडळ. संपादक मंडळाचे सभासद संपादकांना दैनंदिन कामात मदत करतात.

पुढे वाचा

संपादकीय २ – लोकसंख्यावाढ आणि कुळकर्णी सामितीचा अहवाल

महाराष्ट्र सरकारने लोकसंख्या व कुटुंबनियोजन कार्यक्रम यांच्या स्थितीची पाहणी करण्याकरिता नेमलेल्या कुळकर्णी समितीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. सरकारची आणि लोकांचीही झोप खाडकन उतरावी असे त्या अहवालाचे स्वरूप आहे. गेल्या २५-३० वर्षांत कुटुंबनियोजनाचा जो कार्यक्रम देशात चालू आहे त्याला लोकसंख्यावाढीला आळा घालण्याच्या कामात प्रचंड अपयश आले आहे हे त्यातून स्पष्ट होते. १९७१ ते १९८१ या दहा वर्षांत महाराष्ट्राची लोकसंख्या ५ कोटी ४ लाखांवरून ६ कोटी २८ लाखांवर आणि पुढील दहा वर्षात १९९१ साली ती जवळपास ८ कोटीवर गेल्याचे आढळून आले आहे.

पुढे वाचा

वाचक मेळावा

मुळात ‘ नवा सुधारक’ या नावाने सुरू झालेले आमचे हे मासिक किती दिवस चालेल याची खात्री नव्हती. ‘सर्वारम्भास्तण्डुलाः प्रस्थमूलाः’ हे खरे आहे. पण नुसती तांदुळाची सोय असली तरी अशी कार्ये शेवटाला जात नाहीत. लोकाश्रय नसेल तर सारे व्यर्थ. ह्या भीतीमुळे सुरुवातीला चालकांना ‘आजीव वर्गणीदार’ ही पद्धत जाहीर करायचादेखील संकोच वाटला ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘आजचा सुधारक’ दोन वर्षे चालला आणि तो वाढत आहे ही गोष्ट चालकांना समाधानाची वाटते. अधूनमधून वाचकांच्या पत्रांद्वारे आमच्या कामाबद्दल भल्याबुर्‍या प्रतिक्रिया मिळतात. पण त्याने पुरेसे प्रतिपोषण होत नाही.

पुढे वाचा

संपादकीय

आजचा सुधारकाचा हा तिसर्‍या वर्षाचा पहिला अंक. म्हणजे आजचा सुधारक आता दोन वर्षाचा झाला. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तो जन्मला तेव्हा तो किती काळ तग धरू शकेल अशी शंका आम्हाला होती. याचे कारण त्याला वाचकांचा प्रतिसाद कितपत मिळेल याविषयीची साशंकता हे जसे होते, तसेच वाचकांचे विचारप्रवर्तन करील आणि तरी त्यांनी स्वीकार्य वाटेल असे साहित्य आपण किती काळपर्यंत देऊ शकू याविषयीची अनिश्चितता हेही होते. त्या दोन्ही शंका बहुतांशी निराधार होत्या याचा पुरावा गेल्या दोन वर्षांत बर्‍याच मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. वर्गणीदारांची संख्या हळूहळू का होईना सतत वाढते आहे, आणि विचारप्रवर्तक साहित्य पुरविणारे लेखकही आम्हाला साह्य देत आहेत.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षता: काही प्रश्न

मार्च १९९१ च्या ‘आजचा सुधारक’च्या संपादकीयात जाहीर केल्याप्रमाणे त्यात उल्लेखिलेल्या दोन विषयापैकी धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) ह्या विषयावरील परिसंवादाची रुपरेषा दाखवणारी प्रश्नावली खाली देत आहोत. तिच्यावरुन विषयाच्या अपेक्षित व्याप्तीची कल्पना येइल. ही प्रश्नावली आमचे मित्र डॉ. भा. ल. भोळे व श्री. वसन्त पळशीकर यांनी ‘आजचा सुधारक’साठी तयार केली आहे. त्याचे आम्ही आभारी आहोत. पुढील अंकामध्ये ‘मार्क्सवादाचे भवितव्य’ ह्या विषयावरील परिसंवादाची अपेक्षित व्याप्ती दाखविणारी प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात येईल. ह्या विषयांवरील चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही काही विचारवंताना मुद्दाम आमंत्रित करीत आहोत. त्यांचे लेख वेळोवेळी प्रसिद्ध होतीलच.

पुढे वाचा

संपादकीय मागे वळून पाहताना

‘नवा सुधारका’चा पहिल्या वर्षाचा हा शेवटचा अंक. आज नवा ‘आजचा सुधारक’ एक वर्षाचा झाला. त्याची एक वर्षातील वाटचाल कशी झाली याकडे मागे वळून पाहणे उपयुक्त होईल असे वाटल्यावरून त्यांकडे टाकलेला हा दृष्टिक्षेप.

चोहोबाजूंनी होणाऱ्या अंधश्रद्धा, शब्दप्रामाण्य आणि बुवाबाजी यांच्या आक्रमणापुढे हतबल झालेल्या आपल्या समाजाला जागे करण्याकरिता, आणि त्याला योग्य मार्ग दाखविण्याकरिता आगरकरांनी सुरू केलेले कार्य त्यांच्या अकाली निधनाने अपुरेच राहिले. ते यथाशक्ति पुढे चालविण्याकरिता विवेकवादाचे कंकण बांधलेले हे मासिकपत्र आम्ही काढले आणि गेले सबंध वर्ष ते काम पार पाडण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

ह्या विशेषांकाविषयी

नवा सुधारकाचा हा वा.म. जोशी विशेषांक वाचकांच्या हाती देताना आमची मनोवस्था काही संमिश्र अशी झाली आहे. जुलै ९० च्या अंकात आम्ही हा अंक काढणार असल्याचे जाहीर केले तेव्हा विशेषांक प्रकाशित करणे किती दुरापास्त असते याची आम्हाला कल्पना होती. साहित्य वेळेवर मिळणे कठीण असते, हे एक तर खरेच; पण त्याचा आम्हाला फारसा प्रतिकूल अनुभव आला नाही. ज्यांनी लेख देण्याचे मान्य केले त्यांनी बहुतेकांनी वेळेवर लेख पाठविले. पण त्यात दुसरी एक अडचण आली. जुलै अंकात या संकल्पित अंकास कल्पना देताना आम्ही असे म्हणालो होतो की वा.

पुढे वाचा

‘नवा सुधारक’ चा प्रकाशन समारंभ

दि. ३ एप्रिल १९९० रोजी प्रा. म. गं. नातू द्वितीय स्मृतिदिनी विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे ‘नवा सुधारक’ चे प्रकाशन न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगाचा वृत्तांत आणि प्रा. राम शेवाळकर, डॉ. य. दि. फडके आणि न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या भाषणांतील महत्त्वाचे अंश खाली देत आहोत.

‘नवा सुधारक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन ३ एप्रिल १९९० रोजी विदर्भ साहित्य संघाच्या गडकरी सभागृहात समारंभपूर्वक पार पडले. ३ एप्रिल हा श्रीमती म. गं. नातू यांचा दुसरा स्मृतिदिन. प्रकाशनसमारंभ वि.सा.

पुढे वाचा