[शिवसेनेचे नेते आनंद दिघे ठाण्याजवळ एका अपघातात जखमी झाले. इस्पितळात उपाय योजना होत असतानाच ते वारले. ह्यात वैद्यांचा हलगर्जीपणा आहे असे मत बनवून शिवसैनिकांनी ते अद्ययावत खाजगी इस्पितळ नष्ट केले. ह्या घटनेबद्दल डॉक्टर जोशी लिहितात . . .]
वैद्यकक्षेत्रातील लोक व इतर विचारवंत यांनी शिवसैनिकांचा फक्त निषेध करणे पुरेसे नाही. सामाजिक विकृती व त्यांवरील उपाय शोधणे व ते अंमलात आणणे हा वैद्यकीय पेशांचा हेतूच असायला हवा.
काही वर्षांपूर्वी आजचा संतप्त भारतीय या मथळ्याच्या एका (मासिकातील) लेखात असे सुचवले होते की सामाजिक राग व असंतोषाचे नियमन करणाऱ्या पारंपारिक ‘सुरक्षा झडपा’ नष्ट होत असल्याने आजचे तणावपूर्ण जीवन हिंसाचाराच्या उद्रेकांपर्यंत जाऊन पोचते.