याच अंकात पत्रव्यवहार या सदरात श्री माधव रिसबूड यांचे मला आलेले पत्र छापले आहे. या पत्राचा सूर उघड उघड अनादराचा, अधिक्षेपाचाही आहे. माझी विचारसरणी साचेबंद आहे असा त्यांचा आरोप आहे. ते मला हटवादीही म्हणतात. त्यांच्या सप्टेंबर ९३ च्या पत्राला दिलेल्या उत्तरात मी जाणीव कल्पनेची थट्टा केली आहे, समर्पक उत्तर दिले नाही अशी त्यांची तक्रार आहे. असे जर आहे तर त्यांनी त्याच विषयावरील विचार पुन्हा माझ्यापुढे का मांडावेत? माझ्या साचेबंद हटवादी भूमिकेतून त्यांना हवे ते उत्तर मिळाल्याची आशा नसल्यामुळे या पत्राचे प्रयोजन काय असा प्रश्न मला पडला आहे.
Category «इतर»
परंपरा, आधुनिकता व राष्ट्रवाद (पूर्वार्ध)
आधुनिकतेचा विचार राष्ट्रवादाच्या संदर्भात केला नाही तर तो अपुरा आणि अधांतरी राहतो असे मला वाटते. म्हणून त्या दोहोंचा संबंध तपासण्याचा हेतू मनात धरून हा लेख लिहीत आहे.
मानवतेवर आधारलेला नीतिविचार आणि बुद्धिवाद ही दोन ‘‘आधुनिक’ म्हटली जाणारी मूल्य आहेत. प्र. ब. कुळकर्णीच्या शब्दांत (आ. सु. मार्च १९९७) “विवेकनिष्ठ मानवता हेआधुनिकतेचे बीज आहे.” “मानवता”म्हटले की राष्ट्रवाद बाद होतो. राष्ट्रवाद बाद होणे मला रुचणारे नाही. तेव्हा प्रथम राष्ट्रवादाची गरज मला का वाटते आणि त्याचे स्वरूप काय हे अत्यंत सक्षेपाने सांगून नंतर राष्ट्रवादाचा नीतिविचाराशी व बुद्धिवादाशी कोणत्या प्रकारचा संबंध असू शकतो याचा शोध मी घेणार आहे.
‘सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी’
उडत्या तबकड्यांमधून परग्रहांवरले जीव पृथ्वीवर येतात. इथल्या जीवजातींचे नमुने गोळा करून अभ्यासासाठी न्यायच्या हेतूने ही मोहीम असते. कुत्रे, झाडे वगैरेंना पकडून नेण्यात येते, तसेच माणसांनाही. पण त्या ‘परक्यांना इथल्या व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करायची नसते, म्हणून सर्व ‘नमुन्यांच्या तपासण्या झाल्यावर त्यांना परत स्वगृही पोचवले जाते. मांजरे, गुलाबाची रोपे वगैरेंना या प्रकारांचे स्मरण राहत नाही, व ते जीव आपल्या भाईबंदांना सावध करू शकत नाहीत. माणसांना मात्र स्मरण राहते व ती इतर माणसांना सजग करण्यासाठी अशा अनुभवांची वर्णन करतात. कधीकधी या घटनांचे स्मरण सहजपणे मनाच्या पृष्ठभागावर येत नाही.
वैज्ञानिक रीत
डॉ. हेमंत आडारकर यांच्या पत्राच्या (आ. सु., ८:२, ५९-६१) संदर्भात थोडे विवेचन.
आपल्या पत्रातील पहिल्याच परिच्छेदात डॉ. आडारकरांनी आम्ही आमच्या लेखात (आ. सु., ८:१, २४-२५) वर्णन केलेल्या भस्मधारी तथाकथित वैज्ञानकांच्या वर्णनाची पुष्टीच केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
विज्ञान हे गृहीतकांपासूनच सुरू होते हे खरेच. सर्वप्रथम कोणा एका वैज्ञानिकाच्या (अथवा सामान्यजनांच्याही!) तल्लख डोक्यात एखाद्या भन्नाट कल्पनेचा (idea) उगम होतो. त्यानंतर, ती व्यक्ती वैज्ञानिक असली तर, अशी कल्पना उपलब्ध ज्ञानावर तपासली जाते व ती अगदीच निराधार (म्हणजे पाण्यापासून पेट्रोल सारखी) नसेल तर ती कल्पना तपासून पाहण्यासाठी (test करण्यासाठी) प्रयोगांची आणखी केली जाते व त्यानुसार प्रयोग वारंवार (हे महत्त्वाचे) केले जातात.
वैज्ञानिक व आस्तिकता
वैज्ञानिक व आस्तिकता यांविषयी गेल्या तीन महिन्यात ‘आजचा सुधारक’मध्ये वेगवेगळी मते मांडण्यात आली. ह्याच चर्चेचा धागा पकडून काही माहिती देत आहे. अत्याधुनिक ज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या व सर्व प्रकारचे ऐहिक सुख भोगत असलेल्या अमेरिकन वैज्ञानिकांना ईश्वर व अमरत्व (life after death) यांविषयी काय वाटते याबद्दलची एक चाचणी नुकतीच घेण्यात आली. ३ एप्रिल १९९७ च्या ‘नेचर’च्या अंकात याविषयीचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. जॉर्जिया विद्यापीठाचे एड्वर्ड लार्सन व लॅरी विथम यांनी १९९६ मध्ये यथातथाच निवडलेल्या १००० वैज्ञानिकांची चाचणी घेण्यात आली. अशीच वैज्ञानिकांची चाचणी यापूर्वी १९१६ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व संशोधक जेम्स ल्यूबा यांनी घेतली होती.
फिरून एकदा स्त्रीमुक्ती
गेली कमीत कमी दहा वर्षे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या देशात चालू आहे. पण स्त्रीमुक्तीविषयी, किंवा असे म्हणू या की त्या विषयाच्या व्याप्तीविषयी, आपणा बहुतेकांच्या मनांत संदिग्धता आहे. आपल्या स्त्रीमुक्तिविषयीच्या कल्पना अद्याप धूसर किंवा अस्पष्ट आहेत. बहुतेक सर्वांच्याच कल्पनेची धाव स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांनी स्त्रियांना घरकामात मदत करून त्यांची ढोरमेहनत कमी करावी आणि त्यांना आजच्यापेक्षा जास्त मानाने वागवावे ह्यापलिकडे जात नाही. (वरच्या समजाला मदत म्हणून काही ज्येष्ठ समंजस स्त्रिया स्त्रीपुरुषसंबंधामध्ये पुरुष बेजबाबदारीने वागतात, पण त्यांची बरोबरी करावयाची म्हणून स्त्रियांनी पुरुषांसारखे बेजबाबदारीने वागू नये; आपले शील सांभाळावे असे सांगतात.)
चिं. मो. पंडितांच्या लेखाच्या निमित्ताने
(१)संगणक माझ्या मेंदूसारखा, बुद्धीसारखा आहे का?
काही बाबतीत तरी असावा. त्याला काही प्रकारची स्मरणशक्ती असते. ज्या गोष्टी तो ‘लक्षात ठेवतो त्यांना काही क्रमाने मांडणेही संगणकाला जमते. अशा क्रमांचे ढोबळ अर्थही तो लावू शकतो. उदाहरणार्थ, जर संगणकात वेगवेगळ्या माणसांची वये आणि वजने नोंदली, तर तोवयानुसार नोंदी करून प्रत्येक वयाच्या माणसांची सरासरी वजने काढू शकतो, ती क्रमाने मांडू शकतो, आणि वयानुसार (सरासरीने) वजन कसे बदलत जाते याचे गणिती समीकरणही शोधू शकतो – हे सारे मीही करू शकतो. मात्र –
मला वय हे मूळ’ व वजन हे त्यावर अवलंबून’ हे सुचते.
झोपडपट्टी संस्कृती : उत्तर प्रदेशची व तामिळनाडूची
दिल्लीमध्ये पावणेदोन लक्ष वस्तीची एक वसाहत स्थापलेली होती. त्यात भारतामधील सर्व राज्यांतील पोटापाण्यासाठी तेथे गेलेले लोक राहत होते. हे लोक मोलमजुरी करणारे, किंवा निश्चित स्वरूपाचे मासिक उत्पन्न असलेले असे नव्हते. त्यांचा एक सर्वसमावेशी गुण म्हणजे गरिबी. त्यातल्या प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून ५ यार्ड x ५ यार्ड असा जमिनीचा तुकडा मिळालेला होता. त्यावर घर बांधण्यासाठी दोन हजार रुपये कर्ज मिळालेले होते. ज्याचे त्याने आपल्या कुवतीने घर उभे करावयाचे होते. ह्या वसाहतीला वैद्यकीय सुविधा देणारे सात दवाखाने होते. अर्थात त्यांच्या कामाच्या वेळा मजूर वर्गाला सोयीच्या नव्हत्या.
मुलींबाबत पालकनीती
जग आता एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. या जगातील मानवी समाजाचे दोन वर्ग पुरुष आणि स्त्री. या दोन्ही वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजात त्यांचे स्थान, प्रतिष्ठा, त्यांना मिळणाच्या संधी यात समानता असावी, हे तत्त्व मान्य होत आहे. या दृष्टीनेच आतापर्यंत जो वर्ग कनिष्ठ, हीन म्हणून शोषित, मागासलेला राहिला त्या स्त्रीवर्गाला, मुलींना योग्य दर्जा मिळावा, माणुसकीची वागणूक मिळावी आणि कुटुंब, समाज, राष्ट्र उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग असावा या दृष्टीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कक्षावर बरीच जागृती करण्याचे प्रयत्न होत आहेत. १९७५ ते १९८५ हे महिला दशक साजरे झाले.
परंपरा, रूढी आणि आधुनिकता
परंपरा, रूढी आणि आधुनिकता या विषयावरील माझ्या भाषणाचा वृत्तांत आणि त्यावरील प्रा.प्र.ब.कुलकर्णी यांचे आक्षेप ‘आजचा सुधारक’च्या एप्रिल महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यापूर्वीच्या म्हणजे मार्च महिन्याच्या अंकात, त्याच परिसंवादातील प्रा.कुलकर्णी यांचे भाषण प्रसिद्ध झाले आहे. प्रा.कुलकर्णी यांच्या अनुग्रहामुळे हे दोन्ही अंक मी वाचू शकलो. मी प्रा.कुलकर्णी यांचा आभारी आहे.
मी हे प्रारंभीच मान्य करतो की, प्रा.कुलकर्णी यांच्यासारख्या विद्वान आणि विचक्षण श्रोत्याला मी माझे म्हणणे नीट समजावून सांगू शकलो नाही, हे माझ्याच प्रतिपादनाचे न्यून आहे. मी भाषण लिहून आणलेले नव्हते. पूर्वी झालेल्या माझ्या भाषणांचा परामर्श, परिपाटीप्रमाणे मी अध्यक्षीय भाषणात घेतला.