(१)संगणक माझ्या मेंदूसारखा, बुद्धीसारखा आहे का?
काही बाबतीत तरी असावा. त्याला काही प्रकारची स्मरणशक्ती असते. ज्या गोष्टी तो ‘लक्षात ठेवतो त्यांना काही क्रमाने मांडणेही संगणकाला जमते. अशा क्रमांचे ढोबळ अर्थही तो लावू शकतो. उदाहरणार्थ, जर संगणकात वेगवेगळ्या माणसांची वये आणि वजने नोंदली, तर तोवयानुसार नोंदी करून प्रत्येक वयाच्या माणसांची सरासरी वजने काढू शकतो, ती क्रमाने मांडू शकतो, आणि वयानुसार (सरासरीने) वजन कसे बदलत जाते याचे गणिती समीकरणही शोधू शकतो – हे सारे मीही करू शकतो. मात्र –
मला वय हे मूळ’ व वजन हे त्यावर अवलंबून’ हे सुचते.
विषय «इतर»
झोपडपट्टी संस्कृती : उत्तर प्रदेशची व तामिळनाडूची
दिल्लीमध्ये पावणेदोन लक्ष वस्तीची एक वसाहत स्थापलेली होती. त्यात भारतामधील सर्व राज्यांतील पोटापाण्यासाठी तेथे गेलेले लोक राहत होते. हे लोक मोलमजुरी करणारे, किंवा निश्चित स्वरूपाचे मासिक उत्पन्न असलेले असे नव्हते. त्यांचा एक सर्वसमावेशी गुण म्हणजे गरिबी. त्यातल्या प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून ५ यार्ड x ५ यार्ड असा जमिनीचा तुकडा मिळालेला होता. त्यावर घर बांधण्यासाठी दोन हजार रुपये कर्ज मिळालेले होते. ज्याचे त्याने आपल्या कुवतीने घर उभे करावयाचे होते. ह्या वसाहतीला वैद्यकीय सुविधा देणारे सात दवाखाने होते. अर्थात त्यांच्या कामाच्या वेळा मजूर वर्गाला सोयीच्या नव्हत्या.
मुलींबाबत पालकनीती
जग आता एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. या जगातील मानवी समाजाचे दोन वर्ग पुरुष आणि स्त्री. या दोन्ही वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजात त्यांचे स्थान, प्रतिष्ठा, त्यांना मिळणाच्या संधी यात समानता असावी, हे तत्त्व मान्य होत आहे. या दृष्टीनेच आतापर्यंत जो वर्ग कनिष्ठ, हीन म्हणून शोषित, मागासलेला राहिला त्या स्त्रीवर्गाला, मुलींना योग्य दर्जा मिळावा, माणुसकीची वागणूक मिळावी आणि कुटुंब, समाज, राष्ट्र उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग असावा या दृष्टीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कक्षावर बरीच जागृती करण्याचे प्रयत्न होत आहेत. १९७५ ते १९८५ हे महिला दशक साजरे झाले.
परंपरा, रूढी आणि आधुनिकता
परंपरा, रूढी आणि आधुनिकता या विषयावरील माझ्या भाषणाचा वृत्तांत आणि त्यावरील प्रा.प्र.ब.कुलकर्णी यांचे आक्षेप ‘आजचा सुधारक’च्या एप्रिल महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यापूर्वीच्या म्हणजे मार्च महिन्याच्या अंकात, त्याच परिसंवादातील प्रा.कुलकर्णी यांचे भाषण प्रसिद्ध झाले आहे. प्रा.कुलकर्णी यांच्या अनुग्रहामुळे हे दोन्ही अंक मी वाचू शकलो. मी प्रा.कुलकर्णी यांचा आभारी आहे.
मी हे प्रारंभीच मान्य करतो की, प्रा.कुलकर्णी यांच्यासारख्या विद्वान आणि विचक्षण श्रोत्याला मी माझे म्हणणे नीट समजावून सांगू शकलो नाही, हे माझ्याच प्रतिपादनाचे न्यून आहे. मी भाषण लिहून आणलेले नव्हते. पूर्वी झालेल्या माझ्या भाषणांचा परामर्श, परिपाटीप्रमाणे मी अध्यक्षीय भाषणात घेतला.
लोकेश शेवडे यांच्या पत्राला उत्तर
आजच्या सुधारकातील हुसेन साहेबांच्या चित्राविषयीच्या लेखासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करणारे लोकेश शेवडे यांचे पत्र एप्रिल १९९७ च्या अंकात प्रसिद्ध झालेले आहे. पत्रातील आमच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे लेखनशैली. स्वभावाने आम्ही उद्दाम किंवा बेरड नसून खिलाडी वृत्तीने टीकाकाराचेही महत्त्व मान्य करण्याची आमची वृत्ती आहे. प्रा. के. रा. जोशी यांनीआमच्या विचारांसंबंधी वेळोवेळी उपहास केला आहे. त्यांचा तो अधिकारही मान्य आहे. आमची मते अंतिम सत्य आहेत असा आमचा आग्रह नाही. के. रा. जोशी म्हणतात त्याप्रमाणे भड़क भाषाशैली, बेदरकार विवेचन यासाठी वापरले जाते की परंपरावादी थोडे हलतील.
मी आस्तिक का आहे?
मी आस्तिक आहे का नास्तिक आहे, याबद्दल निश्चितपणे काही सांगायला मी कचरतो. माझी हिंमत होत नाही. तरीपण, पुढील कारणांस्तव मी मला स्वतःला ‘आस्तिक’ म्हणणेच योग्य ठरेल.
‘मी आहे’ म्हणजे, माझा देह आहे व ह्या देहात ‘देह नसलेली’ एक शक्ती आहे, म्हणजेच देहात आत्मा आहे.
देह ही जड वस्तू आहे. आत्म्याशिवाय देह ही जड वस्तू नाश पावते. Matter is indestructible हा नियम मान्य करूनच ‘नाश’ हा शब्द मी वापरला आहे.
आत्मा ही चेतक शक्ती आहे. पण ती शक्ती स्वतंत्रपणे दिसत नाही. भासत नाही.
मी नास्तिक का आहे
या प्रश्नाचे उत्तर ‘मी आस्तिक नाही म्हणून’ या चार शब्दांत देणे शक्य आहे हा विचार बाजूला सारला तरी मी जन्मतःच नास्तिक नव्हतो. कोणतीही व्यक्ती तिला थोडेफार कळायला लागल्यावर तिच्या अवतीभवतीच्या वातावरणानुसार, उदा. घरातील संस्कार, शाळेतील शिक्षण, ती व्यक्ती वावरत असलेल्या समाजाचा सर्वसाधारण विचार, इत्यादि कारणांमुळे आस्तिक किंवा नास्तिक बनत असते. संपादकांनी सुचविलेला विषय फक्त ईश्वराचे अस्तित्व किंवा नास्तित्व या संबंधात आहे असे मी समजतो. लहानपणी घरी दारी देव, देव. शाळेतील पाठ्यपुस्तकातही देव,देव.
(१) पाहूं जातां एक देव, तेणें निर्मीयले सर्व
पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे, सर्व त्याचींच लेकुरें।
अन्नपाणी तोचि देतो, प्रेमें सर्वा सांभाळीतो
चित्तीं धरी जो हे बोल, त्याचे कल्याण होईल।।
(२) कारे नाठवीसी कृपाळू देवासी
पोषितो जगासी एकलाची
(३) देवाजीने करुणा केली.
आस्तिकता आणि विज्ञान
याच अंकात पत्रव्यवहारात वरील विषयावर तीन पत्रे आली आहेत. पत्रलेखकांपैकी एक तर चक्क वैज्ञानिक आहेत असे ते स्वतःचसांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला विशेष महत्त्व असणार!
डॉ. हेमंत आडारकर हे ते पत्रलेखक. विज्ञानक्षेत्रातील संशोधनाचा दहा वर्षांचा अनुभव . त्यांच्या गाठीशी आहे. टाटा मूलभूत संशोधनसंस्थेत त्यांनी दहा वर्षे भौतिकीत संशोधन केले आहे. तेव्हा बघू या ते काय म्हणतात ते.
ते म्हणतात ‘आस्तिकता आणि विज्ञान परस्परविरोधी गोष्टी आहेत असे गृहीत धरणे बरोबर नाही. उलट ‘वैज्ञानिक आणि आस्तिकता यांचा घनिष्ठ संबंध आहे. या मताच्या पुष्ट्यर्थ ते काय पुरावा देतात?ते
कलमी मानव (Human Clones)
पृथ्वीवरील जीवसृष्टीत तरी प्रजोत्पादनाचे अजून दोनच प्रमुख प्रकार ज्ञात आहेत. काही निम्नस्तरीय जीव वगळता, बहुसंख्य प्राण्यांचे लैंगिक प्रजनन, तसेच वनस्पतींतील लैंगिक आणि अलैंगिक (कलमी) प्रजनन हे ते प्रकार होत. सस्तन प्राण्यांसारख्या सर्वच उत्क्रांत जीवांमध्ये केवळ लैंगिक पद्धतीनेच प्रजोत्पादन शक्य आहे. परंतु अशा लैंगिक प्रजोत्पादनात पुढील पिढी आधीच्यापिढीच्या दोन जीवांच्या मिश्र गुणधर्माचीच असते. त्यामुळे अल्फान्सो (हापूस) आंब्याचे अथवा एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण गुलाबाचे शतप्रतिशत गुण असणारे नवे झाड उत्पन्न करणे जसे सुलभ होते तसे सस्तन प्राण्यांच्या बाबतीत आतापर्यंत अशक्यच होते. परंतु एखाद्या प्राण्याची शतप्रतिशत प्रत (copy) तयार करण्याचे स्वप्न मात्र आधुनिक जीवशास्त्रज्ञ फार पूर्वीपासूनच पाहत होते.
पुदुकोट्टाई – एक अनुभव
पुदुकोट्टाई हा एक तामिळनाडू राज्यातील जिल्हा. हा भारताच्या अगदी आग्नेयेला, बंगालच्या उपसागराला लागून आहे. अत्यंत मागासलेला जिल्हा. गरिबी, निरक्षरता अगदी भारतीय परिमाणानेही भरपूर. सामाजिक व आर्थिक विकासाला पूर्ण पारखा! अशा या जिल्ह्यात १९९० नंतर प्रौढ साक्षरतेसाठी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.
प्रौढ साक्षरतेचा कार्यक्रम भारताच्या अंदाजे ४७० जिल्ह्यांत १९९० च्या सुमारास सुरू केला गेला. त्या अन्वये वेगवेगळ्या जिल्ह्यांनी प्रौढ म्हणून वेगवेगळे वयोगट कार्यक्रमाखाली घेतले. कोणी ९ ते ३५ वयोगट, कोणी १५ ते ३५ वयोगट, तर पुदुकोट्टाईमध्ये ९ ते ४५ वयोगट साक्षर करण्यासाठी निवडला.