विषय «इतर»

राष्ट्रवादाच्या उठावाची माहितीपूर्ण चिकित्सा

जगाच्या नव्या रचनेत राष्ट्रवादाचे स्थान काय राहील, हा प्रश्न सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना वारंवार पडतो. विशेषतः दुसऱ्यार महायुद्धानंतर ही चर्चा सुरू झालीआणि इतिहासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यानंतर या चर्चेने जोर धरलेला दिसून येतो. सुरुवातीला दळणवळणक्रांती आणि आर्थिक-सांस्कृतिक सहकार्य यामुळे राष्ट्रीय ।।। अस्मिता पुसट होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ‘बहुराष्ट्रीय भांडवलशाहीमुळे राष्ट्रवादाचा अस्त होईल, असे काहींना वाटत होते, तर दुसऱ्या- बाजूला मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने ही प्रक्रिया लवकर घडून येईल, असे बरेच जण मानत होते. प्रत्यक्षात । काय घडते आहे? विविध देशांमधील परिस्थितीचा अभ्यास करणार्या- तज्ज्ञांचे निबंध संकलित करून डेव्हिड हुसॉन यांनी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे वाचा

लैंगिक मुक्ती आणि स्वैराचार

स्त्रियांची लैंगिक मुक्ती व स्वैराचार यातला फरक भारतीय व आशियामधल्या (बहुतेक) स्त्रीपुरुषांना समजणे कठीण जाते याचा प्रत्यय परत श्री गलांडे यांच्या (नोव्हें. ९५) पत्रातून आला. म्हणून परत लैंगिक मुक्ती व स्वैराचार ह्यांच्या (माझ्या) व्याख्या लिहिते.
लैंगिक स्वातंत्र्य अथवा मुक्ती असणे म्हणजे शरीरसंबंधास हो किंवा नाही म्हणण्याची संपूर्ण समाजमान्य मुक्तता.
स्वैराचार म्हणजे असंख्य मित्रमैत्रिणींशी अल्प परिचयात शरीरसंबंध, मजा म्हणून one night stand व वेश्यागमन.
स्त्रियांची अत्यंत हानी त्यांच्या लैंगिक पावित्र्याला अवास्तव दिलेल्या महत्त्वामुळे झालेली आहे. म्हणून मला स्त्रियांची लैंगिक मुक्ती हवी आहे.

पुढे वाचा

समाजसुधारणा, पुनर्घटना आणि डॉ. केतकर

अमेरिकेस गेल्यानंतर आपण काय करावे याचे मनापुढे कोणतेच कल्पनाचित्र नव्हते’ असे म्हणणारे केतकर, तेथील विद्यार्जन आटोपताच,
जाई देशी, कार्यलागे स्वजनांच्या कल्याणा
असे कृतनिश्चय होऊन परतले होते. अमेरिका आणि इंग्लंडमधील वास्तव्यातज्ञानकोशाचा उपयोग त्यांनी पाहिला होता. तयार ज्ञान तत्काळ हाताशी असणे याचा फायदा इंग्रजी सुशिक्षितांस सहज मिळत होता. तसा ज्ञानकोश मराठीच असावा असे त्यांना वाटू लागले. एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका वरील अमेरिकन समाजाचे काही आक्षेप त्यांना पटले होते; त्यामुळे ज्ञानकोशात सर्व ज्ञानाचा संग्रह व्हायचा असला तरी तो संग्रह ज्ञानकोश ज्या समाजासाठी असेल त्याच्या गरजांप्रमाणे ठेवला पाहिजे असे त्यांनी ठरविले.

पुढे वाचा

एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या जगात पुरुषाचे स्थान

जीवशास्त्र व आनुवंशिकताविज्ञानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा अभ्यास केला तर असे जाणवते की एकविसाव्या शतकाच्या मध्यावर एखाद्या जोडप्याला मूल हवे असेल तर मुलगीच पाहिजे असा आग्रह धरला जाईल. कुठलाही सुज्ञ मनुष्य मुलगा हवा अशी इच्छा करणार नाही. सबल पुरुष व अबला स्त्री ही संकल्पना कालबाह्य होईल. वैद्यकशास्त्राप्रमाणे जन्माला आलेला मुलगा गर्भावस्थेतूनच काही ना काही आनुवंशिक रोगांची शिकार झालेला असतो. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे मुलींमध्ये मुलांपेक्षा जरूरीपेक्षा जादा आढळणारे एक्स हे गुणसूत्र असावे. मुलामध्ये एखादे बिघडलेले गुणसूत्र असेल तर ती चूक निस्तरण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही.

पुढे वाचा

सर्व हितांची रक्षक लोकशाही

जिची मासिस्ट मंडळी केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणून हेटाळणी करतात ती – म्हणजे लोकशाही – वस्तुतः सर्व हितांचा आधार आहे. हे केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणजे जनतेचा आपल्या शासनकर्त्यांची परीक्षा करून त्यांना अधिकारावरून दूर करण्याचा हक्क. राजकीय शक्तींच्या दुरुपयोगापासून आपले रक्षण करण्याचा तो एकमेव ज्ञात उपाय आहे. ते शासितांकडून शास्त्यांचे नियंत्रण आहे.आणि राजकीय शक्ती आर्थिक शक्तींचे नियंत्रण करू शकत असल्यामुळे, राजकीय लोकशाही ही आर्थिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचाही एकमेव उपाय आहे. लोकशाही नियंत्रण जर नसेल तर शासनसंस्थेने आपली राजकीय आणि आर्थिक शक्ती नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाहून अतिशय भिन्न अशा हेतूंकरिता का वापरू नये याचे कसलेही कारण राहणार नाही.’

पुढे वाचा

आगरकर-वाङ्मयातील एक कूटस्थळ

आगरकरांचे लेखन म्हणजे प्रसादगुणाचा नमुना. त्यात ओजही अर्थात् भरपूर आहे, परंतु त्याचे त्यांच्या प्रसादगुणावर आक्रमण होत नाही. त्यांना काय म्हणायचे आहे याविषयी वाचकांची बुद्धि द्विधा होईल असे स्थळ शोधूनही सापडायचे नाही, इतके त्यांचे लेखन पारदर्शक आणि सुबोध आहे. त्यांची विवेचनपद्धतीही अशीच सुसंगत आणि तर्कशुद्ध. ज्याचे पूर्वग्रह फार पक्के नाहीत अशा कोणालाही सामान्यपणे पटेल अशीच ती असते. पण त्यांच्या वाङ्मयात एक स्थळ असे आहे की ते वरील दोन्ही नियमांना अपवाद आहे. हे स्थळ म्हणजे ‘देवतोत्पत्तीविषयी शेवटचे चार शब्द या लेखाचा शेवट. (आगरकर वाङ्मय, संपादक नातू देशपांडे, खंड २, पृष्ठे २०६—७).

पुढे वाचा

ज्ञानप्रसारक डॉ. केतकर

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांना आपण ज्ञानकोशकार म्हणतो. ते स्वतःही हे बिरुद मोठ्या आवडीने मिरवीत. पण केतकरांनी केवळ ज्ञानसंग्रह केला नाही. ज्ञानाचा विस्तार केला. प्रसार केला. तरी त्यांना ज्ञानकोशकार ही पदवी भूषणास्पद आहेच. कारण त्यांच्या आधी मराठीत कोणीही हा गड सर करू शकले नव्हते. हे काम त्यांनी ज्या अवधीत पूर्ण केले तो एकै विक्रम आहे. राजाश्रय नसताना कल्पकतेने लोकाश्रय मिळवून त्यांनी हा वाङ्मयव्यवहार तडीस नेला. अशी तडफ त्यांच्याआधी कोणी दाखविली नव्हती आणि नंतरही दाखविली नाही. बारा वर्षांत ज्ञानकोश हातावेगळा केला. तो आता शेवटास जाणार हे दिसू । लागताच कादंबरीलेखनास त्यांनी हात घातला.

पुढे वाचा

अंतर्ज्ञान : एक अहवाल

काही व्यक्तींना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते, तिच्या योगाने त्यांना अतींद्रिय मार्गाने ज्ञान मिळू शकते अशी अनेक लोकांची पक्की धारणा असते. या समजुतीत कितीतथ्य आहे याबद्दल एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. (त्याचा गोषवारा ११ डिसेंबर १९९५ च्या टाइम या नियतकालिकात आला आहे). या विषयामध्ये संशोधन करून त्याविषयी शहानिशा करण्यासाठी अमेरिकेमध्ये एक प्रकल्प राबविला. अमेरिकेजवळ द्रव्याची विपुलता आहे तेव्हा या संशोधनासाठी द्रव्याचा अपुरेपणा त्यांना जाणवत नाही. अतींद्रिय सामर्थ्याद्वारे दूरच्या घटनांविषयी ज्ञान होऊ शकते याचा छडा लावण्यासाठी १९७२ ते १९७७ या काळामध्ये ७.५ लक्ष डॉलर्स खर्च झाले.

पुढे वाचा

लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

स्त्रियांची लैंगिक मुक्ती व स्वैराचार यातला फरक भारतीयांना व आशियामधल्या बहुतेक स्त्रीपुरुषांना समजणे कठीण जाते याचा प्रत्यय परत श्री गलांडे यांच्या (नोव्हें. ९५) पत्रातून आला. म्हणून परत लैंगिक मुक्ती व स्वैराचार ह्यांच्या (माझ्या) व्याख्या लिहिते.
लैंगिक स्वातंत्र्य अथवा मुक्ती असणे म्हणजे शरीरसंबंधास हो किंवा नाही म्हणण्याची संपूर्ण समाजमान्य मुक्तता.
स्वैराचार म्हणजे असंख्य मित्रमैत्रिणींशी अल्पपरिचयात शरीरसंबंध, मजा म्हणून one night stand व वेश्यागमन.
स्त्रियांची अत्यंत हानी त्यांच्या लैंगिक पावित्र्याला अवास्तव दिलेल्या महत्त्वामुळे झालेली आहे. म्हणून मला स्त्रियांची लैंगिक मुक्ती हवी आहे.
भारतात स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य किंवा मुक्ती असती तर एका धोब्याच्या वक्तव्यामुळे श्रीरामांनी सीतामाईचा त्याग केला नसता, द्रौपदीला भोगदासी करण्याची दुर्योधनाला हिंमत झाली नसती, सोळासहस्र नारींशी लग्न करण्याची श्रीकृष्णाला जरूरी पडली नसती, (बलात्कार झाले असते पण त्यामुळे बायका अपवित्र मानल्या गेल्या नसत्या.)

पुढे वाचा

मिथ्ये आणि वास्तव

(१) ज्ञानदेव – ‘म्हैशा मुखीं वेद बोलविले’
जगातील पुराणकथातील, संतचरित्रातील कथानायकांच्या जीवनात अलौकिक वाटणाच्या घटनांची रेलचेल असते. मानवी स्वरूपातील व्यक्ती अतिमानवी स्वरूपात प्रक्षेपित केल्या जातात. काही कथानायक निसर्गशक्तींच्या मानवीकरणातून (athropomorphism) जन्माला आले असतात. त्यांच्या जीवनातील अलौकिकत्व नैसर्गिक शक्तीचे कार्य म्हणून स्पष्ट करता येते. जसे ‘अग्नी हा देवांचा पुरोहित आहे असे ज्यावेळी सांगितले जाते त्यावेळी अग्नीतून निर्माण होणारा धूर यज्ञात अर्पण केलेल्या आहुतींना इष्ट देवतेकडे नेतो असा त्यातून बोध होतो. ऐतिहासिक व्यक्तीदेखील अतिमानवी स्वरूपाच्या अचाट कृत्यांच्या वलयात गुरफटून टाकल्या जातात. त्यांच्या चरित्रांतही मिथ्या भासणाच्या अनेक घटना गुंफल्या असतात.

पुढे वाचा