माझे परम मित्र प्रा. कुळकर्णी यांचा पुनर्जन्मासंबंधी शोध घेणारा एक प्रश्नांकित लेख वाचला. (आजचा सुधारक, ऑगस्ट १९९५) प्रा. व. वि. अकोलकरांनी कधी काळी पुनर्जन्मासंबंधी त्यांना अनुकूल असे जे चूक निष्कर्ष काढलेत त्या लेखाचे वाचन करून त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. त्यांच्या अश्रद्ध अशा भूमिकेला या लेखाने हादरा बसला. एखाद्या मृत व्यक्तीचा आत्मा दुसऱ्यां देहाचा आश्रय घेऊ शकतो हे प्रा. कुळकर्णीना मान्य झाले असावे. अन्यथा त्यांनी प्रा. अकोलकरांशी प्रतिवाद केला असता.
शारदा नावाच्या बंगाली युवतीचा आत्मा बंगालमधून शेकडो मैल अंतर कापून शंभर वर्षानंतर, बंगाल नागपूर दरम्यान असणारी लक्षावधी शरीरे नाकारून फक्त उत्तरा नावाच्या नागपुरातील एका युवतीच्या देहाचा आश्रय घेऊनच अवतीर्ण झालेला असतो अशी ही नाट्यमय घटना, प्रा.
विषय «इतर»
रूढ आचारविचारांचा चिकटपणा
पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही ही गोष्ट कोपर्निकस व गॅलिलिओ यांनी जगाच्या नजरेस आणून दिल्यास पक्की सव्वादोनशे वर्षे होऊन गेली, तरी आमच्या मते सूर्य व चंद्र एका दर्जाचे ग्रह असून ते पृथ्वीभोवती घिरट्या घालीत आहेत, आमच्या पंचांगांत प्रत्येक पानावर चमकणारे, पण अर्वाचीन ज्योतिषज्ञास मोठमोठ्या दूरदर्शक यंत्रांच्या साह्यानेही अद्याप न गवसलेले राहू व केतू द्विजांस विकल करीत आहेत, शनी वगैरे दूरस्थ ग्रहांचे आमच्याशी अर्थाअर्थी संबंध नसून त्यांची साडेसाती आम्हांस अद्यापि छळीत आहे, सारांश सार्याे ग्रहमालेपुढे आमची पृथ्वी बोराएवढी असूनही आम्ही तिला एका दृष्टीने सर्व ग्रंहांची स्वामिनी आणि दुसन्या दृष्टीने सवौची बटीक करून सोडीत आहो!
मानवी मनोव्यापार
जीवसृष्टीत मानवजात सर्वाधिक बुद्धिमान असून त्यामुळे मानवाने पृथ्वीतलावर अतिशय प्रगत अशी संस्कृती निर्माण केली आहे, आणि केवळ पृथ्वीच्या पाठीवरीलच नव्हे तर अनंत अपार विश्वातील सर्व शक्तींवर नियंत्रण ठेवण्याची मानवाची धडपड सातत्याने चालूच आहे. मानवाला हे यश लाभले आहे ते सर्वस्वी त्याच्या बुद्धिमत्तेमुळे, त्याच्या मानसिक कर्तृत्वामुळे.
माणसाचे मन हृदयात असते या ॲरिस्टॉटलच्या कल्पनेप्रमाणेच मनाचे अधिप्ठान डोक्यात आहे यावर प्लेटोचा ठाम विश्वास होता. सतराव्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ डेस्क। यास माणसाचे मन डोक्यात असते हे पटले होते; परंतु हे मन कोणत्याही भौतिक अवयवाशी संबंधित नसून, मन ही एक अमूर्त शक्ती आहे असे त्याचे मत होते.
वेताळकथाः २ पळा, पळा, कोण पुढे पळे तो!
राजा पुन्हा वेताळाला खांद्यावर घेऊन वाट चालू लागला. वेताळ म्हणाला, “राजा, विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणक्रम निवडताना स्वत;चा कल, स्वतःची क्षमता, यांच्याकडे लक्ष न देता ‘चलती कशाची आहे, हेच फक्त पाहिले तर त्यातून उद्भवणाच्या प्रश्नांचे एक टोकाचे उदाहरण मी तुला दाखवले. धन्य तुझी, की तू त्या कथेला दलित-ललित न समजता किंवा आयायट्यांवर केलेली टीका न मानता छान ‘सिनिकल दुर्लक्ष केलेस! पण आज मी तुला एक वेगळी कहाणी ऐकवणार आहे. मी तुला एकच प्रश्न विचारणार आहे. पण तो अनेक उत्तरांमधून एक निवडण्याचा, म्हणजे ‘मल्टिपल चॉईस प्रश्न आहे, ऐक.”
गुणवत्ता व आर्थिक मदत/दंड
शिक्षणासाठी आर्थिक मदत करताना शासनाने (किंवा शासनाच्या आदेशाने इतरसंस्थांनी) विद्याथ्र्यांची आर्थिक स्थिती हा निकष मानावा की त्याची गुणवत्ता हा निकष मानावा याची चर्चा या लेखात केली आहे.
सध्या वैद्यकीय किवा अन्य व्यावसायिक शिक्षणासाठी दोन प्रकारच्या शिक्षणसंस्थांत प्रवेश दिला जातो. पैकी अनुदानित शिक्षणसंस्थांना शासनाकडून अनुदान मिळाल्याने तेथील विद्याथ्र्यांना (यापुढील आकडे उदाहरणादाखल वैद्यकीय शिक्षणाचे आहेत) प्रतिवर्षी ४ ते ६ हजार रुपये फीमध्ये शिक्षण मिळते. शासनाकडून मिळणारे अनुदान प्रतिवर्षी अंदाजे रु. ५४,०००/- प्रत्येक विद्याथ्र्यामागे असते. गुणवत्ता व राखीव जागा यानुसार या सर्व जागा भरल्या जातात.
इतर
आम्ही आग्न्याचा किल्ला बघायला गेलो, वाटाड्याने आम्हाला सुंदर बागबगीचे, महाल, कलाकुसर दाखविली. पण ह्या बाह्य देखाव्याने माझे समाधान झाले नाही. मला तिथली तळघरे पाहायची होती. पण तिथला रक्षक ते दाखवेना. तेव्हा मी त्याला पैसे देऊन तळघरांत प्रवेश मिळविला. राजाच्या मर्जीतून उतरलेल्या स्त्रियांना तेथे कोंडून ठेवून त्यांचा छळ केला जात असे. आम्ही त्या अंधाच्या कोठड्या पाहिल्या. माझ्या मनात आले, ह्या तुरुंगाच्या भिंती बोलू लागल्या तर किती क्रौर्याच्या करुण कहाण्या कानावर येतील! लोक इथल्या कलाकुसरीच्या, सौंदर्याच्या आठवणी घेऊन जातात. मला त्यापेक्षा तिथल्याअंधारकोठड्याच आठवत राहिल्या!
खरं, पुनर्जन्म आहे?
आपण नसावं असं कोणालाच वाटत नाही. पण वाटून काय उपयोग? जन्माला आला तो जाणार हे ध्रुवसत्य आहे. तसे मृताला पुन्हा जन्म आहे का? तेही ध्रुवसत्य आहे काय? । सश्रद्ध भावनावादी म्हणतो, ‘हो, आहे. कारण पुनर्जन्म पूर्वजन्म मानला नाही तर कशाची संगती लागत नाही. जीवनाला आधार मिळत नाही. ‘मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले, तयासारिखें भोगणें प्राप्त झालें.’ या विचाराने दुःख सहन करायला धीर मिळतो. ‘सदाचार तो थोर सांडूं नये तो का बरे,तर त्यामुळे मनाचे समाधान करता येते, या जन्मी फळ न का मिळेना’.
खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ७)
उद्याचे जग आजच्यापेक्षा जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे अधिक सुखी असावे असे विधान मी केले तर माझ्याशी कोणी विवाद करणार नाही. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांवर आज अधिक बन्धने आहेत. आणि त्यांची स्वायत्तता आज कमी आहे हे माझे विधानही बहुधा विरोधाशिवाय स्वीकारले जाईल. इतकेच नाही तर पूर्वीच्या मानाने ती बंधने आता कमी होत चालली असून स्त्रीची शारीरिक आणि आर्थिक शक्ती वाढावी ह्यासाठी समाजामध्ये ज्यूडोकराटेचे वर्ग कसे सुरू केले गेले आहेत आणि तिला नोकर्यांवमध्ये कसे सामावून घेतले जात आहे, अनुकंपेच्या आधारावर विधवांना आज नोकर्याक कश्या मिळत आहेत ते मला सविस्तरपणे समजावून दिले जाईल.
चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?
सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे.
मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर यांना क्रान्तदर्शनाची दिव्य अंतर्दृष्टी (clairvoyance) त्यांच्या पौर्वात्य गुरूंकडून प्राप्त झाली होती. ह्या दिव्य अंतर्दृष्टीमुळे सूक्ष्मात सूक्ष्म अणूदेखील मोठ्या आकारात ते आपल्या अंतर्मनात पाहू शकत असत. पातंजल योगसूत्रांत ‘अणिमा’ नामक ह्या सिद्धीची प्रक्रिया सांगितली आहे.
अन्तर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही
टॉप क्वार्कचा शोध लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या ९ एप्रिल ९५च्या अंकात आणि त्याच्या आधारे प्रा. काशीकरांचा लेख आजच्या सुधारकच्या प्रस्तुत अंकात प्रसिद्ध झाला आहे. अॅनी बेझंट आणि लेडबीटर यांनी भौतिक आणि रसायनशास्त्रातील विशेषेकरून अणुसंरचनेविषयी काही संकल्पना अंतर्दृष्टीने प्राप्त करून पूर्वीच प्रतिपादन केल्या होत्या. यावरून अंतर्दृष्टीने ज्ञान मिळू शकते असे मत ध्वनित करण्यात येत आहे. परंतु हा समज नवा नाही. विश्लेषण, संश्लेषण, विवेक, तर्क आणि प्रत्यक्ष पुरावा याभक्कम पायावर आधारलेल्या विज्ञानाने दिलेली आव्हाने पारंपारिक धर्मकल्पनांना पेलताआली नाहीत. याची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान धोकादायी आहे अशी कल्पना गेल्या शतकात : रूढ झाली.