विषय «इतर»

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ९)

उद्गमन (२)

गेल्या लेखांकात आपण उद्गमनाची समस्या समजावून घेतली. ती समस्या अशी आहे की निसर्गाचे ज्ञान मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे उद्गमन. परंतु ही क्रिया अवैध असल्यामुळे तिचे निष्कर्ष कधीही पूर्णपणे सिद्ध झाले असे म्हणता येत नाही. ते कमीअधिक प्रमाणात संभाव्य असू शकतात, पण पूर्णपणे निश्चित असू शकत नाहीत. म्हणून मग उद्गामी अनुमाने त्यातल्या त्यात विश्वासार्ह कशी होतील असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर या लेखांकात द्यावयाचे आहे.
निसर्गातील प्रक्रम (Order in Nature)
निसर्गाची वाटचाल नियमबद्ध आहे, आणि प्रत्येक घटना कोणत्या तरी नियमानुसार घडते असे वैज्ञानिक मानतो.

पुढे वाचा

अकुतोथय गीता साने – १

वाशीमला भटगल्ली संपते तिथे थोडीशी मोकळी जागा आहे. हा टिळक चौक. त्या चौकात आजूबाजूच्या जुनेर घरांच्या मानाने एक नवी नेटकी इमारत ताठ उभी होती. तिला साने वकिलांचा वाडा म्हणत. पण आम्ही पाहिला तेव्हा तिथे रामभाऊची खाणावळ असे. मधू कायन्देबरोबर मी तिथेअधेमधे गेलो आहे. या वास्तूत थोड्याच वर्षामागे अग्नीसारखी तेजस्वी माणसे वसतीला असत याची आम्हाला तेव्हा बिलकूल कल्पना नव्हती. वाशीम साने वकीलांना विसरत चालले होते ?
एकोणपन्नास-पन्नास सालच्या या गोष्टी. साने वकिलांच्या मृत्यूनंतर दोन-तीन वर्षांतल्या. वाड्याचे मालक भाऊसाहेब साने ज्वलंत देशभक्त आणि कृतिशूर सुधारक.

पुढे वाचा

इतर

‘मला कोणी शत्रू नाही ही तुझी बढाई आहे ना !
माझ्या मित्रा ! तुझी ही प्रौढी व्यर्थ आहे..
शूराला साजेशा पद्धतीने जीवनाच्या संघर्षात जे उडी घेतात
त्यांना अनेक शत्रू निर्माण होतातच
तुला जर कुणी शत्रूच नसेल तर….
त्याचा अर्थ एवढाच की तुझ्या हातून
काही घडलेलेच नाही.
कोणाही विश्वासघातक्याच्या पेकाटात
तू लाथ घातली नाहीस.
दुष्टाच्या तावडीतील शिकार तू सोडवून आणली नाहीस.
कोणत्याही अन्यायाचा मुकाबला करण्यास तू धजावलाच नाहीस.
खरं सांगू ? तूं एक भ्याड आहेस भ्याड !

जातीय दंगली आणि त्यामागील विचारप्रणाली

१८९३ साली मुंबईत पहिली जातीय दंगल झाली. म्हणजे एका अर्थी यावर्षी आपण जातीय दंगलींचा शतकोत्सव साजरा करीत आहोत. गेल्या शंभर वर्षांत अशा जातीय दंगलींचा उद्रेक अधून मधून सतत होत आला आहे व त्या दंगलींतून माणसातील पशुत्वाचे दर्शनही भरपूर झाले आहे. प्राणहानी व वित्तहानी किती झाली याचे तपशीलवार आकडे या दंगलींच्या अहवालातून उपलब्ध आहेत. अशा दंगलींमुळे राष्ट्राची एकता धोक्यात येते, त्याच्या प्रगतीला खीळ बसते, हे मान्य असूनही आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातून अशा दंगलीना कायमचे निपटून काढण्यात आपण अपेशी ठरलो आहोत. उलट बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर उफाळलेल्या दंगलीत परस्पर-विद्वेषाचा व हिंसाचाराचा एक नवाच उच्चांक गाठला गेला.

पुढे वाचा

वृत्त आणि विवेक

एन्.टी. रामाराव यांचे लग्न ही मोठीच खबर आहे. राष्ट्रीय आघाडी आणि तेलगू देसम् या राजकीय पक्षांचे अध्यक्ष, आंध्राचे माजी मुख्यमंत्री असे हे बडे प्रस्थ आणि मुख्य म्हणजे त्यांचे (जवळपास ‘अवघे पाऊणशे वयमानं’. असे असताना त्यांनी ३६ वर्षाच्या घटस्फोटिता लक्ष्मी शिवपार्वती या आपल्या चरित्र – लेखिकेशी दुसरे लग्न केले आहे. सदान्कदा भगवे कपडे परिधान करून स्वामी विवेकानंदांची मधून मधून आठवण द्यायला ते विसरत नसत. या प्रौढा- वृद्धविवाहाने त्यांची प्रतिमा आणि निवडणुकीच्या मोसमात मते खेचण्याचे सामर्थ्य यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याची त्यांना जाणीव नसेल असे कोण म्हणेल ?

पुढे वाचा

नागपूरपासून दूर – मागे, मागे

सध्याची पंचायत समिती, ‘राष्ट्रीय विस्तार योजना’ या दुर्बोध नावाने जन्माला आली. चारपाच वर्षांत तिचेच ‘सामूहिक विकास योजना’ असे नामांतर झाले. आणि तिला सध्याचे नामरूप येऊनही आता तीस वर्षे उलटली आहेत. या विकास योजनेत मी उमेदीची सहासात वर्षे घालवलेली. मधूनच जुने सोबती भेटतात. कुणी मोठ्या पदापर्यंत पोचलेले असतात. असेच एकदा जोशी भेटले. मी उत्सुकतेने विचारले, ‘खेड्यांचे चित्र आता पार पालटले असेल नाही ?’ माझा आशावाद पाहून म्हणाले, ‘मेड इन इंडिया वाचली का ? आपल्या अकोल्याच्या पुरुषोत्तम बोरकरची ती कादंबरी वाचा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.’

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक यांस स.न.वि.वि. आपल्या मासिकाच्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात श्री. शांतिलाल मुथ्था ह्यांचा ‘समाजातील मुलींची घटती संख्या: कारणमीमांसा व उपाययोजना’ ह्या शीर्षकाचा लेख व त्यावरील श्री. दिवाकर मोहनी ह्यांचे भाष्य वाचावयास मिळाले. श्री. मुथ्था ह्यांची चिंता सार्थ आहे व त्यांनी केलेली कारणमीमांसा व सुचविलेली उपाययोजनाही बुद्धीला पटणारी आहे. पण श्री. मोहनींनी ह्या संदर्भात व्यक्त केलेले विचार मात्र तर्कसंगत वाटले नाहीत.

मूळ प्रश्नाचा विचार करणे व त्यावर उपाय कोणते करावेत ह्याचा शोध घेणे सोडून, श्री. मोहनी ‘पुरुषांकडून स्त्रियांची होणारी छेडखानी’ ह्या विषयाकडे वळले आहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक, यांना स.न. वि मुस्लिम समाजाचे मन वळवण्यासाठी म. गांधींनी अनुसरलेला मार्गच आजही आवश्यक आहे अशी श्री. पळशीकरांची श्रद्धा आहे. ऑगस्ट १९९३ अंक, पृष्ठ १३७ वर त्यांनी काहीशा डौलाने प्रश्न विचारला आहे की, “सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळवण्याचे कोणते प्रयत्न झाले, त्या प्रयत्नांना अपयश का आले, व अपयशाची जबाबदारी सर्वस्वी मुस्लिम समाजावर कशी ?” या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी देत नाही, पण एक अवतरण देतो. नोव्हेंबर – डिसेंबर १९९२ अंक, पृष्ठ २६९, शेवटचा परिच्छेद यात श्री.

पुढे वाचा

श्रुति-प्रामाण्य

श्रुति-प्रामाण्य
आपले पूर्वज अशा काही ऋषिमुनींनी जीव आणि जगताच्या बाबतीत–’हे कसे ? हेच सत्य, हीच चरमवाणी’ असे लिहून ठेवले आहे. यांना तुम्ही वाटल्यास वेद उपनिषद म्हणा, अथवा तपश्चर्येने समजून घेतलेल्या गोष्टी म्हणा किंवा देवांनीच हे सर्व कानात सांगितले असे म्हणा; मला मात्र एक संशय आहे. हे विश्व, ही चराचर सृष्टी यांच्याबाबतीत अल्पस्वरूप वाचनाने मी काही ज्ञान मिळविले आहे. जीवनाने या यात्रेला केव्हा आरंभ केला, ही जीवनयात्रा कुठे चालली आहे, प्रवासाला आरंभ केल्यावर बऱ्याच काळपर्यंत वाटेतील स्टेशनावर गाडीत चढणाऱ्या उतारूप्रमाणे माणूस नावाचा प्राणी आत प्रवेश करून काही वेळ बसून उतरूनही जातो, पण जीवनाचा प्रवास तर अजून पुढेच जात असतो.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ७)

निगामी व्यवस्था (Deductive Systems)

इ.स. पूर्वी चौथ्या शतकात यूक्लिड या ग्रीक गणितज्ञाने भूमितीची मांडणी निगामी व्यवस्थेच्या रूपात केल्यापासून शास्त्रीय ज्ञानाच्या जगतात निगामी व्यवस्था हा ज्ञानाचा आदर्श मानला गेला आहे आणि तेव्हापासून तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक दोघांचीही आपल्या विषयाची मांडणी निगामी व्यवस्थेत करण्याची धडपड सुरू आहे. Deduction किंवा निगमन म्हणजे काय हे आपण स्थूलरूपाने पाहिले आहे. निगामी अनुमान म्हणजे असे अनुमान की ज्याची साधके (म्हणजे साधक विधाने किंवा premises) सत्य असल्यास त्याचा निष्कर्प असत्य असू शकत नाही. निगमन हा सत्यतासंरक्षक अनुमानप्रकार आहे; म्हणजे त्यात साधकांची सत्यता निष्कर्षापर्यंत सुरक्षितपणे पोचविली जाते.

पुढे वाचा