विषय «इतर»

गरज मायेच्या ओलाव्याची

गरज मायेच्या ओलाव्याची
“बायको मागेच गेली. मुलं अमेरिकेत आहेत, मला बरं नाही असं कळलं, की लगेच पैसे पाठवतात नि लिहितात, की प्रकृतीची काळजी घ्या.’ … “मुलं लहान आहेत. त्यांना कसं कळणार, की मायेच्या ओलाव्याची गरज आहे, तिथे पैशांच्या उबेचा काय उपयोग?”
“खरं! म्हणजे तुमच्या उपेक्षेला सुरुवात होते, तेव्हाच तुम्ही ओळखायला हवं, की आता जगाच्या दृष्टीने तुमचा उपयोग संपला. मग तुम्ही त्या खेळातूनच नव्हे, तर मैदानातूनही बाहेर पडायला हवं. हे शहाणपण आदिवासी आणि रानटी टोळ्यांनासुद्धा असतं. उत्तर ध्रुवाजवळच्या एस्किमो लोकांत काय करतात माहीत आहे ?

पुढे वाचा

कोणता भारत ‘चक दे’?

जयदीप साहनी हे सध्या चर्चेत असलेल्या ‘चक दे’ या चित्रपटाचे पटकथाकार आणि गीतकार. ह्याआधी ‘कंपनी’ आणि ‘खोसला का घोसला’ हे लोकप्रिय आणि समीक्षकांनी वाखाणलेले चित्रपटही साहनींच्या लेखणीतून उतरले आहेत. ‘चक दे’साठी अभ्यास करायला आपण शोधनिबंध लिहीत आहोत असे सांगत साहनींनी हॉकीचा खेळ आणि त्याचे खेळाडू यांचा कानोसा घेतला. निरीक्षण इतके नेमके ठरले की लॉस एंजलिसला एक बाई येऊन साहनींना भेटली. म्हणाली, “तुम्हाला माझी कहाणी कोणी सांगितली ? आम्ही वसतिगृहात काय बोलत होतो हे तुम्हाला कसं कळलं?’ ती होती ओरिलिया मॅस्करेनस, गोव्याची अर्जुन पुरस्कार विजेती हॉकीपटू !

पुढे वाचा

सुधारकाचा एक मित्र हरवला

आजचा सुधारक १९९० साली निघाला तेव्हा त्याचे जे वर्गणीदार झाले ते सगळे सुधारकी बाण्याचे होते असे नाही. काहींना मित्रत्वाच्या भावनेतून आम्ही तो घ्यायला लावला. हरिभाऊ त्यांतले एक. लौकरच ते आजीव वर्गणीदार झाले. आसु त माझे लेखन वाचून ते चेष्टा करत, वाः तुमचे शुद्धलेखन छान आहे! पुढे १७ वर्षांनी ‘शब्द-प्रभा’चे संपादक
ह्या नात्याने मात्र त्यांनी हातचे राखून न ठेवता मुक्तकंठाने जी दाद दिली ते त्यांचे शेवटचेच लेखन ठरले. गेल्या ऑगस्टच्या २५ तारखेला ते गेलेच.
हरिभाऊ प्रा. ह.चं.घोंगे सुधारकाचे हितचिंतक अन् हुकमी लेखक होते.

पुढे वाचा

साला माझ्या जीवनाचे तात्त्विक अधिष्ठान

मला पाच मिनिटांत माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगावयाचे आहे. तत्त्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्त्वज्ञान असाच समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरविणे आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो याचे कारण या तत्त्वांच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे त्याला आकलन होते. आणि जेव्हा आपण चुकलो आहोत असे त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्त्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल. माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी निश्चित केलेले आहे.

पुढे वाचा

हृदयरोग हटविता येतो

डॉ. डीन ऑर्निश हे अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आहेत. ते काही वर्षांपूर्वी ‘प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन रिसर्च इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष व कॅलिफोर्निया विद्यापीठात क्लिनिकल प्रोफेसर ऑफ मेडिसीन या पदावर कार्यरत होते. श्री बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना डॉ. ऑर्निश त्यांना आहार, पोषक तत्त्वे, जीवनपद्धती ह्यांबद्दल सल्ला देत असत. त्यांच्या जीवनातील काही अनुभवांची ओळख करून देण्याचे योजले आहे.
डीन ऑर्निश हे विद्यार्थी असताना त्यांना मेडिकल स्कूलमध्ये प्रवेश हवा होता. त्यावेळी असा समज होता की जो विद्यार्थी ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील विविध द्रव्यांचे गुणधर्म व त्यांच्या रासायनिक क्रिया नीट लक्षात ठेवू शकत असेल तोच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यास पात्र आहे.

पुढे वाचा

राष्ट्रपतिपदाची तिरकी चाल: बाबूजी ते बीबीजी! (भाग-२)

सप्टेंबरच्या अंकापासून सुरू झालेला हा अहवाल तीन भागांत तीन वैशिष्ट्यांवर भर देणारा आहे. ‘वाकडी वाट’, ‘बाबूजी’ व ‘बीबीजी’ हे त्यांतले ३ कोन आहेत. मागील लेखांकांत ‘बाबूजी’ व ‘इंडिया टुडे’ने शीर्षस्थ मानलेले दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपती अर्थात् ‘डॉ. स. राधाकृष्ण यांच्याबद्दल विस्ताराने लिहिले.
आता या दुसऱ्या भागात ‘वेडी’, ‘वाकडी’, ‘तिरकी’ वाटचाल कशी याचा ऊहापोह करू. त्याचबरोबर १२ वे व १३ वे (व्या) राष्ट्रपतींचा विचार पुढच्या लेखांकासाठी राखून चवथ्याच (व्यक्तिशः पांचव्या) चालीमध्ये वाकुडपणा कसा आला ते बघू.
तत्पूर्वी आणखी एका सूक्ष्म तिरपिटीकडे पाहणे आवश्यक आहे.

पुढे वाचा

पुस्तक परामर्श -वस्ती

वस्ती या पुस्तकात वसंत मून यांनी नागपूरच्या बर्डी या मध्यवर्ती भागातील बौद्ध धर्मांतराच्या पूर्वीच्या महार लोकांचे जीवन चितारले आहे. हा काळ इ.स. १९३० ते १९५६ दरम्यानचा आहे. पूर्वीच्या महार लोकांची जीवनपद्धती, त्यांचे नागपंचमीसारखे सण, त्यांची सामाजिक एकी, हिंदू धर्माने त्यांच्यावर लादलेल्या अस्पृश्यतेच्या अन्यायाची चीड, त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती व सदैव सतावणारी भूक, नातलगांचे कधी-आहे, कधी-नाही असे सहकार्य आणि ह्या साऱ्यांवर मात करणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघर्ष करा व एक व्हा’ हा गुरुमंत्र आणि त्याप्रमाणे वागून शिक्षणाद्वारे ह्या दलदलीतून सुटका हे सारे वसंत मून यांच्या वस्तीत वाचावयास मिळते.

पुढे वाचा

पत्रचर्चा

प्रदीप पाटील, चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली, (फोन ९८९०८०४४९८)
ऑगस्ट २००७, अंकातील टी.बी.खिलारे यांची प्रतिक्रिया वाचली. जॉन हॉरगन यांच्या लेखाच्या आधारे त्यांनी असे म्हटले आहे की ईश्वरीय-धार्मिक अनुभवांविषयीचे सिद्धान्त चुकीचे व अस्थायी आहेत. मी तो मूळचा लेख “The God Experiment’ वाचला. त्या लेखात जॉन हॉरगन यांनी पाच जणांचे संशोधन दिले आहे. त्यांची चिकित्सा करता ते वैज्ञानिकदृष्ट्या चूक ठरत नाहीत. कारण जॉन हॉरगन हे बी.ए. (इंग्लिश) असून ते विज्ञान पत्रकार आहेत. त्यांनी पाचही जणांच्या संशोधनात कुठे व कशी चूक आहे हे नमूद करावयास हवे होते.

पुढे वाचा

भारतीय स्त्रीजीवन

भारतीय स्त्रीजीवन
एकोणिसाव्या शतकाच्या प्रबोधनाच्या उलाढालींमध्ये स्त्रियांचे प्रश्न केंद्रस्थानी होते. राम मोहन राय, विद्यासागर, अक्षयकुमार दत्त, केशवचंद्र सेन अशा अनेक धुरंधर व्यक्तींनी स्त्रियांना कौटुंबिक दडपणातून बाहेर काढून सुशिक्षित व सुरक्षित करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजामध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी स्वतःच्या घरातही स्त्रीशिक्षणाचे प्रयोग केले. याशिवाय देवेंद्रनाथ टागोरांच्या घराण्यात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच घरातल्या स्त्रियांना इंग्रजी, बांगला धर्मग्रंथ वगैरे वाचायला-लिहायला शिकवण्यासाठी परदेशी शिक्षिका व वैष्णवी नेमल्या जात असत. तसेच देवेंद्रनाथ कर्मठ विचारांचे होते व घरातल्या मुलीबाळींना शिक्षणासाठी घराबाहेर पाठविणे त्यांना मंजूर नव्हते.

पुढे वाचा

गड्या, तू बोलत का नाही ?

प्रिय वाचक,
सुधारक कोणासाठी आहे असा प्रश्न मला मधून-मधून पडतो, कधी तो वाचकही विचारतात. स्वेच्छेने, काही एका अपेक्षेने जे वर्गणीदार झाले त्यातलेही कोणी हा अवघड प्रश्न विचारतात. काही भले वाचक, आपणच वाचक म्हणून कमी पडतो अशी समजूत घालून घेतात. पण हा प्रश्न गंभीरतेने घेण्यासारखा आहे. ग्राहकाचा कधीच दोष नसतो असे म्हणतात. त्या चालीवर वाचकांचा उगीच रोष नसतो असे मानायची माझी तयारी आहे. म्हणून वाचकाचे म्हणणे ऐकायला मी उत्सुक असतो. कोणत्याही वाययीन उपक्रमाला प्रतिपोषण (षशशव लरलज्ञ) हे आवश्यकच आहे. म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत की, वाचकहो, बोला!

पुढे वाचा