स्त्रियांवरील अत्याचार
“गोध्यातील मदतछावणीतील एका बलात्कारितेची कहाणी एक वारंवार घडलेला घटनाक्रम नोंदते. तिचे मूल तिच्यासमोर मारले गेले, तिला मारहाण केली, जाळले व मृत समजून सोडून दिले. कुठेकुठे वैविध्यासाठी अॅसिड टाकले गेले.” “प्रांताभरातील लैंगिक हिंसेच्या घटनांची संख्या तर अचंबित करणारी आहेच, पण मुख्यमंत्री, मंत्री, गुजरातेतील अधिकारी व सर्वात वाईट म्हणजे भारत सरकारचे मंत्री यांनी ज्या थातुर-मातुर आणि उपेक्षागर्भ (trivial and dismissive) त-हेने हे हाताळले, त्याने अचंबित होणे दुणावते.”
“जॉर्ज फर्नाडिस लोकसभेत म्हणाले (30 एप्रिल 2002), ‘गुजरातेतील हिंसेत काही नवीन नाही … गर्भार बाईचे पोट फाडणे, आईच्या पुढ्यात मुलीवर बलात्कार करणे, हे नवीन नाही.’