विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

राजीव जोशींनी दोन कात्रणे व एक पत्र पाठवले आहे. मुद्दे महत्त्वाचे आहेत, पण एक कात्रण व पत्र इंग्रजीत आहेत. सारांशच देत आहोत.]
क)(लोकसत्ता, ३१ ऑगस्ट २००६, हज यात्रेचे अनुदान: आता लक्ष मुंबईतील याचिकेकडे, या बातमीवरून.) मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली एक जनहितयाचिका सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपांनी धार्मिक कार्यांसाठी दिली जाणारी सरकारी मदत थांबवू पाहते. या याचिकेतील मागण्यांचा तपशील बातमीत आहे.
ख) (टाईम्स ऑफ इंडिया, ३१ ऑगस्ट २००६, युअर ब्रेन डझन्ट हॅव अ गॉड स्पॉट, या लेखावरून)
एक नवा अभ्यास दाखवतो की गूढवादी व धार्मिक अनुभवांसाठी मेंदूत एक ‘देव-स्थान’ नसते.

पुढे वाचा

पत्रसंवाद/चर्चात्मक लेख

व्यावसायिक शेती [जयंत वैद्य यांनी दहा गुंठे प्रयोग व अशोक बंगांचे प्रतिमान यापेक्षा वेगळे एक प्रतिमान तपशिलात सुचविले आहे. या प्रतिमानाचे वैशिष्ट्य असे की ते सुट्या शेतकऱ्याऐवजी संपूर्ण खेड्याचा विचार करते. वैद्यांनी शेतीसोबत करावयाच्या इतर अनेक गोष्टींचे तपशीलवार विश्लेषण करून आकडेवारी प्रस्थापित केली आहे. आम्ही मात्र या पत्र-लेखात केवळ शेवटची गोषवारा देणारी आकडेवारी देत आहोत. तपशील हवा असणाऱ्यांनी वैद्यांशी थेट संपर्क साधावा, ही विनंती. सं.]
एखादी वस्तू खरेदी करणे व ती कमी जास्त भावात विकणे याला व्यापार म्हणतात. एखाद्या वस्तूचा उत्पादनखर्च कमीत कमी ठेवत, दर्जेदार व सुबक वस्तू तयार करून त्या वाजवी भावाने विकणे याला व्यवसाय म्हणतात.

पुढे वाचा

पत्रसंवाद

‘आर्यांचे निसर्गगीत’
वाहोत हे झुळूझुळू मधु मंद वात
राहो वहात जल गोडचि या नद्यांत
देवोत दुग्ध मधु गोऽऽडचि नित्य गाई, रात्रि-प्रभातही असो,
मधु सौख्यकारी वर्तात गोड जन पार्थिव ते आम्हास
वृष्टीमुळे नभ करो, जग रक्षणास
झाडातुनि मधुरचि रस पाझरोत आरोग्यदायक असो रविची ही ज्योत
वरील निसर्गगीत ऋग्वेदातल्या ऋचा/सूक्ताचा अनुवाद आहे. आर्य (भारतार्य) निरीश्वरवादी होते आणि निसर्गोपासक.
माझ्या सनातनी कुटुंबातून आलेल्या आईने (स्मृतिरूप लीला मोडक यांनी) आमच्या प्रार्थनासमाजी पार्श्वभूमीला सुसंगत म्हणून ही ईश्वररहित ‘प्रार्थना’ आम्हा दोन भावंडांसाठी परवचांबरोबर म्हणण्यासाठी मिळविली होती व आम्हाला गोड चालीवर म्हणायला शिकवली होती.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आजचा सुधारक चा अंक आला. “दि.य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका’ हा जोगिन्दर कौर महाजन यांचा लेख अप्रतिम आहे. तो लेख मी दोनदा वाचला आणि मला नानांची भूमिका बढेशाने समजली. शुभंकरणाचे तत्त्व यावर लिहिताना त्यांनी, प्रा. दि.य. देशपांडे यांनी कांटचे मत आणि उपयोगितावादी मत यांची सांगड घालण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचे स्वरूप माझ्यासारख्या सामान्य वाचकाला समजेल अशा रीतीने स्पष्ट केले आहे. श्रीमती महाजन यांना माझे मनःपूर्वक धन्यवाद.
जॉन स्टुअर्ट मिलच्या Utlitarianism चे प्रा. दि.य. देशपांडे यांनी केलेले भाषांतर याच अंकात प्रसिद्ध करण्यात मोठेच औचित्य साधले आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आपल्या फेब्रुवारी ०६ च्या अंकातील श्री दिवाकर मोहनी यांचा लेख वाचला. आपल्या देशात बेरोजगार हमीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचा तसेच इंग्रजी राजवट येण्यापूर्वी तो प्रश्न नसल्याचाही उल्लेख त्यात आहे. हा विषय गेली शतक दीड शतक बराच चर्चिला गेलेला आहे. अर्थात लोकशाहीत आपली मते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हे सर्वमान्य आहेच.
मी आजच्या रोजगार हमीची प्रशंसा करणे अत्यंत कठीण समजते. परंतु इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी आमच्याकडे रोजगाराचा प्रश्न अजिबात नव्हता, कोणी बेरोजगार नव्हतेच, त्या वेळी पैशाला महत्त्व नव्हते वगैरे उल्लेख मोहनींच्या लेखात आहेत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

डिसें. २००५ (अंक १६.९) मध्ये प्रा. कुमदिनी दांडेकरांची प्रतिक्रिया महत्त्वाची वाटली. माझ्या लेखनाचा पहिलाच खर्डी मला पाठवावा लागला. इतर सर्व व्याप, जबाबदाऱ्या सांभाळून दिलेल्या वेळात लेख देताना मलाही असमाधान वाटत होते. विशेषतः माझ्या लेखातील स्त्री-अभ्यासाच्या ज्ञानशाखेने स्त्रियांच्या साहित्याकडे कसे पाहिले हे जे लिहिले आहे त्याचे विभावरीच्या लेखनाशी नेमके काय नाते हे स्पष्ट करायला हवे होते. माझी धडपड अशी होती की एकीकडे ‘विभावरी’च्या लेखनाला त्या काळात मिळालेले महत्त्व समजावून घ्यावे आणि दुसरीकडे एकूणच महाराष्ट्रातील मराठी समाजाने १९५० नंतर ज्या प्रकारे एकूणच साहित्याचे क्षेत्र, विषय मर्यादित केले त्याकडे लक्ष वेधून स्त्रियांच्या लेखनाचाही कोंडवाडा का झाला ह्या प्रश्नाला तोंड फोडावे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

मी एक सामान्य वाचक आहे. साहित्याशी माझा दूरान्वयानेही संबंध नाही. परंतु माझी पंधरा वर्षांनी मोठी असलेली बहीण एक ऑक्टोबर २००५ ला शंभर वर्षांची झाली असती त्यानिमित्ताने आजचा सुधारक ने एक विशेषांक काढला, कारण एके काळची ती सुप्रसिद्ध लेखिका होती. हा अंक वाचण्याची मला उत्सुकता होती.बाळुताईंची शंभरी! आज तिच्या साहित्याच्या क्षेत्रात (समाजशास्त्रात नव्हे) काय बदल झाले असतील हे जाणून घेण्याची इच्छा होती. सुदैवाने तीन उच्चशिक्षित मराठीच्या प्राध्यापिकांनी लेख लिहायचे कबूल केल्याचे ऐकले आणि माझी उत्सुकता वाढली. या तीनही प्राध्यापिकांचे लेख मी वाचले.

पुढे वाचा

पत्रसंवाद

पा.क्र.१५३ तिसरी ओळ ‘म्हणजे गणित समजणे’ ऐवजी ‘त्याचप्रमाणे ५ आणि ३ मिळून ८ होतात हे समजणे म्हणजे गणित समजणे’ असे हवे. ही ओळ छापण्यात आली नाही असे दिसते. चुका माझ्याकडून झाल्या असण्याची शक्यता मी नाकारू शकत नाही. चुकीचे छापून आलेले दुरुस्त न करणे हे अयोग्य आहे असे मला नवीन आलेल्या अनुभवावरून प्रकर्षाने जाणवू लागले म्हणून
ह्या पत्राचे प्रयोजन.
प्रश्न हा उद्भवतो की मी ह्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीसंबंधी पत्र लिहायला इतका उशीर का केला ? ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजात गणिताविषयी असलेली एकूणच उदासीनता.

पुढे वाचा

पत्रसंवाद

समाजवाद जिन्दाबाद “लाँग लिव्ह सोशलिझम” या मथळ्याखाली खांदेवाले यांनी माझ्या ‘समाजवादी स्मृति’च्या घेतलेल्या परामर्शावर वर्गयुद्ध : भांडवलदार मजुरांचे शोषण करतो हे दाखविण्यासाठी खांदेवाले यांनी औद्योगिक क्रान्तीच्या सुरुवातीला कारखान्यातील मजुरांचे जीवन कसे यातनामय होते याचे नेहमी करण्यात येणारे वर्णन पुनरुक्त केले आहे. पण अशा पुनरुक्तीने “भांडवलदार मजुरापासून काय हिरावून घेतो?’ या माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. “कारखान्यातील मजुरांचे कष्टमय जीवन हे भांडवलदाराने त्यांचे केलेले शोषण होय.” असे म्हणताना कारखानदाराने दुसरीकडे सुखाचे जीवन जगणाऱ्या कामगारांना पकडून आणून त्यांना यातनात लोटले असे दाखवून द्यावे लागेल.

पुढे वाचा

पत्रसंवाद

कुमुदिनी दांडेकर यांच्या महानगराची वाढ = झोपडपट्टीची वाढ ह्या लेखात त्यांनी मुंबई आणि ग्रामीण भागातील गरिबांच्या परिस्थितीची तुलना मांडली आहे. पाणी, वीज, संडास या भौतिक सोयी नगरांमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत अगोदर आणि जास्त प्रमाणात मिळतात हे त्यावरून दिसते. भारतामधील गरिबी कमी होण्याच्या वेगातही अशीच नागरी आणि ग्रामीण भागात तफावत आढळते आहे. १९८७ ते २००० या काळात भातामधील गरिबी कशा प्रमाणात कमी होत आहे ते पुढील (पान ३०१ वरील) तक्त्यावरून दिसेल. नागरीकरणाचे प्रमाण जास्त असणाऱ्या राज्यांत गरिबीचे प्रमाण कमी असलेले दिसते.

पुढे वाचा