एखादा देश आपल्या नद्यांशी कसा वागतो, विशेषतः अश्या देशात जिथे नद्यांना माता म्हणून पूजले जाते, ह्यावरून त्या देशाच्या धोरणकर्त्यांचे पर्यावरणीय भान किती खोल आहे, हे लक्षात येते. आपल्या धोरणकर्त्यांना मोहवणारी एक कल्पना म्हणजे ‘नदी जोड प्रकल्प’, ऐकायला फार सोपी आणि शहाणपणाची वाटते. जिथे पाणी जास्त आहे त्या नदीखोऱ्यातून कृत्रिम कालव्यांनी ते जिथे कमी आहे तिथे वळवा; पुराने हैराण करणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात न्या; निसर्गाने केलेली ‘चूक’ मानवी अभियांत्रिकीच्या वापराने सुधारा, असे दिवास्वप्न ही कल्पना दाखवते आणि आपण सहज ह्या सापळ्यात फसतो.
Category «राजकारण»
भारतीय शहरे: शाश्वततेच्या मार्गातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अडथळ्यांचे मूर्त रूप
निसर्गसंवर्धन आणि सामाजिक सलोखा टिकविण्याच्या विरुद्ध दिशेने ऐतिहासिक बदल आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे:
स्वार्थकारण साध्य करण्याच्या हेतूने प्रेरित कायद्यांची आणि धोरणांची अनिर्बंध घडण आणि अंमलबजावणी:
बोकाळलेल्या शहरीकरणाच्या संदर्भातील तोकडे आकलन:
शहर नियोजनामागील निराधार आणि उथळ तत्त्वे आणि अपारदर्शक अंमलबजावणी:
शहरांबाबत निर्णयप्रक्रिया राबविणार्यांची नीती आणि नागरिकांची वागणूक ह्यात मूलभूत बदलांची आवश्यकता:
भारतातील शाश्वत विकासाबाबत विचार करताना आपोआपच हा प्रश्न पुढे येतो की भारतीय शहरांच्या शाश्वत विकासाचे काय?… ह्याचे प्रमुख कारण असे की एकीकडे देशातील अर्थव्यवस्था अधिकाधिक भक्कम होते आहे असे दावे होत असताना दुसरीकडे भारतीय शहरे जगातील सर्वात प्रदूषित, गलिच्छ आणि आजूबाजूच्या निसर्गसंस्थांसाठी हानिकारक म्हणून प्रसिद्ध होत आहेत.
ना सरकारी कलेक्टर, ना कमिश्नर— पण जबाबदार शहरे
न्यूझीलंडचा अनुभव: नगरसेवकांद्वारे प्रशासनप्रमुखाची नियुक्ती, मुद्रांकशुल्काचा अंत आणि स्वायत्त पोलिसव्यवस्था
मेरी रिचर्डसन न्यूझीलंडमधील आधुनिक शहर (स्मार्ट सिटी) क्राइस्टचर्च येथे महानगरपालिकेच्या प्रशासनप्रमुख आहेत. कार्यक्षमता, आर्थिक शिस्त आणि सुधारीत प्रशासन ह्यांवर भर देत त्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या कामकाजात लक्षणीय सुधारणा झाल्या. सन २०२५ मध्ये त्यांना पगारवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला गेला. मात्र “सध्या अनेक नागरिक आर्थिक दबावांचा सामना करत आहेत,” असे सांगत त्यांनी ही पगारवाढ आदरपूर्वक नाकारली.
आपल्याकडील शहरांमध्ये प्रशासनप्रमुख म्हणून महानगरपालिका आयुक्त कार्यरत असतात. परंतु आपल्याकडील आयुक्त आणि मेरी रिचर्डसन ह्यांच्या पदातील मूलभूत फरक लक्षात घ्यायला हवा.
खरंच भारतात नक्षलवाद हा फार मोठा धोका आहे का?
संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाच्या सुमारे १०% लोकसंख्या असलेल्या, १५%, दलित, ५०% महिला आणि १५% अल्पसंख्याक मिळून ९०% समाजघटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच्या गेल्या ५५ वर्षांच्या सामाजिक जीवनात विविध अनुभव गोळा झाले आहेत. त्या अनुभवांच्या आधारे केलेल्या अभ्यासाकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. आपल्या देशात सुरू असलेल्या आदिवासी असंतोषाकडे भारतसरकारने केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणे बरोबर होणार नाही. ह्या असंतोषाच्या परिस्थितीचा मुळापासून अभ्यास करणे, हाच ह्या प्रश्नाला सोडविण्यासाठी योग्य उपाय होऊ शकतो.
भारतीय कम्युनिस्ट चळवळीचा इतिहास
भारतात कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत स्थापना कानपूर येथे काही कम्युनिस्टांनी डिसेंबर १९२५ मध्ये केली असून सांप्रत वर्ष कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे.
निवडणुकांचे मुद्दे, आणि विवेकवादी नागरिकांची जबाबदारी
- निवडणुकांमध्ये सत्तेसाठी, आणि त्यानंतर सत्ता टिकविण्यासाठी सत्यनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेचा त्याग करणाऱ्या व्यवस्थांनी समाजाला असहाय अवस्थेत ढकलले आहे. अशा परिस्थितीत विवेकवादी नागरिकांवर सत्याच्या आधारे जनजागृती करून योग्य दिशा दाखविण्याची मोठी जबाबदारी आहे.
महाराष्ट्रातील अलीकडच्या निवडणुकांमध्ये “बटेंगे तो कटेंगे” ही घोषणा, आणि अचानक समोर आलेली “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना, हे दोन निर्णायक मुद्दे ठरले. माध्यमांनी ह्या मुद्द्यांचा गाजावाजा केला, परंतु सखोल आणि विवेचक चर्चा करण्याचे टाळले. परिणामी, ह्या घोषणा/योजनांना जनतेचा भावुक असा मोठा प्रतिसाद मिळाला, आणि दक्षिणपंथी सत्ताधारी पक्षाने प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली.
आपण बोलत राहिलं पाहिजे…
“ना तो मै तुम्हारा आकडा हूं, ना ही तुम्हारा वोट बँक. मै तुम्हारा प्रोजेक्ट नही हूं और ना ही तुम्हारे अनोखे अजायबघर की कोई परियोजना, ना ही अपने उद्धार की प्रतीक्षा मे खडी आत्मा हूं, और ना ही वह प्रयोगशाला जहाँ परखे जाते है सिद्धांत.”
“तुमने जो नाम मुझे दिये है, जो फैसले सुनाए, जो दस्तावेज लिखे, परिभाषायें बनायी, जो मॉडेल घडे नेता और संरक्षक दिये मुझे, सबसे इन्कार मै करूं. इन सबका, प्रतिकों का. वंचित किया है मुझे मेरे अस्तित्व से, मेरे स्वप्न और मेरे आकाश से.
रक्ताश्रू आणि जनआक्रोश
कोलकात्यातील आर.जी.कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील तरुणीमुळे एका अवैध सिंडिकेटविरुद्ध खळबळ माजली. ह्या डॉक्टरने हॉर्नेटचे घरटे ढवळण्याचे धाडस केल्यामुळे तिच्या निषेधाची किंमत तिला चुकवावी लागली. जंगली श्वापदालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीने तिच्यावर बलात्कार करून तिची अमानुष हत्या करण्यात आली. ज्या ठिकाणी तिचा जीव घेतला गेला ते ठिकाण तिच्यासाठी दुसरे घर आणि एक सुरक्षित आश्रयस्थान होते. तिच्यावर अत्याचार होत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू नाही, तर रक्त सांडत होते. तिच्या मारेकऱ्यांना आणि पुरावे नष्ट करणाऱ्या सर्वांना असे वाटले की, गेल्या अनेक दशकांपासून आर.जी.कार
विविध निवडणूक पद्धती
लोकशाही ह्याचा अर्थ लोकांनी म्हणजे आपण निवडलेल्या प्रतिनिधींनी निवडलेल्या मंत्रिमंडळाने ठराविक कालावधीसाठी राज्य करणे. ह्यालाच सांसदीय लोकशाही म्हणतात. भारतामध्ये हीच लोकशाही चालू आहे. ह्याशिवाय भारतामध्ये राज्यसभा आणि राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी वेगळी निवडणूक होते. भारतामध्ये राष्ट्राध्यक्षांना प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये भाग घेता येत नाही आणि फारसे अधिकारही असत नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणजे पंतप्रधान हे भारतातील केंद्रीय शासनाचे प्रमुख असतात.
अठरा वर्षे किंवा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याचे लिंग, धर्म, जात, श्रीमंती, गरिबी, वंश, ह्यांचा विचार न करता मत देण्याचा अधिकार असणे हा लोकशाहीचा पहिला महत्त्वाचा निकष आहे.
नवीन सरकारपुढील समस्या आणि नागरिकांची भूमिका
नागरिक आणि त्यांची कर्तव्ये
‘विशिष्ट देशाच्या राज्यव्यवस्थेचे सदस्य’, या अर्थाने आपण त्या देशाचे ‘नागरिक’ असतो. नागरिक म्हटले, की त्याच्याशी निगडीत असलेल्या हक्कांचा आणि कर्तव्याचा विचार करावा लागतो. मराठी विश्वकोशात नागरिकत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे, “आधुनिक काळात नागरिकत्व म्हणजे शासनसंस्थेचे सदस्यत्व आणि नागरिक म्हणून असलेले हक्क व जबाबदाऱ्या यांचा समुच्चय.” म्हणूनच सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. पण त्या देशाचे सरकार निवडण्याचे अधिकारही नागरिकांनाच असतात. अर्थात् हे लोकशाही राज्यव्यवस्थेला लागू आहे, हे उघड आहे. सरकार निवडण्याबरोबरच ते योग्यप्रकारे आपले काम करीत आहे, की नाही यावर पाळत ठेवण्याचाही अधिकार नागरिकांना असतो, यात संशय नाही.
लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
१९ एप्रिल ते १ जून २०२४ ह्या कालावधीत सात टप्प्यांमध्ये ५४३ मतदारसंघात झालेली सर्वांत मोठ्या लोकशाही देशाची जगातील सर्वांत मोठी निवडणूक पार पडून स्वतंत्र भारताची अठरावी लोकसभा नुकतीच स्थापित झाली आहे. निकालानंतर उडणारा गुलाल असो वा धुराळा यथावकाश दोन्ही खाली बसेल. फैजच्या शब्दांत सांगायचे झाल्यास “तुझ से भी दिल-फ़रेब हैं ग़म रोज़गार के” (तुझ्याहूनही माझ्या रोजी-रोटीची लढाई अधिक महत्त्वाची आहे) याची जाणीव सर्वसामान्य नागरिकास एव्हाना झाली असेल. जिगर मुरादाबादीने “उन का जो फ़र्ज़ है वो अहल-ए-सियासत जानें” (त्यांचे कर्तव्य जाणोत ते राजधुरंधर) असे म्हटले होते.