1996 साली ब्रिटनमधील विश्व हिंदू परिषदेने एक सचित्र व गुळगुळीत पुस्तक प्रकाशित केले. हिंदू धर्माचि स्पष्टीकरण शिक्षकांसाठी मार्गदर्शिका’ या नावाच्या या पुस्तकात ‘वर्गात हिंदू कल्पना व विषय शिकवण्याबाबतच्या सूचना’ आहेत. ब्रिटिश शालापद्धतीतील माध्यमिक व उच्च वर्गामध्ये वापरासाठी हे पुस्तक आहे. आज पुस्तक दुसऱ्या आवृत्तीत उपलब्ध आहे.
पुस्तक ब्रिटिश शिक्षकांना सांगते की हिंदू धर्म हे चिरंतन निसर्गनियमांचेच दुसरे नाव आहे.’ वैदिक ऋषींनी शोधून काढलेले आणि नंतर आधुनिक भौतिकशास्त्रज्ञांनी व जीवशास्त्र्यांनी पुष्टी दिलेले हे नियम आहेत, असा दावा आहे. यानंतर गणित, भौतिकी, खगोलशास्त्र, वैद्यक आणि उत्क्रांतीचे शास्त्र यांच्या वेदांमधील उल्लेखांचे ठार चुकीचे व आत्मतुष्ट ‘स्पष्टीकरण’ आहे.