माणूस जसा वागतो तसा तो का वागतो, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातूनच मानवी वर्तन (आणि प्राणि-वर्तनसुद्धा) समजून घेण्याच्या शास्त्राचा, म्हणजेच मानसशास्त्राचा जन्म झाला आहे.
मानवी मन हे आजही माणसाला पडलेले कोडे आहे व ते सोडविण्याचे अनेक मार्ग व पद्धती मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहेत.
आजही मानसशास्त्र का निवडले असा प्रश्न जर विद्यार्थ्याला विचारला तर त्याचे स्वाभाविक उत्तर ‘समोरच्या व्यक्तीचे वर्तन/मन समजून घेता यावे’ म्हणून असे असते. आणखी विचार करून उत्तर द्या असे म्हटले तर चांगले जगता यावे म्हणून असे उत्तर मिळते. ‘चांगले जगणे’ म्हणजे काय, हे स्वतःला समजून घेता आले, इतरांना समजून घेता आले, एकमेकांशी व्यवहार करताना एकमेकांना समजून घेता आले तरच शक्य आहे असेही त्यांना मनापासून वाटते व ह्याचा मार्ग मानसशास्त्राच्या अभ्यासाने मिळेल असे त्यांचे उत्तर असते.
भ. पां. पाटणकर यांच्या पत्रास हे उत्तर
“पुरुष अजूनी भूतकाळात राहात आहेत म्हणून पा चात्त्य कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत आहे’ असे विधान माझ्या लेखात आहे (जाने. २००२). त्याला आशा ब्रह्म यांच्या लेखातल्या विधानांना जोडून भ. पां. पाटणकर यांनी एक (? विनोदी) निष्कर्ष काढला आहे “स्त्रिया (? उपय) नैतिक मूल्यांच्या मागे लागल्या आहेत.’ पा चात्त्य स्त्रिया ज्या मूल्यांचा पुरस्कार करत आहेत त्यांची थोडक्यात यादी लिहिते.
पती व पत्नी दोघेही नोकऱ्या करत असताना (अ) दोघांनी घरकामाची व मुलांची समान प्रमाणात जबाबदारी घ्यावी. (ब) पतीच्या करिअरएवढेच पत्नीच्या करिअरला महत्त्व असावे (क) दोघांच्या नातेवाईकांना सम प्रमाणात घरात स्थान मिळावे.
धिस फिशर्ड लँड : लेख ३
शेती आणि उद्योग
जमिनीच्या एखाद्या तुकड्यावर थोड्याच जातींच्या वनस्पतींपासून बरेच उत्पादन घेत राहिल्यास त्या जमिनीतील अनेक द्रव्ये शोषून घेतली जाऊन जमिनीचा कस उतरतो. यावर एक उपाय म्हणजे जमिनीला काही काळ न वापरणे, ज्यामुळे तिच्यावर नैसर्गिक झाडोरा येऊन द्रव्यांची साठवण होते. हे झाले फिरत्या शेतीचे तंत्र. जर कस उतरलेल्या जमिनीला गाळ, खते वगैरेंमधून पोषक द्रव्यांचा पुरवठा केला, तर मात्र एकाच भूभागावर वर्षानुवर्षे पिके घेता येतात. फिरती शेती करताना बऱ्याच जमिनीवर थोडीशीच माणसे जगू शकतात, तर स्थिरावलेल्या शेतीवर जास्त माणसे जगू शकतात.
स्थिर शेतीसाठी जमिनीची सक्रिय मशागत करावी लागते.
संघाचा फतवा : राज्यघटनेलाच आव्हान
गुजरातमध्ये ज्यांनी अमानुष कृत्ये केली ते हिंदू नव्हते; तर माणसाच्या रूपातील राक्षस होते. मला जे हिंदुत्व भावते ते “दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो, जो जे वांच्छील तो तें लाहो, प्राणिजात” असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचे. कारण ते हिंदुत्व वैश्विक आहे, मानवतावादी आहे. जे हिंदुत्वाचा उपयोग माणसामाणसांतील द्वेष आणि भीती वाढवण्याकरता करतात, ते हिंदुत्ववादी नाहीतच. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांच्यापासून गांधींपर्यंत ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला त्यांचे ते हिंदुत्व अहिंसा आणि प्रेम या दोन तत्त्वांवरच आधारलेले होते. संघाचे हिंदुत्व नकारात्मक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लोकशाही आणि राज्यघटना यांवर विश्वास नाही, हे काही नवीनच प्राप्त होणारे ज्ञान नाही.
शिक्षण कशासाठी!
त्याने आपल्या भावाला शिकवले का नाही?
“बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना त्याने कॉलेज सोडलं. एज्युकेशनची आपली सिस्टिमच अशी आहे. आयुष्यातली पंधरा वर्षं आपण निरुपयोगी काहीतरी शिकत रहातो आणि मग ते शिक्षण मोठ्या ऑफीसमध्ये साधी क्लार्कची नोकरी द्यायलाही उपयोगी पडत नाही. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यामुळे तुम्ही निक्कमे होता. दुसरं काही करणं तुम्हाला जमेनासं होतं. आर्टस घेतलं की ते सांगतील तेवढेच विषय शिकावे लागतात. त्यात चॉईसच नाही. समजा बीए करताना एखाद्याला अकाऊन्टन्सीही करायची आहे तर कॉलेजमध्ये तसं चालत नाही. प्रायव्हेट क्लासला जावं लागतं.
संपादकीय राष्ट्र वाद, विवेकवाद आणि थोडे इतर काही
ह्या अंकामध्ये अन्यत्र श्री. रवीन्द्र द. खडपेकर ह्यांचे एक पत्र संक्षेपाने प्रकाशित होत आहे. त्याचा परामर्श येथे घ्यावयाचा आहे. स्थलाभावामुळे मूळ पूर्ण पत्र प्रकाशित करू शकलो नाही.
खडपेकरांनी दूरदर्शनवर पाहिलेल्या जाहिरातीची दखल मिळून साऱ्याजणींनी घेतली आहे (मार्च २००२). खडपेकरांशी मी सहमत आहे, मात्र त्यांच्या माझ्या सहमतीची कारणे मात्र अगदी वेगळी आहेत. कोणत्याही परिस्थितीत पत्नीचा व्यभिचार हे घटस्फोटाचे कारण होऊ नये असे माझे मत आहे. त्याविषयी मी आजचा सुधारक मधूनच वेळोवेळी अनेक लेख लिहिले आहेत म्हणून त्याच्यामागील सर्व कारणांची पुनरुक्ती करीत नाही.
हिंदू! एक शिवी!
काही महिन्यापूर्वी आ.सु.च्या काही वाचकांनी ‘हिंदू म्हणजे नेमके काय’ असे प्रश्न विचारले होते. भल्याभल्या विद्वानांना नेमक्या हिंदुत्वाची परिभाषा करता आली नाही. एक विचार असाही वाचायला मिळाला, ज्यात ‘हिंदू नावाचा कोणी धर्मच नाही’ असे मांडले होते. प्रत्येक धर्मपंथाला एखादा संस्थापक असतो, ग्रंथ असतो, ठराविक तत्त्वज्ञान, कर्मकांड असते, तसे हिंदूधर्माचे नाही.
जैन-बुद्ध धर्माच्या वैचारिक आक्रमणानंतर आर्य पुरोहितशाहीची बरीच पिछेहाट झाली. त्यांनी मग पडते घेतले. गोमांस, पशुपक्षीमांसभक्षक यज्ञ बंद केले. यज्ञातील अ लील प्रकार बंद केले. भरतखंडात पसरलेल्या अनार्यांच्या देवदेवता स्वीकारल्या, मंदिरे, मूर्तिपूजा स्वीकारल्या.
पर्यावरण, जमिनीचे पोषकत्व आणि लोकसंख्या इ.
१. मार्च २००२ च्या आ.सु.मधील संपादकीयावर चर्चा होणे आवश्यक आहे. अशा चर्चेसाठी पूरक असे काही विचार इथे मांडत आहे. मूळ मुद्दा आहे ‘नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन’, ‘नैसर्गिक संसाधनांवर सर्वांचा हक्क’ आणि ‘नैसर्गिक संसाधनांवर येणारे लोकसंख्येचे सातत्याने दडपण’. माल्थसपासून हा विचार अधून मधून पुढे येतच राहिला आहे. पण विज्ञानामुळे उत्पादनवाढही पटीत होऊ शकते (Geometrical increase) आणि लोकसंख्यावाढ नियंत्रणही शक्य झाले आहे. आणि सुजाण, जागरुक, ज्ञानी समाज आज याचा पुरेपूर फायदा करून घेताना दिसत आहे. खास करून राजकीय सत्तासंपादनाच्या खेळाबाहेरच या गोष्टी राहायला हव्यात.
‘एक होती बाय’
नित्यनव्या घडणाऱ्या प्रसंगांच्या गुंफणीमधून चित्रपट वा टी. व्ही. मालिका वेधक बनतात. आपल्याला खेचून घेतात. तीच ताकद ‘एक होती बाय’ ह्या पुस्तकात आहे. गेली सुमारे चाळीस वर्षे हॉलंडमध्ये स्थायिक झालेल्या श्री. सुरेन आपटे यांनी त्यांच्या सत्तरीत लिहिलेली ही सत्यकथा. फक्त त्यांच्या जन्मापूर्वीचा, अजाण वयातला आणि दूरदेशीच्या वास्तव्याचा काळ यातील हकिकती ऐकीव माहितीतून आल्या आहेत. जगावेगळ्या आईची आणि मुलाची जोडकथा, असे हे मराठीतले एकमेव पुस्तक असावे.
पेणजवळच्या हातोंडे या खेड्यातले एक ज्यू कुटुंब. त्यात १९१० च्या आसपास जन्मलेली बाय. वडिलांचा अकाली मृत्यू होतो.
अज्ञान, ज्ञान आणि आत्मज्ञान
‘ज्ञान’ म्हणजे काय? ज्ञानेन्द्रिये आणि कर्मेन्द्रिये यांचे द्वारा व्यक्तीला होणारी ‘जाणीव’ म्हणजे ज्ञान. अध्यात्मवादी तत्त्वज्ञानात अशा ज्ञानाला मिथ्या म्हटले जाते. त्यांच्या मते ‘खरे’ ज्ञान हे इंद्रियापलीकडील असते. आणि हे इंद्रियांपलीकडील ज्ञान भगवद्भक्ती केली तरच प्राप्त होते, अन्यथा नाही. अध्यात्मवादी ह्या छापील तत्त्वज्ञानावर किंवा त्यांचे गुरु सांगतात म्हणून संपूर्ण विश्वास (चुकलो) —- ‘संपूर्ण श्रद्धा’ ठेवतात. विश्वास ठेवायला पूर्वानुभव लागतो. श्रद्धा ठेवायला पूर्वानुभवाची गरज नसते.
अशा ज्ञानाची पुढची पायरी म्हणजे आत्मज्ञान! म्हणजेच ‘आत्मसाक्षात्कार’ असे म्हणतात! श्रीमद्भगवद्गीतेत हा विषय पुष्कळ विस्तृतपणे हाताळलेला आहे. श्रद्धाळू लोकांना गीतेत सांगितलेली प्रत्येक गोष्ट संपूर्ण खरी वाटते.