स्त्रीपुरुषतुलना हे ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली लिहिलेले पुस्तक श्री शिवाजी छापखाना, पुणे येथून प्रसिद्ध झाले. श्री. विलास खोले यांनी त्या पुस्तकाची नवीन आवृत्ती संपादित केली आहे. मूळ संहिता उपलब्ध असताना पुन्हा हे पुस्तक संपादन करण्याचे प्रयोजन सांगताना संपादक म्हणतात, “पूर्वाभ्यासातील उणिवा दूर करणे, नवीन माहितीचा शोध घेणे आणि साहित्यकृतीचा नवा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणे या तीन उद्देशांनी मी प्रस्तुत संपादनास प्रवृत्त झालो’ (पृ. ९).
माझे प्रतिपादन संपादकांची प्रस्तावना तसेच मूळ संहिता या दोहोंवर बेतलेले आहे. सर्वच पृष्ठ क्रमांक, जे वेळोवेळी दिलेले आहेत, ते संपादित पुस्तकाचे आहेत.