संपादक-२००८ - लेख सूची

वित्तव्यवस्थेतील ‘सुनामी’ ?

एकमेकांवर विश्वास, पारदर्शक व्यवहार, वारंवार होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाणीकरण, अशा आपल्या गुणांचा अमेरिकनांना रास्त गर्व असतो. नव्या गावात नोकरी लागलेला माणूस रीअल-इस्टेट एजंटाच्या मदतीने आणि वेतनाच्या प्रमाणपत्राच्या आधाराने बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःचे घर किती सहजपणे विकत घेऊ शकतो, याच्या कहाण्या अनिवासी भारतीय सांगतात, ते उगीच नव्हे. अशा व्यवहारांमागे काही धारणा असतात. नव्याने घर घेणाऱ्याची नोकरी टिकेल, …

पत्रसंवाद

सुनेत्रा आगाशे, २६१, शनिवार पेठ, सातारा, फोन २१६२२३२००५८ जातिनिर्मूलनः तुकाराम, कबीर वगैरे कैक थोर संतांच्या वेळेपासून या जातीच्या राक्षसाला हरवण्याचे बरेच प्रयत्न झाले; पण या बलदंड राक्षसापुढे सर्वांनी हात टेकले. आता तर मतांच्या राजकारणाने त्याला आणखीच बळकट केले आहे. जातीच्या अभिमानाचा इतका मोठा प्रभाव आहे की देशासाठी बलिदान द्यायला तयार होणार नाहीत पण जातीच्या इज्जतीसाठी …

पत्रचर्चा

देवयानी बुचे आसु च्या ऑगस्ट २००८ अंकांतील “परमसखा मृत्यू किती आळवावा’ हा लेख वाचला. मी एक फिजिशियन असून गंभीरपणे आजारी असलेल्या रुग्णांची चिकित्सा (शरीशपीं) करते. अशा प्रकारचा वृद्ध रुग्णांची चिकित्सा करताना तीसुद्धा अत्यंत महागडी, क्लिष्ट आणि सरकारी खर्चाने देताना “”Critical care for whom?’ हा प्रश्न मला वारंवार भेडसावतो. लेखिकेने म्हटल्याप्रमाणे पस्तीस वर्षे नोकरी आणि पंचेचाळीस …

पत्रचर्चाः

जात व आरक्षण (सुधीर बेडेकर यांनी पुरविलेले साहित्य) क) जात व आरक्षण विशेषांकावरील चर्चेत एक मुद्दा मांडला गेला, की आरक्षणाला विरोध असणाऱ्यांची बाजू समर्थपणे मांडून तिला उत्तर दिले गेले नाही. यासंबंधात तात्पर्य मासिकाच्या मे १९७८ च्या अंकातील संपादकीय (संपादकः सुधीर बेडेकर) टिपणात असा प्रयत्न सापडला. त्याचा काही भाग (साभार) असा गुणवत्तेनुसार संधी व मोबदलाः सवर्णांचा …

पत्रचर्चा

देवयानी बुचे आसु च्या ऑगस्ट २००८ अंकांतील “परमसखा मृत्यू किती आळवावा’ हा लेख वाचला. मी एक फिजिशियन असून गंभीरपणे आजारी असलेल्या रुग्णांची चिकित्सा (treatment) करते. अशा प्रकारचा वृद्ध रुग्णांची चिकित्सा करताना तीसुद्धा अत्यंत महागडी, क्लिष्ट आणि सरकारी खर्चाने देताना “Critical care for who?’ हा प्रश्न मला वारंवार भेडसावतो. लेखिकेने म्हटल्याप्रमाणे पस्तीस वर्षे नोकरी आणि पंचेचाळीस …

पत्रचर्चा

अर्थ असा नाही की या मंडळींचे विचार प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. परंतु विचारांवर बंदी नको. धर्मनिष्ठांना धार्मिक जशा भावना असतात तशाच तीव्र भावना धर्मावर विश्वास न ठेवणारांच्याही असू शकतात याची जाणीव प्रत्येक प्रगतिशील शासनाने ठेवली पाहिजे. धर्मावर टीका केली म्हणून मारा; आम्ही अमुक अमुक बक्षीस देऊ अशा प्रकारचे काही फतवे भारतातही निघाले होते. भारतात असे …

पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, ए-९/१, कुमार पद्मालय, न्यू डी पी रोड, स. नं. १६०/१, औंध, पुणे ४११ ००७. फोन (०२०) २५८९७३५९ लंकाधिपति-सम्राट-रावणाशी युद्ध करण्यासाठी समुद्राचे उल्लंघन आवश्यक होते. त्यासाठी रामेश्वर व लंका यांच्यामधील महासागरावर सेतू बांधावा लागला. रामाने वानरांच्या साह्याने पाच दिवसांत महासागरावर पाषाण, वृक्ष टाकून सेतू बांधला अशी कथा आहे. हा रामसेतू रामायण प्रत्यक्ष घडल्याचा पुरावा …

जात – आरक्षण विशेषांकासंबंधी

मानसोपचारात रोग्याची पहिली अवस्था “छे! मला कुठे काय झाले आहे!’ अशी नकाराची असल्याचे मानले जाते. भारतात जातिव्यवस्थेबाबत असे नकार फार दिसतात. “मुळात जातिव्यवस्थेत ताणतणाव नव्हतेच, आज अस्पृश्यता पाळली जात नाही, सामाजिक तणावांमध्ये आरक्षण भर घालते. आरक्षणाने आज उच्च असलेली गुणवत्ता खालावेल” अनेक रूपांमधले नकार! मागे लॅन्सी फर्नाडिस आणि सत्यजित भटकळ यांच्या ‘The Fractured Civilization’ या …

पत्रचर्चा

ह. आ. सारंग, प्लॉट नं. ३२, सुभाषनगर, ‘हॉटेल अश्वमेघ’च्या पाठीमागे, एम.आय.डी.सी. रोड, लातूर – ४१३ ५३१. ‘अभ्यासेंनि प्रगटावें’ या संपादकीयाद्वारे आपण वाचकांशी साधलेला सुसंवाद आवडला. त्यामुळे आ.सु. च्या मागील अंगावर प्रतिक्रिया द्यायला प्रोत्साहित झालो. ‘पत्रबोध’ हे नामकरण व त्याला दिलेली जास्तीची जागा या दोन्ही गोष्टी आवडल्या. आ.स्. मध्ये चुटके-विनोद असण्याची गरज नाही. त्यासाठी इतर माध्यमे …

सॉलिप्सिझममधले धोके

[आधुनिकोत्तरवादी विचारांचे दुष्परिणाम कधीकधी आत्यंतिक व्यक्तिनिष्ठेच्या रूपात असतात. त्यामुळे आत्यंतिक व्यक्तिनिष्ठा धोकादायक का, हे दाखवायचा हा प्रयत्न तुला भीती ही कसली वाटते रे?: (चित्रपट: नई देहली) “तुला जर भविष्याचं चित्र हवं असेल, तर एका मानवी चेहेऱ्याला चिरडणारा बटाचा पाय नजरेपढे आण नेहेमीसाठी.” ओब्रायन विन्स्टन काहीतरी बोलेल अशा अपेक्षेने थांबला. विन्स्टन स्ट्रेचरमध्ये शिरायचा प्रयत्न करत असल्यासारखा …

मेजवानी

डेन्मार्कच्या जुट्लांड प्रांताजवळचे एक बेट. काळ सुमारे १८७० सालाचा. एक मुष्किलीने डझनभर उंबऱ्यांचे खेडे. बहुतेक सारी माणसे वयस्क. नावाजण्यासारखी माणसे तीन एक अविचल, कर्मठ धर्मगुरु ऊर्फ ‘मिनिस्टर’, आणि त्यांच्या दोन देखण्या मुली. पंचक्रोशीतले लोक मिनिस्टरांच्या रविवारच्या प्रवचनांसाठी येरा. रारणे मुलींकडे पाहारा दृष्टिसुख घेरा. शेजारच्या जमीदारिणीकडे तिचा एक पुतण्या येतो, वाईट वागण्याची शिक्षा म्हणून तीन महिने …

पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, पुणे ४११ ००७ हिंदू धर्मानुसार विष्णूचे दहा अवतार मानले जातात. काहींच्या मते ३९ अवतार आहेत. लेखकाचे म्हणणे असे आहे की इतर कोणत्याही धर्मात मानवाचा उदय अथवा विकास उत्क्रांतीमुळे झाला याची पुसटशीसुद्धा कल्पना नाही. सर्व प्राणी, पक्षी व मानव ईश्वराने एका झटक्यात निर्माण केले असे यहुदी (ज्यू), ख्रिस्ती व इस्लाम धर्म मानतात. याला हिंदुधर्मही …

पुस्तक-परिचय

डोकं कसं चालतं? (मेंदू आणि मन याबद्दल) प्रकाशक आकार फाऊंडेशन, सांगली. प्रथमावृत्ती मे २००७. पृष्ठे १०४. किं.१०० रु.) डॉ. उल्हास लुकतुके लेखक डॉ. प्रदीप पाटील स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी एम.ए. (क्लिनिकल सायकॉलॉजी) ही पदवी घेतली आहे. मानसिक आरोग्याची सामाजिक जाण वाढावी यासाठी काम करणाऱ्या आकार फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय सेवा, शिक्षकी कार्य, सामाजिक …

पत्रलेखन

सरस्वती के. देव, १६८ एफ वैद्यवाडी, ठाकुरद्वार, मुंबई ४०० ००२. दूरध्वनी : २३८५१३३१ नोव्हेंबरचा आजचा सुधारक वाचला. नेहमीप्रमाणे चांगला आहे. त्यातील शारदा यांची सुहासिनीची सत्त्वपरीक्षा हा लेख वाचला. त्यात सुहासिनीची करुण कहाणी फारच हृदयद्रावक आहे. अजूनही पालक म्हणजे मुलाचे वा मुलींचे आई-वडील. ते शिक्षित आहेत, सुधारक आहेत पण बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहेत. केवळ पैसा हे माध्यम …