मासिक संग्रह: सप्टेंबर, २०१३

संपादकीय दिवस कसोटीचे आहेत

साप्ताहिक साधनाचे संपादक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व प्रमुख डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोलकर ह्यांची ज्या प्रकारे पुण्यात हत्या झाली, तो प्रकार अखिल महाराष्ट्राला अत्यंत लांछनास्पद आहे. विचाराचा आणि विवेकाचा झेंडा घेतलेले महाराष्ट्रात जे काही थोडके लोक आहेत, त्यांच्यामध्ये दाभोलकरांचा क्रमांक वरचा होता. अंधश्रद्धेचे विरोधक आणि विवेकवादी असल्यामुळे ते एका अर्थी आ.सु. परिवारातलेच होते. त्यांच्यावरील हल्ल्याचे व त्यांच्या निधनाचे आम्हाला अतीव दुःख होत आहे. कृष्णा देसाईंच्या खुनाचा साक्षीदार असलेल्या महाराष्ट्राला राजकीय हत्या अपरिचित नाहीत. गेल्या दोन दशकांत जमीन तसेच माहिती अधिकार ह्या क्षेत्रांतील कार्यकर्त्यांच्या हत्या महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत ; पण तरी ही घटना त्यांच्यापेक्षा वेगळी आहे.

पुढे वाचा

मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी यांच्यातील संवाद

आज आपण २१ व्या शतकात जागतिक भांडवलशाहीच्या अवस्थेत जगत आहोत. आज प्रचंड प्रमाणात महागाई, मोठ्या प्रमाणात बेकारी, रुपयाची कमालीची घसरण, त्याबरोबरच राजकारणाचे गुन्हेगारीकरण, रोज होणारे खून, अपघात, घातपात, बलात्कार, दलित, अल्पसंख्यक व दुर्बल घटक ह्यांवर अत्याचार, अशी परिस्थिती आहे. धनदांडगे, बिल्डर लाबी, वाळू माफिया, अंडरवर्ल्ड आणि देशी-परदेशी भांडवलदार आणि व्यापारी हे सारे आपल्यावर राज्य करत आहेत. ही गोष्ट मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी जाणून आहेत. म्हणूनच आज मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी यांच्यामध्ये संवाद होण्याची आवश्यकता आहे. अनेक भांडवली पक्ष आहेत.

पुढे वाचा

बीज-स्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे ?

मानवी प्रगतीचा एक अर्थ असा लावता येतो की अन्न, वस्त्र, निवारा वगैरे मूलभूत गरजा भागविणआाठी करायला लागणाऱ्या कष्टांचे प्रमाण आणि कष्टांचा/कामाचा कालावधी कमी-कमी होत जाणे, आणि उपभोगाचा किंवा रिकामपणाचा कालावधी वाढत जाणे. या प्रगतीची महत्त्वाची साधने दोन होती – एक म्हणजे परस्परांना मदत, सहकार्य आणि स्पेशलायझेशन. दुसरे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर.

सहकार्यः
एकट्याने शिकार करण्यापेक्षा अनेकांनी एकत्रपणे शिकार केल्यास ती अधिक फलदायी होते हे शिकारी रानटी कुत्र्यांनाही कळते, ते आदिमानवांच्याही लक्षात आले. तेच सहकार्य हिंस्र पशृंपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी पडले. हेच सहकार्य पढे विकसित होत, मले सांभाळणे, हत्यारे तयार करणे, शिकार केलेल्या पशंचे कातडे वेगळे करून त्याचे कपडे शिवणे वगैरे आवश्यक कामांच्या कौशल्यांध्ये स्पेशलायझेशन काही लोकांनी केल्यास काम अधिक चांगले होते आणि सर्वांच्याच वेळेची बचत होते, हे लक्षात येऊन परस्परांवर अवलंबून असणाऱ्यांचा एक समाज किंवा टोळी तयार झाली.

पुढे वाचा

विज्ञान-आश्रमाची कथा – लेखांक १

[पुणे जिल्ह्यातल्या पाबळ या गावामध्ये गेली तीस वर्षे विज्ञानाश्रम कार्यरत आहे. डॉ. श्रीनाथ कलबाग ह्यांनी भारतामधील एक नवीन शिक्षणप्रयोग येथे करून दाखवला. शिक्षणव्यवस्थेतून ग्रामीण विकास. आज विज्ञानाश्रमात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असणारे डॉ. योगेश कुलकर्णी यांच्याकडून आपण हा प्रयोग करण्यामागची विचारधारा जाणून घेऊ या. प्रयोग सुरू केल्यापासून आजपर्यंत त्यात कसकसा विकास होत गेला हे तपशिलात समजण्यासाठी पाच लेखांची मालिका द्यावी असा विचार आहे. त्यातील हा पहिला लेख.- संपादक]
डॉ. कलबागांनी १९८३ मध्ये चालू केलेल्या विज्ञानाश्रमाबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. काहींना वाटते, की ही नापासांची शाळा आहे, काहींना वाटते की हे लोक शाळांध्ये व्यावसायिक शिक्षण देण्याचा कार्यक्रम चालवतात, ग्रामीण भागात उपयुक्त तंत्रज्ञान शिकवतात, कमी खर्चात घरे बांधून देतात वगैरे.

पुढे वाचा

ग्रंथपरिचय/परीक्षण

पृथ्वीमंथनः जागतिकीकरणात भारतीय विकास धोरण (मूळ इंग्रजीः ‘चर्निंग द अर्थ, द मेकिंग ऑफ ग्लोबल इंडिया) श्रीनिवास खांदेवाले
जागतिकीकरण आणि त्यानुसार बदलणाऱ्या भारतीय विकासनीतीचे निसर्ग, पर्यावरण, कृषि, ग्रामीण व आदिवासी जाति-जमातींच्या अस्तित्वावर व भवितव्यावर झालेल्या आणि होणाऱ्या परिणामांची सखोल व शास्त्रीय चर्चा करणारा हा मौलिक ग्रंथ आहे. देश-विदेशांतील १४ विद्वान व लोकजीवनाशी जुळलेल्या समाजशास्त्रज्ञांचे, शास्त्रज्ञांचे प्रकाशनपूर्व गौरवोद्गार ह्या पुस्तकात आहेत. लेखकद्वय सामाजिक चळवळींशी संबंधित असल्यामुळे हा ग्रंथ केवळ संदर्भ गोळा करून संपन्न झालेला नसून लोकजीवनातील कार्यकारणभाव दाखविणाऱ्या घडामोडींचा जिवंतपणा त्यात आहे. जागतिकीकरण सुरू झाल्यापासून (१९९०) पाश्चात्त्य जगात त्याचे परिणाम काय झाले हे दर्शविणारे अनेक ग्रंथ प्रकासित झाले.

पुढे वाचा

अनवरत भंडळ (५)

भौतिक-अभौतिक
विशाच्या व आमच्या जीवनाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, याबाबत परस्परविरोधी धारणा असलेले भौतिकवाद व अध्यात्मवाद हे दोन विचार-प्रवाह समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मागील एका लेखात भौतिकवादाची तात्त्विक भूमिका थोडक्यात मांडली होती. सृष्टीच्या मुळाशी केवळ जड/निश्चेतन पदार्थ/ऊर्जा असून कोणतीही ज्ञानी, चैतन्यमय अथवा सामर्थ्यशाली अशी वेगळी शक्ती नसल्याचा भौतिकवादाचा दावा आहे. सर्व प्रकारचे चैतन्य हे जडातूनच उगवले असून कोणत्याही जीवाला/चेतनेला देहाबाहेर वेगळे अस्तित्व नसते. सृष्टीच्या निर्मितीमागे कोणताही हेतू नाही. मनुष्य हाच ज्ञात सृष्टीतील सर्वांत ज्ञानी व समर्थ प्राणी असल्यामुळे कशासाठी जगायचे हे मानवालाच ठरवावयाचे आहे.

पुढे वाचा

आकडेबाजी (५): WPR

भारतातील आर्थिक स्थितीसंबंधीची एक तटस्थ आणि वस्तुनिष्ठ समजली जाणारी पाहणी म्हणजे नॅशनल सँपल सर्व्ह, ऊर्फ छडड. यात वेगवेगळ्या अर्थ-सामाजिक थरांधले भारतीय लोक कशाकशावर कितीकिती खर्च करतात, त्यांपैकी किती लोकांना काय दर्जाचा रोजगार मिळतो, वगैरे अनेक बाबी तपासल्या जातात. एरवी या पाहण्या पाचेक वर्षांनी केल्या जातात, परंतु नुकताच हा अवकाश आवळला गेला. २००९-१० नंतर दोनच वर्षांत, २०११-१२ मध्ये पाहणी पुन्हा केली गेली. २००९-१० हे वर्ष अप्रातिनिधिक मानले गेले, कारण ते दुष्काळी वर्षही होते, आणि त्यावेळी अर्थव्यवस्थेची काही अंगे जागतिक मंदीने ग्रस्त होती.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (१२)

आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?

मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विशाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल असे म्हणावे लागते. हे विश कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता आहे. हे विश पूर्णपणे गोठून जाईल (deep freeze), की कृष्णविवरात नाहीसे होईल की अस्टेरॉइड्सच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे होऊन ब्रह्मांडात सामावून जाईल की…. आणखी काही तरी ?

पुढे वाचा

अंधश्रद्धा निर्मूलन

अंधश्रद्धानिर्मूलन म्हणजे काय? “आपले निर्णय व कृती यांचा सामाजिक अन्वयार्थ लावण्याची क्षमता गमावणे हे झाले वैज्ञानिक दृष्टिकोणाकडे पाठ फिरवणे. त्यातून प्रश्नांची रास्त सोडवणूक लांबवर जाते. चुकीच्या उपायांतून घडणारे परिणाम सोसणे आले की नशिबाला दोष देत बसावे ही झाली दैववादी बाजू. दोन्ही चूकच आहेत व हातात हात घालून घात करणाऱ्या आहेत. त्यांच्या विरोधी संघर्ष करणे हे खरे अंधश्रद्धा निर्मूलन आहे.”