विषय «तत्त्वज्ञान»

नैतिक इहवादाच्या आड येणाऱ्या आस्तिकता नेमक्या कोणत्या?

राजकीय संदर्भात ‘सेक्युलॅरिझम’चा सरळ अर्थ इहवाद असा घेऊन, कायदे बनविताना कोणत्याच संप्रदायाचा आधार न घेणे आणि नागरिकाचा संप्रदाय कोणता ह्या आधारावर कोणताही भेदभाव न करणे, अशा स्वरूपात हा प्रश्न सोडविला गेलेला नाही. त्याऐवजी सर्वधर्मसमभाव हा संभ्रम वाढवणारा शब्द रुळला आहे. कोणताही जमातवाद हा ‘बाहेरच्यां’चे अधिकार नाकारणारा समूहवाद असतो व म्हणून त्याज्य असतो असे न मानले जाता अल्पसंख्य/बहुसंख्य ह्यांच्यात समूहवादी ‘समता’ आणण्याच्या भरात जमातवाद चालूच ठेवले गेले. यावरून जे राजकीय वाद आहेत ते ह्या लेखाच्या विषयात घेतलेले नाहीत.

व्यक्तीने स्वतः न निवडलेला संप्रदाय कुटुंबात शिकविला जातोच.

पुढे वाचा

इतिहासजमा ?

(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार)

सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, “करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झाले हे मान्य करा.” हे बोलत असताना ‘शेवटी इष्ट ते घडले’ याचा त्यांना होणारा सात्त्विक आनंदही मला दिसत असतो. पण ते मान्य करण्याच्या अवस्थेत मी अजूनही नाही; अजूनही मी मुख्यतः मार्क्सवादी व थोडासा गांधीवादी आहे.

पुढे वाचा

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची चळवळ

विवेकवादाच्या चळवळीत शासन आणि न्यायव्यवस्था ह्यांचा काय सहभाग असतो, समाजसुधारक आणि सामाजिक संस्था ह्यांना काय तडजोडी करायला लागतात आणि विरोधकांची त्यामध्ये काय भूमिका असते असा सर्व अंगाने अंनिसच्या कायदाविषयक चळवळीचा अभ्यास केला तर ते उद्बोधक ठरेल.

अंनिस १९९० पासून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. ह्यात शासनाची चालढकल अशी राहिली. एका राजवटीत १९९५ मध्ये कायद्याचे अशासकीय विधेयक विधानपरिषदेत प्रचंड बहुमताने मंजूर झाले परंतु कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. नंतर दुसरी राजवट आली. त्यांनी १५ ऑगस्ट २००३ ला ‘जादूटोणाविरोधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य’ अशी जाहिरात करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.

पुढे वाचा

मेजवानी

डेन्मार्कच्या जुट्लांड प्रांताजवळचे एक बेट. काळ सुमारे १८७० सालाचा. एक मुष्किलीने डझनभर उंबऱ्यांचे खेडे. बहुतेक सारी माणसे वयस्क. नावाजण्यासारखी माणसे तीन एक अविचल, कर्मठ धर्मगुरु ऊर्फ ‘मिनिस्टर’, आणि त्यांच्या दोन देखण्या मुली. पंचक्रोशीतले लोक मिनिस्टरांच्या रविवारच्या प्रवचनांसाठी येरा. रारणे मुलींकडे पाहारा दृष्टिसुख घेरा.
शेजारच्या जमीदारिणीकडे तिचा एक पुतण्या येतो, वाईट वागण्याची शिक्षा म्हणून तीन महिने आत्याकडे काढायला. आत्याला सोबत करत प्रवचन ऐकायला जातो. एका मुलीच्या प्रेमात पडतो. मिनिस्टरांना भेटून मुलीचा हात देण्याची विनंती करतो. मिनिस्टर म्हणतात, “माझ्या मुली म्हणजे माझे डावे-उजवे हात.

पुढे वाचा

उपयोगितावाद (५): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिलचे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण ५: न्याय आणि उपयोगिता यांच्या संबंधाविषयी
विचारांच्या सर्वच युगात उपयोगिता किंवा सौख्य हा युक्तायुक्ताचा निकष आहे ह्या सिद्धान्ताला सर्वांत मोठा विरोध न्यायाच्या कल्पनेच्या आधाराने केला गेला आहे. त्या शब्दाने आपल्या मनात उद्भावित होणारी समर्थ भावना आणि स्वच्छ वाटणारी कल्पना ज्या त्वरेने आणि निश्चितपणे उद्भवते ती सहजप्रवृत्तीला समजेल अशी असते, आणि त्यामुळे बहुतेक विचारवंतांना ती निसर्गाचा अंगभूत भागच असल्याचे दिसते.

पुढे वाचा

उपयोगितावाद (४): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिलचे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण ४: उपयोगितेच्या सिद्धान्ताची कोणत्या प्रकारची सिद्धी शक्य आहे?
अंतिम साध्यांविषयीच्या प्रश्नांची सामान्यपणे स्वीकृत अर्थाने सिद्धी शक्य नसते असे यापूर्वीच म्हटले गेले आहे. युक्तिवादाने सिद्धी अशक्य असणे ही गोष्ट सर्व मूल सिद्धान्तांना समान आहे, ज्ञानाच्या आदिसिद्धान्ताला तसेच आचाराच्या आदिसिद्धान्तालाही. परंतु यांपैकी पहिले वास्तवविषयक असल्यामुळे त्यांच्याविषयी वास्तवविषयक अवधारणांच्या शक्तींना इंद्रिये आणि आंतरसंज्ञा यांना साक्षात् आवाहन करणे शक्य आहे.

पुढे वाचा

उपयोगितावाद (३): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिलचे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण ३: उपयोगितेच्या तत्त्वाचा अंतिम प्रेरक
कोणत्याही नैतिक मानदंडाविषयी असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो आणि ते योग्यच आहे की त्याचा आधार काय आहे? तो मानला जाण्याचे कारण कोणते? किंवा त्याच्या बंधकत्वाचा उगम कशात आहे? त्याला त्याचा बंधक प्रभाव कोठून प्राप्त होतो? या प्रश्नाला उत्तर पुरविणे हा नैतिक तत्त्वज्ञानाचा अवश्य भाग आहे.

पुढे वाचा

उपयोगितावाद (२): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिलचे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण २: उपयोगितावाद म्हणजे काय?
जे लोक उपयोगितेचा पुरस्कार युक्त आणि अयुक्त यांचा निकष म्हणून करतात ते उपयोगिता हा शब्द काहीतरी सुखविरोधी अशा संकुचित आणि बोलभाषेतील रूढ अर्थीच वापरतात अशी जी अडाणी समजूत आहे तिचा ओझरता उल्लेखही पुरेसा होईल. इतका विपरीत गैरसमज करून घेणाऱ्यांत उपयोगितावादाच्या विरोधकांचा समावेश क्षणभरही करताना दिसल्यास त्यांची क्षमा मागितली पाहिजे.

पुढे वाचा

उपयोगितावाद (१): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिलचे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण १: सामान्य आलोचने
मानवी ज्ञानाची वर्तमान अवस्था अपेक्षेहून इतकी भिन्न असावी किंवा अतिमहत्त्वाच्या विषयांतील विचार इतका रेंगाळावा यांतील सर्वांत सूचक गोष्ट म्हणजे युक्त आणि अयुक्त यांच्या निकषासंबंधीच्या वादाचा निर्णय करण्याच्या बाबतीत झालेली अत्यल्प प्रगती ही होय. जीवनाचे सर्वोच्च साध्य कोणते, किंवा नीतीचे मूलाधार काय आहेत हा प्रश्न तत्त्वज्ञानाच्या उत्पत्तीपासून तात्त्विक विचारांतील प्रमुख प्रश्न मानला गेला असून त्याला उत्तर देण्यात अतिशय बुद्धिमान लोक गढून गेले आहेत; एवढेच नव्हे तर त्यामुळे त्यांच्यात अनेक तट पडले असून त्यांचा परस्परांशी तीव्र संघर्ष चालू आहे.

पुढे वाचा

मनाचिये गुंती

आधुनिक युगात स्थलकालाबाधित अशी जर कोणती गोष्ट असेल, जी प्रत्येक मनुष्यप्राण्याला कमीजास्त प्रमाणांत छळत असते, ती म्हणजे काळजी किंवा चिंता. Anxiety (चिंता) हा जर एखाद्या व्यक्तीचा स्थायीभाव झाला तर, तिचे दूरगामी शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, अनेक व्याधींचा उद्भव करून त्या व्यक्तीचे जीवन यातनामय करून टाकू शकतात. ‘जी चित्ताला जाळते ती चिंता’ हे सर्वश्रुत आहेच. सामान्य माणसाचे सामान्य जीवन जगणेही मुष्कील करून टाकणारी ही चिंता (anxiety) दूर करण्यासाठी व किंचित काल तरी तीपासून सुटका करणारी अशी उपाययोजना मग माणसे शोधू लागतात. मुक्तीचे हे मार्ग मात्र दुखण्यापेक्षा जालीम ठस्न जास्तच गंभीर अशी दुखणी होऊन बसतात.

पुढे वाचा