विषय «नीती»

नीतिशास्त्राचा आधुनिक परिचय – प्रस्तावना

‘आजचा सुधारक’चा ऑक्टोबर, २०२२ चा अंक नेहमीप्रमाणे अतिशय वाचनीय आणि चिंतनीय झाला आहे, हे निःशंक आहे. त्यासाठी मी लेखक आणि संपादक यांचे मनापासून अभिनंदन करतो. 

या अंकात तात्त्विक (Philosophical) अंगाने बरेच लेखन आढळते. विश्वविख्यात तत्त्ववेत्ता बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell, जन्म:१८ मे १८७२-०२ फेब्रुवारी १९७०) याच्या ‘A Philosophy for Our Time’ या लेखाच्या श्रीधर सुरोशे यांनी केलेल्या ‘आपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान’ या अनुवादापासून ‘दुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं…?’ या साहेबराव राठोड यांच्या पत्रलेखनापर्यंत बहुतेक लेख तात्त्विक स्वरूपाचे आहेत. चिंतनाला प्रवृत्त करणारे आहेत.

पुढे वाचा

नास्तिकवादः एक अल्प परिचय

अगदी लहानपणापासूनच आपल्यावर संस्काराच्या नावाखाली देव-धर्म यांची शिकवण दिली जाते. पालकांना जरी देव-धर्माचे अवडंबर पसंद नसले तरी समाजात वावरताना त्यांच्या मुलां/मुलींची कळत-नकळत देव-धर्माची, पुसटशी का होईना ओळख होते. सण-उत्सव साजरा करत असताना देव-धर्माच्या उदात्तीकरणाला पर्याय नसतो. कुठल्याही गावातील वा शहरातील गल्लीबोळात एक फेरी मारली तरी कुठे ना कुठे देऊळ दिसते. या देवळाच्या गाभाऱ्यातील देवाच्या/देवीच्या मूर्तींची मनोभावे पूजा-अर्चा करणाऱ्यांची कधीच कमतरता नसते. 

परंतु एकविसाव्या शतकात वावरताना आजच्या पिढीतील विचार करू शकणाऱ्या तरुण/तरुणींच्या मनात देव-धर्म, पूजा-अर्चा, सण-उत्सव, जत्रा-यात्रा इत्यादींच्याबद्दल नक्कीच प्रश्न पडत असतील.

पुढे वाचा

हिरण्यकश्यपूचे मिथक* आणि लाप्लासचे उत्तर  – नास्तिक परिषदेच्या निमित्ताने 

दानव सम्राट हिरण्यकश्यपू याला वरदान प्राप्त झाले होते: तुला मृत्यू दिवसाही नाही; रात्रीही नाही. राजवाड्याच्या आतही नाही; बाहेरही नाही. माणसाकडूनही नाही, मानवेतर प्राण्याकडूनही नाही. हिरण्यकश्यपू विद्वान होता. द्विमूल्य तर्कशास्त्रातील प्राविण्याबद्दल त्याला विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी देऊन शुक्राचार्य विद्यापीठाने त्याचा गौरव केला होता. त्याला वाटले आता आपण अमर झालो. सामर्थ्यवान तर तो होताच. तो स्वतःलाच परमेश्वर समजू लागला. त्याला राजपुत्र प्रल्हादाच्या परमेश्वराचे अस्तित्व रुचेना. 

प्रल्हाद त्याचा मुलगा. पण बापलेकाचे पटत नव्हते. द्विमूल्य तर्कशास्त्र प्रल्हादाला कळत नव्हते. परमेश्वर नाही हे त्याला मान्य नव्हते.

पुढे वाचा

कुंभोजकरांच्या लेखातील काही विसंगती

कुंभोजकरांचा गणिताचा अभ्यास असल्यामुळे त्यांना हे तर माहितीच असेल की एकदा १=२ सिद्ध केले की सिद्धतेच्या इतर पायर्‍यांमध्ये काहीही चूक न करताही कोणताही चुकीचा निष्कर्ष मांडता येतो. त्याच धर्तीवर, त्यांच्या लेखात काही पायर्‍यांमध्ये चुका आहेत, बाकीच्या फाफटपसार्‍याची दखल न घेता चुकीचे दावे पाहू. हे दावे अडवून धरले की बाकीचा साराच डोलारा कोसळतो.

“तो स्वतःलाच परमेश्वर समजू लागला.”

स्वतःला परमेश्वर समजणार्‍या व्यक्तीला नास्तिक म्हणू नये.

“त्या प्रत्येक स्तंभात ईश्वराचे वास्तव्य आहे अशी प्रल्हादाची श्रद्धा होती.”

त्यांच्याच लेखात पुढे उल्लेख आहे की “हिरण्यकश्यपूने पहिल्याच घावात खांबाचे तुकडे केले.

पुढे वाचा

विवेक

आस्तिक विरूद्ध नास्तिक हा वाद अनेक वर्षांपासूनचा आहे. पूर्वी आपण नास्तिक आहोत हे सांगायला माणूस घाबरायचा, पण आता तो एवढा धीट झालाय की नास्तिकांचे मेळावे भरवून, व्यासपिठावर उभा राहून “मी नास्तिक आहे” असे तो निर्भीडपणे सांगू शकतोय. एवढेच नाही तर शंतनू अभ्यंकरांसारखा डॅाक्टर ‘असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठे?’ असा लेखही लिहू शकतोय (संदर्भ : लोकसत्ता, १८ डिसेंबर २०२२ चा अंक)

देवाला मानले, कर्मकांडे केली, उपवास धरले (साग्रसंगीत उपासाचे पदार्थ खाऊन) तर तो आस्तिक व ह्यातले काहीसुद्धा केले नाही तर तो नास्तिक ठरतो का?

पुढे वाचा

संविधान संस्कृती : विज्ञान व वैज्ञानिक

ईश्वर, अल्ला, गॉड ही मानवाने निर्माण केलेली एक सांस्कृतिक संकल्पना आहे. माणसावर संस्कार करून त्याला काही प्रमाणात सदाचारी बनवण्यात ही संकल्पना इतिहासकाळात उपयोगी पडलेली असू शकते. या संकल्पनेसाठी संक्षिप्तपणे ‘देव’ हा शब्द वापरूया. देव या संकल्पनेच्या आधारेच मानवाने बराचसा मनोमय सांस्कृतिक विकासही केला. परंतु नंतरच्या काळात स्वतःच निर्माण केलेल्या देवाच्या लोभात माणूस इतका अडकून पडला की तो देवाचा गुलामच झाला. त्यामुळे देवाला आपणच निर्माण केलेले आहे हेही तो विसरला. देवस्तुतीच्या घाण्याभोवती झापडबंद पद्धतीने बैलफेऱ्या मारत राहिला. या बैलफेऱ्यांची सवय लागल्यामुळे त्याला मानवी विकासाच्या नव्या दिशाच दिसू शकल्या नाहीत.

पुढे वाचा

न्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन

ते म्हणाले की बलात्कार हा एक अश्लाघ्य

गुन्हा आहे.

त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे

मग त्यांच्या लक्षात आले बरेचसे…

म्हणजे ९५ टक्के बलात्कार करणारे पुरुष असतात,

घनिष्ठ सबंध असलेले.

कदाचित नवरासुद्धा.

मग आता नकोच आवाज करायला!

त्यांचे बघा हे असंच आहे.

महागाई पेट्रोलची १ रुपयाने वाढली तेव्हा

त्यांनी रस्त्यावर आंदोलनं केली.

राज्यकर्त्यांना वाटेल ते बोल लावले,

आपला लोकशाही हक्क बजावत ताशेरे झाडले.

आता पेट्रोलने १०० गाठली तर ते म्हणाले, 

“पगार नाही का वाढला

तर पेट्रोल वाढलं तर काय मोठंसं?”

तर ते सारे हा असा लोकशाहीचा सोईस्कर

हक्क बजावत आज राज्यकर्ते झाले

आणि मग…..

पुढे वाचा

न्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता

आज भारताची लोकसंख्याच इतकी आहे की जवळजवळ रोजच बलात्काराची बातमी वाचायला मिळते. बातमी आली की लगेच “पोलीस काय झोपा काढतात का?” अशी ओरड सुरू होते. आपल्याला कल्पना आहे का की संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) स्टँडर्ड्सनुसार दर १००,००० लोकसंख्येला २३० पोलीस असायला हवेत. भारतात पोलिसांची ही संख्या फक्त १२५ आहे. ही संख्या जगातील सर्वात कमी श्रेणीत मोडते. पोलीस कुठेकुठे आणि काय काय सांभाळणार? राजकारणी तर काय विचारता, तापलेल्या तव्यावर पोळी भाजायला एका पायावर तयार! लगेच सनसनाटी विधाने करतात की भारत ही जगाच्या बलात्काराची राजधानी आहे.

पुढे वाचा

बदलते नीतिनियम

माझ्यासाठी जिव्हाळ्याचा असलेला हा विषय गेली दोन वर्षे माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये जहाजावरचे अधिकारी म्हणून काम करण्यासाठी १९ ते २५ या वयोगटातल्या तरुण-तरुणींना व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या एका संस्थेचा प्राचार्य म्हणून मी सध्या काम करतो आहे. या कामाच्या निमित्ताने विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये शिस्तीचे वातावरण प्रस्थापित करणे ही माझी जबाबदारी आहे. यासंदर्भात मला अनेकवेळा नीतिमूल्यांविषयी काही प्रश्न पडतात आणि मी माझ्या सहकार्यांबरोबर या विषयावर सतत चर्चा करीत असतो. आमची ही संस्था निमलष्करी प्रकारचे शिक्षण देत असल्यामुळे तेथे शिस्तही तशाच प्रकारची कडक असावी अशी पारंपरिक विचारधारा आहे.

पुढे वाचा

मला भेटलेले गांधीजी

गांधीजींची माझी पहिली आठवण ३० जानेवारीची आहे. वर्ष १९८८. मी शाळेत होतो. प्राथमिक चौथीचा वर्ग. आईनं शाळेत जाण्यापूर्वी सांगितलं, “आज हुतात्मा दिन आहे. सकाळी अकरा वाजता भोंगा वाजेल. रस्त्यावर, जिथे कुठे असशील तिथे तसाच उभा राहा.” “कशासाठी?” मी विचारलं. “गांधीजींची स्मृती म्हणून,” तिनं सांगितलं. अकरा वाजता भोंगा वाजला. मी होतो तिथे रस्त्यात उभा राहिलो. ही गांधीजींची पहिली आठवण. गांधीजी यानंतर लवकर भेटले नाहीत. आता तीस जानेवारीला अकरा वाजता भोंगा वाजतो का? माहीत नाही. बऱ्याच वर्षांत ऐकला नाही. गांधीजी नाहीत. आईही नाही.

पुढे वाचा