विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

संपादक,
आजचा सुधारक नागपूर
श्री. दिवाकर मोहनी यांनी “कुटुंब’ या शीर्षकाच्या ३ लेखांमध्ये प्रामुख्याने समाजातील कुटुंबरचनेच्या उणीवांचा ऊहापोह करून, कौटुंबिक स्वार्थामुळे समाजाचे अहित होते असा सिद्धांत मांडला आहे, व तो मांडण्यापूर्वी त्यांनी बराच सूक्ष्म मूलभूत मानवीय धारणांचा विचार केल्याचे स्पष्ट जाणवते. कुटुंबाची संकल्पना व कुटुंबातील व्यक्तींच्या स्वार्थावरच कुटुंबाची प्रगती व उत्थान अवलंबून असते या हल्लीच्या सर्वमान्य विचारसरणीमुळे समाजाच्या समस्या अधिक बिकट होतात व त्यांचा अंत होण्याचा सुतराम
संभव नाही असे ते सुचवितात.
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सामाजिक रचनेत-विशेषतः समाजाच्या कुटुंबाधारित विभागात – आमूलाग्र बदल केल्याखेरीज तरणोपाय नाही असा त्यांना विश्वास आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजच्या सुधारकच्या ऑक्टोबर १९९५ च्या अंकात श्री. घनश्याम कमलाकर वाईकर यांचे पत्र वाचले. त्यातील विचार सर्वसाधारणपणे योग्य आहेत. मला तर असे वाटते की बुद्धिवादी आजचा सुधारक मध्ये कोणत्याही धर्मावर कोणत्याही कारणाने ठाम श्रद्धा ठेवणाच्या व्यक्तीचे अवतरण मुखपृष्ठावर किंवा मलपृष्ठावर, व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व मान्य करूनही, एक तत्त्व म्हणून प्रसिद्ध केले जाऊ नये.
मात्र ‘मग बाई ह्या ख्रिस्ती स्मारकात चोर दरवाजाने कशा शिरल्या?’ असा प्रश्न विचारणे हे पंडिता रमाबाईंवर अन्याय करणारे आहे असे मला वाटते. कारण मुळात एका धर्माने केलेल्या अन्यायाचे निराकरण दुसर्यार धर्मात जाऊन म्हणजे धर्मांतर करून होते हा विचारच अपुरा ठरतो आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक,
आजचा सुधारक ह्यांस,
आपल्या सप्टेंबर ९५ च्या अंकाच्या १८३-८४ पानांवर श्री. प्रभाकर नानावटी ह्यांची खरी स्त्रीमुक्ती कशात आहे ह्याविषयी एक प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. त्याविषयी माझे मत पुढीलप्रमाणे :
(१) ह्यापुढे पुरुषांनी स्त्रियांना, किंबहुना सर्वांनीच एकमेकांना अधिक मानाने वागवावे, समतेने वागवावे आणि त्यासाठी आवश्यक तो बदल आपापल्या मनात घडवून आणावा अशी गरज आहे असे माझे म्हणणे आहे. त्यासाठी कोणतीही अट स्त्रीपुरुषांनी घालूनये. उदा. स्त्रिया/पुरुष जास्त पैसे मिळवतील तरच आम्ही त्यांना उचित मान देऊ वगैरे. मला जी सामाजिक दर्जाची समता अपेक्षित आहे ती कोणाच्याही धनार्जनयोग्यतेवर अवलंबून नसणारी अशी आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजच्या सुधारक च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकाच्या मलपृष्ठावर पंडिता रमाबाईंचा एक उतारा छापला आहे. त्यात बाई म्हणतात, “हिंदूधर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळून त्याचे गोडवे गाणाच्या माझ्या पाश्चात्य मित्रांना मी विनंती करते की हिंदुतत्त्वज्ञानावरील व्याख्याने ऐकून भारून जाऊ नका. ह्या हिंदुबुद्धिमत्तेच्या स्मारकाखालचे चोर – दरवाजे उघडून बघा, म्हणजे ह्या उदात्त तत्त्वज्ञानाचे व्यवहारातले रूप दिसून येईल”.
आग्रा येथील ज्या किल्ल्याच्या दर्शनाने हे विचार प्रेरित झाले आहेत त्याचा हिंदु धर्माशी किंवा तत्त्वज्ञानाशी अर्थाअर्थी काही संबंध नसला तरी विचार अगदी योग्य आहेत.
पण समजा एखाद्याने म्हटले की ख्रिस्ती धर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळू नका.

पुढे वाचा

पत्रव्यवहार – प्रतिक्रिया हवी

प्रतिक्रिया हवी
संपादक, आजचा सुधारक यांस,
आजचा सुधारक मधील काही मतांशी मी सहमत होऊ शकत नाही. ज्या मतांशी मी सहमत होऊ शकत नाही त्यांबाबत माझे आकलनही कमी पडत असेल. तरीसुद्धा ज्याशी आपण सहमत नाही ती मते तरी आपल्याला नीट माहिती हवीत ह्या दृष्टीने आपल्या मासिकाची उपयुक्तता निश्चितच आहे.
‘ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?’ या शीर्षकाखाली नागपूरच्या प्रा. श्री. गो. काशीकरांचा एक लेख २८-४-९५च्या तरुण भारतात वाचण्यात आला. माझ्यासारख्या सामान्याला (Layman) या विषयात गम्य नाही; तरीदेखील ह्या लेखासंबंधी आपली प्रतिक्रिया समजून घेण्यास मात्र मी उत्सुक आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि.
आपण आपल्या एका टिपणात (फेब्रु. ९५) इंग्रजीतील व्हस्व दीर्घ उच्चार मराठीत दर्शविण्याकरिता काही खुणा सुचवल्या होत्या त्यावरील माझी प्रतिक्रिया मी आपल्याकडे पाठवली होती. परंतु जागेअभावी ती आपण प्रसिद्ध केली नसावी. आपल्याच विचारांचे सूत्र धरून श्री. दिवाकर मोहनी यांनी लिहिलेले ‘पाठ्यपुस्तक-मंडळाची चमत्कारिक लेखनपद्धती’ हे टिपण मे ९५ च्या अंकात आपण प्रसिद्ध केले त्याबद्दल अभिनंदन. बर्यााच वर्षापूर्वी श्री मोहनी यांचे देवनागरीतील जोडाक्षर-लेखनपद्धती यावरील एक व्याख्यान मी नागपुरातच ऐकले होते. त्याचेही या निमित्ताने मला स्मरण झाले.
श्री मोहनी यांनी हे सर्व या अगोदरच लिहावयास हवे होते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार -पाठ्यपुस्तकमंडळाची चमत्कारिक लेखनपद्धती

श्री. संपादक, आजचा सुधारक यांस,
आपण नागरी लिपीच्या अपर्याप्ततेविषयी एक टिपण नुकतेच आपल्या अंकात प्रसिद्ध केले आहे. ते टिपण वाचून माझ्या मनात विचार आला की कोणत्याही लिपीने हुबेहूब उच्चार दाखविण्याचे कार्य करावे की तत्सदृश उच्चारांचे केवळ स्मरण करून देऊन शब्दांचा अर्थ/आशय व्यक्त करण्याचे कार्य अधिक महत्त्वाचे मानावे? पण ह्या मुद्द्याचा विस्तार न करिता मी आपले लक्ष लिपीसंबंधाच्याच, पण एका दुसर्या? महत्त्वाच्या प्रश्नाकडे वेधतो, आणि त्याचबरोबर शुद्धलेखनाच्या नियमांविषयीही एक बाब आपल्या ध्यानातआणून देतो.
सध्या आपले पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ जी लेखनपद्धती वापरत आहे त्याविषयी मला माझे मत मांडावयाचे आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्रीमान संपादक,
“खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?” या चर्चेत आपण काही मौलिक मुद्द्यांची चर्चा केली आहे. त्या अनुषंगाने माझ्या मनात काही विचार गेल्या काही वर्षांपासून घोळत आहेत. ते व्यक्त करण्याची संधी मला लाभली म्हणून ते येथे नमूद करीत आहे.
स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य दिले पाहिजे? स्वातंत्र्य देणारे तुम्ही आम्ही कोण? खरे तर त्यांनी आपले स्वातंत्र्य उपभोगायला हवे. परंतु कुटुंबव्यवस्थेच्या उगमानंतर मधल्या काळात संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांच्या “योनीला” अवास्तव महत्त्व दिले गेले व त्याभोवतीच सर्व सुसंस्कृत लोक फेर धरून विचार करतात, करत होते व आजही करतआहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि. आजचा सुधारक डिसेंबर ९४ च्या अंकातील माझ्या पत्रावर व प्रत्रातील कवितेवर सर्वेक्षणाचे प्रवर्तक डॉ. र. वि. पंडित व अमरावतीच्या सत्यबाला माहेश्वरी अशा दोघांच्या जानेवारी ९५ च्या अंकात आलेल्या प्रतिक्रियात त्यांनी बरेच आक्षेप घेतले आहेत. तसेच दोघांनीही बरेच असंबद्ध (irrelevant) मुद्दे उपस्थित केले आहेत. उदा. डॉ. पंडित यांनी स्वतःच्या विज्ञाननिष्ठेविषयी दिलेली ग्वाही. या दोघांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देत बसल्यास उत्तर खूपच लांबलचक होईल. म्हणून प्रतिक्रियेतील त्या दोघांच्या असंबद्ध मुद्द्यांसकट सर्व मुद्द्यांचा थोडक्यात परामर्श घेत आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार -आस्तिकतेचे मंडन व खंडन

आजचा सुधारक, जानेवारी १९९५ च्या अंकातील प्रा. रेगे व प्रा. देशपांडे ह्या दोघांचेही लेख वाचले. तुल्यबल युक्तिवादकांचे युक्तिवाद प्रयत्नपूर्वक समजून घेण्यात ‘बौद्धिक व्यायाम झाला व सात्त्विक करमणूकही झाली.
प्रा. रेगे यांचा अनुभव मला सहज समजला. कारण तोच अनुभव मीही घेतलेला आहे. प्रा. देशपांडे यांचा युक्तिवादही मला समजला. कारण स्वानुभव क्षणभर बाजूला सारून मी ही आस्तिकतेच्या विरोधात तोच युक्तिवाद करीन.
‘यो यच्छूद्धः स एव सः’ हे वचन आठवले. प्रा. रेग्यांचा श्रद्धाविषय ‘स्वाभाविक श्रद्धा आहे. प्रा. देशपांड्यांचा श्रद्धाविषय तर्कशुद्ध अश्रद्धा’ हा आहे. त्यामुळे ह्या दोघांचे एकमत होणारच कसे?

पुढे वाचा